Tuesday, 10 February 2015

गांधी फाळणीचे गुन्हेगार ?सत्य कि अफवा


गांधी फाळणीचे गुन्हेगार ?
अखंड भारताचे स्वराज्य ही मागणी होती. परंतु दुर्दैवाने फाळणी झाली. महात्मा गांधीच फाळणीला जबाबदार आहेत, असा आरोप गांधींवर करण्यात आला. पण नेमकं काय घडलं हे जाणुन घ्यायचं असेल तर स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतर घडलेल्या घटना अधिक तपशीलाने पाहणं आवश्यक आहे.

इंग्रजांनी भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हिंदू-मुसलमान समन्वयाला खिंडार पाडलं. १८५७ च्या उठावात हिंदू-मुसलमान सैनिक, हिंदू राजे-मुसलमान बादशहा, त्यांचे सैन्य आणि सेनापती एका झेंड्याखाली एकत्र झाले होते. धर्मभेद व जातपात विसरुन सर्वजण खांद्याला खांदा लावुन ब्रिटीशांविरुद्ध लढले होते. हिंदू-मुसलमान एकीने ब्रिटीशांच्या छातीत धडकी भरली असणे स्वाभाविक आहे. "फोडा आणि राज्य करा" या नीतीचा अवलंब सुरु झाला. "एक बंदर दो बिल्ली" या गोष्टीसारखा खेळ त्यांनी चालु ठेवला. त्यानंतर झालेल्या घटना साधारण अश्या -

१. १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना, १९०५ साली मुस्लिम लीगची स्थापना.

२. लीगच्या नेत्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघांचे बीज इंग्रजांनी पेरले. याच बीजाचं पुढे फाळणीच्या विषवृक्षात रुपांतर झालं.

३. टिळक(कॉंग्रेसच्या बाजुने)-जीना(मुस्लिम लीगच्या बाजुने) यांनी १९१६ मध्ये "लखनौ करार" केला. त्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य केले गेले. तोपर्यंत लीग इंग्रजांच्या बाजुने होती. करारानुसार लीगने स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजविरोधी भुमिका घेण्याचे मान्य केले.

जीना टिळकांचे अनुयायी होते. ते गांधींना सीनीयर सुद्धा होते. गांधींच्या कॉंग्रेसमध्ये उदयामुळे(१९१५) त्यांचे नेतृत्व मागे पडले.
४. १९२० साली गांधींनी असहकार आंदोलन सुरु केले. मुस्लिमांनी लढ्यात सहभागी व्हावे म्हणुन खिलाफत चळवळीला असहकार चळवळीचा भाग बनवले. जीनांचे नेतृत्व मागे पडले. पुढे त्यांनी लंडनला वकिली करणे सुरु केले. लंडनच्या गोलमेज परिषदेत जीनांची उपस्थिती होती, मात्र त्यांची कुणी विशेष दखल घेतली नाही.

५. १९३७ साली प्रांतीय निवडणुका होणार होत्या. जीनांनी या निवडणुकांना आपल्या राजकीय पुनरुज्जीवनाची संधी म्हणून पाहिले. जीना भारतात परतले. त्यांनी पुन्हा लीगचे नेतृत्व स्वीकारले. स्वतंत्र मतदारसंघांच्या आधारे लीगने चांगल्याच जागा जिंकल्या.

६. १९४० साली लाहोरला झालेल्या मुस्लिम लीगच्या परिषदेत वेगळ्या मुस्लिम राष्ट्र मागणीचा ठराव संमत करण्यात आला. मात्र त्यात "पाकिस्तान" हा शब्द नव्हता. "हिंदुस्थानात २ राष्ट्र आहेत. द्वीराष्ट्रवादाचा आमचा सिद्धांत आहे. सिवील वार(यादवी) झाली तरी आम्हाला पर्वा नाही." ही कट्टर भुमिका तोवर जीनांनी आपलीशी केली होती.

७. दुसरीकडे १९२३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "हिंदुत्व" या आपल्या पुस्तकात द्वीराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख केला होता. १९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात द्वीराष्ट्राचा मुद्दा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला होता.

एका माणसाने मात्र अगदी अखेरपर्यंत द्वीराष्ट्र सिद्धांताचा अगदी स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. तो माणूस होता महात्मा गांधी ! "धर्माबरोबर राष्ट्र बदलत नाही." असा विचार मांडत गांधींनी जीनांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. जीनांना फाळणीपासून परावृत्त करण्यात गांधींना यश आलं नाही. पुढे ते त्यांनी बोलुनही दाखवलं. ते म्हणाले होते- मी माझ्या आयुष्य़ात दोन व्यक्तींना माझी बाजु पटवुन देवु शकलो नाही. एक मुलगा हरिलाल आणि दसरे जीना. फाळणीसाठी गांधींचा पाठिंबा मिळवण्यात जीनाही अपयशी ठरले.

गांधींनी माउंटबॅटन यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. त्यानुसार जीनांना पंतप्रधान करण्याची तयारी त्यांनी दाखवली. अखंड हिंदुस्थानातल्या एखाद्या प्रांताला पाकिस्तान नाव देण्यात यावे, अशीही तयारी दाखवली. मौलाना आझादांना ही भुमिका अजब मात्र "प्रॅक्टीकल" वाटली. जीना तयार होतील असेही त्यांना वाटले. "आणखीही योजना असु शकतात" असे सांगुन माउंटबॅटन यांनी ही योजना फेटाळली. शिवाय या योजनेवर कॉंग्रेस कमिटीतही चर्चा न होवु देण्याची दक्षता त्यांनी घेतली.

माउंटबॅटन यांनी चलाखीने गांधींना टाळुन लीग व कॉंग्रेसनेत्यांशी चर्चा केली. जीनांनी डायरेक्ट ऍक्शनची घोषणा दिली. परिस्थितीच अशी उद्भवली की, कॉंग्रेसला फाळणी स्वीकारण्याशिवाय पर्यायच उरला नाही. पंडित नेहरु- सरदार पटेल आदींनी फाळणीला मान्यता दिली. माउंटबॅटन योजनेवर कॉग्रेसने सह्या केल्या. रेडीओ, वृत्तपत्रांमधुन छापुन आल्यावर गांधींना याविषयी कळलं. गांधी त्यावेळी नौखालीत होते. त्यांनी नेहरु-पटेल यांना पत्र लिहून "आपण असा निर्णय घेतला हे मला समजण्यासारखं नाही" एवढंच लिहून कळवलं. त्यांच्या पत्राला नेहरुंनी उत्तर पाठवलं नाही. पटेलांचं उत्तर आलं - "आपण खुप दूर होतात, त्यामुळे
आपल्याशी सल्लामसलत करता आली नाही. खुप विचार करुन फाळणीचा निर्णय संमत करण्यात आला."

फाळणीबद्दल गांधींना राजकुमारी अमृत कौर यांनी सांगितले तेव्हा ते म्हणाले - "इंग्रज देशाचे विभाजन करणार, याचा अंदाज मला होता. ही फाळणी आम्ही रोखू शकलो नाही. मी फाळणी मानत नाही. लोक म्हणले, फाळणी झाली तर झाली असं समजा. आता एवढंच करावं की भुप्रदेशाचं विभाजन इंग्रज निघुन गेल्यावर आपण एकमेकांत चर्चा करुन ठरवावं. इंग्रजांना त्यात आणू नये." गांधींनी तसं कॉंग्रेस कमिटीला कळवलं होतं, परंतु त्यांचा विचार स्वीकारण्यात आला नाही.

विभाजन कसं करायचं हे इंग्रजांनी ठरवलं. बॉर्डर आखायला इंग्लंडवरुन सर सिरील रॅडक्लीफ ला इंग्लंडवरुन बोलावलं गेलं. त्याने पहिल्यांदाच भारतात पाऊल ठेवलं होतं. अश्या अनभिज्ञ माणसाला जाणकार मानलं गेलं. हिंदू बहुसंख्यिक गावे पाकिस्तानात, तर मुस्लिम बहुसंख्यिक गावे भारतात अशी अजब विभागणी या माणसाने केली. रॅडक्लीफ लाईननुसार विभाजन झालं तर प्रचंड हिंसा होईल, रक्ताचे पाट वाहतील, असं गांधीजींनी अगोदरच बजावलं होतं. जागतिक इतिहासातले हे एक मोठे स्थलांतर होते. स्थलांतर करायला वेळही दिला गेला नाही. परिणामी प्रचंड गोंधळ, कत्तली, दंगली उसळल्या. सीमारेषेजवळ जी गावे होती त्यातल्या बहुसंख्य मुसलमानांना आपलं गाव पाकिस्तानात जावं असं वाटत होतं. त्यांनी हिंदूंना मारलं. ज्या गावात हिंदूंची संख्या अधिक त्यांनी आपण भारतात राहावं यासाठी मुस्लिमांना मारलं. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांनाही त्यांचा मुसलमानी पोशाख पाहुन अमृतसरला मारहाण करण्यात आली होती.

१५ ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला तेव्हा बापू कलकत्त्याला दंगली मिटवत होते. १३ ऑगस्ट ला पंडित नेहरुंचा संदेश घेवुन सुधीर घोष आले. स्वातंत्र्याचा पहिला उत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत येण्याचा संदेश त्यांनी गांधींना सांगितला; पण इच्छा नसल्याने गांधींनी दिल्लीला जाणे टाळले. पानगळीत पडलेलं एक पिंपळाचं पान बापूंनी उचललं आणि "या पानासारखी माझी स्थिती आहे" असं म्हणाले.

माउंटबॅटन यांनी गांधींना बाजुला ठेवुन आम्ही फाळणी करण्यात कसे यशस्वी झालो हे त्यांच्या लंडनमधील एका भाषणात सांगितले आहे. पंडीत नेहरुंनी न्युयॉर्कमधल्या एका भाषणात "फाळणीमुळॆ लोकांच्या अदलाबदलीचे इतके भयानक परिणाम होतील असं माहिती असतं तर आम्ही फाळणी मान्य केली नसती" असं म्हटलं आहे.

जीनांनी आपल्या शेवटच्या आजारपणात आपल्या डॉक्टरांकडे एक उल्लेख केलाय. त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्य़ातील सर्वात मोठी चुक कोणती ? त्यांनी उत्तर दिलं - "डीव्हीजन ऑफ इंडीया" ! त्या डॉक्टरांचं नाव आता आठवत नाही, पण त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

आता यावरुन तुम्हीच ठरवा, खरंच गांधींनी फाळणी केली का ?
पुर्ण लेख - http://www.misalpav.com/node/20331

महापुरुषांवरील निवडक व माहिती नसलेले असे प्रेरणादायी लेख व अफवावरील ऊत्तरे खालील पेजवर मिळतील

https://m.facebook.com/mahatmagandhipeace
तसेच चर्चा करायची असल्यास सर्व गांधीविचारक व विरोधक यांचा खालील ग्रुप जॉईन करावा
https://m.facebook.com/groups/562250187168592

