Wednesday, 27 April 2016

एक_पाऊल_पर्यावरणाकडे

#एक_पाऊल_पर्यावरणाकडे 🌿☘🌳
निमित्त होते आपण एस.एम.जोशी हॉल येथे आयोजित केलेले चांगले विचार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प( अभ्याससत्र /व्याख्यान) पर्यावरणतज्ञ प्रा.ऊदय गायकवाड(कोल्हापूर) सरांचे व्याख्यान झाले
सोबतच येथे पर्यावरणात मोलाची कामगिरी करणारे व आपले पुर्ण जीवन समर्पित करणारे दिलीप कुलकर्णी(दापोली कोकण) सर आणि स्मिताजी सोने (गुजरात ) यांचे ही प्रेरणादायी शब्द ऐकण्यास मिळाले.
तरुणईचा व पत्रकार मंडळींचा व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला,

आजच्या स्पर्धा व  धावपळीच्या युगातही एवढ्या जणांना पर्यावरणात काहीतरी करुशी वाटते हे पाहुन छान वाटले.
आपण आपल्या दैनदिन आयुष्यात खुप छोट्या छोट्या गोष्टीतुन आपल्या जवळपासचे जग सुंदर बनवु शकतो व पर्यावरणाची सतत होणारी हाणी, प्रदूषण व ईतर अनेक हानीकारक गोष्टी टाळु शकतो.
काही महत्वाचे मुद्दे
1-महाराष्ट्रात आत्ता दुष्काळाच्या परिस्थितीत जेवढा पाऊस पडतो किंवा जो पाण्याचा अभाव आहे त्याहीपेक्षा 50%पेक्षा कमी राजस्थानच्या अनेक गावांमध्ये व ईतर ठिकाणी आहे पण त्यांनी ती परिस्थिती adopt केली आपणही व्यवस्थित नियोजन केले तर हे शक्य आहे
महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडला पाणी मिळत नाही पण दुष्काळी गावातही दारुची विक्रि कमी झाली का?
2. आपल्या घरी 30-50%पेक्षा जास्त वस्तु अशा असतात ज्या आपण कधी वापरतच नाही नवीन वस्तु आणण्यापुर्वी या वस्तु एखाद्या गरजुला द्यायल्या हव्यात.अनेक वस्तु तर अशा असतात कि आठवण म्हणून ठेवलेल्या असतात जसे कि घरातील. जुन्या धातुच्या वस्तु , पितळी हंडे वगैरे  (आईने दिला याने दिला त्याने दिला वगैरे)
या न लागणार्या वस्तु नुसत्या बाहेर काढल्या तर एवढे धातु मिळतील कि आपल्याला कोणत्याही धातुची बाहेरुन आयात करण्याची गरज पडणार नाही
3)दैनदिन जीवनात वापरत असणारे कपडे हे आपण खादी किंवा कॉटनचे वापरले तरी बराच बदल घडु शकतो.
ऊदा.खादीचे कपडे तयार होताना कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही , जे रंग वापरतात तेही रासायनिक नसुन नैसर्गिक असतात सोबतच आपल्याच देशात हे तयार होत असल्यामुळे आपल्याच माणसांना रोजगारही मिळतो.खादी शक्य नसेल तर कॉटन तरी वापरावे.
4)पाणी
फक्क ब्रश करताना नळ अखंड  चालु ठेवण्याऐवजी ग्लास वापरला तरी हजार लोकांमध्ये लाखो लिटर पाणी वाचु शकते.
गळणारे नळ नीट करुन घ्यावेत कारण पुण्याचा लोकसंख्येचा 20%पाणी जरी वापरले तरी कोट्यावधी लिटर पाणी वाया जाते जे वाचवले तर शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न मिटु शकतो.सुरवात स्वतःपासुन करा.
5)4Rचा वापर
Reuse
Recycle
and
Reduce
प्लास्टिकचा व ईतर अनैसर्गिक साधनांचा वापर कमीत कमी करा. नैसर्गिक वस्तु वापरा जसे कि लाकुड .ज्याचा आपण पुरेपुर ऊपयोग करु शकतो.
पुढचे व्याख्यान याच अनुषंगाने मे महिन्यातील दुसर्या किंवा तिसर्या रविवारी नक्की या.
माहित ए आपण जग बदलु शकत नाही पण जगातील एक कोपरा , एक छोट गाव , छोट कुटुंब किंवा स्वतः तर बदलु शकतो ना?आणि त्यातुनच जग सुंदर बनवण्याकडे वाटचाल होईल
पर्यावरण आणि बदलती जीवनपद्धती याविषयी आपल्या चांगले विचार आणि knowing Gandhism team चे जयंत मठकर अमृतमहोत्सव समितीतर्फे सर्वोदय मंडळाच्या सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपतराव साबळे सर(मा.संचालक साखर महामंडळ ,महाराष्र्ट्र राज्य), सुत्रसंचालन संतोष म्हस्के, प्रस्तावना संकेत मुनोत तर वक्त्याचा परिचय निलेश शिंगे आणि समता मुथ्था यांनी केला. मनोहर खके, डॉ बुटाला आणि रवि आमल, नितिन सोनावणेे यांनी मान्यवरांचे खादी व पुस्तक देऊन स्वागत केले.
आपलाच
संकेत मुनोत
https://m.facebook.com/story.php?story_fbid=143224819413933&id=100011792467292

Wednesday, 6 April 2016

अपने लोगोको भी साथमें लो

एक बार एक कुत्ते और गधे के बीच शर्त लगी कि जो जल्दी से जल्दी दौडते हुए दो गाँव आगे रखे एक सिंहासन पर बैठेगा...
वही उस सिंहासन का अधिकारी माना जायेगा, और राज करेगा.

जैसा कि निश्चित हुआ था, दौड शुरू हुई.

कुत्ते को पूरा विश्वास था कि मैं ही जीतूंगा.

क्योंकि ज़ाहिर है इस गधे से तो मैं तेज ही दौडूंगा.

पर अागे किस्मत में क्या लिखा है ... ये कुत्ते को मालूम ही नही था.

शर्त शुरू हुई .

कुत्ता तेजी से दौडने लगा.

पर थोडा ही आगे गया न गया था कि अगली गली के कुत्तों ने उसे लपकना ,नोंचना ,भौंकना शुरू किया.

और ऐसा हर गली, हर चौराहे पर होता रहा..

जैसे तैसे कुत्ता हांफते हांफते सिंहासन के पास पहुंचा..

तो देखता क्या है कि गधा पहले ही से सिंहासन पर विराजमान है.

तो क्या...!  
   गधा उसके पहले ही वहां पंहुच चुका था... ?

और शर्त जीत कर वह राजा बन चुका था.. !

और ये देखकर

निराश हो चुका कुत्ता बोल पडा..

अगर मेरे ही लोगों ने मुझे आज पीछे न खींचा होता तो आज ये गधा इस सिंहासन पर न बैठा होता ...

तात्पर्य ...

१. अपने लोगों को काॅन्फिडेंस में लो.

२. अपनों को आगे बढने का मौका दो,  उन्हें मदद करो.

३. नही तो गधे हम पर राज करने लगेंगे.

४. पक्का विचार और आत्म परीक्षण करो.

Tuesday, 5 April 2016

भारत माता की जय नेपाल माता की जय

भारत माता की जय
नेपाल माता की जय
पाकिस्तान माता की जय
बंगलादेश माता की जय
श्रीलंका माता की जय
चीन माता की जय
अफ़ग़ानिस्तान माता की जय
ईरान माता की जय
इराक़ माता की जय
कुवेत माता की जय
दुबई माता की जय
बहरीन माता की जय
सीरिया माता की जय
सऊदी अरब माता की जय
यमन माता की जय
उमान माता की जय
तुर्की माता की जय
जापान माता की जय
इंग्लैंड माता की जय
आस्ट्रेलिया माता की जय
हालैंड माता की जय
जर्मन माता की जय
फ्रांस माता की जय
रूस माता की जय
काेरिया माता की जय
वेस्टइंडीज माता की जय
अफ्रीका माता की जय
अमरीका माता की जय
काली माता की जय
गाेरी माता की जय
रेड इंडियन माता की जय
एशिया माता की जय
हिंद महासागर माता की जय
काले पीले समंदर माता की जय
और ना जाने दुनिया भर की माता की जय
और लाे
सारी दुनिया की माता की जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय हाे हाे हाे हाे हाे
.....
ठीक है!
अब बताओ
काला धन कहाँ है?
15 -15 लाख कहाँ हैं?
हर साल 2 करोड बेरोजगारों को नौकरीयां कहाँ है?
हाफिज़ सईद कहाँ है?
पाकिस्तानीयों के सर कहाँ है?
दाऊद इब्राहिम कहाँ है?
विजय माल्या कहाँ है?
पठानकोट हमले के मुजरिम कहाँ हैं?
राेहित के क़ातिल कहाँ हैं?

देश से जो वादे किए वो पुरे करो, देश को बेवकुफ बनाना बंध करो।
"जय हिन्द" 🇮🇳

भारत माता की जय

जय हिन्द ,जय भारत ,भारत माता की जय म्हंटले की देशभक्त ठरत नाही.कारण काल मोठ्या सेलीब्रिटीनी राष्ट्रगीत गाईले पण आज तर ते पनामा यादीत दिसताहेत..
   काळया पैशावाले,करबुडवे,बॅन्क बुडवे, साठेबाज ,भ्रष्टाचारी बाबू,ब्लॅकमेलर्स,गुंड ,स्रीयांना सन्मान नाकारणारे,परदेशी शक्तींना गुप्त खबरे देणारे,धर्माधर्मात फुट पाडणारे,जातीय तेढ वाढवणारे कितीही देशभक्तीचे नारे देवोत ते खरे देशभक्त नाहीत.

सावरकर गांधी माफीपत्रे लोकमत लेख

आजच्या लोकमतमधील माझा लेख
होम >> महाराष्ट्र >> स्टोरी(लोकमत १५/३/२०१६)
- संकेत मुनोत
(टीप -मी कोणत्याही राजकीय पक्षात नाही पण
जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांचा ईतिहासाची मोडतोड करणारा लेख मोठ्या प्रमाणात viral झाला व लोकांना खोटेच खरे वाटु लागले त्यामुळ सत्य लिहावे लागले) .

काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा हा भारतकुमार राउतांचा लेख इतिहासाची मोडतो़ड करणारा

- संकेत मुनोत

भारतकुमार राऊत यांचा'काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा' हा इतिहासाची मोडतोड व दिशाभुल करणारा लेख वाचला. त्यांनी लेखात खोटे लिहले आहे ज्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. या संदर्भातलं सत्य मी मांडत आहे.

सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दयेची भीक मागितली, असे म्हणणे  खोटे नसुन सत्य आहे व त्याचे ऐतिहासिक पुरावेही आहेत.

आत्ता लेखकाने सांगितलेले खोटे मुद्दे व खंडण

1. 1931मध्ये झालेल्या गांधी-लॉर्ड आयर्विन कराराच्या वेळी गांधीजींना कारावासाची शिक्षा झालेली होती. या करारात गांधीजींनी देशभर चाललेली सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याचे व दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचे मान्य केले. त्यामुळेच गांधीजी तुरुंगातून मुक्त झाले. याला काय म्हणायचे? ही `दयेची भीक' नव्हती का?

सत्य- गांधीजींनी कधीही माफी मागितली नाही किंवा स्वत:ची एकट्याची सुटका करुन घेतली नाही तर हजारो भारतीयांची सुटका करुन घेण्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ तात्पुरती मागे घेतली होती आणि त्यानंतर व्यापक जनआंदोलन करुन इंग्रंजांविरुध्द लढले होते याऊलट सावरकर अंदमानमधुन परत आल्यावर त्यांनी कुठल्याही सशस्त्र वा अहिंसक आंदोलनात सहभाग घेतला नाही शिवाय हजारो क्रांतीकारक अंदमानमध्ये होते त्यांच्या सुटकेसाठी सावरकरांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

असहकार आंदोलनाच्यानंतर कोर्टात होणार्या सुनावणीत गांधीजीनी स्वत:ला कठोरात कठोर शिक्षा द्यायला न्यायाधिशाला सांगितले होते तेव्हा त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती.

2. चंद्रशेखर आझाद यांना फाशीची सजा झाली, तेव्हा काँग्रेसने कोणता विरोध नोंदवला?

सत्य- मुळात चंद्रशेखर आझाद यांना फाशी झालीच नव्हती. चंद्रशेखर आझाद अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले. शिवाय चंद्रशेखर आझाद आणि नेहरु चांगले मित्र होते.

3. भगत सिंह, सुखदेव व राजगुरू या तीन देशभक्त क्रांतिकारक तरुणांना ब्रिटिशांनी फाशी दिले. त्यावेळी काँग्रेस काय करत होती? उलट गांधीजींनी भगत सिंह यांच्या कृत्याचा निषेधच केला होता. याचे समर्थन आज काँग्रेस कसे व कोणत्या शब्दांत करेल?

सत्य- भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.

भगतसिंग सशस्त्र क्रांतीकारक व कम्युनिस्ट होता म्हणून तो गांधींच्या विरोधात होता आणि म्हणून तो हिंदूत्ववादी होता, असा प्रचार धादांत खोटा होता. भगत सिंग आणि त्याच्या सहकार्यांना वाचविण्याचा जो कांही प्रयत्न केला तो गांधी-पटेल-नेहरूंनीच केला मात्र आज भगतसिंग आमचा आहे म्हणणा-या कोण्याही हिंदुत्ववादी पक्षातील नेत्यांनी असा कोणताही प्रयत्न केला नाही आणि  महत्वाचे म्हणजे भगतसिंग आणि त्याचे सहकारी हौतात्म्यासाठी खूपच अधीर झाले होते . त्यांना माफी नकोच होती ,म्हणून तर त्यांनी खटल्या दरम्यान बचावाचा प्रयत्न केला नाही.

शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.

4. अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला वेढा घालून गावागावांत नासधूस, अत्याचार व जाळपोळ चालवली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला भेटण्याची तयारी दाखवलीच. पण आम्ही आपल्याकडे यायला घाबरतो. आपणच प्रतापगडावर यावे, असा निरोप पाठवला. ही युद्धाची व्यूहरचना होती. यालाही काँग्रेस दयेची भीक मानणार का?

सत्य- सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. आग्र्याहुन सुटुन आल्यावर शिवाजी महाराज काय शांत बसले नव्हते त्यांनी त्यानंतरही अनेक लढाया लढल्या आणि गड जिंकले होते ते शेवटपर्यंत रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी लढत होते

याऊलट अंदमानला जाण्यापुर्वी सावरकर थोडे विज्ञानवादी सुधारणावादी असले तरी ब्रिटीशांची माफी मागुन सुटुन आल्यावर भारतात आल्यावर त्यांनी कुठल्याही सशस्त्र वा अहिंसक स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला वाही  धार्मिक तेढ निर्माण करणारे, माणसा माणसात जातपात धर्म प्रांत यावरुन भांडण लावणारे, द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडुन भारत पाकिस्तान फाळणीची बीजे पेरणारे, गांधीहत्येचा कट रचणारे , देशातील गोरगरीबांचे शोषण करणार्या संस्थानिकांना साथ देणारे, देशाच्या एकीकरणाला आणि संस्थानांच्यस विलिनीकरणात अडथळे निर्माण करणारे होते, शिवाजी महाराजांच्या सर्व धर्मांना आदर करण्याच्या व स्त्रीयांचा आदर करण्याच्या चांगल्या गुणांना सावरकरांनी विकृती( सद्गुण विकृती )म्हटले आहे. सावरकरांनी आपल्या सहा सोनेरी पाने पुस्तकात खालील शब्द लिहले आहे.

“कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ” एवढच शिवाजी महाराजांबद्दल मी बोलू शकतो. ज्यांनी मनुस्मृती लिहीली त्यांच्याबद्दल पन्नास पाने आणि शिवाजी महाराजांबद्दल दिड पाने ही सहा सोनेरी पाने ह्या पुस्तकात वाचायला मिळतात.

5 - काँग्रेसने वीर सावरकरांचा उल्लेख `भाजपचे' असा केला आहे. त्यांनी आधी इतिहासाचे किमान वाचन करावे, अशी अपेक्षा आहे. वीर सावरकरांच्या काळात कार्यरत असलेल्या भारतीय जनसंघ वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी त्यांचा कधीही सुसंवाद नव्हता. या मंडळींची ध्येय-धोरणे व कार्यपद्धती सावरकरांना मान्य नव्हती. म्हणूनच त्यांनी स्वत:ची हिंदु महासभा या संघटनेची रचना केली. या संघटनेने तेव्हाच्या जनसंघाविरुद्ध निवडणुकाही लढवल्या होत्या.

सत्य- गांधी कॉंग्रेसचे आणि सावरकर बीजेपीचे हे खरे नाही. गांधी हे विश्वव्यापक आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे भारतातच काय परदेशात ओबामा, मंडेला ही गांधीजीना आपला गॉडफादर म्हणतात. याऊलट सावरकरांचे एकांगी विचार कोणत्याच पक्षाला झेपलेले नाहीत ते हयात असतांनाही त्यांना अनुयायी मिळाले नाहीत. याऊलट गांधींना प्रेरणा माणणारा वर्ग तेव्हाच काय आत्ताही आहे. जगभर मलाला, दलाई लामा, ओबामा,मंडेला, त्स्यांग त्सु कि असे लाखो लोक गांधीना आपली प्रेरणा मानतात.

6 - शेवटी एक स्मरण: काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या इंदिराजी गांधी यांनी मुंबईत उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी स्वत:च्या वैयिक्तक खात्यातून रु. 5 हजारचा चेक तेव्हाचे स्मारकाचे अध्यक्ष कै. जयंतराव टिळक यांच्या स्वाधीन केला होता. इंदिराजींच्या या कृतीबद्दल आताच्या काँग्रेसला काय म्हणायचे आहे?

सत्य- आणीबाणीच्या काळात सर्व समाजवादी, गांधीवादी लोक ईंदिरा गांधीच्या विरुद्ध बोलत असतांना सरसंघचालक देवरस तुरुंगात असतानाही इंदिरा गांधी यांची स्तुती करणारी पत्रे त्यांना लिहीत होते आणि  त्यामुळे इंदिरा गांधींनी 5000रु. देणगी देणे यात नवल ते काय?

चारित्र्य, नैतिकता, संस्कृती इत्यादी गोष्टी संघ बोलत असला तरी आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी रणनीती आखताना व त्याबरहुकूम वागताना अनैतिकता, अप्रामाणिकपणा, संधिसाधूपणा इत्यादीचं हिंदुत्ववाद्यांना कधीच वावडं नसतं.

प्रेयसीवर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणायचं असेल तर सावरकरांच्या आदेशाप्रमाणे गांधीजीचा खुन करणाऱ्या नथुरामलाही देशभक्त म्हणता येईल.

कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .

कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.

सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते

बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते ....... चाफ़ेकर , खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते त्या वेळी हे फक्त हातात काठ्या घेवुन पाडव्याचे संचलन करत होते

लोकांना देवा धर्मावरुन जातीपातीवरुन भडकवत होते

तेव्हा संघटना म्हणून हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या  या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?

मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?

आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे.

(लेखकाचा ई-मेल आयडी - changalevichar1@gmail.com)
लेखाची लिंक

http://m.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11816905

भरतकुमार राऊत यांच्या लेखाची FB लिंक
मला प्रतिक्रिया नाही दिली तरी चालेल पण शिवसेनेचे माजी खासदार पत्रकार भारतकुमार राऊत यांच्या लेखावर 666+ Shares आणि शेकडो शेअर आणि कमेंटस आहेत
ईतर गोष्टी सोडुन द्या पण चंद्रशेखर आझादांना फाशी दिली गेली नव्हती तर आझाद अल्फ्रेड पार्क मधे इंग्रजांशी लढताना मस्तकावर गोळी झाडून घेऊन शहीद झाले होते येवढेही  या अंधपणे शेअर करणार्या भक्त मंडळींना माहीत नसावे हे नवलच.आहे
.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=577844039045013&id=507650172731067&refid=17&_ft_=top_level_post_id.577844039045013%3Atl_objid.577844039045013%3Athid.507650172731067%3A306061129499414%3A3%3A0%3A1459493999%3A6172107821800616720
त्यांच्या लोकमतमधील लेखाची लिंक
http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=11774409

स्त्रियांना मंदिरप्रवेशाच्या आंदोलनावरील टीका व सत्य

स्त्रियांना मंदिरात / मंदिराच्या गाभार्‍यातही प्रवेश नाकारला जातो याविरुध्द सध्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर टीका करणारे काही लोक म्हणतात कि आधुनिक विचाराच्या स्त्रियांनी मंदिर, पुजा अर्चा, दर्शन यांत गुंतू नये.इतर काही म्हणतात की, दुष्काळ वगैरे इतर अधिक महत्वाचे प्रष्ण आहेत. केवळ शनिचा चौथरा हाच प्रष्ण आहे का?

मग मोहनदास करमचंद गांधी यांना देशात इतरत्र मीठ मिळत नव्ह्ते म्हणून ते चिमुठभर मीठ उचलायला दूरवर चालत दांडीला गेले होते का ?
भीमराव आंबेडकर यांना खूप तहान लागली होती आणि जवळपास पाणी मिळत नव्ह्ते म्हणून  ते  महाडच्या चवदार तळ्यावर पाणी प्यायला गेले होते का ?

मंदिर हे भक्तिभावनेचे स्थळ आहे. परंतु, मंदिर हे कुणा एकाचे खाजगी देवघर नाही. मंदिर सार्वजनिक आहे म्हणुनच मंदिरात प्रवेश देताना भेदभाव करणे हा अन्याय आहे.काही जातीना अस्पृष्य ठरवुन त्यांनाही मंदिरात प्रवेश बंदी होती. त्याविरुध्दही आंदोलने, सत्याग्रह झाले. त्यांनाही हेच सांगितले जायचे, "तुझ्या घरातही देव आहे, मंदिरातच कशाला जायला हवे?"
घरी बसुन पण देवाजवळ जाता येते हे मान्य असेल तर मग सर्वच देवळे मोडीत काढा ना! सर्वांनीच घरगुती स्वरुपात देवभक्ति करावी. परंतु, फक्त स्त्रियांनी घरगुती देवभक्ति करावी हे सांगण्यामागची मानसिकता पुरुषी आहे.

मंदिरात जाण्याचा... मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा... शनिच्या चौथऱ्यावर जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. तसेच स्वत:च्या विचारसरणीनुसार मंदिरात, मंदिराच्या गाभार्‍यात, शनिच्या चौथर्‍यावर जायचे की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्यही सर्वांना आहे.
प्रथा, परंपरा, वगैरे बिनबुडाची कारणे सांगुन घटनेने व कायद्याने दिलेला अधिकार कोणी हिरावून घेत असेल तर तो अन्याय आहे, म्हणून त्याविरुध्द संघर्ष करणे उचितच आहे.
एखादा पुरुष नास्तिक असूनही शनिच्या चौथऱ्यावर जाऊ शकलो, कारण तो पुरुष आहे. परंतु, स्त्रियांना मात्र सरसकट बंदी. हा अन्याय आहे.स्त्रियांना समान हक्क नाकारण्याची मानसिकता या मागे आहे. म्हणुन हा संघर्ष आवश्यक आहे.