Blog Archive

Friday, 20 May 2016

सोमालिया केरळ

दोन दिवस लिहायचे होते पण वेळ नव्हता. सोमालियाचे मूळ नाव सोमालय आहे. सोम ही प्राचीन वैदिक देवता आहे. तसेच शंकराला सोमेश्वर किंवा सोमनाथ म्हणतात आणि काही वेळा शंकरालाच सोम म्हणतात. त्यामुळे सोमालिया हे आलय म्हणजे सोमाचे घर म्हणजेच देवांचे घर असा अर्थ निघतो. तसेच भारतवर्षातील केरळ ही भूमी देवभूमी म्हणून केरळ टुरिजम जाहिरात करत असतो. मग सोमालिया आणि केरळची तुलना केली तर लोकांना राग येण्याचे काय कारण आहे. उलट एका देवभूमीची दुसऱ्या देव्भूमिबरोबर तुलना करून हा 'अखंड भारताचा' एक तुटलेला दुवा दाखवून दिल्याबद्दल आपला उर अभिमानाने भरून आला पाहिजे. तसेच अशी तुलना करणारा हा कोणी सामान्य मनुष्य नसून तो एक इतिहास तज्ञ आणि 'संपूर्ण राज्यशास्त्रातील' विशारद आहे हेच सिद्ध होते.
साभार-फेसबुक

No comments:

Post a Comment