Blog Archive

Sunday, 25 June 2017

संघात जाणारा आणि मोहन भागवतांसोबत बसून जेवण करणारा अक्षय कसा बदलला त्याच्याच शब्दात

(यासाठी लिहितोय की मला संघात किती दिवस होता म्हणून विचारलं जातंय)

2008 ची गोष्ट असेल.मला काळ नेमका आठवत नाहीये पण हाच होता.विदर्भ प्रांताच शिबीर अमरावतीला झालं होतं.आम्ही सर्व स्वयंमसेवक(हो मी 2004 ते 2008-9 संघाचा कार्यकर्ता राहून आहे) चार दिवसाचं ते शिबीर होत.दुपारी भोजन समयी मी आणि माझ्या दोन फूट अंतरावर सरसंघचालक मोहन भागवत बसलेले होते जेवायला.त्यांच्यात आणि आम्हा मुलात खायचे पदार्थ सर्व सारखेच.फक्त वेगळं ते एकच होतं त्यांना पाट दिला गेला होता जेवण करतेवेळी बाकी सर्व सारखच होतं.
मित्रांनो मी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सोबत बसून जेवण केले आहे.म्हणून सांगतो मला संघात काही दिवस घालवा.तुम्ही किती जवळून संघ बघितला? असे प्रश्न विचारू नका.हा अक्षय खूप पोहचलेला होता,आहे आणि राहणार. 2010नंतर मी या सर्व गोष्टीतून बाहेर पडलो.नंतर मी काही दिवस शिवेसनेचा कार्यकर्ता होतो.शिवसेनेच्या तालुक्याच्या ठिकाणी दुर्गादेवी बसतात.त्या मंडळाचा उपाध्यक्ष पण एक साल होतो. 18 वर्षाच्या आत मुलाचं नाव म्हणजे माझं नाव काही अघटित घडल्यास मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून लिगली पोलीस स्टेशनला होतं. वास्तविक मंडळाची नाममात्र बॉडी वेगळी आणि पोलीस स्टेशनला दिलेली नावे वेगळी होती.पण माझं दोन्ही यात नाव होतं.बारावी होई पर्यंत मी या सर्व गोष्टीत राहून झालो आहे.सगळंच जगून बसलो आहे.

पण,आज मला तुम्ही कोणत्याच दावणीला बांधून नाही ठेवू शकणार.कारण बारावी आधी जगत असलेला अक्षय अज्ञानी म्हणून जगत होता.आणि बारावी नंतरचा अक्षय दोन पुस्तक वाचून जगत आहे.माझं मस्तक हस्तक करू शकणार नाही ही या समाजातील प्रत्येक मानवाची मेख राहील एवढं नक्की.आज ना मी कुठल्या पक्षाचा आहे,संघटनेचा आहे,ना कोणत्या धर्माचा आहे.तुमचे हे सर्व तुम्हाला लखलाभ...
बाकी परत एकवेळ सांगतो.मी आणि मोहनजी भागवत एकमेकांकडे तोंड करून दोन ते तीन फुटांवर बसून जेवण केलं आहे.माझा आणि संघाचा तोच काय तो शेवटचा संबंध.

(ज्याला जो अनुमान लावायचा माझ्या विषयी तो खुशाल लावा.पण समुद्राला कुठल्या भिंती थांबवू नाहीत शकत.हेच काय ते सत्य)

-अक्षय सुनीता मोहन

No comments:

Post a Comment