🌹🌹🌹🌹निमंत्रण🌹🌹🌹🌹
---------------------------------------------
"महात्मागांधीदोनव्याख्याने……"
वक्ते …
मा.तुषार गांधी
महात्मा गांधी यांचे पणतू
(लेट्स कील गांधी या पुस्तकाचे लेखक,व्यवस्थापकीय विश्वस्त,महात्मा गांधी फांउंडेशन)
--------------------------------------------
एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितल्याने पुढच्या पिढ्यांना तेच सत्य वाटते, हा इतिहास आहे. महात्मा गांधीच्या विषयात ही गोष्ट प्रकर्षाने लागू होते. महात्मा गांधी यांच्या हत्येला 67 वर्षे झाल्यानंतरही त्यांच्याबद्दलचा खोटानाटा प्रचार अव्याहतपणे सुरु आहे. महात्मा गांधीनी देशाची फाळणी घडवली…..त्यांनी 55 कोटी रुपये पाकीस्तानला देण्यास बाध्य केले….ते मुस्लीमधार्जिणे होते……भगतसिंग फाशी जाताना त्यांना वाचवण्यसाठी गांधीनी काहीच केले नाही. अशी अनेक कारणे सांगून गांधींची हत्या समर्थनीय ठरवण्याचा प्रयत्न सतत सुरु आहे. मात्र सत्य सोयीस्करपणे दडविले जात आहे. गांधीचा खुनी नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण करण्याची, त्याला हीरो ठरविण्याची स्पर्धा लागली असताना या सर्व प्रश्नांची खरीखुरी उत्तरं घेण्यासाठी आठवणीनं नक्की या.
--------------------------------------------
उदघाटक
मा.राज कुलकर्णी
(नेहरु चरित्राचे अभ्यासक,उस्मानाबाद),
समारोप
मा.अविनाश दुधे
(आम्ही सारे फाउंडेशन,अमरावती)
-------------------------------------------
रविवार 8 मे 2016
विषय : गांधी हत्येमागील षडयंत्राची कहाणी,
सोमवार 9 मे 2016 :
विषय : गांधी समज व गैरसमज
वेळ : सायंकाळी ६ वाजता
हुतात्मा स्मृती मंदीर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर
आयोजक – आम्ही सारे फाउंडेशन,सोलापूर,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment