मरतो रोज शेतकरी अन्
सैनिकांच्या छातीवर घाव
जळतो आहे भारत कसला
मोदी उत्सव करता राव
.
सरहद्दीवर पाकिस्तानचा
रोजचाच गोळीबार
चीनकडून सीमा रेषेची
सुरू आहे सारासार
कश्मीरमध्ये सुरू आहेत
अतिरेक्यांचे हल्ले
तुमचे मात्र पोकळ
देशभक्तीचे सल्ले
सर्जिकल स्ट्राईक केले सैनिकांनी
पोस्टरवर तुमचे नाव
जळतो आहे भारत कसला
मोदी उत्सव करता राव
शेतकरी जातो फासावर
तुम्ही म्हणता साला
सत्तेचा माज कसा
इतक्या लवकर आला
उद्योगपतींना कर्जमाफी
शेतकऱ्यांना ठेंगा
बोललं कुणी खरं तर
तुमच्या भक्तांचा दंगा
पेट्रोल-डिझेल महाग अन्
शेत मालाचे पडती भाव
जळतो आहे भारत कसला
मोदी उत्सव करता राव
.
दलिताला मारले जातेय
काढून सर्व कपडे
अखलाकचे तर पार
करून टाकले तुकडे
दलित गरीब कष्टकरी
यांना कोणी नाही वाली
जाहिरातबाजीसाठी
मात्र तिजोरी होते खाली
किती बडवणार ढोल आपलेच
किती प्रसिद्धीची हाव
जळतो आहे भारत कसला
मोदी उत्सव करता राव
काळा पैसा येणार होता
त्याचे काय झाले?
खरं सांगा अच्छे दिन
नेमके कुठं गेले?
कुठे गेला छप्पन इंच
छातीचा तो वादा?
तीन वर्षांत काय केलंत
तेवढं सांगा दादा!
बंद करा ढोंग आणि
नाटकी सारे हावभाव
जळतो आहे भारत कसला
मोदी उत्सव करता राव
.
*- शामसुंदर सोन्नर*
फोन : 9594999409
dhanyawad
ReplyDeletedhanyawad
ReplyDeletedhanyawad
ReplyDeletedhanyawad
ReplyDelete