Sunday, 23 November 2014

अहिंसक लढा आणि भारत

नेल्सन मंडेला ,मलाला,मार्टिन ल्युथर किंग ,त्स्यांग त्सू कि यांच्याकडे बघितले तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे हे शब्द आठवतात
सशस्त्र युध्द पध्दतीचा मार्ग स्वीकारून हिंदुस्थानचे दुसरे आयर्लंड किंवा रशिया बनवणे ही बाब यद्यपि मानवी शक्यतेतील असली, तत्रापि [हिंदुस्थानी प्रजाननांच्या आणि] महात्मा गांधींच्या स्वभावाला व निसर्गप्रवृत्तीला रुचणे शक्य नव्हते. सबब गांधींनी सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग वावडा व दुष्ट ठरविला. गांधीजींसारखा सर्वजनप्रिय पुढारी ह्या आयरिश किंवा बोल्शेव्हिक कुमार्गांत शिरता, तर केवढी घोर आपत्ती पृथ्वीतलावर पडती, तिची कल्पनाही करणे शक्य नाही. हा अमानुष मार्ग सर्वजनक्षयकारक असल्यामुळे, गांधींनी तो अवलंबिला नाही. हे पाहता या थोर गृहस्थाच्या नीतिमत्तेच्या अगाधत्वाची प्रशंसा करण्यास भाषेतील शब्द अपुरे पडतात. - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे [`चित्रमय जगत' मासिकाच्या ऑगस्ट १९२२ अंकातील `सध्याचे भारतीय राजकारण' हा लेख]

No comments:

Post a Comment