पतियाला हाउस कोर्टासमोर मी पोहोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. सेक्युरीटी गेटमधून पुढे येताच मला दिसलं- काही वकील एका तरुणाला मारत होते. मारहाण करणारे 'हा देशद्रोही आहे' अशा घोषणा देत होते. 'जेएनयुच्या विद्यार्थ्यांसारखे' कपडे घातलेल्या कुणालाही झोडपले जात होते. इंडियन एक्सप्रेसमधील माझ्या सहका-यांना संपर्क करण्यासाठी फोन करु लागलो तेव्हा माझ्याजवळ काही लोक आले ते म्हणाले, " याचं व्हिडिओ शूटिंग करु नका" मी व्हिडीओ शूटिंग करत नाही तर कॉल करतआहे, असं मी सांगितलं तर मला थोबाडीत मारली गेली. माझा फोन हिसकावून ताब्यात घेण्यात आला.दहाबारा जणांचा घोळका माझ्याजवळ आला मला थपडा मारण्यात आल्या. डोक्यावर आपटलं गेलं. बाजूला पोलिस उभे होते. ते केवळ बघत उभे होते. " याने व्हिडीओ रेकॉर्डिंग केलंय. याला इथून हाकला" असे आवाज येत होते. पुन्हा माझ्याजवळ एक वकील आला नि त्यानेही मला मारहाण केली. अखेरीस दुसरा एक वकील आला त्यानेच मला या जमावापासून सोडवलं. मी माझा फोन मागितला. तर संपूर्ण स्क्रीन क्रॅक करुन मला माझा मोबाइल देण्यात आला. मी गेटकडे निघालो तेव्हा आणखीही काही पत्रकारांना वकीलांनी घेराव घातला होता. त्यांचा पाठलाग करत होते. डीएनए वृत्तपत्राचा आझानलाही असाच त्रास दिला गेल्याचं मला दिसलं. स्कॅनर मशीनजवळ उभ्या असलेल्या पोलिसाला मी विचारलं-
" मला का मारलं गेलं ? मीडियाला का टार्गेट केलं जातंय ? तुम्हीआमच्या मदतीला का आला नाहीत ?"
मख्ख चेह-याने पोलिस म्हणाला, " पुन्हा असं घडण्याआधी इथून पळ काढा"
मी गेट नं २ कडे गेलो जिथून इंडिया गेट सुरु होते !
-
अलोक सिंग
इंडियन एक्सप्रेस
No comments:
Post a Comment