काय आहे हिंदू 🇮🇳
हिंदू हा स्वाभिमानी ☀आणि शूर ☀असतो…. लाचार 😨आणि भिकमंगा 😷नसतो…
स्वत:चा प्राण 💫देईल पण मला सोडून द्या म्हणून भिक 🙈मागणार नाही…
शुरवीर छत्रपती शंभू राजाने प्राण💎 दिले पण कोणाला शरण नाही गेले तर
ब्रिटीोशांकडे दयेची भिक📝 झोळीत घेवून आलेले स्वतःला वीर म्हृणु लागले….
हिंदू हा शांतता 🌞प्रेमी आणि दिलदार🌻 असतो… आणि निशस्त्र व्यक्तीवर आक्रमण🐍 कधीच करत नाही…
मोहम्मद 👹घोरीने पृथ्वीराजला👑आणि👹 माथेफिरूने गांधीजींना 🌞धोका🐍 देवून मारले….
श्रीकृष्ण 📙गीतेमध्ये म्हणतात सर्व प्राण्यामध्ये देव आहे आणि ज्याला तो दिसतो तोच मनुष्य म्हणण्याच्या लायकीचा आहे….
आणि अशा हिंदू धर्माचा 🇮🇳मला अभिमान आहे…
कुठलाही राजकीय पक्ष हिंदू🚩 पुरुषाला धर्माच्या नावाखाली वैचारिक गुलाम 😇बनवू शकत नाही…. जे बनतात ते मुळात हिंदू😷 नसतात….
माझा धर्म स्वातंत्र्य⛅ शिकवतो, पंच तत्वाचे आभार मानायला शिकवतो….
नवरात्र आम्ही मातेला 🙏प्रणाम करतो…. एका जमिनीच्या तुकड्याला माता म्हणून त्या शक्तीचा अपमान करायला माझा धर्म शिकवत नाही… वसुधैव कुटुंबकम, पृथ्वीला माता मानतो आम्ही, जमिनीच्या तुकड्याला नाही….
"संविधान"📘 हे आम्ही सर्व धर्मियांनी मिळून शांततेने राहण्यासाठी बनवलेले आहे…. यात माझा धर्म 🚩🇩🇿मी कधीच आणणार नाही… मोठ्याने लहानाला द्यायचे 🌺💐असते आणि तो दिलदारपणा आणि संस्कार "संविधानात" 📘आम्ही दाखवतो…
दुसर्याचे हिसकावून घेवून खायला माझा धर्म शिकवत नाही🐍… इतरांची निंदा❌, परधर्मावर टीका करणे माझा धर्म शिकवत❌ नाही, तर स्वत:मध्ये😃 बदल करायला आणि कर्म करायला 👍(गीता) माझा धर्म शिकवतो….
अशा महान धर्मात मी जन्माला आलोय हे माझे भाग्य🌞…
स्वार्थ, द्वेष, आक्रमकपणा, फुकाचा धर्म अभिमान करणारे हिंदू नसतात….
---- DNA तपासा रे अशा लोकांचे
🇮🇳जयहिंद 🇮🇳
मुळ कविता-अजय मक्तेदार
एडिटिंग and ईफेक्टस-संकेत मुनोत
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Tuesday, 27 January 2015
स्वाभिमान आहे हिंदु असल्याचा
थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर
थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर फक्त थोडेसे ते कसे कमी करायचे ते पाहु या 😌😌अंधानुसरण😌😌
मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला , तो याप्रमाणे...
एका खोली मध्ये 8-10 माकडांना 🐒🐒🐒🐒🐒ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी 🔗सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर केळीचा🍌🍌 एक गुच्छा लटकत ठेवण्यात आला.
थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या🐒🍌🐒 गुच्छ्याकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करतो , तोच त्याच्या अंगावर थंडगार🐒🚿 पाणी पड़ते व इतर उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारा माकड खाली परत येतो.
