Blog Archive

Thursday, 29 December 2016

३१ डिसेंबरच्या शुभेच्छा आणि आपण

हल्ली हे फ्याड फार जोरात आहे. हिंदूच राहणार , कट्टर हिंदू .. कापून काढू इत्यादी इत्यादी . काही प्रश्न पडले
१. मला ३१ डिसेंबरच्या शुभेच्छा देण्याची सक्ती केली होती काय ? किंवा पाडव्याला शुभेच्छा दिल्यास हत्तीच्या पायाखाली देण्याचा रिवाज होता काय ? म्हणजे जसे श्राद्ध  वगैरे करणे म्यांडेटरी असते तसे ..
२ . मी इतके दिवस हिंदू होतो हे किती जणांना माहित होतं
३. मी इतके दिवस हिंदू आहे यामुळे किती जणांना फरक पडला ?
४. मी उद्या हिंदू राहणार नाही (जबरदस्तीने वगैरे ) याची कितपत शक्यता आहे ?
५. मी उद्या हिंदू नाही राहिलो (किंबहुना नाहीच राहिलो ) तर किती जणांना फरक पडेल ?
६. मला एवढाच हिंदू असल्याचा पुळका आहे तर मी फेसबुक नावाचे नॉनहिंदू प्रोडक्ट का वापरतो ?
७. भारताने ( पक्षी हिंदूंनी ) जगाला शून्य सोडून काय दिले आहे हे चटकन ( आणि गुगलुनही) का सापडत नाही ?
८. मी नॉनहिंदू कंपनी मध्ये काम करतो , माझा क्लायंट नॉनहिंदू आहे थोडक्यात माझी रोजीरोटी नॉनहिंदू आहे , मग मी काय करावे ? गोमुत्र पिऊन काम भागेल काय ?
९. माझ्या भोवतालची ९९.९९% गोष्ट नॉनहिंदू आहे, उदा.फोन ,कम्प्युटर , टीव्ही , फ्यान , गाडी ... अंडरवेयर. इतकंच काय , बऱ्याचदा आजारी पडल्यावर मला गैरहिंदू औषधांचाच सहारा घ्यावा लागला. एलीयोपथी आणि आधुनिक उपचार भारतात येण्यापूर्वी भारताचा डेथरेट काय होता हे एकदा चेकवावे.
१०. आपल्याकडे लाकडी फाळ आणि जनावरांच्या सहाय्याने शेती करत. लोखंडी फाळ वापरल्यास विषबाधा होते असा एक हिंदू समज होता. आधुनिक उपकरणेही पाशिमात्य देण आहे. तीही त्यागावी काय ??

थोडक्यात प्रामाणिकपणे १००% कट्टर हिंदू म्हणून जगायचे असल्यास माझ्याकडे (माझ्यालेखी रद्दी असणारे ) वेद, (बिनकामाची) गीता , आणि तो भारतीयांनी दिलेला शून्य .. इतकेच हातात राहील . मग मी अश्मयुगीन जीवन जगेन. चालेल का मला ? बाकी यात हिंदू असल्याची लाज वाटणे किंवा कमीपणा वाटणे असली कुठलीही भावना नाही ही आणि एक बळेच थोपलेली रट असते. म्हणजे हेच ठरवणार, आम्ही सांगतो त्यात अभिमान बाळगा, अन्यथा तुम्हाला त्याची शरम / लाज वाटते वगैरे.

असो, हल्ली तसाही पंचवार्षिक मूर्खोत्सव चालू राहणार आहे.  आणि हे अस काही ऐकवल्यावर बिनबुडाच्या धार्मिक अस्मितेच्या बाता हाणायच्या :)

अरे गर्वसे कहो  ..

.. पोस्टेड फ्रॉम फेसबुक ( अ मार्क झुकरबर्ग ज्यु कंपनी )

No comments:

Post a Comment