Saturday, 21 September 2019

'त्या टकल्यामुळेच माझा देश या अवस्थेत पोहोचलाय' हे तर माझ्या बोलण्यातलं सुरुवातीचं वाक्य असायचं. मग पुढचं तर विचारूच नका.. विशेष हे आहे कि यावेळी मी न्यूरोसर्जरीची MCh हि सुपरस्पेशालिस्ट डिग्री मिळविली होती. म्हणजे एक सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर.. म्हणजे या देशातील मोजक्या 'अतिबुद्धिमान' लोकांपैकी एक! पण या पोस्ट्स टाकताना माझा त्यासाठीचा अभ्यास काय होता?

सोबत जोडलेल्या फोटोंकडे नीट बघा. त्यात एक फोटो आहे ज्यामध्ये मी, २०११ साली फेसबुकवर टाकलेल्या काही पोस्ट्स चे स्क्रीनशॉट्स आहेत.
काय होतं या पोस्टमध्ये आणि त्या टाकणाऱ्या माझ्या मनात?   कमालीचा द्वेष... 'गांधी-नेहरू' म्हणजे या देशाचे दुश्मन असा पक्का समज..

मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाविषयी तर विचारूच नका! 'त्या टकल्यामुळेच माझा देश या अवस्थेत पोहोचलाय' हे तर माझ्या बोलण्यातलं सुरुवातीचं वाक्य असायचं. मग पुढचं तर विचारूच नका.. विशेष हे आहे कि यावेळी मी न्यूरोसर्जरीची MCh हि सुपरस्पेशालिस्ट डिग्री मिळविली होती. म्हणजे एक सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर.. म्हणजे या देशातील मोजक्या 'अतिबुद्धिमान' लोकांपैकी एक! पण या पोस्ट्स टाकताना माझा त्यासाठीचा अभ्यास काय होता?
वैद्यकीय क्षेत्रामधील मोठमोठी पुस्तके शेकड्यांनी वाचून संपवलेला मी गांधी व्यक्तीविषयी बोलताना मात्र आधार घ्यायचो तो ऐकीव माहिती आणि रक्त उसळायला लावणाऱ्या 'टिपिकल बेसलेस‘ काही पुस्तकांचा ...

परंतु 'वाचणारा' माणूस हा नितप्रवाही पाण्यासारखा असतो. त्याचे विचार साठलेल्या पाण्यासारखे वास मारत नाहीत म्हणतात. २०१४ साली नरहर कुरुंदकरांच्या 'जागर' आणि 'शिवरात्र'ने मला गांधींविषयी वेगळा विचार करायची प्रेरणा दिली. आणि तेंव्हापासून एक प्रवास सुरु झालाय जो आता कधीच थांबणार नाही!

मोहनदास करमचंद गांधी..
काय आहे बाबा तुझ्यात? नाही.. तुझं माझं नक्की नातं काय आहे ते तरी सांग! ज्या काळात मी तुला भरभरून शिव्या द्यायचो तेंव्हा सुद्धा तू माझ्याकडे निर्मळ हास्यवदनाने बघायचास.. आज तुला जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय तरी तुझ्या हसण्यात बदल झालेला दिसत नाही.. असा कसा रे गांधीबाबा तू? तुझ्या द्वेष करणाऱ्या मदनमध्ये आणि तुझ्याविषयी होकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या मदनमध्ये तू काहीच भेदभाव ठेवत नाहीस का? तुझ्या त्या हास्याने मला मात्र नित्य खजील करतोयस तू!
जाऊ दे..

बापू...
यंदा तुम्हांला १५० वर्षे पूर्ण होतील.. तुम्ही म्हणायचा, "मी सव्वाशे वर्षे जगणार आहे.."  किती चुकीचं बोलत होता तुम्ही... यंदा तुम्हांला १५० वर्षे पूर्ण होतील. आणि यापुढे कॅलेंडर वरची वर्षे बदलत जातील परंतु तुम्ही या जगाला सोडून जाऊ शकत नाही. मनुष्याच्या मनात जोपर्यंत तमोभाव असणार आहे, तुम्हांला इथे राहावंच लागेल!

बापू..
यंदा तुम्हांला १५० वर्षे पूर्ण होणार या निमित्ताने मी एक संकल्प केलाय.. २ सप्टेंबर (माझा वाढदिवस) ते २ ऑक्टोबर (तुमचा वाढदिवस) हा पूर्ण महिना मी तुम्हांला वाचणार! तसं तर माझं एक आयुष्यसुद्धा पुरं नाही म्हणा तुम्हांला जाणून घेण्यासाठी! पण एक छोटा प्रयत्न समजा माझा!
किंवा माझा आत्मक्लेश समजा हवं तर.. आयुष्याच्या एका टप्प्यावर, अज्ञानाच्या अंधकारातून तुमच्याविषयी केलेल्या पापांसाठी माझं प्रायश्चित्त !!

...डॉ. मदन भिमसेन जाधव, सांगली.