दुसऱ्या दिवशी दूसरा एक माकड 🐒असाच प्रयत्न करतो , तेव्हा सुद्धा त्याचा अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर थंडगार पाणी पड़ते.🚿
असे सतत 3-4 दिवस📆 घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की , 🙊🍌🚿केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेव्हा पुन्हा एक माकड केळीसाठीशिडी चढ़ण्याचा प्रयत्न करतो , इतर सगळे माकड मीळून त्याला झोडतात त्यामुळे तो माकड परत येवून कोपर्यात बसतो🐒, यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.🚿❎
पुढील 3-4 दिवस असे सतत घडते, जो कोणी माकड शिडीकडे वळला की इतर सर्व माकड मीळून👊👊👊👊🐒👊👊👊👊 मारायचे.अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े 🍌बघायचा👀 सुद्धा नाही.तेव्हा मग वैज्ञानिकांनी पाणी🚿❎ घालनेच बंद केले.
मग वैज्ञानीकांनी त्या माकडांपैकी एक माकड 🐒बाहेर काढले आणि दुसरे एक नविन माकड 🐒आत टाकले. या नविन माकडाने केळी 🍌नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुन्या सर्व माकडं मीळून त्या नविन माकडाला👊👊👊👊👊👊 झोडतात.
दुसर्या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक🐒🐒🐒 माकड बाहेर काढून नविन एक माकड आत टाकतात. हा माकड देखिल केळी🍌🍌 बघून शिडी 🔗चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकड त्याला 👊👊👊झोड़तात. पण यात विशेष हे असते की काल आलेला नविन माकड सुद्धा या झोडनाऱ्या माकडात 🐒🐒🐒शामिल असतो ज्याच्या अंगावर कधी ही पाणी पडलेले नसते.
या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नविन माकड आत घालतात. 📆आणि रोज तोच प्रकार घडतो. नविन माकड🐒 केळीसाठी 🍌🔗शिडीकड़े वळला की उर्वरित सर्व माकड त्याला👊👊👊👊 मारतात. मारणार्या माकडांमध्ये जुने माकड🐒 ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत🙊. त्यांच्यासोबतच नविन माकडं ही शामिल होती ज्यांनी कधीही पाणी अंगावर झेलले नव्हते🙈. अशाप्रकारे दररोज एक एक करून सर्व जुने माकड बाहेर काढून नविन माकड आत घालण्यात येतात. प्रत्येक नविन🐒 येणाऱ्या माकडाला शिडी 🔗चढ़न्याचा प्रयत्न केल्यास 👊मार पडत असते.
आता मात्र खोलीमध्ये सगळे नविन माकड 🙈🙈असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर पानी🚿❎👀 पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो. पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़न्याचा प्रयत्न केला की इतर सर्व माकड त्याला 👊👊👊मारतात.कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते , आपण का मारत आहोत याचे मुळ कारण माहीत नसून🙈 सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला 👊👊👊मारायचे.बस्स!!!
बोध:-
माणसाचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो काही माणसाबद्दल गैरसमज बाळगतो पण आपल्याला त्यांचे मुळ कारण माहितच नसते. कारण त्या रुढी परंपरा वा अफवा पसरविणे सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो. त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटनारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात आणि 99%वेळा खोटी असतात . तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे🙈🐵🐒 "अंधानुसरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ति समजतो.
मित्रांनो , म्हणून कोणतीही गोष्ट , रुढी , परंपरा यांच्या मागचे कारण निट समजून , ते वैज्ञानिकदृष्टया , तार्किकदृष्टया खरे आहेत किंवा नाही हे जानुन घेतल्या शिवाय त्यावर विश्वास करू नये. फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग धिक्कार आहे आपण घेतलेल्या शिक्षणाचा....
ऊदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही. जवळचच ऊदाहरण घ्यायच तर गांधींच घेऊ
ज्याला आईनस्टाईन पासुन ओबामापर्यंत व बाबा आमटेपासुन मलालापर्यंत पुर्ण जग आदर्श मानते त्याला आपण गोडसेची खोटीनाटक पाहुन व काही भंपक लोकांचे पुस्तक वाचुन चुकीच समजतो त्याच्याबद्दल सत्य पडताळुन पाहण्यात आपणास रस नाही
मग माकडंच बरी...
