सर्व मित्रांना नम्र विनंती कि शिवाजी महाराज प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यासावे
आता ऊद्या शिवाजी महाराजांचा खरा ईतिहास सोडुन त्यांच्याबद्दल हिंदुत्ववादी लोकांनी लिहलेल्या ईतिहासाचे मेसेज
अनेक लोक अंधपणे पसरवतील
जे Valentine day ला भगतसिंग बलिदान दिवसांचे खोटे मेसेज आणि पोस्ट शेयर करत होते ते आता शिवाजी महाराजांना ही फक्त एकाच धर्माचा राजा वगैरे वगैरे म्हणतील पण लक्षात ठेवा शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते
शिवाजी राजे शेतक-यांचा कैवारी होते, कुळवाडी भुषण होते, रयतेचे रक्षक होते, राजाची वस्त्रे घालून सिंहासनावर बसणारा सामन्य माणूस होते, सरदारांचा सन्मान राखणारा गुणग्राहक राजा होते स्त्रीला सन्मान देणारे नरवीर होते, मुत्सद्दीपणे शत्रूशी दोन हात करणारा पराक्रमी राजा होते अशी शिवरायांची अनेक रुपे सोडुन आपण त्यांना फक्त कोणा एका धर्मात व जातीत वाटु नये
भारताबाहेरही त्यांचा प्रभाव होता हे तुम्हाला व्हिएतनामवरुन दिसुन येईल
व्हिएतनाम हा छोटासा देश 20 वर्षे अमेरिकेविरुध्द लढत होता
अमेरिकेच्या बलाढ्य nuclear weapons समोर तो तग धरु शकत नव्हता पण तो जिंकला त्या यशाचे रहस्य त्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा हे सांगितले होते.documented आहे
त्यांचा साईटवर जाऊन पहा
बाहेरचा देश त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि आपण त्यांना नुसता एका धर्माविरुध्द वा एका धर्माच्या बाजुने वगैरे म्हणतो
छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून शिवाजी महाराज मांडतात
पण 'कै. नरहर कुरुंदकर' यांचे लेखन एकदम practical वाटते कुठे अतिशयोक्ति नाही कि कुठे अतिरंजितपणा नाही .
'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या त्यांनी लिहिलेल्या फक्त 60पानांच्या पुस्तकात आपणासमोर बर्याच माहिती नसलेल्या गोष्टी ऊलगडत जाता
श्रीमान योगी'(लेखक रणजित देसाई )ला सुध्दा नरहर कुरुंदकर सरांची प्रस्तावना आहे जमल्यास ती वाचावी
पुस्तकातील खालील 2परखड ऊतारे खुप काही सांगुन जातात
"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही"
"परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"
आणि खालील वाक्य तर अप्रतिमच
"शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.'
आजही शिवाजी महाराज तेवढेच Relevant आहेत
त्यांची management आणि ईतर असंख्य पैलु आपण अभ्यासले पाहिजेच.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे ते आयुष्यात implement केले पाहिजेत तेव्हा कुठे आम्हाला शिवाजी महाराज खर्या अर्थाने समाजतील
संकेत मुनोत
जय जिजाऊ !!! जय शिवराय !!!
No comments:
Post a Comment