🔴🔴समज गैरसमज 🔴🔴
गांधी ,ज्या माणसाला लहाणपणी मी टकल्या , म्हातार्या , मजबूरी वगैरे काय काय म्हणायचो त्याच्याविषयी थोडेसे.
सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त🐍🐍 मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 🔫हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण📢 केले जाते आहे.
कुणाला फाळणी, पन्नास कोटी, मुस्लिमअनुनय अशी करणे सापडतात तर कुणाला पुणे करार आठवतो. गांधीला झोडपण्यासाठी काहीना भगतसिंग, सुभाषबाबू, सरदार पटेल ह्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवावी लागते तर कुणाला आंबेडकरांचा खांद्याची गरज भासते.
आपल्या शेवटच्या भाषणात📣 आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे 📝नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे विकृत लोक सांगतात. हे सर्व खोटे मुद्दे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे.
गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे-
१) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते.
✅२) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा होता.✅
३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही. ✅
४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.✅
५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.✅
६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. ✅
७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.✅ ९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते. ✅१०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.✅
११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती. ✅ नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही
गांधीजींनी हे राष्ट्र शतकानुशतके राजकीयदृष्ट्या झोपलेल्या बहुजनांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करून लोकशाही स्थापित करून त्यांच्या हाती हे सोपवले. त्यामुळे सनातनी चिडले होते .आणि हत्या त्यामुृळे झाली होती.
आइनस्टाईन म्हणाला होता, की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना #राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी #सुभाषचंद्र_बोसच होते
शहीदेआजम #भगतसिंगांनीही तुरुंगामध्ये ऊपोषण केले होते काही मतभेद असले तरी त्यांच्यामध्येही गांधीजीबद्दल आदरच होता
पण ज्या गोडसेनी वा माफीवीरांनी ना #अहिंसक ना #सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
#मुस्लिमांवरील प्रभाव-
अफगाणिस्तान-पख्तुनिस्तान-नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स येथील प्रदेश जेथे प्रत्येक घरामध्ये बंदुका, मशीनगन्स, हँडग्रेनेड्स होत्या, वयाच्या 10-12 वर्षांपासून प्रत्येक मुलाला खांद्यावर बंदूक बाळगायची सहज सवय होती,
अलेक्झांडरपासून ते अरबांपर्यंत, मोगलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत आणि सोव्हिएत युनियनपासून ते अमेरिकेपर्यंत अनेकांनी या प्रदेशाला (म्हणजेच येथील डोंगरी-वाळवंटी जीवन जगणा-या टोळ्यांना) आपल्या कब्जात आणण्याचे प्रयत्न केले. पण येथील लोकांची स्वाभिमानाची भावना इतकी तीव्र, इतकी उग्र आणि इतकी तेजस्वी की, त्यांना कुणीही नामोहरम करू शकलेले नाही. त्या बंदुका, त्या मशीनगन्स, ती बेदरकारी हे सर्व त्या स्वाभिमानाचे आविष्कार. खांद्यावरची मशीनगन म्हणजे, पठाणी टोळ्यांच्या पुरुषार्थाने झळझळणारे प्रतीक.बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबातील, जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य.
त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता,
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
मित्रांनो गांधी समजुनच घ्यायचे असतील तर डॉ #अभय_बंग, #प्रकाश_बाबा_आमटे, #दलाई_लामा, #सत्यार्थी #मलाला, #मार्टिन_ल्युथर_किंग असे कोट्यावधी लोक ज्यांनी गांधीविचारातुन आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्यासोबत काही क्षण राहुन पहा मंडेला,आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी, य दि फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर(जगन फडणीस), freedome at midnight वाचा
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका
गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..
नास्तिक असो वा आस्तिक , स्त्री असो वा पुरुष , हिंदु असो वा मुस्लिम वा कोणत्याही धर्माचा, शेतकरी असो वा व्यापारी , ऊच्च शिक्षित असो वा अशिक्षित, लहान/तरुण असो वा वयस्कर त्याकाळात अशा कोट्यावधी लोकांचा लोकमान्य नेता गांधी हेच होते
मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते
असेच अनेक जगभरातील गांधीजीना मानणारे समविचारी मित्र खालील Facebook ग्रुपवर मिळतील
Mahatma Gandhi Global Friends
प्रश्न विचारा चिकित्सा करा
संकेत मुनोत
संदर्भ-
1-Let's kill Gandhi- Tushar Gandhi
2-Freedome at midnight
3-Mahatmyachi akher- jagan fadnis
4-justice D.G,khosala
5- प्रो.डॉ. अशोक चौसाळकर ( राजनैतिक विश्लेषक ) यांचा लेख -दै लोकमत
http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=6518937-Khosala G.D. -The murder of Mahatma and other cases from judge's Notebook
6-pyarelal :mahatma Gandhi- The Last phase नथुरामायण-य.दि.फडके
7--गोपाळ गोडसे - 55कोटीचे बळी , मी न बोलतोय-न.गोडसे, गांधीगोंधळ-वि.दा.सावरकर
8-आफळे की मनभडंग कहाणी-चारुदत्त आफळे
9-अभय बंग, कुमार सप्तर्षी, तुषार गांधी ,अन्वर राजन, सदानंद मोरे , संजय सोनवणी , सुगन बरंत , अजय मक्तेदार, संतोष लहामगे, प्रसाद वांजळे, लोकेश शेवडे, राहुल रांजणगावकर, मच्छिंद्र गोजामे , ऊत्तम कांबळे, आनंद पटवर्धन यांच्याशी झालेली चर्चा अन्य अनेक मित्रांचेही आभार
10- फेसबुकवर , whatsapp व अन्यत्र फिरणारे आणि अफवा पसरवणारे गांधीजी प्रतीचे लाखोे विकृत लेख ज्यांना ऊत्तर देताना वरील प्रश्न व ऊत्तरे सुचली
11-नरहर कुरुंदकर , कुमार केतकर
सत्य शेयर करा