Friday, 5 June 2015

चर्चा

चर्चा
आज जास्त होणार नाही पण काही खास वादांना प्रतिवाद, प्रश्नांना उत्तरे, मुद्द्यांना प्रतिमुद्दे आणि खरी माहिति सांगत आहे. नीट विचार करा.
1) स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळची परिस्थिति अत्यंत विस्फोटक होती आणि अत्याचार मुसलमान आणि हिंदूंनी दोघांनी केले. गांधीजींचे उपोषण दिल्लीतील दंगल शमावी यासाठी होते ना कि पाकिस्तानला 55 कोटि देण्यासाठी नव्हतेच.

2) शिवाजी महाराजांनी रमजान निवडला कारण त्यांना मुसलमानांच्या धर्माचा द्वेष होता असे नाही. जो कोणी असे सांगत असेल त्याल पहिल्यांदा नीट पारखून घ्या. रमजानचा उपास रात्री सोडतात आणि पहाटेच जेऊन घेतात. त्यावेळी बहुतांश पेंगलेले आणि गाफिल असतात म्हणुनच लाल महालात मुठभर मावळ्यांनीशी घुसून शिवाजी महाराज ती मोहीम फत्ते करु शकले. महाराजांनी काही मशीदी पाडल्याचे म्हणता आणि बांधल्याही हे ही मान्य करता, तरी ते औरंगजेबासारखे धर्मांध नव्हते हे आमचे म्हणणे आहे असेल तर सिद्ध करुन दाखवावे.

3) हज ची सबसीडी कधीच बंद झाली. पण ती जेव्हा होती तो पैसा विमान कंपनींना दिला जायचा ना कि मुसलमानांना. हजची यात्रा स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करावी असे इस्लाम म्हणतो म्हणून बहुसंख्य मुसलमानच त्या सबसीडीच्या विरोधात होते. म्हणून ती बंद झाल्याबरोबर मुसलमानांनीच आनंद साजरा केला, त्याला विरोध करणे तर दूरच.

4) आमच्यासाठी सर्व धर्मांध एकसारखेच! पण ते तुम्हाला कळायचे नाही कारण विज्ञानवादी तर्कनिष्ठ बनण्यापेक्षा ते धर्मांध तर आम्ही त्याहुन धर्मांध बनून दाखवू यातच आपल्याला स्वारस्य आहे.

5) सावरकरांचे अंदमानानंतरचे कार्य का सांगितले जात नाही??? सावरकरांविषयी काहिही बोलले तरी अंगाचा तीळपापड होतो, पण गांधीजि, नेहरु आदि लोकांवर आगपाखड करायला किंचितही मागेपुढे पाहत नाही. का? गांधीजी, नेहरुजी, कॉ.शहिद  भगतसिंग यांना नावे ठेवायची असेल तर ठेवा पण आधी त्यांना व्यवस्थित समजून तर घ्या.

No comments:

Post a Comment