. गणेश देवी - गांधीजींची भाषा
Naarativisam ऐवजी गांधीजींनी Activisam स्वीकारला व मांडला.
गांधींजीना भूतकाळ वाचक वाक्यात फार रस नव्हता. गांधीजी महादेव भाई व कस्तुरबांच्या जाण्यानंतर देखील वर्तमानच बोलत होते आणि जगत होते. भूतकाळ आठवून त्यावर पुन्हा पुनः त्यांनी कधी Comments केल्या नाहीत.
गांधींजीना भूतकाळ वाचक वाक्यात फार रस नव्हता. गांधीजी महादेव भाई व कस्तुरबांच्या जाण्यानंतर देखील वर्तमानच बोलत होते आणि जगत होते. भूतकाळ आठवून त्यावर पुन्हा पुनः त्यांनी कधी Comments केल्या नाहीत. जरी
गांधीजींना रामायण, महाभारत आवडत असतील तरी त्यातील गोष्टी सांगणे, कथाकथन करणे ही गांधींची भाषा कधीच नव्हती त्याएवेजी ते कृतिशील भाषेतुन, कृतीतून संदेश द्यायचे.
अहिंसा, सत्य या तत्वावर विश्वास ठेवून ते जगले आणि त्याबद्दल ते कृतीतून सांगत राहिले पण त्यांची जगण्याची भाषा आपल्याला समजली पाहिजे. गांधी जगावा तो केवळ बोलू नये.
रस्किन व बायबल ची सोपी भाषा गांधीजींनी अंगिकारली, गीतेतून त्यांनी Dialogue पद्धती स्वीकारली जी त्यांनी Hind Swaraj मध्येही वापरली. राजकारणात जी भाषा गांधीजींनी वापरली ती सर्वथा नवीन होती. त्यांनी पूर्वापार चालत आलेली वकिली भाषा वापरली नाही. सत्याग्रह, सत्याग्रही असे अतिशय नवीन, सर्वसमावेशक व सर्वाना एकत्र आण्यासाठीचे शब्द वापरले. गांधीजिनी साबरमती आश्रम व गुजरात विद्यापीठ हे स्वातंत्र्य संग्रामसाठी, रचनात्मक समाज निर्मितीसाठी नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रयोगशाळा म्हणून उभे केले. गांधीजी शेवट पर्यंत कुठल्या शब्दाला चिकटून राहिले नाहीत पण अंतिम क्षणापर्यंत ते गुजरात विद्यापीठाचे कुलपती राहिले. या विद्यापीठाची त्यांची दिक्षांत समारंभाची भाषणे मुळातून वाचण्यासारखी आहेत. टागोर म्हणजे बंगाली, टिळक म्हणजे मराठी असे आपण समजतो पण गांधीजींनी भारत म्हणजे विविध भाषांचा देश हि प्रतिमा स्वतःच्या अभ्यासातून, लेखनातून निर्माण केली. विविध भाषा व लिपी ते बोलायचे, लिहायचे आणि असा भाषासंपन्न साहित्यकार इथे पुन्हा नवनवे शिकण्याचा प्रयत्न करत रहायचा. भारतीयांना शिक्षण कोणत्या भाषेत द्यायचे याबद्दल 70 वर्ष विचार चालू होता.
भारतीयांना शिक्षण कोणत्या भाषेत द्यायचे याबद्दल 70 वर्ष विचार चालू होता. परंतु गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर इथे सर्वानी जी इंग्रजी भाषा स्वीकारली होती त्यावेळी गांधीजींनी भारतीय भाषांना उत्तेजन द्यायला सुरुवात केली. केवळ या मुळे काँग्रेसने भारत हा बहुभाषिक देश आहे हे जाहीर केले. गांधीजींनी राजकारणाला भाषा दिली आणि भाषेला राजकारण दिले. गांधीजींनी तीर्थस्थळाना भेटी देण्यात वेळ घालवला नाही परंतु आपल्या आचरणात संतत्व आणण्याचा प्रयत्न नेहमीच केला. ज्यांच्या आजूबाजूला अनेक प्रकारची, भाषांची माणसे होती त्यांच्या लेखनाच्या ओघात आलेल्या एखाद्या शब्दाला पकडून त्यांच्यावर टिका करत राहने हे चुकीचे आहे. एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याचा प्रत्येक शब्द वेदवाक्य आहे कि चुकीचे हे एवढेच आपण पाहत राहतो पण त्याचा भावार्थ आपण लक्षात घेत नाही. छपाई आल्यानंतर माणूस जे स्वतःशी बोलायचा ते लिखीत पने मांडायला लागला. गांधीजींनी यात जी क्रान्ती सांगितली कि स्वतःच्या कृती बद्दल ती अंतिम घटकाच्या उपयोगी आहे का हा संवाद साधण्याची, अशी भाषांची खोली, रचना कबीर, तुकाराम, अक्कमहादेवी यांच्या प्रमाणे आपल्याला सांगितली. पराधीन जनतेला स्वतंत्र करण्यासाठी भाषा कुठली असली पाहिजे- गांधींनी साधनशुचितेवर जो भर दिला होता तो आपल्या हिंद स्वराज ग्रंथात मांडला आहे. असा ग्रंथ मागच्या 100-150 वर्षात झाला नाही. गुलामी मनातून काढून टाका, स्वराज असले पाहिजे, स्वराज्य आपोआप येईल. यासाठी त्यांनी भाषेलाहि शस्त्र म्हणून संताप्रमाणेच केला. भाषा न वापरता मौन वापरून हा प्रयोग सिद्ध केला. Public Space मधील मौन हि वेगळी भाषा गांधीजींनी वापरली. No narratives,
स्वातंत्र्याची नवी भाषा,
भाषेची सखोलता वाढवली,
भाषेला सामाजिक कामासाठी शस्त्र म्हणून कसे वापराचे हे गांधींनी शिकवले.
] हजार वर्षाच्या मागच्या इतिहासात विविध प्रांतातील संतांनी समाजात माणुसकी आणण्याचे प्रयत्न केले तो जर तसाच सुरु राहिला असता तर भारतीय समाज एका उच्च पातळीला पोहचला असता. पण इथे आलेल्या पाश्चात्य सभ्यतेच्या आपण स्वीकारले आणि त्यामुळे निर्माण झालेला Individual Citisam हा खरा धोका निर्माण झाला. भारतातील खेडी - खेड्यातील जनता शहरात आपले खेडीपन घेऊन येत होती याचा अंदाज आल्यामुळे गांधींनी हि सामान्य माणसालाही सहज समजेल अशी नवी भाषा निर्माण केली.
आपण गांधींना चुकीच्या आडाख्यात बांधले आणि निर्माल्यासारखे वापरले. पण तोच गांधी निट समजला तर खरा भारतही आपणाला निट समजता येईल.भाषा ही समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी वापरणारा हा कबीर, तुकारामाच्या पंक्तीतला हा मानव होता. गांधी हा आतल्या आवाजानुसार जगणारा आणि निसर्ग व समाज याचा विचार करून आपल्यापेक्षा अनेक शतके पुढचा जगणारा माणूस होता.
गांधीजी विविधतेची लोकशाही आणू पाहत होते. त्यांचा संपत्तीला विरोध नव्हता त्याच्या लालसेला विरोध होता.- A very new concept.
Bhujang Bobade
No comments:
Post a Comment