पुस्तकातून गांधी नेहरूंना हटवलं की ते संपतील असा बिनडोक विश्वास जे बाळगू शकतात त्यांच्या बुद्धीदारिद्र्याची फक्त कीवच केली जाऊ शकते!
ज्यांच्यामुळे इंग्रजांना पळून जावं लागलं ते इंग्रजांच्या तत्कालिन साजिंद्यांच्या आजच्या कारस्थानांमुळे नामशेष होण्याची अजिबातच शक्यता नाही.
इतिहासाच्या पुस्तकावरच ज्यांचा इतिहास आजवर ठरत आला, इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला स्थान नाही याची खंत ज्यांना आयुष्यभर बाळगावी लागली त्यांच्याकडून या गोष्टी होणारच हेही आपण गांधीजींच्या सहनशील वृत्तीनं समजून घेतलं पाहिजे. वैचारिक दूर्बलांना सूड उगवण्याची तीच तर एक जागा आहे!
एक विशिष्ट विचारसरणी वगळता गांधी-नेहरू भारतीयांच्या ह्रदयात राहतात, पुस्तकात नाही. भारतीय माणसांच्या ह्रदयाचा कप्पा हा यांच्या बेगडी पुस्तकांपेक्षा मोलाचाच आहे.
विश्वंभर चौधरी
No comments:
Post a Comment