थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर फक्त थोडेसे ते कसे कमी करायचे ते पाहु या 😌😌अंधानुसरण😌😌
मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला , तो याप्रमाणे...
एका खोली मध्ये 8-10 माकडांना 🐒🐒🐒🐒🐒ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी 🔗सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर केळीचा🍌🍌 एक गुच्छा लटकत ठेवण्यात आला.
थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या🐒🍌🐒 गुच्छ्याकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करतो , तोच त्याच्या अंगावर थंडगार🐒🚿 पाणी पड़ते व इतर उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारा माकड खाली परत येतो.
दुसऱ्या दिवशी दूसरा एक माकड 🐒असाच प्रयत्न करतो , तेव्हा सुद्धा त्याचा अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर थंडगार पाणी पड़ते.🚿
असे सतत 3-4 दिवस📆 घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की , 🙊🍌🚿केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेव्हा पुन्हा एक माकड केळीसाठीशिडी चढ़ण्याचा प्रयत्न करतो , इतर सगळे माकड मीळून त्याला झोडतात त्यामुळे तो माकड परत येवून कोपर्यात बसतो🐒, यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.🚿❎
पुढील 3-4 दिवस असे सतत घडते, जो कोणी माकड शिडीकडे वळला की इतर सर्व माकड मीळून👊👊👊👊🐒👊👊👊👊 मारायचे.अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े 🍌बघायचा👀 सुद्धा नाही.तेव्हा मग वैज्ञानिकांनी पाणी🚿❎ घालनेच बंद केले.
मग वैज्ञानीकांनी त्या माकडांपैकी एक माकड 🐒बाहेर काढले आणि दुसरे एक नविन माकड 🐒आत टाकले. या नविन माकडाने केळी 🍌नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुन्या सर्व माकडं मीळून त्या नविन माकडाला👊👊👊👊👊👊 झोडतात.
दुसर्या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक🐒🐒🐒 माकड बाहेर काढून नविन एक माकड आत टाकतात. हा माकड देखिल केळी🍌🍌 बघून शिडी 🔗चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकड त्याला 👊👊👊झोड़तात. पण यात विशेष हे असते की काल आलेला नविन माकड सुद्धा या झोडनाऱ्या माकडात 🐒🐒🐒शामिल असतो ज्याच्या अंगावर कधी ही पाणी पडलेले नसते.
या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नविन माकड आत घालतात. 📆आणि रोज तोच प्रकार घडतो. नविन माकड🐒 केळीसाठी 🍌🔗शिडीकड़े वळला की उर्वरित सर्व माकड त्याला👊👊👊👊 मारतात. मारणार्या माकडांमध्ये जुने माकड🐒 ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत🙊. त्यांच्यासोबतच नविन माकडं ही शामिल होती ज्यांनी कधीही पाणी अंगावर झेलले नव्हते🙈. अशाप्रकारे दररोज एक एक करून सर्व जुने माकड बाहेर काढून नविन माकड आत घालण्यात येतात. प्रत्येक नविन🐒 येणाऱ्या माकडाला शिडी 🔗चढ़न्याचा प्रयत्न केल्यास 👊मार पडत असते.
आता मात्र खोलीमध्ये सगळे नविन माकड 🙈🙈असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर पानी🚿❎👀 पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो. पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़न्याचा प्रयत्न केला की इतर सर्व माकड त्याला 👊👊👊मारतात.कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते , आपण का मारत आहोत याचे मुळ कारण माहीत नसून🙈 सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला 👊👊👊मारायचे.बस्स!!!
बोध:-
माणसाचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो काही माणसाबद्दल गैरसमज बाळगतो पण आपल्याला त्यांचे मुळ कारण माहितच नसते. कारण त्या रुढी परंपरा वा अफवा पसरविणे सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो. त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटनारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात आणि 99%वेळा खोटी असतात . तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे🙈🐵🐒 "अंधानुसरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ति समजतो.
मित्रांनो , म्हणून कोणतीही गोष्ट , रुढी , परंपरा यांच्या मागचे कारण निट समजून , ते वैज्ञानिकदृष्टया , तार्किकदृष्टया खरे आहेत किंवा नाही हे जानुन घेतल्या शिवाय त्यावर विश्वास करू नये. फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग धिक्कार आहे आपण घेतलेल्या शिक्षणाचा....
ऊदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही. जवळचच ऊदाहरण घ्यायच तर गांधींच घेऊ
ज्याला आईनस्टाईन पासुन ओबामापर्यंत व बाबा आमटेपासुन मलालापर्यंत पुर्ण जग आदर्श मानते त्याला आपण गोडसेची खोटीनाटक पाहुन व काही भंपक लोकांचे पुस्तक वाचुन चुकीच समजतो त्याच्याबद्दल सत्य पडताळुन पाहण्यात आपणास रस नाही
मग माकडंच बरी...
🐵🐵🐵🐵🐵🐵🐵
हेच एवढसं अंतर आहे चला तर मग ते कमी करुया तर. थोरपणाकडे वाटचाल करुया
©संकेत मुनोत
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Tuesday, 27 January 2015
थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment