Friday, 7 April 2017

निवारा बालगृहातील अनाथ, निराधार व वंचित घटकातील मुलांसाठी पुणे येथील नोविंग गांधीजम व चांगले विचार ग्रुपतर्फे स्कूल बॅग

#Mission_Education
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील अनाथ, निराधार व वंचित घटकातील मुलांसाठी पुणे येथील नोविंग गांधीजम व चांगले विचार ग्रुपचे सदस्य आणि पुण्यातील नामांकित साॅफ्टवेअर इंजिनिअर मा. श्री. निलेश शिंगे यांनी मुलांच्या जेवणासाठी 20 प्लेट, 20 वाट्या व 20 चमचे दिले तसेच 20 स्कूल बॅग देऊन विद्यार्थ्यांना मदत केली. यावेळी संस्थेचे संस्थापक अॅड.डाॅ.अरूण जाधव, बापु ओव्हळ, गणेश वागस्कर, संतोष रत्नपारखी (प्रोजेक्ट कोआॅरडीनेटर अक्षरभारती पुणे), बदाम गायकवाड, द्वारका पवार, संतोष गर्जे सर, बाळासाहेब कदम, विशाल पवार, रिजवान बागवान, रणजित मेघडंबर व बालगृहातील मुले उपस्थित होते........ मुलांना केलेल्या मदतीबद्दल निवारा बालगृहाच्या वतीने निलेश शिंगे यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करून त्यांचे हार्दिक आभार मानले ...... !!!!!

No comments:

Post a Comment