Monday, 19 October 2015

अहिंसा आणि गांधीजी

अहिंसा आणि गांधीजी
लेखक-आचार्य जे. बी. कृपलानी

अहिंसा दोन प्रकारची आहे. एक येशू ख्रिस्ताची. तिला सामाजिक परिमाण नाही. आत्म्याची मुक्ती हे तिचं उद्दिष्ट. समाजातील वाईट बाबी सुधारण्यासाठी, समानतेच्या लढ्यासाठी, परदेशी सत्तेपासून मुक्त होण्यासाठी ती वापरली जात नाही. पॅलेस्टिन त्यावेळी रोमन साम्राज्याखाली होतं, पण ख्रिस्ताला त्याविषयी काही देणंघेणं नव्हतं. त्याची अहिंसा ही शुध्द, साधी होती. तो अहिंसक प्रतिकार नव्हता. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आथिर्क अन्याय दूर करण्यासाठी साधन म्हणून अहिंसेचा वापर केला.
गांधीजींच्या अनेक कट्टर अनुयायांनाही हा फरक कळलेला नाही.
दुसरं एक उदाहरण देतो. ख्रिस्त म्हणत असे, 'दुष्टप्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला'.
गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, 'का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.' जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे.'
-आचार्य जे. बी. कृपलानी

कृपलानींची गांधींशी पहिली भेट १९१५ सालची. त्यावेळी द. आफ्रिकेतून गांधीजी भारतात नुकतेच आले होते. त्यांना फारसं कुणी ओळखतही नव्हतं. रवींदनाथ टागोरांचा शांतिनिकेतन आश्म पाहण्यासाठी ते आले होते. त्यावेळी कृपलानी मुजफ्फरपूर येथील सरकारी कॉलेजात इतिहासाचे प्राध्यापक होते. द.आफ्रिकेत गांधींनी केलेल्या असहकार चळवळीविषयी कुतूहल होतं म्हणून कृपलानी आश्ामात त्यांना भेटायला गेले. अनेक बाबतीत हा माणूस चाकोरीबाहेरचा आहे, हे त्यांचं प्रथमदर्शनी मत.
' कपड्यांपासून आहारापर्यंत त्यांचं सगळंच वेगळं होतं. आ.श्ामात पहिल्यांदाच आलेला हा माणूस, पण पुढच्या सातच दिवसांत त्यानं तिथलं वातावरणच बदलून टाकलं. आश्ामात शिजवलं जात असलेलं अन्न आरोग्यदायी नाही आणि जिथं ते शिजवलं जातं तो परिसरही अनारोग्याला निमंत्रण आहे, हे त्यांना दिसलं. आश्ामवासी स्वत: स्वच्छतेची कामं न करता त्यासाठी नोकरांवर विसंबून राहतात, म्हणून असं होतं, हे त्यांचं निदान. त्यांनी आश्रमातल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्यासाठी प्रेरित केलं. साफसफाई, जेवण करणं, खरकटी भांडी स्वच्छ करणं ही सगळी कामं. आठवड्यातच आश्ामातली संस्कृतीच बदलली.'
' आधी केलं, मग सांगितलं, हे त्यांचं प्रभाव टाकणारं वैशिष्ट्य. एखादी गोष्ट योग्य आहे असं वाटलं की ते ती स्वत: आधी करत आणि मग इतरांना करायला सांगत. एखादी गोष्ट योग्य असल्याचं त्यांना पटलं की जग काय म्हणेल याचा विचार ते करत नसत. याचं मला आकर्षण वाटलं आणि भारतात ते जर काही करू पाहत असतील, तर मला कधीही हाक मारा, असं वचन देऊन मी परतलो.' पुढे चंपारणमधील निळीच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं गांधीजी बिहारमध्ये आले, तेव्हा कृपलानींनीच त्यांची सर्व व्यवस्था केली. परिणामी सरकारी कॉलेजातून त्यांना काढून टाकण्यात आलं आणि कृपलानी गांधींचे आयुष्यभराचे सहकारी बनले.
गांधींच्या अहिंसेविषयीचं त्यांचं चिंतन मूलगामी आहे.
#अहिंसा
#कृपलानी
#Nonviolence
#Kriplani
#Gandhi

Sunday, 4 October 2015

समज गैरसमज- गांधीजी

🔴🔴समज गैरसमज 🔴🔴
गांधी ,ज्या माणसाला लहाणपणी मी टकल्या , म्हातार्या , मजबूरी वगैरे काय काय म्हणायचो त्याच्याविषयी थोडेसे.

सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त🐍🐍 मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 🔫हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण📢 केले जाते आहे.
कुणाला फाळणी, पन्नास कोटी, मुस्लिमअनुनय अशी करणे सापडतात तर कुणाला पुणे करार आठवतो. गांधीला झोडपण्यासाठी काहीना भगतसिंग, सुभाषबाबू, सरदार पटेल ह्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवावी लागते तर कुणाला आंबेडकरांचा खांद्याची गरज भासते.
आपल्या शेवटच्या भाषणात📣 आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे 📝नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे विकृत लोक सांगतात. हे सर्व खोटे मुद्दे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे.
गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे-

१) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते.
✅२) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा होता.✅
३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही. ✅
४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.✅ 

५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.✅

६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. ✅

७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.✅ ९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते. ✅१०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.✅

११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती.   ✅ नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही
गांधीजींनी हे  राष्ट्र  शतकानुशतके राजकीयदृष्ट्या झोपलेल्या बहुजनांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करून लोकशाही स्थापित करून त्यांच्या हाती हे सोपवले. त्यामुळे सनातनी चिडले होते .आणि हत्या त्यामुृळे झाली होती.

आइनस्टाईन  म्हणाला होता,  की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना #राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी #सुभाषचंद्र_बोसच होते
शहीदेआजम #भगतसिंगांनीही तुरुंगामध्ये ऊपोषण केले होते काही मतभेद असले तरी त्यांच्यामध्येही गांधीजीबद्दल आदरच होता
पण ज्या गोडसेनी वा माफीवीरांनी  ना #अहिंसक ना  #सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?

#मुस्लिमांवरील प्रभाव-
अफगाणिस्तान-पख्तुनिस्तान-नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स येथील प्रदेश जेथे प्रत्येक घरामध्ये बंदुका, मशीनगन्स, हँडग्रेनेड्स होत्या, वयाच्या 10-12 वर्षांपासून प्रत्येक मुलाला खांद्यावर बंदूक बाळगायची सहज सवय होती, 
अलेक्झांडरपासून ते अरबांपर्यंत, मोगलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत आणि सोव्हिएत युनियनपासून ते अमेरिकेपर्यंत अनेकांनी या प्रदेशाला (म्हणजेच येथील डोंगरी-वाळवंटी जीवन जगणा-या टोळ्यांना) आपल्या कब्जात आणण्याचे प्रयत्न केले. पण येथील लोकांची स्वाभिमानाची भावना इतकी तीव्र, इतकी उग्र आणि इतकी तेजस्वी की, त्यांना कुणीही नामोहरम करू शकलेले नाही. त्या बंदुका, त्या मशीनगन्स, ती बेदरकारी हे सर्व त्या स्वाभिमानाचे आविष्कार. खांद्यावरची मशीनगन म्हणजे, पठाणी टोळ्यांच्या पुरुषार्थाने झळझळणारे प्रतीक.बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबातील, जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य.
त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता,

असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
मित्रांनो गांधी समजुनच घ्यायचे  असतील  तर डॉ #अभय_बंग,  #प्रकाश_बाबा_आमटे, #दलाई_लामा, #सत्यार्थी  #मलाला, #मार्टिन_ल्युथर_किंग असे कोट्यावधी लोक ज्यांनी गांधीविचारातुन आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्यासोबत काही क्षण राहुन पहा मंडेला,आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी, य दि फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर(जगन फडणीस),  freedome at midnight   वाचा 
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

