Tuesday, 28 April 2015

हिंदुत्ववादी महात्मा गांधी जगन फडणीस

महात्मा गांधी विषयी हिंदुत्ववाद्यांना द्वेष होता व आहे , तो एखाद्या च्या व्यक्ती द्वेषा सारखा नाही.  गांधीच्या  विचाराने हिंदुत्ववाद्याच्या विचाराला रोखले आणि त्यांच्या राजकारणाला पायबंद बसला म्हणुन गांधीविषयी द्वेष होता . हिंदुत्ववादी ज्या वर्गातुन आले तो वर्ग पेशवाई संपल्यापासुन सत्तेवरुन फेकला गेला होता.टिळकांच्या   राजकारणामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. त्या गांधीच्या पाजकरणाने करपुन गेल्या .म्हणुन हिंदुत्ववाद्याच्या गांधीच्या विचारसरणीवर द्वेष होता.त्यातही पुण्याचा ब्राम्हणवर्ग होता . त्यांच्यापैकी काहीजण हिंदुत्ववादी होते. मग मुंबई च्या हिंदुत्ववाद्यांचा गांधी द्वेष पुण्याच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा कमी का?    याचाही विचार केला पाहिजे आणि तो विचार केल्यास असे लक्षात येईल कि, संभाजीच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ब्राह्मणांच्या हातात गेले  होते   ते पेशवाई  बुडेपर्यंत आणि टिळकांच्या काळात ब्राम्हणाकडे राजकारणाची सुत्रे होती .त्यामुळे पुण्यातील ब्राम्हणांनी काळानुरुप बदलण्याचे नाकारले. ते त्यांना जमले नाही. पेशवाई गेल्यानंतर राजकारणाच्या हालचाली मुंबईत केंद्रित झाल्या .मुंबईत हिंदु मुस्लिम ,पारशी यांच्या व्स
व्यवहारात सरमिसळपणा होता. पुण्याप्रमाणे मुंबईत ब्राम्हणांचे वर्चस्व राहिलेले नव्हत. तसेच मुंबईत ब्राम्हण वर्ग पुण्याप्रमाणे एकजिनसी राहिलेला नव्हता .टिळकांसारखा नेता च्या ऊदयास आल्यावर पुण्यातील ब्राह्मण वर्गााला जी आशा वाटत होती तिलाच धक्का बसला .त्यातुन गांधी द्वेषाचे राजकारण सुरू झाले.सर्वच ब्राह्मण गांधीद्वेष्टे नव्हते नव्हते. केळकर ,खापर्डे यांच्यासारखी मंडळी दुर राहिली तरी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ,  आचार्य जावडेकर, आचार्य स.ज. भागवत अशी कितीतरी मंडळी ब्राम्हणी मंडळी गांधीच्या प्रभावाखाली आली. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचे पित्त आणखीच खवळले. ब्राम्हणवर्गातील काहींनी गांधी विचारसरणी स्वीकारली.  पण ज्यांनी नव्या बदलास सामोरे जाण्याचे नाकारले ते कट्टर हिंदुत्ववादी  बनले आणि द्वेषाने अंध झाले. नवे विचार व नवे राजकारण यांचा दैदिप्यमान प्रकाश पाहुन त्या प्रकाशाचा स्वीकार करण्याऐवजी त्यांनी स्वतःचे डोळेच म त्यांनी मिटुन घेतले. ज्या गांधीमुळे हा प्रकाश पडला होता त्या प्रकाशाचेच ते विरोधक बनले आणि गांधींना ठार मारल्याशिवाय त्यांचा विचार रोखता येणार नाही या विचाराप्रत ते आले .विचारांचा मुकाबला विचाराने करण्याईतका प्रभावी विचार हिंदुत्ववाद्यांजवळ नव्हता .तसेच प्रभावी नेतृत्वही त्यांच्याजवळ नव्हते . जुन्या विचारांचा टिकाव लागत नाही आणि नव्या विचारांचा बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. त्यावेळी अशीच विकृती तयार होते.म्हणून हिंदु धर्माजवळ जी विकृती आहे तशीच विकृती  मुस्लिम धर्मांधाजवळही आहे.नवे विचार स्वीकारण्यास तयार नाहीत

No comments:

Post a Comment