कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा पगडा होता , महात्मा गांधींना ते आदर्श मानीत .महात्मा गांधींना प्रेरणा मानून त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेले .
कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा गांधीजी यांचे 1920 पासून जवळचे संबंध होते. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत आले. त्यावेळी अण्णा मुंबईत गेले होते. त्यावेळी ते महात्मा गांधींच्या भाषणाने प्रभावित झाले. कर्मवीरांनी तळागाळातील व सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण सुलभपणे मिळावे, यासाठी "रयत‘ची स्थापना केली. महात्मा गांधी यांनी "नयी तालीम‘द्वारे आपली ग्रामीण शिक्षणाची संकल्पना मांडली होती. गांधीजींचे मार्गदर्शन घेऊन त्याच तत्त्वावर अण्णांनी 548 व्हॉलंटरी शाळांची स्थापना केली. 20 फेब्रुवारी 1927 मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते साताऱ्यात शाहू बोर्डिंगचे नामकरण केले. 1932 मध्ये मतदार संघावरून गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात मतभेद झाले. गांधीजींनी उपोषण केले. त्यावेळीही अण्णांनी गांधीजींची भेट घेतली होती. पाचगणी येथे महात्मा गांधी आले होते. त्यावेळी आवर्जून कर्मवीरअण्णा तेथे उपस्थित राहिले. कर्मवीरांची तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ पाहून गांधीजींनी हरिजन फंडातून दरवर्षी 500 रुपये अशी सलग तीन वर्षे मदत केली होती. प्रत्यक्ष महात्मा गांधीजीही रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार होते. त्यावेळी इंग्रज सरकारने "महात्मा गांधीजींची ही मदत नाकारा, आम्ही तुम्हाला मदत देतो‘, असे सांगितले होते. पण, ही सरकारची सूचना अण्णांनी धुडकावून लावली होती. अशा अनेक भेटी महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामध्ये झाल्या होत्या.
कर्मवीरांचे कार्य खूप मोठे आहे , त्यांचे उपकार आपल्या पुढील 7 पिढ्याही फिटवू शकणार नाही .
कर्मवीर भाऊराव पाटील ही अशी व्यक्ती होती की, त्यांनी ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर हे कार्य उभे केले आहे, ते समजले, तरच कर्मवीर भाऊरावांसारखा कर्तृत्ववान पुरुष समजू शकेल.
त्यांना कोणतीच गोष्ट लढाई लढल्याशिवाय मिळाली नाही. महात्मा गांधींनी धनिणीच्या बागेला दिलेली भेट ही काही भाऊरावांच्या सहजासहजी पदरी पडली नाही; त्यासाठी एका अर्थाने भाऊरावांना सत्याग्रह करावा लागला.
महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले.
महात्मा गांधींची अस्पृश्यता निवारण चळवळ असो वा सर्वांना(बहुजनांना) शिक्षण, राजकारण , समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण आदी सर्वच गोष्टीवरून एखाद्या जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी न ठेवता ते सर्वांसाठी खुले करण्याचे त्यांचे धोरण असो याला पुण्यातील तथाकथित उच्चवर्णीयांचा तीव्र विरोध होता यातूनच संतापून गोडसेने त्त्यांची हत्या केली पण त्यांनतर तर ही चळवळ अजून वाढली त्याानंतर भाऊरावांनी या हत्येच्या निषेधार्थ आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा केवळ १० वर्षात पूर्ण केली.
No comments:
Post a Comment