Friday, 11 September 2020

#स्वामी_अग्निवेश एक निर्मळ माणूस

#स्वामी_अग्निवेश यांचे निधन 
एक खूप मोठा आणि निर्मळ माणूस आपण गमावला आहे
काही वर्षापूर्वी गांधीभवन मध्ये त्यांची भेट झाली होती, खूप छान बोलले , त्यावेळी एक मित्र त्यांच्या पाया पडायला गेला तर त्यांनी त्याला अडवले आणि गळा भेट घेतली
तारीख अजून ही आठवते 01 ऑक्टोबर 2016, त्यांच्यासोबत त्यांना पुस्तक देतांना फोटो ही काढला होता , त्यांनी तिथे जे भाषण दिले ते अजूनही आठवते
दिल्लीत गेलो तेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते दिल्लीत नव्हते

धर्माचा मानव कल्याणासाठी विधायक उपयोग त्यांनी केला, धर्माच्या नावावर बाजार करणाऱ्या, द्वेष पसर्वणार्या वातावरणात धर्माचा खरा अर्थ त्यांनी सांगितला आणि जगला
अनेक धर्मांध लोकांचे त्यांच्यामुळे धाबे दणाणले होते त्या लोकांनी त्यांच्यावर हल्लेही केले पण ते लढत राहिले गरीबांसाठी
Youtube वर जाऊन त्यांचे काही एपिसोडेस पहा बरेच काही शिकायला मिळेल
त्यांना तर आपण परत आणू शकत नाही पण त्यांचे विधायक विचार आपण ठिकठिकाणी पोहचवू शकतो त्याचा प्रयत्न करूया

संकेत मुनोत
11-sep-2020

Thursday, 10 September 2020

विनोबा- अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठ नाव...

आज आचार्य विनोबांची जयंती 
अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठ नाव...
जगातील प्रमुख 22 भाषा त्यांना अवगत होत्या आणि सर्व धर्मांबद्दल सखोल अभ्यास असणारे आणि ते सोप्पे करून सांगणारे त्यावर त्यांचे साहित्य आहे
तरुणपणी त्यांच्या मनात दोन स्वप्ने होती एक तर बंगालच्या सशस्त्र क्रांतिकारकांना जोडून सशस्त्र क्रांती करायची किंवा हिमालयात जाऊन अध्यात्मिक क्रांती करायची
 पण त्याच वेळी महात्मा गांधींचा एक लेख त्यांच्या वाचनात आला
त्यांना हिमालयाची शांती आणि बंगालची क्रांती दोन्हीचा संगम तिथे दिसला , ते त्यांना भेटले आणि त्यांनतर ते त्यांना जोडले गेले ते कायमचेच..
 पुढे याच विनोबांनी चंबळ मधील एकदम अवघड समजल्या जाणाऱ्या डाकूंचे हृदयपरिवर्तन घडवून आणले।
जिथे माणूस एक तुकडा जमिनीसाठी स्वतःच्या सख्ख्या नातेवकाशी भांडायला ही कमी करत नाही तिथे विनोबांच्या प्रेरणेने लाखो एकर जमिनी लोकांनी हरीजनांसाठी दान केल्या हे जगात पहिल्यांदाच घडले होते.
 जगातील सर्व प्रमुख धर्मग्रन्थाचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यावर त्यांनी लिहलेले ग्रंथ त्या-त्या धर्मात आणि इतर धर्मात ही मार्गदर्शक ठरले 
उदा- जैन धर्मातील अनेक पंथाच्या आचार्यांना आणि अभ्यासकांना एकत्र बसवून त्यांनी 32 आगम चा सार काढला ज्याचे नाव समणसुत्तम 
हा ग्रंथ फक्त जैन धर्मियांनाच नव्हे तर जगात ज्यांना कुणाला जैन धर्म जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे.
त्यांनी फक्त धार्मिक आणि साहित्यिक उंचीचं नाही गाठली तर स्वतः शेवटपर्यँत कष्टाची कार्ये ही करत राहिले
ज्या कामांना खालच्या दर्जाची कामे म्हटले जाई आणि जी एका कुठल्या तरी जातिकडून केली जात ती विनोबांनी स्वतः तर केलीच पण लाखो लोकांना करायला लावली.ते शौचालय साफ करणे असो, शेती करणे असो वा इतर काही...

आत्ता जेवढे आठवले तेवढे लिहले अजूनही खूप लिहण्याची इच्छा आहे पण ऑफिस ची वेळ झाली 

11-sep-2019

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2606626132721755&id=100001231821936

चुकभुल क्षमस्व
संकेत मुनोत