Tuesday, 30 December 2014

लोकमान्य चित्रपट

📝टिळक चित्रपटाच्या जाहिराती गेले कित्येक दिवस बघतोय , टिळक ह्या विषयावर बोलने जाणीवपूर्वक टाळत होतो👐 . ह्या विषयाला एवढी किंमत द्यायची मला तरी गरज वाटत नव्हती🌑 , एक तर हे काय दाखवणार - मुख्य म्हणजे काय नाही दाखवणार हे आधी पासून माहितीच होते . पण आता यांच्या जाहिराती बघता व त्यात केलेले इतिहासाचे विकृतीकरन बघता आज लिहावे लागले .

* कारण नसताना महात्मा गांधी व महात्मा फुले यांना किंवा त्यांच्या विचारसरनीला कमी लेखन्याचा प्रयत्न , तसा एक प्रसंग दाखवला जात आहे - मुळात याच बा. ग. टिळकांनी केलेल्या लखनो करार असो की इतर ऐतिहासिक चुका गांधीजींना निस्तराव्या लागल्या . आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञाना वर काहीही कारण नसताना केलेली टिका पुढील काळात कोणता मार्ग यशस्वी ठरला हे बघता किती भंपक आहे हे लक्षात येते .

* सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते टिळकांना दाखवले आहे 🚩- मुळात हिंदूस्थानातिल पहिला सार्वजनिक गणपति हां 🔷" श्रीमंत भाऊ साहेब रंगारी "🔷 यांनी व त्यांच्या 2 सहकार्यांनी मीळून बसवला . आजही त्या गणपती मंडळाची पाटी " हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपति " ✅अशीच आहे . पुण्यामधे शनिवार वाड्याच्या पुढे आल्यावर वसंत सिनेमा च्या पुढील बोळात साईंबाबा मंदिर आहे , तिथून 2 मिनिटावर हा🌇 गणपती आहे . त्या काळी बसवलेली मूर्ती व मिरवणुकिचा रथ आजही बघायला मिळतो . विसर्जन मिरवणुकिमधे देखिल ती मूर्ती व तोच रथ आजही असतो . जीज्ञासुंनी स्वतः बघून खात्री करावी . सार्वजनिक गणेशोत्सवा बरोबर सार्वजनिक शिवजयंतीचे श्रेय देखिल टिळकांना कारण नसताना दिले जात होते पण गेल्या काही वर्षात झालेले प्रबोधन बघता तो खोडसाळपना करण्याचे धैर्य लेखक-निर्माता-दिग्दर्शक यांनी दाखवलेले दिसत नाही .

* चित्रपटात टिळक़ हे मोठे🔥🔥 क्रांतिकारी वैगेरे दाखवले आहेत - टिळकांनी bomb 💣फोडल्याचा - कोना वर गोळी🔫 चालवल्याचा एखादा संदर्भ किंवा एखादा प्रसंग दाखवला असता तर बरे झाले असते . सुभाषचंद्र बोस व गांधीजी  कोणत्याही आंदोलनात स्वतः पुढे असायचे हे निदान लक्षात ठेवावे .🇮🇳

* " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " हां अग्रलेख जरुर दाखवतील पण वेदोक्त प्रकरणा नंतर लिहिलेले अग्रलेख - विशेषत: " वेदोक्ताचे खुळ " हां अग्रलेख दाखवतील काय ?😷

* टिळक हे देशाचे नेते दाखवतील पन वेदोक्त प्रकरणानंतर त्यांचे एकाच जातीचे नेते हे रूप दाखवतील काय ?👳

* समाजसुधारक टिळक दाखवतील पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबरोबर झालेला संघर्ष दाखवतील काय ???

* वेदोक्त प्रकरण - ताई महाराज प्रकरण दाखवतिल का ????

* पुरोगामी टिळकांनी विलायतेवरून आल्यावर घेतलेले प्रायश्चित्त दाखवतिल का  ?????

* महात्मा फुले यांनी टिळकांची काढलेली मिरवणुक - महात्मा फुले यांनी दिलेला जामीन दाखवतील पण महात्मा फुले यांच्या मृत्यु नंतर दोन ओळीची सुद्धा स्वतःच्या मालकीच्या वर्तमानपत्रात बातमी न देणारे कोत्या मनोवृत्तीचे टिळक दाखवतिल का👎 ??

असो ,
अकथित टिळक लिहिण्यासाठी📙 पुस्तक लिहावे लागेल

असहकार आंदोलनाच्या प्रसंगी लो. टिळकांनी काय केले असते?❓
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, टिळकांनी लाला लजपत राय, दास व नेहरू यांच्याप्रमाणेच गांधींचे अनुकरण केले असते. 👬👬👬👬🙇👨

"👨गांधींनी कॉंग्रेसचे बहुमत काबीज केल्यास आपल्या अनुयायांसह गांधीना एकनिष्ठ साहाय्य करण्याचे वचन टिळकांनी दिले होते"✊

वचनाला टिळक किती जागत याचा प्रत्यय जगाला आहेच. ☝
( राहुल रांजणगावकर यांना धन्यवाद)

Monday, 29 December 2014

गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामविकास

गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामविकास **गांधीजी हे विसाव्या शतकातील अजूनही न उकललेलं कोडं आहे, आणि कदाचित ते कधीही न उलगडलं जाणारं विलक्षण गूढ आहे. जगातील अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांनी, दूरचित्रवाहिन्यांनी, जनमत घेणाऱ्या तज्ज्ञांनी गांधीजींना विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ति म्हणून निवडलं. ही आपल्या भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आज एकविसाव्या शतकातही गांधीजीचं तत्वज्ञान त्यांचे विचार तरुण पिढीला भारावून सोडत आहे. **ग्राम स्वराज्याची कल्पना मांडतांना गांधीजी म्हणतात, प्रत्येक गावात गावकऱ्यांजवळ आपल्या कारभाराची पूर्ण सत्ता आणि अधिकार राहतील, जनतेच्या हातात सत्ता आली म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर होणारा हस्तक्षेप कमीत कमी होतो. जे राष्ट्र आपले कामकाज राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय शांतपणे करुन दाखविते त्यालाच खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्र म्हटले जाऊ शकेल, सरकारी नियंत्रणापासून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करणे हा स्वराज्याचा अर्थ आहे. **माझ्या कल्पनेतील गावात शुध्द चैतन्याचा संचार राहील, प्राणीमात्र अंधाऱ्या गोठयात राहणार नाही, स्त्री, पुरुषांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, साऱ्या जगाचा मुकाबला करण्याची शक्ती त्यांच्यात असेल, गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेत मानवाचे कल्याण, शरीरश्रम, समानता, संरक्षण, विकेन्द्रीकरण, स्वदेशी, स्वावलंबन, सहयोग, सत्याग्रह, धार्मिक समानता पंचायत राज, नई तालीम या गोष्टींना प्राधान्य आहे. **शहरे त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. आपल्याला खेडयांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांचे पूर्वग्रह, त्यांच्या भ्रामक समजुती, त्यांचा संकुचित दृष्टिकोन यांच्यापासून खेडयांना मुक्त करायला हवे आणि खेडूतांमध्ये राहून त्यांच्या सुखदु:खात वाटेकरी होऊन, शिक्षणाचा प्रसार करुन, त्यांना विविध विषयांची माहिती देऊन, आपल्याला हे काम करता येईल. याखेरीज अन्य कोणताही मार्ग नाही, असे गांधीजींना वाटत होते. **आपण भर उन्हात शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांशी समरस झाले पाहिजे व ज्या तळयात खेडूत आंघोळ करतात, भांडी व कपडे धुतात, त्यांची गुरेढोरे पाणी पितात व डुंबतात त्या तळयातील पाणी प्यायला कसे वाटेल याचा विचार आपण केला पाहिजे. असे केल्यानंतरच आपण खरेखुरे लोकांचे प्रतिनिधित्व करु व लोकही आपल्या प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद देतील,प्रतिसाद देती अशी गांधीजींची भावना होती. **लायनेल कर्टिस याने आपली खेडी म्हणजे उकिरडे आहेत असे म्हटले आहे. या उकिरड्यांचे रुपातर गांधीजीना आदर्श खेडयात करावयाचे होते, कारण आपल्या खेडूतांच्याभोवती ताजी हवा असली तरी त्यांना ती घेता येत नाही. त्यांच्या भोवती ताजे अन्न असले त्यांना त्या आस्वाद घेता येत नाही. वेळ व पैसा यांची बचत, तसेच आरोग्य कसे राखावे यांचे ज्ञान खेडयातील लोकांना नाही. हे गांधीजीनी ओळखले होते व त्यादृष्टीने खेडयांमधे सुधारणा करण्याकरिता कार्यकरण्याचं गांधीजींनी ठरविले होतं. **यासाठी गांधीजींनी प्रत्येक गावी एका शाळेची स्थापना केली. हे लोक गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत. त्याचप्रमाणे गावातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवीत. या शाळेत जुजबी औषधांची तयारी असे. शिक्षण याचा अर्थ गांधीजी 'जीवनाकरिता योग्य शिक्षण' असा करीत. म्हणूनच या शाळेत पुस्तकी शिक्षणावर भर नव्हता. गावातील लोकांना सफाईचे शिक्षण स्वयंसेवकांनी देण्यास सुरुवात केली. रस्ते, विहिरी आणि घराची अंगणे साफ करणे हे त्यांचे पहिले काम होते. **ग्रामसुधारणा करावयाची म्हणजे लोकांना शिक्षण देणं आवश्यक आहे, असं गांधीजींना वाटलं. पण त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. त्यांनी लोकांना पाश्चिमात्य पध्दतीने शिक्षण दिले होतं. म्हणूनच गांधीजींच्या मनात राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना आली. त्यांनी शिक्षणाची नवीन पध्दत काढली. यासाठी त्यांनी १९३८ साली सेवाग्राम येथे एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांना नेमले. या शिक्षण पध्दतीस वर्धा शिक्षण पध्दती किंवा बेसिक शिक्षण पध्दती म्हणतात. **१९४५ साली हिंदुस्तानी तालिमी संघाच्या परिषदेत गांधीजींनी आपले विचार स्पष्ट केले. अथांग सागरातून प्रवास करताना ध्रुवतारा हा एकच मार्गदर्शक असतो. त्याप्रमाणे वर्धा शिक्षणामध्ये ग्रामोद्योग हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे आपण खेडेगावचे शिक्षक बनणार आहोत. म्हणजेच खेडयांचे सेवक. हे काम आपण मोबदला मिळेल म्हणून करावयाचे नाही. या योजनेस सरकारी सहाय्य नाही. म्हणूनच हा शिक्षणक्रम आपण यशस्वी करुन दाखवावयाचा आहे. यामुळे बालकांच्या मनाचा पूर्ण विकास होईल. खेडयाची उन्नती खेडयातील लोकच करु शकतील. त्यांना म्हणूनच स्वावलंबन शिकवावयाचे आहे. हेच आमच्या शिक्षण पध्दतीचे ध्येय आहे. **भारतातील बहुसंख्य ग्रामीण लोकांचा मुख्य धंदा शेती. तिला पूरक म्हणून गांधीजींनी ग्रामोद्योगावर भर दिला. तसं करतांना त्यांनी काही मर्यादेपर्यंत यंत्रशक्तीचे स्वागतही केले. भारताच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करताना देशाच्या सात लक्ष खेडयांतून राहणाऱ्या जनतेची चिंता राजकीय नेत्यांनी आणि अर्थशास्त्रज्ञांनी केली पाहिजे असा गांधीजींचा नेहमी आग्रह राहिला होता. आज खेडयांतून राहणाऱ्या लक्षावधी लोकांना शेतीमधून संपूर्ण वर्षभर काम मिळू शकत नाही, एरवीही दिवसभर कष्ट करुन जो रोजगार मिळतो त्यावरच त्यांना राहावे लागत असे. **भारताची परंपरागत अर्थव्यवस्था ग्रामीण विभागाच्या स्वयंपूर्णतेवर आधारलेली होती. खेडयातील १२ बलुतेदारांचे व्यवसाय एका अर्थाने गावातल्या गावात पूरक उद्योग निर्माण करीत असत, त्यायोगे शेतकऱ्यांना त्यांच्या बेकारीच्या काळात रोजगार उपलब्ध होत असे. निसर्गसंपत्तीवर योग्य प्रक्रिया करण्याचे काम खेडयातच चालत असल्याने एक नवी संपत्ती गावातल्या गावात निर्माण होई. शिवाय गावच्या बहुसंख्य गरजांच्या बाबतीत ते स्वयंपूर्ण होई. परकीय सत्तेमुळे मोठे उद्योगधंदे शहरातून सुरु झाले आणि खेडयातील **व्यवस्थेला घरघर सुरु झाली. यावर मात करण्यासाठी गांधीजींनी ग्रामोद्योगावर भर देण्याचे ठरविले.ग्रामोद्योगांच्या पुनरुज्जीवनाचा आग्रह धरतांना गांधीजींचा भर त्यामागच्या मानवतावादी दृष्टीकोनावर होता. ग्रामोद्योगांसाठी इमारती, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञांची आवश्यकता फारच मर्यादित असते. यंत्रशक्तीचा वापरही जरुर तेथेच होत असल्याने विजेचा आणि इंधनाचा खर्चही बेताचा. त्यामुळे मोठया प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते. उत्पादन मात्र त्वरीत होवू शकते. **ग्रामीण उद्योगांच्या उभारणीनंतर प्रत्यक्ष उत्पादन हाती येईपर्यंतचा काळ फारच थोडा असल्याने उत्पादनाचा फायदा मिळण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही. ग्रामोद्योगाचा पुरस्कार करतांना गांधीजींनी किती मूलगामी विचार केला होता, हे या विवेचनावरुन स्पष्ट होते. ग्रामोद्योगाचा पुरस्कार करुन गांधीजी देशात बैलगाडीवर आधारलेली अर्थव्यवस्था पुन्हा आणू पाहत होते. **अर्थशास्त्राला योग्य समज असलेल्या कोणाही व्यक्तीला भारतासारख्या देशात ग्रामोद्योगाची आवश्यकता सहज पटण्यासारखी आहे. विख्यात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गुन्नार मिरडाल यांनी गांधीजींच्या ग्रामोद्योग-विकासाच्या कार्यक्रमाचे आग्रहपूर्वक समर्थन केले होते. ते म्हणतात, ग्रामोद्योगाशी स्पर्धा करणारे मोठे उद्योगधंदे प्रस्थापित करण्याने लक्षावधी खेडूतांना काहीच कामधंदा उरणार नाही. त्यांच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल. नियोजनाच्या दृष्टीने ते विसंगत ठरेल. ग्रामोद्योगाच्या पुरस्कारामागे गांधीजींची दृष्टी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाची आणि स्वावलंबनाची होती. **अन्न वस्त्रांसारख्या किमान मूलभूत गरजांच्या बाबतीत तरी ग्रामीण जनतेने स्वावलंबी व्हावे. असा त्यांचा कटाक्ष होता म्हणूनच तेलघाणे, चर्मोद्योग, कुंभारी वगैरे परंपरागत उद्योग आणि हातकागद, नीरा, ताडगूळ वगैरे ग्रामोद्योग सुरु करण्यास त्यांनी स्फूर्ती दिली. ग्रामोद्योगाचा विकास होत जाईल तसतसे नवेनवे उद्योगही साविष्ट होऊ शकतील असा गांधीजींचा विचार होता. **ज्या काळात महात्मा गांधीजींचा जन्म झाला आणि त्यांना जे जीवन जगावे लागले त्या काळाची जी सर्वात कठीण समस्या होती, ती होती सामान्य माणसाच्या जीवनाची. समाजात काहीही असले तरी साधारणत: दोन वर्ग नेहमीच निर्माण होत असतात. समाज म्हटला की, तो संघटित समूह आणि संघटित म्हणून त्यात नियंत्रक आणि नियंत्रित असे दोन वर्ग आपोआपच निर्माण होतात. या दोन वर्गात ज्या दिवशी भेद पूर्णत: नष्ट होईल तो दिवस सर्वोच्च महत्वाचा ठरेल. **म्हणूनच गांधींजीवर लिहिलेल्या गद्य काव्यात बाबा आमटे म्हणतात, गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही, उद्याच्या पिढयांना त्यांची ओळख पटण्यासाठी कदाचित कॉम्प्यूटर लागेल. पण काळाच्या भाळावर उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.

Wednesday, 24 December 2014

ख्रिसमसच्या शुभेच्छा व आपण

एका मित्राचा मेसेज आला कि मला एकतरी ख्रिश्चन दाखवा,
जो तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा देत
तुम्हाला आज हजारो हिंदू दाखवतो,
जे आजपासूनच नाताळाच्या शुभेच्छा देत फिरत आहे.....

माझ ऊत्तर होत निमित्तच लागत कारे तुम्हाला जातीधर्माच्या नावाने लोकांना भडकवायला
अरे दिवाळी सगळेच साजरे करतात तो हिंदु असो वा मुस्लिम वा ख्रिस्चन
सगळ्या ग्रुपमधील वातावरण शांतच
नका रे माणसा माणसात फुट पाडु
दिवाळी, ईद आणि ख्रिसमस या निमित्ताने तर सर्व एकत्र येतात.

Thursday, 11 December 2014

जगातील राष्ट्रपुरूष व आपला राष्ट्रपुरूष फरक

मित्रांनो आपला राष्ट्रपिता आणि जगातील इतर राष्ट्रपुरूषांमध्ये काय फरक आहे माहीत आहे का??....."
आपल्या राष्ट्रपित्याचे उदात्तीकरण करण्याची आपल्याला कधीच गरज भासली नाही इतके महान व्यक्तिमत्व आहे हे !
त्यांच्याविरुध्द प्रचंड अफवा पसरवल्या जातात
प्रत्येक जातीतील महापुरूषाशी याची तुलना करून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केेला जातो पण तरीही हा माणुस कोणालाही विरोध न करता  सगळीकडे पोहचतो व मनावर राज्य करतो

त्यांचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलिनियम’वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. मोठमोठे लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी मोठमोठी नावं मागं पडली(लेनिन,लिंकन,वॉशिंगटन, कार्व्हर ,व अनेक....), आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणुनच म्हणाले कि
"मरते है हम तुम गांधीजी नही मरते"
एवढ असुनही मला अजुन अनेक मित्र भेटतात ज्यांना गांधीजी ला महात्मा अथवा जी लावण्यासही लाज वाटते
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्या गोडसेनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
हा जो अपप्रचार व अफवा पसरवणे त्यांनी चालू आहे हे त्यांच्या वाईट कृत्यामुळे नसुन चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे शक्य झाले आहे मी गांधीवादी नाही परंतु एखाद्याच्या ज्वलंत लिखाणावरुन त्या महान माणसाला मुर्ख समजणारा नाही लिखाण सर्व वाचले ते 55कोटीँचे बळी,मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक पाहिले,त्या विदेशी लेखकाचे GANDHI NAKED AMBITION, सावरकरांची गांधी टीकात्मक पुस्तके, वाचली हे सर्व पाहिल्यावर असे वाटले कि गांधी जणु भारताचा शत्रुच आहे
व गोडसेने केलेले कार्य म्हणजे जणु देशसेवाच पण  असे वाटायचे परंतु त्यानंतर काही चांगल्या लोकांशी संपर्क आला(डॉ. अभय बंग) मग चांगल्या लेखकांचे सत्य लेखन ही वाचले आहे
जसे की पुल देशपांडे चे गांधी चरित्र,फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर,अनिल अवचट, रघुनाथ माशेलकर,सरदार पटेल ,राजेंद्रप्रसाद  हेही वाचले आहेत आणि शहानिशा करुनच जे सत्य आहे तेच मांडले आहे
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका

संकेत मुनोत 

मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते

https://m.facebook.com/groups/562250187168592

सावरकर, गांधी व सत्य

30 सेकंदच लागतील वाचायला पण तेच  जग 30 सेकंद सर्व बदलु शकतात.वाचुन तर पहा

स्वा. सावरकरांनी गांधीना ऊद्देशुन लिहलेल्या पुस्तकातील ही काही वाक्ये व त्याला सत्य हे माझे ऊत्तर तुम्हाला कोणते पटते ते पहा
--------
स्वा. विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या गांधी गोंधळ मधील काही निवडक विचार📝
वाचा आणि विचार करा कुठली मते धर्माला धरून आहेत, आपण सर्व हिंदूंनी नक्की काय शिकायला पाहिजे, कोणाचे ऐकायला पाहिजे आणि नक्की कसे वागले पाहिजे
गांधी, सावरकर , सत्य
आपणास कोणता पटतो ते पहा

गांधी :- भारत वासीयांनो शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा.

सावरकर :- शत्रुवर प्रेम कींवा विश्वास टाकला जात नाही.

सत्य :- शत्रूवर विश्वास ठेवला नाही आणि विनाकारण हिंसा करत राहिलो, तर दोघेही संपाल…😀

गांधी :- अहिंसेचा मार्ग स्विकारा, कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर :- स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो, एक गळाकापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही.

सत्य :- स्वसंरक्षण म्हणजे कुरापती काढणे किंवा सतत ज्वलंत विचार बोलून दाखवून शत्रू पैदा करणे नाही… तोंड बंद ठेवाल आणि चांगले विचार जगाला द्याल तर शत्रू निर्माणच होणार नाहीत.
मंडेलापासुन प्रकाश बाबा आमटे पर्यंत पुर्ण जगात कोणते विचार स्वीकारले 

गांधी :- मी एक हींदु आहे, आणि हिंदुंचे सगळे देव शांतीचा संदेश देतात.
सावरकर :- तुम्ही पोकळ हिंदु आहात, प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे, तर श्रीक्रुष्णाच्या हातात सुदर्शन चक्र.सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात.

सत्य :- बुध्द,मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, महावीर, मलाला, प्रकाश बाबा आमटे   आंग सान स्यू की आणि अश्या  कोट्यावधी लोकांनी  गांधीजींचा मार्ग अवलंबला…. लादेन, गोडसे,ISIS, लश्कर ए तयबा, तालिबान ,इ. भक्तांनी किती प्रगती केली?…. विचार करा जिथे चर्चेने प्रश्न सोडवले जावू शकतात तिथे चर्चा अवश्य करावी… हनुमान, अंगद यांना श्रीरामाने चर्चेस पाठवले होते… श्रीकृष्ण शिष्टाई… शस्त्र उचलणे हा शेवटचा पर्याय असतो… आता धनुष्य़, तलवारी नाहीत अणुबॉम्ब आहेत…💣💣 घ्या हातात आणि टाका एकमेकावर…

गांधी :- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट, शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा.
सावरकर:- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. सीमा ह्या तलवारीने आखता येतात तत्वांनी नाही.
सत्य :- जग हे असिमीत संधीने व्यापलंय स्वत:ला सीमा आखून घेवून बंदिस्त करू नका… ओबामा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होवू शकतो आणि उद्या एखादा भारतीय पण होईल… आपण २१व्या शतकात जगतोय अठराव्या नाही… मागासलेले विचार सोडा… उज्वल भविष्याकडे वाटचाल करा

गांधी :- तलवारी नकोत, हृदय परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन जिंका.
सावरकर :- ज्याने आपल्याला मारुन टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. अफजल खानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही त्याचे हृदय फाडावे लागते.

सत्य :- वाईट काम करणाऱ्या व भेकड लोकांनाच कुणीतरी आपल्याला मारेल याची सतत भीती असते…. आज अफजलखान निर्माण होतील कसे? ज्या देशात धार्मिक लढाया लढल्या जातात तिथेच असे लोक तयार होतात…. आपल्या देशाला युरोप अमेरिका बनवायचे आहे की धार्मिक दंगली करून इराक, सिरीया इ. बनवायचे आहे?
(सावरकर विचार जर एवढेच प्रिय आहेत तर का महामहीम मोदी प्रत्येक भाषणात गांधीजीचाच का ऊल्लेख करतात?
व का  प्रत्येक देशातील राष्ट्राध्यक्षाला  Geeta according to Gandhi हे पुस्तक  भेट देतात?
द्यायची ना Geeta according to sawarkar भेट ?

का जगभर जाऊन सांगतात कि गांधीजी आजच्या युगात खरे  आदर्श आहेत म्हणून?)

गोडसेनीे सशस्त्र वा अहिंसक कोणत्याही आंदोलनात भाग घेतला का? नाही
फक्त  ज्वलंत भाषण व लिखाण करून लोकांना एकमेकांविरूध्द भडकवणे याला शौर्य म्हणतात का?

सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी व भगतसिंग या तिघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागले ? कोठेही धार्मिक भावना भडकवल्या नाहीत

सुभाषचंद्र बोस च्या आझाद हिंद सेनेत गांधी व नेहरू टुकडी होती

भगत सिंगांनी धर्म का  सोडला व नास्तिक का झाले हे जरा तपासुन पहावे.त्यांनी कधी कोणाला धर्माच्या नावावरून भडकवले का?त्यांचे "मै नास्तिक क्यों हुँ" पुस्तक वाचा

जातिवादी लोकांनी धर्माच्या नावावर लोकांना भडकवणे बंद करावे
आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा.
शेवटी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
….
सत्य :- लक्षात ठेवा तोडणे खूप सोपे असते… ज्वलंत विचार व ईर्ष्या  करणे जरी सोपे असले तरी त्याने समोरच्याचेही नुकसान होते व आपलेही  

…. माणुस म्हणुन जगुया

🙏एक नम्र विनंती शक्य असेल तितक्या आपल्या बंधू आणि भगिनी पर्यंत हे विचार पोहोचवा.

चला भारताला सार्वभौम राष्ट्र बनवुया
….
🇮🇳जयहिंद🇮🇳

Tuesday, 9 December 2014

लोकमान्य टिळक व गांधीजी वाद किती सत्य वा असत्य

असहकार आंदोलनाच्या प्रसंगी लो. टिळकांनी काय केले असते? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, टिळकांनी लाला लजपत राय, दास व नेहरू यांच्याप्रमाणेच गांधींचे अनुकरण केले असते. गांधींनी कॉंग्रेसचे बहुमत काबीज केल्यास आपल्या अनुयायांसह गांधीना एकनिष्ठ साहाय्य करण्याचे वचन टिळकांनी दिले होते. वचनाला टिळक किती जागत याचा प्रत्यय जगाला आहेच. -इतिहासाचार्य वि. का. राजवाडे [`चित्रमय जगत' मासिकाच्या १९२२ ऑगस्टच्या अंकातील `सध्याचे भारतीय राजकारण' हा लेख]

Sunday, 7 December 2014

गांधी व गोडसे काय सत्य व अफवा

गांधी हत्येबद्दल केलेला पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्याचा खोटा प्रचार व देशाची फाळणी यातिल वास्तवता भारतियांनी समजुन घेतली पाहिजे..

"गांधीजींच्या हत्येच्या 30/01/1948 चे पूर्वी झाले होते सात प्रयत्न" ....
बापू स्वतःच 30जून 1946 ला पुण्यांतील प्रार्थना सभेत म्हणालें होते"ईश्वर कृपेनें मी सातव्यांदा देखील वाचलो आहें आणि मी 125 वर्षे जगणार आहे त्याचवेळी नथुरामने अग्रणीत प्रतिक्रिया देऊन सांगितले होते कि 125 वर्षे तुम्हाला जगु देणार कोण?

त्या तारखाच फक्त मी येथें देत आहे ★25जून1934रोजी बापू पुणें  नगरपालिकेकडें भाषणाला जांत असतांना त्यांच्यावर बाँब फेकला होता.परंतु त्यांतून बापू वाचलें व पालिकेचे मुख्य अधिकारी व दोन पोलीसांसह सात जण जखमी झालें होते.
जुलै 944 मध्यें पांचगणी येथें नथुराम गोडसेला हातांत सुरा असतांना पकडला होता. सुशीला नायर या साक्षीदार होत्या.
सप्टेंबर 1944 ला बापू जीनांना भेटण्यास जात असतांना त्यांच्या हत्येचा प्रयत्न डीवायएसपीच्या सावधानतेनें फसला.
★29जून 1946 ला बापू मुंबईहून पुण्याला रेल्वेनें येत असतांना नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर गोटे ठेवण्यांत आलें होते.

शेवटीं 30 जानेवारी 1948 रोज़ी सायं.6 वाजतां बापू प्रार्थनेला जात असतांना नथुरामनें गोळ्या घालून  त्यांची हत्या केली.
याचा अर्थ पाकिस्तान ला देण्याचे पंचाव्वन कोटी रुपये व देशाची फाळणी त्या नंतर हिंसाचार व त्यामुळे गांधी हत्या हे धांदात खोटे आहे.
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्यांनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
हा जो अपप्रचार व अफवा पसरवणे त्यांनी चालू आहे हे त्यांच्या वाईट कृत्यामुळे नसुन चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे शक्य झाले आहे मी गांधीवादी नाही परंतु एखाद्याच्या ज्वलंत लिखाणावरुन त्या महान माणसाला मुर्ख समजणारा नाही लिखाण सर्व वाचले ते 55कोटीँचे बळी,मी नथुराम गोडसे बोलतोय ,त्या विदेशी लेखकाचे GANDHI NAKED AMBITION, सावरकरांची गांधी टीकात्मक पुस्तके, कोणाला पाहिजे असतील तर सांगा देतो वाचायला

पण त्याचबरोबर चांगल्या लेखकांचे सत्य लेखन ही वाचले आहे

जसे की पुल देशपांडे चे गांधी चरित्र,फडकेंचे नथुरामायण ,अनिल अवचट, रघुनाथ माशेलकर,सरदार पटेल ,राजेंद्रप्रसाद  हेही वाचले आहेत आणि शहानिशा करुनच जे सत्य आहे तेच मांडले आहे
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका
संकेत मुनोत
https://m.facebook.com/mahatmagandhipeace