नास्तिक असो वा आस्तिक , स्त्री असो वा पुरुष , हिंदु असो वा मुस्लिम वा कोणत्याही धर्माचा, शेतकरी असो वा व्यापारी , ऊच्च शिक्षित असो वा अशिक्षित, लहान/तरुण असो वा वयस्कर त्याकाळात अशा कोट्यावधी लोकांचा लोकमान्य नेता गांधी हेच होते

मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते

असेच अनेक जगभरातील गांधीजीना मानणारे समविचारी मित्र खालील Facebook  ग्रुपवर मिळतील
Mahatma Gandhi Global Friends

प्रश्न विचारा चिकित्सा करा
संकेत मुनोत

संदर्भ-
1-Let's kill Gandhi- Tushar Gandhi
2-Freedome at midnight
3-Mahatmyachi akher- jagan fadnis
4-justice D.G,khosala
5- प्रो.डॉ. अशोक चौसाळकर ( राजनैतिक विश्लेषक ) यांचा  लेख -दै लोकमत
http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=6518937-Khosala G.D. -The murder of Mahatma and other cases from judge's Notebook
6-pyarelal :mahatma Gandhi- The Last phase नथुरामायण-य.दि.फडके
7--गोपाळ गोडसे - 55कोटीचे बळी , मी न बोलतोय-न.गोडसे, गांधीगोंधळ-वि.दा.सावरकर
8-आफळे की मनभडंग कहाणी-चारुदत्त आफळे
9-अभय बंग, कुमार सप्तर्षी, तुषार गांधी ,अन्वर राजन, सदानंद मोरे , संजय सोनवणी , सुगन बरंत , अजय मक्तेदार, संतोष लहामगे, प्रसाद वांजळे, लोकेश शेवडे, राहुल रांजणगावकर, मच्छिंद्र गोजामे , ऊत्तम कांबळे, आनंद पटवर्धन  यांच्याशी झालेली चर्चा  अन्य अनेक मित्रांचेही आभार
10- फेसबुकवर , whatsapp व अन्यत्र  फिरणारे आणि अफवा पसरवणारे गांधीजी प्रतीचे लाखोे विकृत लेख ज्यांना ऊत्तर देताना वरील प्रश्न व ऊत्तरे सुचली
11-नरहर कुरुंदकर , कुमार केतकर

सत्य शेयर करा

Saturday, 26 September 2015

सुगन बरंत काकासे भेट

आज एक प्रेरणादायी व्यक्तित्व डॉ सुगन बरंत (अध्यक्ष , नयी तालीम) ईनसे मुलाकात तथा ढेरसारी बाते हुई

1975 से लेके आजतक वे
शोषितोंके लिए कार्य कर रहे है।
साथ ही अनेक रचनात्मक एवं निर्माण कार्यमें भी आगे है
1979 मे मराठवाडा विद्यापीठ को बाबासाहब अंबेडकरजी का नाम देने के लिए हुए समता आंदोलनमे जेल गए
1982 से सर्वोदय एवं राष्ट्र सेवा दल मे। दोन संगठनो स्थानिक स्तर से राष्ट्रीय स्तर तक सहभाग
1982 से विनोबा के आवाहनानुसार गोवश बचाओ आंदोलन मे आज तक सक्रीय। अनेक बार
युवाओंके , मिहलाओंके साथ कत्लखानो पर सत्याग्रह, गोवंश छुड़ाना, केस दर्ज करना,
पशु पालक, गोबर-गोमूत्रसे औषधी निर्माण, संशोधन, कसानी, मे नर्मदा नवनिर्माणमें ऊनका योगदान रहा है।
14 जीवन शालाओंका संचालन एवं 150 आिदवासी विद्यार्थीयोंकी आगेकीपढ़ाइकी मालेगावमे व्यवस्था , नर्मदा मे युवा संगठन “रेवा के युवा” निर्माण मे प्रमुख
भूमिका ।
सजीव खेती, स्वदेशी तथा आदिवासी स्वास्थ्य  परंपराके जतन, संवर्धन मे योगदान।
1993 से सर्वोदय के जीवनदानी कार्यकर्ता
1996 मे एनरोन के खिलाफ सत्याग्रह  मे  6 युवाओंके साथ
येरवड़ा जेल मे ।
1999मे नर्मदा बचाव आंदोलनमे धूिलया जेलके21 दिन 450 लोगोको साथ लेकर।
2001 से 2007 तक महाराष्ट्र  सर्वोदय मंडल मे अध्यक्ष्य-
2007 से.2011 तक अ.भा. सर्वोदय मंडल (सव सेवा संघ) मे अध्यक्ष्य
2011 से आज तक अ. भा. नयी तालीम समिती के अध्यक्ष्य - पद पर कार्यरत।
♠ स्थानिक काम :- स्थानिक काम ःथािनक काम -रचनात्मक कार्य (नव निर्माण) हेतु लोक सिमती, महाराष्ट्र गो-वंश विज्ञान
सिमती इन व कई संस्थाओं के कार्य चालु है जो आज भी चालू है,

इसमे एसेम जोशी कॅप सार्वजिनक वाचनालय, जयप्रकाश नारायण ब्लड बँक,
पुस्तक पेढी(6000 से अधिक दुर्बल बच्चो को किताबे एवं संस्कार),
सहकार& गृहनिर्माण संस्था, जयभा खादीभंडार, कस्तूरबा अंबर चरखा  (75
महिलाओंको 7 साल तक रोजगार), महावीर जिमख़ाना, दिनानाथ संगीत विद्यालय,
साने गुरुजी आरोग्य मंदिर (आयुर्वेद पंच कर्म चिकित्सा  एवं प्रशिक्षण केंद्र ), युसुफ मेहर अली
युवा संस्कार कृती भंडार (इको शॉप)।
इसीके साथ सानेगुरुजी परिवारके नामसे स्थानिक पिछड़ो, दिलतो एवं झुग्गी-झोपड़ी एवं आम आदमीके सवालो पर एवं राष्ट्रीय सवालो पर जैसे भ्रष्टाचार, शिक्षाके सवाल, शासनके सवालो पर, जन सुुविधाओंके लिए, किसान-मजदुर के लिए भी संघर्ष के काम
राजनीतीसे अलग अहिंसात्मक संघर्ष के काम सातत्य पूर्वक शिबिर,
व्याख्यान पदयात्राए,  धरने, उपवास, आंदोलन आदि माध्यम से युवा, महिला एवं जन आंदोलनमें मे, नर्मदा नवनिर्माणमें
पूर्ण योगदान।
14 जीवन शालाओंका संचालन एवं 150 आिदवासी विद्यार्थीयोंकी आगेकी
पढ़ाइकी मालेगावमे व्यवस्था, नर्मदा मे युवा संगठन “रेवा के युवा” निर्माण मे प्रमुख भूमिका । सजीव खेती, स्वदेशी तथा आदिवासी स्वास्थ्य  परंपराके जतन, संवर्धन मे योगदान।
1993 से सर्वोदय के जीवनदानी कार्यकर्ता
1996 मे एनरोन के खिलाफ सत्याग्रह  मे  6 युवाओंके साथ
येरवड़ा जेल मे ।
1999मे नर्मदा बचाव आंदोलनमे धूिलया जेलके21 दिन 450 लोगोको साथ लेकर।
2001 से 2007 तक महाराष्ट्र  सर्वोदय मंडल मे अध्यक्ष्य-
2007 से.2011 तक अ.भा. सर्वोदय मंडल (सव सेवा संघ) मे अध्यक्ष्य
2011 से आज तक अ. भा. नयी तालीम समिती के अध्यक्ष्य - पद पर कार्यरत।
♠ स्थानिक काम :- रचनात्मक कार्य (नव निर्माण) हेतु लोक सिमती, महाराष्ट्र गो-वंश विज्ञान
सिमती इन व कई संस्थाओं के कार्य चालु है
आज भी चालू है,
इसमे एसेम जोशी कॅप सार्वजिनक वाचनालय, जयप्रकाश नारायण ब्लड बँक,  (6000 से अधिक दुर्बल बच्चो को किताबे एवं संस्कार),
सहकार& गृहनिर्माण संस्था, जयभा खाद& भंडार, कस्तूरबा अंबर चरखा क (75
महिलाओंको 7 साल तक रोजगार), महावीर जिमख़ाना, दिनानाथ संगीत विद्यालय,
साने गुरुजी आरोग्य मंदिर (आयुर्वेद पंच कर्म चिकित्सा  एवं प्रशिक्षण केंद्र ), युसुफ मेहर अली
युवा संस्कार कृती भंडार (इको शॉप)।
इसीके साथ सानेगुरुजी परिवारके नामसे स्थानिक पिछड़ो, दिलतो एवं झुग्गी-झोपड़ी &-कची
बःतीके लिए एवं आम आदमीके सवालो पर एवं राष्ट्रीय सवालो पर जैसे भ्रष्टाचार, शिक्षाके
सवाल, शासनके सवालो पर, जन सुिवधाओंके लिए, किसान-मजदुर के लिए भी संघर्ष के काम चलते है। राजनीतीसे अलग अहिंसात्मक संघर्ष के काम सातत्य पूर्वक शिबिर,
व्याख्यान पदयात्राए,  धरने, उपवास, आंदोलन आदि माध्यम से युवा, मिहला एवं जन समय का प्रबोधन भी हम कराते रहते है इसी कारण आज मालेगाव मे इस परिवार की तीसरी पीढ़ी कार्यरत है। ऊनका खास काम हिंदू मुस्लिम एकता पर सतत कार्य करना हैजो विविध
माध्यमोसे चल रहा है।
♣ विशेष Gची- देश भरके संघर्ष एवं रचना मे लगे साथियोंसे संपक , मिलना  तथा उनके
कामकाज की जानकारी रखना।साथहही उन्हे एकदुजेसे जोड़ना एवं उनक साथ से मदद करना।
♥ कार्यकर्ता के परिवारको शिक्षा - और अन्य मदद हेतु कार्यकर्ता कृततज्ञता निधी खादी विषय। सफाई एवं व्यवस्थापन आनंद का विषय। इस कारण युवाओंसे सतत संपर्क ।
◘ वर्तमान जिम्मेदारीया- 
जमनालाल बजाज पुरःकार (रचनात्मक कार्य) चयन सिमती सदस्य।
आजीवन सभासद - कुष्ठरोग निवारण सिमती, शांतिवन-पनवेल, मुंबई।
महाराष्ट्र सेवा संघ (पुणे), लोकसिमित (मालेगाव)
कार्यकारिोणी & सदस्य- मामदान नव निर्माण सिमती (पुणे), ग्रामस्वराज सिमती (मुंबई),
सेवाग्राम ( सेवाग्राम -वर्धा)
◙ पुरस्कार-
विचारधारा सम्मान (अहमद नगर), अण्णा साहब सहस्त्रबुध्दे सम्मान (वर्धा),
कोकण गांधी अप्पासाहब पटवर्धन पुरस्कार (कनकवली),
लोकनायक जयप्रकाश  नारायण सम्मान (नागपुर),
शांतिभूषण सम्मान (नािसक),
राम आपटे सामािजक कृतज्ञता सम्मान (पुणे),
मध्यप्रदेश राष्ट्र भाषा सम्मान (भोपाल)
सर्वोदय  सम्मान- सर्वोदय

और भी बहुत कुछ


संकेत मुनोत 

Tuesday, 14 July 2015

अतुल कुलकर्णी

अभिनेता अतुल कुलकर्णीचा मी मागे पोस्ट केलेला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील प्रेरणादायी लेख वाचला का?
मला कल्पना नव्हती असे होईल अतुल कुलकर्णी सरांनी स्वतः कमेंट केली आहे त्या पोस्टवर
एका Friend ने तो स्वतःच्या टाईमलाईनवर पोस्ट केला होता जो शेअर होत होत अतुल कुलकर्णी पर्यंत पोहचला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली
link
https://m.facebook.com/mahatmagandhipeace/posts/453973854754553:0
संकेत मुनोत

लेख खालीलप्रमाणे
असाही अतुल कुलकर्णी (नटरंग)
हा थोडासा वेगळा च कलाकार☀
एकदम भारी कलावंत 🌟
साधा ज्याच्या घरी आजही टीव्ही💻 नाही वॉशिंग मशिन नाही
जो वनराईत स्वतः जाऊन🌱🌱🌱 पुढच्या पिढीसाठी कार्य करतो
या कलावंताबद्दल वेगळ लिहायची गरज नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार🇮🇳 , आठ नाट्य पुरस्कार 👑 आणि इतर अनेक 💫पुरस्कार यांनी सन्मानित केल्या गेलेल्या या कलावंताने मराठी अन हिंदी चित्रपटसृष्टीत निश्चीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे. अतुल कुलकर्णी हा एक अत्यंत सक्षम, अभ्यासू, चौकस, अन् एक स्वतःचा स्पष्ट अन ठोस दृष्टीकोन असलेले कलावंत आहेस्वतःची व्यावसायिक वाटचाल, एकंदर चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शनाचे पैलू, तांत्रिक भाग, अभिनय, चित्रपटांचे बदललेले स्वरूप, अन् चित्रपट व्यवसाय अन कला यांतील संबंध, नाटक, इत्यादी
अतुल कुलकर्णी ची प्रेरक मुलाखत 🌞👏

अतुल- नटरंग’ चित्रपटातल्या गुणाच्या भूमिकेनं मला माझ्या शरीराकडं 💪 लक्ष द्यायला शिकवलं. आपल्याकडं समाजात बुद्धीला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामानानं शरीराकडं दुर्लक्ष केलं जातं. त्याला दुय्यम समजलं जातं. इतकंच नव्हे तर, खेळ, नृत्य, व्यायाम यांसारख्या शारीरिक गोष्टींकडं आपण साधारणतः दुर्लक्षच करत करतो. बौद्धिक यशाच्या आनंदाला आपण अधिक महत्त्व देतो. शारीरिक क्षमतेचा वापर करून मिळालेल्या यशाला दुय्यम मानलं जातं. लहानपणी कोणताही खेळ मी गांभीर्यानं घेतला नाही; त्याचबरोबर व्यायामही कधी केला नाही. सुदैवानं मला कुठलंही व्यसन नव्हतं, त्यामुळं माझ्या शरीराचं नुकसान मात्र झालं नाही. ‘नटरंग’ चित्रपटाच्या दोन वर्षं आधी मी शैलेश परुळेकर (माझे जिम-ट्रेनर आणि मित्र) यांच्या संपर्कात आलो आणि शरीराकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला. ‘गुणा’च्या भूमिकेची तयारी हा शरीराच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉइंट होता. भूमिकेची गरज म्हणून मी सहा महिन्यांत १६ किलो वजन वाढवलं आणि १७ ते १८ किलो वजन कमीही केलं! भूमिकेसाठी हे करत असताना शरीराकडं गंभीरपणे बघण्याची, त्याला महत्त्व देण्याची सवय मला लागली. बहुतेक लोक शरीराला गृहीत धरतात. हे इतक्‍या पातळीपर्यंत घडतं, की जोपर्यंत शरीर आपल्याला त्रास देत नाही, तोपर्यंत आपण त्याला गृहीत धरलेलं असतं! मात्र, त्रास सुरू होतो, तेव्हा उशीर झालेला असतो. सुदैवानं ‘गुणा’च्या भूमिकेनं मला लवकर जागं केलं. तुम्ही जेव्हा स्वतःच्या शरीराकडं टोकाची मागणी करता आणि ती मागणी तुमचं शरीर पुरवतं, तेव्हा त्या वेळी त्यात केवळ शारीरिक सामर्थ्याचा सहभाग असतो असं नाही, तर मानसिक शक्तीचाही मोठा भाग असतो. व्यायाम म्हणजे काय, तर तुमच्या शरीरात त्या क्षणी असलेल्या मर्यादांच्या पलीकडं शरीराला ढकलत नेणं. त्या मर्यादांची सवय झाली, की त्याला आणखी पलीकडं ढकलणं. रोजच्या रोज केलेला व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला तुम्ही ‘कम्फर्ट झोन’मधून ‘अनकम्फर्टेबल झोन’मध्ये नेत असता. सहा महिन्यांच्या कालावधीत माझ्या शरीरात बदलांचे जे चढ-उतार झाले, त्यासाठी माझ्या सगळ्या मर्यादा पणाला लागलेल्या होत्या; पण त्यामुळं माझं आरोग्यही उत्तम झालं. माझ्या क्षमता वाढल्या. शरीर सुडौल झालं. किरकोळ आजार दूर पळाले. मन आणि बुद्धी पहिल्यापेक्षा जास्त स्थिर झाली. शरीराचं आणि आहाराविषयीचं ज्ञान वाढलं
(तुम्हीही करु शकता नियमित व्यायाम करा शरीराकडे लक्ष द्या )

वैचारिक😇 जडण घडण-
भारतात 🇮🇳; विशेषतः महाराष्ट्रात 🎭गांधीजींच्या विरोधी विचारांचा खूप मोठा इतिहास आहे📖👺🔥. तुमची इच्छा असो किंवा नसो, या विरोधी वातावरणाचा परिणाम तुमच्यावर होतोच. मात्र, हा विरोध तुटपुंज्या माहितीवर, तसंच गांधीजींच्या जीवनाचा पूर्ण अभ्यास न करता ठराविक गोष्टी भिंगाखाली बघितले आणि‘त्या गोष्टी म्हणजेच तो माणूस’ असं गृहीत धरून जे गैरसमज पसरवले गेले व जे विरोधी वातावरण निर्माण🌘 केलं गेलं, त्याचा मीही एक बळी होतो😞! नाटकासाठी या📝📝 भूमिकेचा मी अभ्यास सुरू केला, तेव्हा गांधीजींचं ‘सत्याचे प्रयोग📔’ हे पुस्तक, तसंच त्यांची अन्य पुस्तकं📖📚, त्यांच्यावर इतरांनी लिहिलेली पुस्तक📗📘📙, गांधीजींनी केलेला पत्रव्यवहार 📩📮हे सर्व मी अभ्यासलं. गांधीजींच्या विरोधातल्या 👽👹लेखनाचाही अभ्यास केला. तीन भाषांमध्ये तीन वर्षं ही भूमिका😇 मी केली. या सगळ्या काळात एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे जशी शून्य 0⃣ही संकल्पना 🇮🇳भारतानं संपूर्ण जगाला 🌏दिली, तशीच भारतानं संपूर्ण जगाला दुसरी कुठली महत्त्वाची गोष्ट 🎁दिली असेल, तर ती म्हणजे गांधीजी 🌞होय! व्यक्ती म्हणून अभ्यासातून आलेलं स्वतःचं असं तत्त्वज्ञान😇 असणं, ते बदलण्याची क्षमता बाळगणं💪 (म्हणजेच प्रवाही असणं !), हे तत्त्वज्ञान दृश्‍य स्वरूपात👀 आणि कृतीतून जगणं आणि लोकांपर्यंत पोचवणं 📥👫👪👬👭👯📨हे सारं अवघड आहे. त्याचबरोबर त्या तत्त्वज्ञानाचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी उभं करणं, हेही सोपं😱 नाही.
हे सगळं गांधीजींच्या बाबतीत घडलं.
आयुष्य जगत असताना ज्या ज्या क्षेत्रांशी संबंध येतो, मग ते 'समाजकारण🌍 असेल, राजकारण🌎 असेल किंवा आरोग्य, शिक्षण🎓, अर्थ, धर्म असं कुठलंही असेल, या सगळ्यांविषयी अगदी बारकाव्यांसह🌞 गांधीजींचा अभ्यास होता. त्याबद्दल त्यांचा स्वतःचा विचार🌝 होता; त्याचप्रमाणे या सर्व क्षेत्रांचा विचार करताना मानवजातीच्या कल्याणाचा👌👌 मुद्दा त्यांच्या विचारात अग्रस्थानी👑 ☝असे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गांधीजींचे विचार माझ्यावर माणूस म्हणून खूप परिणाम 😇करून गेले. त्यांच्या सगळ्या गोष्टींशी मी संपूर्णपणे सहमत 😇आहेच असं नाही; पण एक मोठी व्यक्ती आपल्याला विचारप्रवृत्त 😃करते आणि स्वतःच्या व्याख्या ठरवायला मदत करते, याचं श्रेय माझ्या आयुष्यात गांधीजींना आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला इथं आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, गांधीजी नेहमी म्हणत असत ः ‘माझी दोन वाक्‍यं जर तुम्हाला परस्परविरोधी वाटली🙈, तर त्याच्या तारखा 📅बघा. जे नंतरच्या तारखेचं 📆वाक्‍य असेल, ते माझं आजचं मत समजा.’ तत्त्वज्ञान हे असं प्रवाही असणं मला महत्त्वाचं वाटतं. हे मी गांधीजींकडून शिकलो.😀