Wednesday, 4 February 2015

गैरसमज भोळा गांधीवाद व काहींचा वैचारिक गांधीवाद

असो आपल्यापैकी काहींचा भोळा गांधीवाद व काहींचा वैचारिक गांधीवाद ही अतिरम्य सुंदर कल्पना आहे व अण्वस्र सज्ज(ड) लोकांनी त्याची महती सांगावी हे म्हणजे
भुता तोंडी भागवत नाही का. >
हा खूप मोठा गैरसमज आहे की गांधीजींचा युद्धाला विरोध होता… गांधीजीनी मग इंग्रजांना युद्धात मदत केली असती का? पाकने १९४७ साली आक्रमण केल्यावर नेहरुंना प्रतिउत्तर देण्यास रोखले नसते का?
आफ्रिकेत त्यांना प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले म्हणून त्यांनी तेच काम इथे केले… बाकी इथे ५०० राजे, महाराजे, सरदार, नवाब होतेच की, त्यांचे सैनिक घेवून त्यांना एकत्रित करून तथाकथित जहाल हिंदुवाद्यानी लढा का दिला नाही? असे हजारो प्रश्न या हिंदुवाद्यांच्या षंढपणावर उठतात, जातीभेद करून लोकांमध्ये सतत insecurity ची भावना जागृत ठेवायची आणि आपले महत्व वाढवून घ्यायचे… हजारो वर्ष सत्ता उपभोगुन पण उपाशीच राहिले आणि सत्तेची हाव सुटत नाही… भारत हा गद्दारांचा देश आहे, म्हणून मोगल, इंग्रज इ. शिरले… नथुराम हा त्यातलाच एक…           
One of our friend rightly said <Depending on who writes history, a terrorist for one is martyr for another.… >
नत्थू व सावरकर यांच्या समर्थनार्थ जे काही लिखाण लिहिले गेले हे त्यांच्या नातेवाईकांनी(जातभाई) लिहिले…. याउलट गांधीजींवर जगातील नामवंत विचारवंतानी लिखाण केले… ही खूप साधी आणि बोलकी बाब आहे आणि ती आज लोकांना उमजलीय… आणि गांधीजी सारख्या माणसाचा न्यायनिवाडा करणारा हा कोण? एकटा माणूस हे करू शकतो? नाही…
अजय मक्तेदार

गांधीजीवर संशोधन

महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित व्यक्ति
1. बाबा आमटे
2. अल्बर्ट आईनस्टाईन
3. साने गुरूजी
5. नेल्सन मंडेला
6. दलाई लामा
7. बाबा अढाव
8. कुमार सप्तर्षि
9. बराक ओबामा
10. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर
11. मुन्शी प्रेमचंद
12. नारायण मूर्ति
13. सुधा मूर्ति
14. नरेंद्र दाभोळकर
15. डॉ. राजेंद्रप्रसाद
16. सत्यार्थी
17.अकिनौ
18.त्स्यँग सु कि
19.बराक ओबामा
20.मलाला
21.खान अब्दुल गफार खान
लिस्ट बरीच मोठी आहे
जगातील असंख्य लोकांनी गांधीजीवर संशोधन करून लिहिलंय, एका खुनी माणसाच्या नातेवाईकांनी व वीर म्हणवून घेणाऱ्या कटात सामील असणाऱ्या माणसांनी लिहिलेली पुस्तके व नाटके वाचून, पाहून दोष देण्यापेक्षा व ब्रह्मचार्याचा भाग वगळून (आवडत नसेल तर) गांधीचारीत्र तटस्थपणे वाचा…. इतिहासातील घटनांचा अभ्यास करा… "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" या वाचाळवीरांनी १९११ पासून ते मरेपर्यंत काय केले हे अभ्यासा… खुनी नत्थुने देशासाठी काय दिवे लावले ते आम्हाला सांगा… मी स्वत: पुतळा बांधेन…
२१ वर्ष आफ्रिका आणि १९१५ पासून मरेपर्यंत भारतात सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका देशभक्ताला एका अत्यंत खुनशी आणि कपटी खुनी माणसाला देशभक्त साबित करण्यापायी किती बदनाम करणार? असंख्य वेळा जेलमध्ये जावून १३ वर्ष जेलमध्ये घालवली… कितीतरी वेळा मार खाल्ला… त्याने केलेल्या त्यागाच्या १% तरी कुठल्या संघाने केलंय का? वर्षानुवर्षे सत्तेवर राहायचे समाजात उच नीच करायचे व आपली पोटं फुगवायची… स्वातंत्र्यापूर्वी हेच लोक राजे महाराजे याचे वकील आणि सल्लागार असायचे सत्तेचा मोह आणि माज पुरातन काळापासून जोपासणाऱ्या लोकांना गांधी रुचेल?
Ajay Maktedar

