Monday, 19 October 2015

अहिंसा आणि गांधीजी

अहिंसा आणि गांधीजी
लेखक-आचार्य जे. बी. कृपलानी

अहिंसा दोन प्रकारची आहे. एक येशू ख्रिस्ताची. तिला सामाजिक परिमाण नाही. आत्म्याची मुक्ती हे तिचं उद्दिष्ट. समाजातील वाईट बाबी सुधारण्यासाठी, समानतेच्या लढ्यासाठी, परदेशी सत्तेपासून मुक्त होण्यासाठी ती वापरली जात नाही. पॅलेस्टिन त्यावेळी रोमन साम्राज्याखाली होतं, पण ख्रिस्ताला त्याविषयी काही देणंघेणं नव्हतं. त्याची अहिंसा ही शुध्द, साधी होती. तो अहिंसक प्रतिकार नव्हता. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आथिर्क अन्याय दूर करण्यासाठी साधन म्हणून अहिंसेचा वापर केला.
गांधीजींच्या अनेक कट्टर अनुयायांनाही हा फरक कळलेला नाही.
दुसरं एक उदाहरण देतो. ख्रिस्त म्हणत असे, 'दुष्टप्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला'.
गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, 'का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.' जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे.'
-आचार्य जे. बी. कृपलानी

कृपलानींची गांधींशी पहिली भेट १९१५ सालची. त्यावेळी द. आफ्रिकेतून गांधीजी भारतात नुकतेच आले होते. त्यांना फारसं कुणी ओळखतही नव्हतं. रवींदनाथ टागोरांचा शांतिनिकेतन आश्म पाहण्यासाठी ते आले होते. त्यावेळी कृपलानी मुजफ्फरपूर येथील सरकारी कॉलेजात इतिहासाचे प्राध्यापक होते. द.आफ्रिकेत गांधींनी केलेल्या असहकार चळवळीविषयी कुतूहल होतं म्हणून कृपलानी आश्ामात त्यांना भेटायला गेले. अनेक बाबतीत हा माणूस चाकोरीबाहेरचा आहे, हे त्यांचं प्रथमदर्शनी मत.
' कपड्यांपासून आहारापर्यंत त्यांचं सगळंच वेगळं होतं. आ.श्ामात पहिल्यांदाच आलेला हा माणूस, पण पुढच्या सातच दिवसांत त्यानं तिथलं वातावरणच बदलून टाकलं. आश्ामात शिजवलं जात असलेलं अन्न आरोग्यदायी नाही आणि जिथं ते शिजवलं जातं तो परिसरही अनारोग्याला निमंत्रण आहे, हे त्यांना दिसलं. आश्ामवासी स्वत: स्वच्छतेची कामं न करता त्यासाठी नोकरांवर विसंबून राहतात, म्हणून असं होतं, हे त्यांचं निदान. त्यांनी आश्रमातल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्यासाठी प्रेरित केलं. साफसफाई, जेवण करणं, खरकटी भांडी स्वच्छ करणं ही सगळी कामं. आठवड्यातच आश्ामातली संस्कृतीच बदलली.'
' आधी केलं, मग सांगितलं, हे त्यांचं प्रभाव टाकणारं वैशिष्ट्य. एखादी गोष्ट योग्य आहे असं वाटलं की ते ती स्वत: आधी करत आणि मग इतरांना करायला सांगत. एखादी गोष्ट योग्य असल्याचं त्यांना पटलं की जग काय म्हणेल याचा विचार ते करत नसत. याचं मला आकर्षण वाटलं आणि भारतात ते जर काही करू पाहत असतील, तर मला कधीही हाक मारा, असं वचन देऊन मी परतलो.' पुढे चंपारणमधील निळीच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं गांधीजी बिहारमध्ये आले, तेव्हा कृपलानींनीच त्यांची सर्व व्यवस्था केली. परिणामी सरकारी कॉलेजातून त्यांना काढून टाकण्यात आलं आणि कृपलानी गांधींचे आयुष्यभराचे सहकारी बनले.
गांधींच्या अहिंसेविषयीचं त्यांचं चिंतन मूलगामी आहे.
#अहिंसा
#कृपलानी
#Nonviolence
#Kriplani
#Gandhi

No comments:

Post a Comment