मला ज्याप्रमाणे जैन धर्माची माहिती आहे ईथे अवतारमहिमेला सक्त विरोध केला आहे
तुम्ही जसे कर्म कराल तसेच फळ तुम्हाला मिळेल हे हा धर्म सांगतो
जैनाचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर हे कोणत्याही परमेश्वराचे अवतार नव्हते तर त्यांनी कर्म चांगले केले म्हणुन ते वर्धमानचे भगवान महावीर झाले हे जैन धर्म मानतो
जसे गौतम बुध्दाला वैदिकांनी विष्णुच्या अवतारात टाकण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न महावीरांबाबतही झाला होता पण जैनांच्या विरोधामुळे व आधीच्या 23तीर्थंकराचे काय करायचे या अडचणीमुळे वैदीक ब्राम्हणाचा तो डाव फसला
क्रुष्ण राम यांचे सगळ्यात जुने पुरावे जैन धर्मातील ग्रंथातही अरधमागधी व आंग्ल भाषेत मिळतात पण ते विष्णु वा कुणाचा अवतार म्हणुन नाही तर ते एक माणुस म्हणुन जन्माला आले होते व आपल्या कर्मानी ते मोठे झाले असे जैन धर्मात लिहलेले आहे
"माणसाचा देव अथवा अवतार ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
कारण अश्यामुळे काय होते अरे ते क्रुष्ण महावीर बुध्द देव होते म्हणून त्यांना ते शक्य होत आपण सामान्य माणुस आणि माणसाचा देव एकदा केला कि त्याची चिकित्साच आपण करत नाही
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment