Friday, 22 September 2023

जयहिंद लोक चळवळ भेटीगाठी ग्रेट भेट with मकबूल तांबोळी सर

आपल्या जवळपास अनेक प्रेरणादायी लोक असतात पण आपल्याला माहीत नसतात त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे माझे 75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर .


परवा त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त हा लेख. 

 तरुण यासाठी की ते गप्पा मारताना त्यांच्या अनुभवाबद्दल  बोलतातच पण आत्ता आमच्या पिढी समोर असलेल्या चॅलेंजेसचाही ते विचार करतात . आम्ही महिन्यातून एकदा एक तास सहज बोलतो..


तर यानिमित्त सरांचा परिचय पाहूया

सरांचा जन्म पुण्यात मराठमोळ्या मुस्लिम गरीब कुटुंबात,  फुलवाला चौक येथे 06 Sep 1948 रोजी गणेश चतुर्थी ला झाला .आणि काल 06 sep 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमी ला 75 वर्षे पूर्तता झाली. बालपणात आसपास जैन मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन, मराठी , मुस्लिम, सिंधी, तेलगू, सिंधी , शीख , कानडी असा संमिश्र जाती धर्माच्या वस्तीचा भाग होता. 

त्यांनी Telco मध्ये 35 वर्षे नोकरी केली आहे.


ते देवभक्त होते,  तळ्यातल्या गणपतीला ते रोज जात असत त्यामुळे एक मुस्लिम मुलगा जातोय त्याचे विशेष कौतुक होत असे. 1965 पासून काही वर्ष गणेश मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांच्या मनात मात्र वेगवेगळे विचार घोळवत असत. त्यांनी सावरकरांचा मानवाचा देव आणि विश्वाचा देव हा लेख वाचला आणि ते नास्तिक झाले.


मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते 5-6 लोकांपैकी एक असे संस्थापक सदस्य होते आणि त्यात ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा भाई वैद्य, निळू फुले, बाबा आढाव यांच्याशी ही जवळचा संबंध आला होता. 

अभिनेते निळू फुले यांच्याशी त्यांचा 1970 पासून चांगली मैत्री होती आणि निळू भाऊ यांनी मकबूल सरांचा त्यांच्या बालमित्रांमध्ये समवेश केला होता.2003 ते 2009 या कालावधी मध्ये ते निळू भाऊंच्या सोबत संबंध महाराष्ट्रभर दौऱ्यात असत. महाराष्ट्र आणि देशभर च्या दौऱ्या मध्ये भाई वैद्य यांच्या सोबत ही असत. सुधाताई वर्दे आणि खासदार संभाजीराव काकडे यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध होते.मकबूल सर राष्ट्र सेवा दल चे  ट्रस्टी Treasurar होते त्याच बरोबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट याचेही ट्रस्टी होते.


अगदी वयाच्या 6 व्या -7 व्या वर्षापासून वाचनाची गोडी लागल्यामुळे विविध विषयांवरील त्यांचे वाचन अफाट आहे. त्यांचे विचार हे सुस्पष्ट आणि balanced आहेत.

आमची ओळख फेसबुकवरच झाली. सर माझे बहुतेक लेख वाचत आणि त्यावर प्रतिक्रिया देत असत. गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद वाढवणे हा आम्हाला जोडणारा दुवा.

2021 मध्ये एकदा स्वतः साठी आणि कॉलनी तील लोकांच्या साठी जांभळे विकत घेण्याच्या निमित्ताने त्यांनी मला त्यांच्या पाषाण येथील घरी बोलवले तेव्हा त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट झाली. (Lock down मध्ये 2 महिने बहिणीने काही काळ जांभळाचा व्यवसाय सुरू केला होता त्याबद्दल मकबूल सरांनी फेसबुक वर वाचले आणि मला बोलवले). नंतर Wednesday कट्टा निम्मित गुडलक कॅफे, FC Road येथे भेटी होत असत. 


काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांशी भेट झाली ज्यात *डॉ. बाबा आढाव, डॉ कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, रत्नाकर महाजन ,प्रशांत कोठडीया , मुक्ता पुणतांबेकर, संग्राम खोपडे , सुरेश खोपडे  ,  यशोदा वाकणकर , संदीप बर्वे , मनीषा पाटील, संतोष म्हस्के, विकास देशपांडे, चंद्रकांत शेडगे, माणिक जोगदंड, संतोष पवार, पराग गायकवाड, सुकेश पासलकर* आणि अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

यानिमित्त सर्वांना भेटून जयहिंद चे brochures दिले आणि या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केलें सोबत चळवळ वाढवण्यासाठी आपण विचार द्यावेत हेही सुचवले. 

आपणही त्यांना फोन किंवा मेसेज करून सदिच्छा नक्की द्या. 

त्यांचा संपर्क Makbul Tamboli - 7020509654


हा लेख लिहिण्याचा एक हेतू हाही आहे कि चांगल्या लोकांचे असे चरित्र पुढे न आल्याने लोकांच्या समोर चुकीचे दंगली घडवणारे लोक आदर्श म्हणून  उभे केले जातात . 


संकेत मुनोत

8668975178



Share


दिग्दर्शक शार्दुल सराफ भेट - जयहिंद लोकचळवळ

 Actor, Director मित्र शार्दुल सराफ हे परवा भेटण्यास आले होते. त्यांच्या सोबत जवळपास 4-5 तास छान चर्चा झाली. 

जयहिंद  लोकचळवळ विशेषतः जयहिंद कला मंच ची त्यांना माहिती दिली. त्यांनी टीव्ही वरील अनेक मालिकांच्या साठी लेखन केले आहे , नाटके लिहली आहेत आणि अभिनय ही केला आहे. 

त्यांनी जयहिंद च्या माध्यमातून गांधी विचार कसे पोहचवता येतील याबाबत थोडे स्क्रिप्ट लिहून दिले आणि पुढे ही त्यात लागेल ती मदत ते करणार आहेत. आमची ओळख फेसबुक वरची . शार्दुल सर माझे सर्व लेख वाचतात. ते actor, director etc आहेत हे लक्षात नव्हते काल प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात आले. 

संकेत मुनोत

जयहिंद लोक चळवळ

8668975178