Friday, 28 November 2014

स्वातंत्रलढा व सद्यस्थितीतील भारत

भारतात पाहिल्यानं १७९ इंग्रज आले , नंतर १०००
झाले , नंतर १०,००० आणि नंतर १,००,००० झाले
आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या ३० करोड
🇮🇳जनतेवर राज्य केले. कसे बर शक्य झाले ???

कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
केला होता आणि त्यांनी एक निष्कर्ष
काढला जो आजही 2014 सालीही लागू
होतो तो म्हणजे भारतीय लोकांना 📊"जाती-भेद,
धर्मभेद, गरीब-श्रीमंत, प्रांत भेद या गोष्टीनमध्ये
पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तर
कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत कारण ते
एकमेकांनाच कापत बसतील. कधीही एक होऊ
शकणार नाहीत एवढा द्वेष मनामध्ये भरेल.

मी हिंदु, मी मुस्लिम ,मी मराठा, मी धनगर , मी ब्राहमण, मी दलित ..
मी आमुक आणि मी तमुक.... झाल यातच
आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो.
  1857मध्ये पहिला ऊठाव ⛅झाला हिंदु मुस्लिम एकत्र लढले ब्रिटीशांविरूध्द .
मग ब्रिटिशांनी हिंदु मुस्लिमांतील फुटीरवाद्यांना 🔪भडकवले मग त्यांनी फुटीरवादी गट तयार केले
पण त्याच वेळी गांधी,भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, खान अब्दुल गफार खान यांचा स्वातंत्र्यसंग्रामात⛅ प्रवेश .
सर्व जातींचे एकत्रीकरण . असहकार चळवळ 🌍जागतिक ईतिहासात पहिल्यांदाच सर्व जाती गरीब श्रीमंत व प्रांत  एकत्र लढले
सुभाषबाबुंची आझाद हिंद सेना 🇮🇳स्थापन तेथेही हिंदु मुस्लिम एकत्र.
भगतसिंगनेही 🇮🇳सशस्त्र क्रांतीसोबतच जातीवादाविरूध्द आंदोलन छेडले मी नास्तिक का ?
पुस्तक लिहले

ईंग्रजांना पुन्हा 6मोठे झटके
मग पुन्हा फुटीरवाद्याशी (हिंदुत्ववादी आणि मुस्लिम लीग )चर्चा
वेगवेगळे गट स्थापन.
सावरकर गोळवळकरांचा🚩 हिंदुसाठी फुटीरवादी गट,
जीनांचा मुस्लिमांसाठी फुटीरवादी🇸🇦 गट
सावरकरांकडुन द्विराष्ट्र सिध्दांत मांडुन या पुस्तकात हिंदुचे वेगळे राष्ट्र करण्याची मागणी त्या पाठोपाठ जीनांकडुन पण मुस्लिम राष्ट्र वेगळे करण्याची मागणी. त्यासाठी असंख्य दंगली आणि रक्तपात
भारत पाकिस्तान वेगवेगळे झाले.
परंतु गांधी पटेल नेहरू आंबेडकर यांच्यामुळे भारत हे सर्व एकत्र नांदतील असे धर्मनिरपेक्ष राष्ट्र संविधान तयार करुन बनवले गेले
पाकिस्तान धर्माच्या आधारावर वेगळे तर झाले पण त्यांनंतरही त्याचे अनेक तुकडे झाले
परंतु भारत अजुनही एकत्रच.
फुटीरवादी गटांकडुन मंदिर-मस्जिद जात धर्म यांच्या नावाने. आजपर्यंत छोट्या मोठ्या दंगली भडकल्या हल्ले झाले पण तरी आम्ही पुन्हा एकत्र होतो कारण ईतिहासच तसा आहे सुभाषचंद्र,  भगतसिंग आणि गांधीजी बरोबर लढणारे कोट्यावधी सत्याग्रही हे धर्मनिरपेक्ष देशासाठी लढले
जाता नाही ती जात, इंग्रजांनी केली वाताहात।
आपण बनवले गेलो हातोहात,
आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।

पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोेणत्या जाती पंथ धर्मांचे गुलाम बनुन जगा ॥
एकत्र रहावस वाटल तर शेयर करा

Tuesday, 25 November 2014

व्हॉट्स अप वर काही फॉरवर्ड करताना घ्यायची काळजी

व्हॉट्स अप वापरता एवढ माहिती असु  द्या
आपण जागृत आहोत ?

बघा ना, व्हॉट्स अप वर ज्या पद्धतीने बुद्धिवादी म्हणवणारे लोकही आंधळेपणाने खोट्याचा प्रचार करतात, तेंव्हा त्यांच्या स्मार्टपणाची खरोखर कीव करावीशी वाटते.

सुरेश भटांची नसलेली कविता त्यांच्या नावावर खपवली जाते.

खबरदारीचे इशारे बिनधास्त एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव टाकून पोस्ट केले जातात.

मंगळ हा ग्रह आहे, हे माहित असतानाही त्यावरच्या कॉस्मिक किरणांनी पृथ्वीवर दुष्परिणाम होणार असल्याचं भय पसरवलं जातं.

भारताच्या राष्ट्रगीताला जगातलं सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून दर्जा मिळाल्याची आवई उठवली जाते.

जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकावण्यास मनाई असल्याचा कांगावा केला जातो.

नकली नाणे बनविण्याच्या कलमात महिला अत्याचाराच्या सुधारणा केल्याचं सांगितलं जातं.

शीतपेयांमध्ये एड्सबाधित माणसाचं रक्त मिसळलं असल्याचा खोटा प्रचार केला जातो.

गोडसे , कसाब यांसारख्यांना हिरो बनवल्याचे मेसेज केले जातात

काय मिळत असेल, या लोकांना असं खोटंनाटं पसरवून असा भाबडा प्रश्न आपल्या मनात येत असेल.

पण त्याचं उत्तर त्या भाबडेपणातच आहे.आपलं खोटं , लोक किती बेफिकीरीने पुढे पुढे ढकलताहेत हे पाहून जगातली संबंधित विकृत माणसं पोट धरून हसत असतील. आपल्या मूर्खपणावर किंवा अति शहाणपणावर !!!

त्या विकृतांना असुरी आनंद सुद्धा होत असेल.

कारण आपण दिवसेंदिवस बधीर होत चाललो आहोत, याची त्यांना जाणीव आहे.

एक दिवस आपणच आपल्या बेजबाबदारपणामुळे आपलीच घरेदारे पेटवण्यास कारणीभूत ठरणार आहोत.

आपली नजरचुकीने पुढे पाठवलेली पोस्ट एक दिवस दंगेधोपे घडविण्यास कारणीभूत ठरू शकते.

ती आपणावर कायदेशीर कारवाई होण्याचे कारण तर ठरेलच पण आपल्याच प्रियजणांच्या विनाशाचेही कारण बनू शकते.

आपले डोळे उघडतील.

पण तोपर्यंत उशीर झालेला असेल.

तेंव्हा वेळीच जागे व्हा.

पुरेपूर खात्री असल्याशिवाय कोणतीही पोस्ट शेअर किंवा फोरवर्ड करू नका.

कोणतीही कविता, लेख, विचार ज्याचे असतील, त्याचे नाव टाकल्याशिवाय पोस्ट करू नका.

संवेदनशील विषय पोस्ट करण्याचे किंवा शेअर करण्याचे टाळा.

कोणाही व्यक्तीची, समाजाची, धर्माची तारतम्य सोडून बदनामी करेल असे मजकूर, फोटो, चित्रे, कार्टून्स, विनोद पोस्ट करू नका.

महिलांना अवमानित करणारे विनोद, पोस्ट टाळा.अपघात, खून, बलात्कार संबंधी पोस्ट करताना जाणीवपूर्वक काळजी घ्या.पिडीत महिलेचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड होणार नाही, हे पाहा.

रक्तरंजित किंवा भावना भडकवणारे फोटो पोस्ट करू नका.

देवांच्या पोस्ट भीती दाखउन अकरा लोकाना  forward करा नाहीतर तुमच नुकसान होइल कोणी आजारी पडेल अशी भीती आणि अंधश्रधा पसरवू नका.

ग्रुपवर आपसात बोलतानाही आपलं लिखाण ग्रुपमधील सर्व सदस्य वाचत असतात, याचे भान राखा.

देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अशी माहिती उघड करू नका.

हे सोशल नेट्वर्किंग आहे, कचरा डेपो नाही, याची जाणीव असू द्या.

सोशल नेट्वर्किंगचा वापर सकारात्मक करा.

🔬हातात नुसता स्मार्टफोन असून उपयोग नाही.
खऱ्या अर्थाने " स्मार्ट " बना.

Sunday, 23 November 2014

अहिंसक लढा आणि भारत

नेल्सन मंडेला ,मलाला,मार्टिन ल्युथर किंग ,त्स्यांग त्सू कि यांच्याकडे बघितले तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे हे शब्द आठवतात
सशस्त्र युध्द पध्दतीचा मार्ग स्वीकारून हिंदुस्थानचे दुसरे आयर्लंड किंवा रशिया बनवणे ही बाब यद्यपि मानवी शक्यतेतील असली, तत्रापि [हिंदुस्थानी प्रजाननांच्या आणि] महात्मा गांधींच्या स्वभावाला व निसर्गप्रवृत्तीला रुचणे शक्य नव्हते. सबब गांधींनी सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग वावडा व दुष्ट ठरविला. गांधीजींसारखा सर्वजनप्रिय पुढारी ह्या आयरिश किंवा बोल्शेव्हिक कुमार्गांत शिरता, तर केवढी घोर आपत्ती पृथ्वीतलावर पडती, तिची कल्पनाही करणे शक्य नाही. हा अमानुष मार्ग सर्वजनक्षयकारक असल्यामुळे, गांधींनी तो अवलंबिला नाही. हे पाहता या थोर गृहस्थाच्या नीतिमत्तेच्या अगाधत्वाची प्रशंसा करण्यास भाषेतील शब्द अपुरे पडतात. - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे [`चित्रमय जगत' मासिकाच्या ऑगस्ट १९२२ अंकातील `सध्याचे भारतीय राजकारण' हा लेख]

गांधीजीचे फेक फोटो

फेक नाटकानंतर आता फेक फोटो पण तयार विकृत लोकांचा नवा प्रताप
गोडसेची खोटी नाटकं बनवली पोट नाही भरलं आता फोटो पण
काही फेक फोटोस Facebook व Whatsapp वर शेयर होत आहेत
एका फोटोत गांधीजी नृत्य करताना दिसतात  हा फोटो सिडनीमधील एका चँरिटी प्रोग्रममध्ये एका अफ्रिकन अभिनेत्याचा आहे ज्याने गांधीजींचा पेहराव केला आहे तर दुसरा व तिसरा फोटो 1963 साली आलेल्या Nine hours to Rama या चिञपटातील  आहे...Horse Buchholz या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याने गोडसेची भुमिका केली होती....

काही लोकांचे असले फेक फोटो आणि अफवा पसरवुनच पोट भरते असे दिसते
आणि असल्या फोटोला
Reality of  गांधी वगैरे नाव देतात
फेसबुकवर सर्वच लोक वेडे वाटतात का हो तुम्हाला
काय तर म्हणे 55कोटी, फाळणी , काहीही खोटी कारण सांगायची
मग 1934ला कशाला हल्ला केला ?तेव्हा काय गांधी याच्या स्वप्नात आलते काय ?

अरे जेव्हा देश स्वातंत्र्यदिन साजरा करत होता  तेव्हा गांधीजी  एकटे पायी हिंसा थांबवण्यासाठी मुख्यतः मुस्लिम बहुसंख्याक व हिंदु बहुसंख्याक भागात पायी फिरत होते  ...
अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्यांनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
हा जो अपप्रचार व अफवा पसरवणे त्यांनी चालू आहे हे त्यांच्या वाईट कृत्यामुळे नसुन चांगल्या लोकांच्या शांत बसण्यामुळे शक्य झाले आहे

ईंदिरा गांधी सत्य व अफवा

इंदिरा प्रियदर्शिनी....
हे नाव घेतले कि अनेकांच्या पोटात पोटशूळ उठते.
संस्थानिक कोण होते , हे तपासून पहा.
त्यांचे तनखे बंद करणे..
बँका कोणाच्या मालकीच्या होत्या पहा..
त्या रात्रीतून देशाच्या मालकीच्या करणे...
त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण गेले ती यादी तपासा... ..
मग बांगलादेश युद्ध झाले ...
इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले.
जनता फिदा झाली .
मग रणरागिणी वगैरे म्हणावे लागले.
कामुनिस्त्ताच्या ७१ खासदारणी पाठींबा दिलेले सरकार होते ते, पाडताही येत नव्हते.

मग भारताने पहिला अणुस्फोट केला १९७५ साली..अमेरिकेची दादागिरी झुगारून.

सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र १६ मे १९७५ रोजी इंदिराजींच्या राजकीय चातुर्याने भारतात सामील झाले ...
त्यावर संसदेत चर्चा कोण मागितली..
तपासा.
अशा जन नेत्याची मग बदनामी करण्याचे शाखेत ठरले...
महात्म्याची हत्या तर करूनच टाकली होती...
नेहरूंची बदनामी करू..
भारतीय समाज मजेशीर आहे . व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्याची फार वेळा गल्लत करतो.याचाच युक्ती म्हणून वापर करण्याचे ठरले .
महत्वाचे
पाप  इंदिराजींनी केलं ,
ते
म्हणजे ४२ कि ४४ वी घटना दुरुस्ती केली.
काय होती ती?
संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील
समाजवादी समाजरचना हा शब्द घटनेत समाविष्ट करून भारत हा समाजवादी धर्मनिरपेक्ष देश असेल हेच संविधानात टाकून
दिले.
या अति गंभीर गुन्ह्याची शिक्षा देण्याचे
समाजकंटकांनी ठरविले.
मग द्वेष कसा निर्माण करावयाचा तर अगदी सोप्पे!
मुस्लिम म्हणा , नाहीतर उगाच जोडून टाका.

मग नेहरुचे पूर्वज मुस्लिम. इंदिराजींचे पती मुसलमान...कानगोष्टी सुरु..शाखेवर.

याला म्हणतात कुजबुज मोहीम.
हेच तर सनातन्यांचे पराभवी हत्यार.

कुजबुजीचा एक फायदा असतो...पुरावा देण्याची जबाबदारी नसते.२/३ पिढ्यानंतर हि कुजबुज थोडी अधिक�
Thanks to Uttamkumar Holikar