🐵🐵🐵🐵🐵🐵🐵
हेच एवढसं अंतर आहे चला तर मग ते कमी करुया तर. थोरपणाकडे वाटचाल करुया
©संकेत मुनोत
Saturday, 10 January 2015
गांधीजी आठवणी
स्वाती ठकार यांचे वाल वरून ..... शाळकरी वयाचे रेड्डी आंध्रप्रदेशातून तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नसताना निव्वळ गांधीजींच्या जवळ राहायचे म्हणून त्याना पत्र पाठवून साबरमतीला रेल्वेने गेले .गांधीजीनी महादेवभाईना सांगितले होते या मुलाला तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः त्याला आणायला जा .महादेवभाईनी ते काम तिसऱ्याला सांगितले ..तिसऱ्याने चौथ्याला ..कुणीच या मुलाला आणायला गेला नाही .सकाळी आश्रमात येणारा हा मुलगा दुपारी एक वाजता पोहोचला .गांधीजींच्या लक्षात आले .काकाना जेवायला खायला देऊन विश्रांती घ्यायला सांगितली आणि महादेवभाईना शांत स्वरात एवढंच म्हणाले जर वल्लभभाई किंवा जवाहरलाल येणार असता तर स्वतः जातीनं गेला असतात .हा मुलगा जवाहरलाल इतकाच मला महत्वाचा आहे. एकदा खेडा जिल्ह्यातून काही शेतकरी तहसीलदाराच्या जुलुम आणि वाढीव साऱ्याबद्दल तक्रार करायला आले होते.त्यातला एकजण दर दोन शब्दामागे संतापाने शिव्या देत होता .महादेवभाई अस्वस्थ झाले.त्यानी लोकाना त्याला बाहेर घेऊन जायला सांगितले .पण बापूनी त्याला थांबवून पुन्हा बोलतं केलं.सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली .नंतर ते महादेवभाईना म्हणाले .त्याच्या शिव्या या त्याच्यावर झालेल्या अन्यायातून आल्या होत्या .ही साधी माणसं आहेत .त्याना संतापाच्या वेळी व्यक्तव्हायला उपयुक्त असणारे शब्द आहेत ते .तिथं भावना समजून घ्यायची असते .शब्दांचा कीस पाडत बसू नये. वल्लभभाईंची पत्नी अकाली गेली .त्यांची मुलगी ते गांधीजींच्याजवळ सोडून गेले.ती बापुंची खूप लाडकी होती .तिला रंगीत बांगड्या हव्या होत्या ,बापू रंगीत काचेच्या बांगड्या घालण्याच्या विरूद्ध होते .मोठ्या बायका रंगीत बांगड्या घालत नव्हत्या .पण त्या मुलीसाठी त्यानी रंगीत बांगड्या आणल्या .तेव्हा मोठ्या बायकानी याबद्दल विचारलं .ते म्हणाले तिच्या मनावर ताबा यायला काही काळ जावा लागेल .असे अनेक किस्से गांधीजींच्या बद्दल ऐकले .लहान मुलंही बापूंबरोबर भांडत असत .त्यांच्या सोबत फिरायला जात .चालण्याची शर्यत लावत .गांधीजींच्याजवळ राहण्यासाठी आश्रमात विश्रांतीला गांधीवादी ,कम्युनिष्ट ,हिंदुत्ववादी ,दलित सर्वजण येत. गांधीजींबरोबर मनसोक्त भांडून ,वादावादी करून पुन्हा विश्रांतीला येण्याची धमकी देऊन जात
संदर्भ- https://www.facebook.com/groups/mahatmagandhibest/
Saturday, 3 January 2015
सावरकर माफीनामा
भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य 🇮🇳मिळावे म्हणून कोट्यावधी लोकांनी ब्रिटीशांच्या 👊🔫गोळ्या व लाठ्या खावून देशासाठी आपले सर्वस्व दिले. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्या वा जन्मठेप भोगणार्या भगतसिंग व लाखो तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती.
पण तसे कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:
"मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्या सरकारचा जयजयकार करील."
"एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."
"माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"
१४ नोव्हेंबर १९१३
सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!
संदर्भ:
माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
मुंबई चौफेर, ५ मे २००२
http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm
सत्य वाचा व शेयर करा