Blog Archive

Friday, 20 May 2016

नेहरु जबाबदारी

देशाच्या कानाकोप-यातील तळागाळातील एकेक माणूस संघटीत करून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून ती सतत तेवत ठेवणे. त्यातून स्वांतंत्र्यप्राप्ती करून आर्थिक सामाजीक समतेवर सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन देशाच्या निर्मितीचे स्वप्न पुरं करण्याची सुरूवात गांधी नेहरू पटेल यांनी केली . पण पटेल, गांधी याच्या लवकर झालेल्या मृत्यूमुळे ती संपुर्ण जवाबदारी नेहरूंवर पडली आणि ती त्यांनी सशक्तपणे पार पाडली. जो काम करतो त्याच्या कामात कांही त्रुटी राहतात कांही चुकाही घडतात पण एकंदर पाहता नेहरूंचे योगदान खूपच महान आहे. पण खूप कार्य करणारा माणूस श्रेयाच्या बाबत नेहमी उपेक्षित राहतो, ही जगरूढ आहे. यशस्वी संसार करून, मुलंबाळं रांगेला लागूनही, सर्व कांही सुखसंपन्न असताना ' मला माझ्या वडिलांनी कित्येक चांगली स्थळे आणली होती, पण मी म्हणून सर्व निभाऊन नेतेय ' ' तुझ्या ऐवजी ती पसंत केली असती तर माझं फार भलं झालं असतं ' असे संवाद पन्नाशीकडे झुकलेल्या पतीपत्नीत ऐकायला मिळतात. आहे त्या बाबीतील सुखाकडे दुर्लक्ष करून नसलेल्या बाबींचे आकर्षण ही मानवी मनाचा सहज स्वभाव आहे. देशाचा पंतप्रधान कोण असायला हवा, हा विचार याच पद्धतीच्या सहज भावनेतून आलेला आहे,_Raj kulkarni

No comments:

Post a Comment