Tuesday, 27 January 2015

स्वाभिमान आहे हिंदु असल्याचा

काय आहे हिंदू 🇮🇳
हिंदू हा स्वाभिमानी ☀आणि शूर ☀असतो…. लाचार 😨आणि भिकमंगा 😷नसतो…
स्वत:चा प्राण 💫देईल पण मला सोडून द्या म्हणून भिक 🙈मागणार नाही…
शुरवीर छत्रपती शंभू राजाने प्राण💎 दिले पण कोणाला शरण नाही गेले तर
ब्रिटीोशांकडे  दयेची भिक📝 झोळीत घेवून आलेले स्वतःला वीर म्हृणु लागले…. 
हिंदू हा शांतता 🌞प्रेमी आणि दिलदार🌻 असतो… आणि निशस्त्र व्यक्तीवर आक्रमण🐍 कधीच करत नाही…
मोहम्मद 👹घोरीने पृथ्वीराजला👑आणि👹 माथेफिरूने गांधीजींना 🌞धोका🐍 देवून मारले….
श्रीकृष्ण 📙गीतेमध्ये म्हणतात सर्व प्राण्यामध्ये देव आहे आणि ज्याला तो दिसतो तोच मनुष्य म्हणण्याच्या लायकीचा आहे….
आणि अशा हिंदू धर्माचा 🇮🇳मला अभिमान आहे…
कुठलाही राजकीय पक्ष हिंदू🚩 पुरुषाला धर्माच्या नावाखाली वैचारिक गुलाम 😇बनवू शकत नाही…. जे बनतात ते मुळात हिंदू😷 नसतात….
माझा धर्म स्वातंत्र्य⛅ शिकवतो, पंच तत्वाचे आभार मानायला शिकवतो….
नवरात्र आम्ही मातेला 🙏प्रणाम करतो…. एका जमिनीच्या तुकड्याला माता म्हणून त्या शक्तीचा अपमान करायला माझा धर्म शिकवत नाही… वसुधैव कुटुंबकम, पृथ्वीला माता मानतो आम्ही, जमिनीच्या तुकड्याला नाही….
"संविधान"📘 हे आम्ही सर्व धर्मियांनी मिळून शांततेने राहण्यासाठी बनवलेले आहे…. यात माझा धर्म 🚩🇩🇿मी कधीच आणणार नाही… मोठ्याने लहानाला द्यायचे 🌺💐असते आणि तो दिलदारपणा आणि संस्कार "संविधानात" 📘आम्ही दाखवतो…
दुसर्याचे हिसकावून घेवून खायला माझा धर्म शिकवत नाही🐍… इतरांची निंदा❌, परधर्मावर टीका करणे माझा धर्म शिकवत❌ नाही, तर स्वत:मध्ये😃 बदल करायला आणि कर्म करायला 👍(गीता) माझा धर्म शिकवतो….
अशा महान धर्मात मी जन्माला आलोय हे माझे भाग्य🌞…
स्वार्थ, द्वेष, आक्रमकपणा, फुकाचा धर्म अभिमान करणारे हिंदू नसतात….
---- DNA तपासा रे अशा लोकांचे
🇮🇳जयहिंद 🇮🇳
मुळ कविता-अजय मक्तेदार
एडिटिंग and ईफेक्टस-संकेत मुनोत

थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर

थोर व्यक्ती व आपल्यातले अंतर फक्त थोडेसे ते कसे कमी करायचे ते पाहु या  😌😌अंधानुसरण😌😌
मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला , तो याप्रमाणे...
        एका खोली मध्ये 8-10 माकडांना 🐒🐒🐒🐒🐒ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी 🔗सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर केळीचा🍌🍌 एक गुच्छा लटकत ठेवण्यात आला.
         थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या🐒🍌🐒 गुच्छ्याकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करतो , तोच त्याच्या अंगावर थंडगार🐒🚿 पाणी पड़ते व इतर उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारा माकड खाली परत येतो.
         दुसऱ्या दिवशी दूसरा एक माकड 🐒असाच प्रयत्न करतो , तेव्हा सुद्धा त्याचा अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर थंडगार पाणी पड़ते.🚿
         असे सतत 3-4 दिवस📆 घडते, त्यामुळे  याचे कारण माकडांच्या लक्षात येते की , 🙊🍌🚿केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
          मग पाचव्या दिवशी जेव्हा पुन्हा एक माकड केळीसाठीशिडी चढ़ण्याचा प्रयत्न करतो , इतर सगळे माकड मीळून त्याला झोडतात त्यामुळे तो माकड परत येवून कोपर्यात बसतो🐒, यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.🚿❎
        पुढील 3-4 दिवस असे सतत घडते, जो कोणी माकड शिडीकडे वळला की इतर सर्व माकड मीळून👊👊👊👊🐒👊👊👊👊 मारायचे.अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े 🍌बघायचा👀 सुद्धा नाही.तेव्हा मग वैज्ञानिकांनी पाणी🚿❎ घालनेच बंद केले.
           मग वैज्ञानीकांनी त्या माकडांपैकी एक माकड 🐒बाहेर काढले आणि दुसरे एक नविन माकड 🐒आत टाकले. या नविन माकडाने केळी 🍌नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुन्या सर्व माकडं मीळून त्या नविन माकडाला👊👊👊👊👊👊 झोडतात.
           दुसर्या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक🐒🐒🐒 माकड बाहेर काढून नविन एक माकड आत टाकतात. हा माकड देखिल केळी🍌🍌 बघून शिडी 🔗चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकड त्याला 👊👊👊झोड़तात. पण यात विशेष हे असते की काल आलेला नविन माकड सुद्धा या झोडनाऱ्या माकडात 🐒🐒🐒शामिल असतो ज्याच्या अंगावर कधी ही पाणी पडलेले नसते.
       या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नविन माकड आत घालतात. 📆आणि रोज तोच प्रकार घडतो. नविन माकड🐒 केळीसाठी 🍌🔗शिडीकड़े वळला की उर्वरित सर्व माकड त्याला👊👊👊👊 मारतात. मारणार्या माकडांमध्ये जुने माकड🐒 ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत🙊. त्यांच्यासोबतच नविन माकडं ही शामिल होती ज्यांनी कधीही पाणी अंगावर झेलले नव्हते🙈. अशाप्रकारे दररोज एक एक करून सर्व जुने माकड बाहेर काढून नविन माकड आत घालण्यात येतात. प्रत्येक नविन🐒 येणाऱ्या माकडाला शिडी 🔗चढ़न्याचा प्रयत्न केल्यास 👊मार पडत असते.
             आता मात्र खोलीमध्ये सगळे नविन माकड 🙈🙈असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर  पानी🚿❎👀 पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो. पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़न्याचा प्रयत्न केला की  इतर सर्व माकड त्याला 👊👊👊मारतात.कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते , आपण का मारत आहोत याचे मुळ कारण माहीत नसून🙈 सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला 👊👊👊मारायचे.बस्स!!!
बोध:-
          माणसाचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो काही माणसाबद्दल गैरसमज बाळगतो पण आपल्याला त्यांचे मुळ कारण माहितच नसते. कारण त्या रुढी परंपरा वा अफवा पसरविणे सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो. त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटनारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात आणि 99%वेळा खोटी असतात . तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे🙈🐵🐒 "अंधानुसरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ति समजतो.
           मित्रांनो , म्हणून कोणतीही गोष्ट , रुढी , परंपरा यांच्या मागचे कारण निट समजून , ते वैज्ञानिकदृष्टया , तार्किकदृष्टया खरे आहेत किंवा नाही हे जानुन घेतल्या शिवाय त्यावर विश्वास करू नये. फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग धिक्कार आहे आपण घेतलेल्या शिक्षणाचा....
ऊदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही. जवळचच ऊदाहरण घ्यायच तर गांधींच घेऊ
ज्याला आईनस्टाईन पासुन ओबामापर्यंत व बाबा आमटेपासुन मलालापर्यंत पुर्ण जग आदर्श मानते त्याला आपण गोडसेची खोटीनाटक पाहुन व काही भंपक लोकांचे पुस्तक वाचुन  चुकीच समजतो त्याच्याबद्दल सत्य पडताळुन पाहण्यात आपणास रस नाही
        मग माकडंच बरी...
     🐵🐵🐵🐵🐵🐵🐵
   हेच एवढसं अंतर आहे चला तर मग ते कमी करुया तर. थोरपणाकडे वाटचाल करुया
©संकेत मुनोत