माणसाचा पशू 🐗🐍🐸तेव्हा होतो, जेव्हा तो संकल्पनांना चिकटून बसतो🐣.  त्याचा अहंकार त्याला चुकीच्या गोष्टी आणि चुकीचं तत्त्वज्ञान अमलात🐙🐊 आणायला भाग पाडतो .‘माझं मत बदललं 🐥😀आहे’  हे स्वतःशी आणि जाहीरपणेही कबूल करायला खूप मोठी ताकद💪 लागते. अर्थात स्वतःमधला हा बदल अभ्यासावर📓 आणि अनुभवावर आधारित 👀असावा लागतो. ‘स्वतःपेक्षा संपूर्ण 👲👳👮🌞👷👩👧👦मानवसमूहाचा आणि प्राणिमात्रांचा विचार करून हा बदल🌻 करावा...तो सकारात्मक🌼 असावा... बहुमत काय आहे, याचा विचार करून त्याच्यासमोर झुकण्याऐवजी आपल्या विचारांतलं सत्य शोधून ते जगणं आणि अनुभव, अभ्यास यातून जर सत्य 👀बदललं, तर या बदललेल्या सत्याचा स्वीकार करणं, हे उत्तम आयुष्य जगण्याचं गमक आहे, हे मला गांधीजींनी शिकवलं आणि तसं जगण्याचा प्रयत्न मी करतोय. आज १८ वर्षं झाली, तरी माझ्यावर तो पगडा कायम आहे.
(पुर्ण लेख खालील लिंकवर अथवा सप्तरंगमध्ये ऊपलब्ध आहे
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx)
जसे अतुल कुलकर्णीही  महाराष्ट्रातील गैरसमज पसरवणार्या व महान लोकांबद्दल वाईट गोष्टी पसरवणार्या गोष्टीला व कोणा एका व्यक्तीला एकाच भिंगातुन👓😡 पाहणार्या विचारशैलीला पुर्वी बळी पडले होते तसे मी पण 😓त्याचा बळी होतो व आपल्यातील असंख्य जण ✔असतील पण जेव्हा त्याने सखोल ♻💯📚अभ्यास केला तेव्हा अतुल आतुन पुर्णच बदलला , तसे आपण कधी स्वतःत सकारात्मक बदल करणार चला आता तरी सखोल अभ्यास करुया.
संदर्भ- 1-सकाळ
2-महाराष्ट्र टाईम्स
3-Wikipedia

संकेत मुनोत

आवडला वाटला स्वतः. सकाररात्मक रीत्या बदलावं तर
शेयर करा🌸🌸🌺🌺

कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा....
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुले वाटतात,🌺🌸🌹🌺🌺🌸🌸
त्यांच्या हातांनाही🙌👏 नेहमी सुगंध दरवळत राहतो.."
शेयर करा🌸🌸🌺🌺