Saturday, 14 February 2015

भगतसिंग

कट्टर धर्मांध लोकांच्या अफवा पसरवु नका
१४ फेब्रुवारी १९३१ ला भगतसिंग,सुखदेव व राजगुरू या तिघा क्रांतिकारांना फाशीची शिक्षा "सुनावण्यात" आली होती म्हणून या दिवशी व्हॅलेन्टाईन डे काय साजरा करता अशा अर्थाचे हे पोस्ट आहे.सोबत क्रांतिकारकांचे फोटो आहेत.ही तारीख खरी नाही.लाहोर कटाच्या खटल्यात तीघा क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा 23मार्च 1931 रोजी " सुनावण्यात" आली होती.६ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली होती.हा खटला रेकॉर्डेड आहे. त्या वेळच्या वर्तमान पत्रात सविस्तर याबद्दल आले आहे.
शहीदांबद्दल खोटे लिहून 'व्हॅलेन्टाईन् डे' ला विरोध करायच हे षडयन्त्र आहे.याच प्रवृतिनी देशात गेली आठ महीने धुमाकुळ घातला आहे.त्यांना यशस्वी होवू देऊ नका. ते पोस्ट लाईक करू नका.त्या पोस्टला शेअर  करू नका...
मित्रांनो इतिहास समजून घ्या. धर्मांध लोकांच्या  पोस्ट शेअर करू नका. कालपासून whatsappवर आणि फेसबुकवर मुद्दाम खोटे मेसेज पसरवण्यात येत आहे
गोडसेनीे सशस्त्र वा अहिंसक कोणत्याही आंदोलनात भाग घेतला का? नाही
फक्त  ज्वलंत भाषण व लिखाण करून लोकांना एकमेकांविरूध्द भडकवणे याला शौर्य म्हणतात का?

सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी व भगतसिंग या तिघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागले ? कोठेही धार्मिक भावना भडकवल्या नाहीत

सुभाषचंद्र बोस च्या आझाद हिंद सेनेत गांधी व नेहरू टुकडी होती

भगत सिंगांनी धर्म का  सोडला व नास्तिक का झाले हे जरा तपासुन पहावे.त्यांनी कधी कोणाला धर्माच्या नावावरून भडकवले का?त्यांचे "मै नास्तिक क्यों हुँ" पुस्तक वाचा

जातिवादी लोकांनी धर्माच्या नावावर लोकांना भडकवणे बंद करावे
आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा.
शेवटी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
….
सत्य :- लक्षात ठेवा तोडणे खूप सोपे असते… ज्वलंत विचार व ईर्ष्या  करणे जरी सोपे असले तरी त्याने समोरच्याचेही नुकसान होते व आपलेही  

…. माणुस म्हणुन जगुया

🙏एक नम्र विनंती शक्य असेल तितक्या आपल्या बंधू आणि भगिनी पर्यंत हे विचार पोहोचवा.

चला भारताला सार्वभौम राष्ट्र बनवुया
….
🇮🇳जयहिंद🇮🇳
ईन्कलाब झिन्दाबाद
🇮🇳जयहिंद🇮🇳
संकेत मुनोत

No comments:

Post a Comment