Saturday, 10 January 2015

गांधीजी आठवणी

स्वाती ठकार यांचे वाल वरून ..... शाळकरी वयाचे रेड्डी आंध्रप्रदेशातून तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नसताना निव्वळ गांधीजींच्या जवळ राहायचे म्हणून त्याना पत्र पाठवून साबरमतीला रेल्वेने गेले .गांधीजीनी महादेवभाईना सांगितले होते या मुलाला तेलगुखेरीज कुठलीही भाषा येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः त्याला आणायला जा .महादेवभाईनी ते काम तिसऱ्याला सांगितले ..तिसऱ्याने चौथ्याला ..कुणीच या मुलाला आणायला गेला नाही .सकाळी आश्रमात येणारा हा मुलगा दुपारी एक वाजता पोहोचला .गांधीजींच्या लक्षात आले .काकाना जेवायला खायला देऊन विश्रांती घ्यायला सांगितली आणि महादेवभाईना शांत स्वरात एवढंच म्हणाले जर वल्लभभाई किंवा जवाहरलाल येणार असता तर स्वतः जातीनं गेला असतात .हा मुलगा जवाहरलाल इतकाच मला महत्वाचा आहे. एकदा खेडा जिल्ह्यातून काही शेतकरी तहसीलदाराच्या जुलुम आणि वाढीव साऱ्याबद्दल तक्रार करायला आले होते.त्यातला एकजण दर दोन शब्दामागे संतापाने शिव्या देत होता .महादेवभाई अस्वस्थ झाले.त्यानी लोकाना त्याला बाहेर घेऊन जायला सांगितले .पण बापूनी त्याला थांबवून पुन्हा बोलतं केलं.सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली .नंतर ते महादेवभाईना म्हणाले .त्याच्या शिव्या या त्याच्यावर झालेल्या अन्यायातून आल्या होत्या .ही साधी माणसं आहेत .त्याना संतापाच्या वेळी व्यक्तव्हायला उपयुक्त असणारे शब्द आहेत ते .तिथं भावना समजून घ्यायची असते .शब्दांचा कीस पाडत बसू नये. वल्लभभाईंची पत्नी अकाली गेली .त्यांची मुलगी ते गांधीजींच्याजवळ सोडून गेले.ती बापुंची खूप लाडकी होती .तिला रंगीत बांगड्या हव्या होत्या ,बापू रंगीत काचेच्या बांगड्या घालण्याच्या विरूद्ध होते .मोठ्या बायका रंगीत बांगड्या घालत नव्हत्या .पण त्या मुलीसाठी त्यानी रंगीत बांगड्या आणल्या .तेव्हा मोठ्या बायकानी याबद्दल विचारलं .ते म्हणाले तिच्या मनावर ताबा यायला काही काळ जावा लागेल .असे अनेक किस्से गांधीजींच्या बद्दल ऐकले .लहान मुलंही बापूंबरोबर भांडत असत .त्यांच्या सोबत फिरायला जात .चालण्याची शर्यत लावत .गांधीजींच्याजवळ राहण्यासाठी आश्रमात विश्रांतीला गांधीवादी ,कम्युनिष्ट ,हिंदुत्ववादी ,दलित सर्वजण येत. गांधीजींबरोबर मनसोक्त भांडून ,वादावादी करून पुन्हा विश्रांतीला येण्याची धमकी देऊन जात
संदर्भ- https://www.facebook.com/groups/mahatmagandhibest/

Saturday, 3 January 2015

सावरकर माफीनामा

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य 🇮🇳मिळावे म्हणून कोट्यावधी लोकांनी ब्रिटीशांच्या 👊🔫गोळ्या व लाठ्या खावून देशासाठी आपले सर्वस्व दिले. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्‍या वा जन्मठेप भोगणार्‍या भगतसिंग व लाखो तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती.
पण तसे कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:

"मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्‍या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्‍या सरकारचा जयजयकार करील."

"एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."

"माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"

१४ नोव्हेंबर १९१३

सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!

संदर्भ:
माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
मुंबई चौफेर, ५ मे २००२
http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm
सत्य वाचा व शेयर करा