साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा असा अनुभव
खरच सरांना विचारले आणि सर आलेही
सर घरी येणार म्हटल्यावर थोडीशी धावपळ उडाली एवढा मोठा माणूस घरी येणं तेही एका अश्या व्यक्तीच्या घरी जो ना कुणी मोठा नेता आहे ना कुठल्या संघटनेतील पदाधिकारी आहे ना इतर काही आहे.आमच्या घराचा लांब लांब पर्यत राजकारण,समाजकारण, साहित्य वा इतर अश्या कोणत्या क्षेत्राशी जास्त संबंध नाही तरीही सर घरी आले.
तुषार सर हे गांधीजींचे पणतू. पण या ओळखीशिवाय त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे.
व्याख्यानादरम्यान
'बापू ही साधी व्यक्ती होती. आपल्या दुबळेपणावर प्रभुत्व मिळवून ते मोठे झाले. मी महात्मा गांधीचा वंशज नसून बापूंचा वशंज आहे' अस ते सुरवातीलाच म्हणाले. तुषार सर गांधीविचारावर कार्य करणाऱ्या जगातील अनेक देशांचे मार्गदर्शक आहेत , बराक ओबामा व अनेकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत 4 दिवसांपूर्वीच ते अमेरिकेत होते तेथून आले तसे लगेच येथे आले.
पहिली भेट वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमात सरांशी ओळख झाली(अन्वर राजन सरांमुळे) 5 मिनिटे बोलायचे म्हणून गेलो आणि जवळ जवळ अर्धा पाऊण तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली होती मी काही विषयांवर टीकाही केली होती कि आज सोशल मीडिया मध्ये गांधीविचारांवर आपण मागे का?प्रत्येक महापुरुषाच्या मागे त्याच्या त्याच्या जातीचे लोक आहेत ते ठीक आहे पण गांधीजीना मानणारे कोट्यवधी लोक असताना आपण त्यांच्याविरुद्ध ज्या अफवा आणि अपप्रचार पसरवला जातो त्यावर काही करू शकत नाही का? वगैरे वगैर बरेच काही बोललो
पण सरांनी ती स्वीकारली आणि त्यावर कार्य करत असल्याचे सांगितले त्यांच्या जागी एखाद दुसरा कोणी असता तर हा कोण नवीन बोलणारा म्हणून विषय बदलून निघून गेला असता किंवा तू कोण मला बोलणारा असं बोलला असता
पण तसे काही झाले नाही सरांनी मनमोकळी चर्चा केली सर्व प्रश्नांची उत्तरे दिली
त्यांनतर त्यांसोबत अनेकदा फोनवर संवाद झाला सर एकदम घरातल्यासारखे बोलत."सध्या करिअर कडे जास्त लक्ष दे जे इतर कार्य करतोय ते टीम मध्ये विभागून दे, खूप व्याप घेऊ नको" असे कितीतरी मार्गदर्शन सरांनी केले जेव्हा सरांशी बोलतो तेव्हा माझ्या घरातलीच कुणीतरी वडीलधारी व्यक्ती वा मोठा भाऊ बोलत आहे असे वाटते एखादा दुसर कुणी असत तर म्हटलं असत करतोय ना माझ्या पणजोबांच्या विचारावर कार्य अजून कर पण ते तस कधीच बोलले नाहीत
कार्यक्रमाला येताना सर बस ने येणार होते आणि जाताना ही तसेच जाणार होते return तिकीट ही काढले होते पण पहिल्या दिवशी अभय सरांचा फोन आला ते म्हणाले कि कार्यक्रमातून वेळ मिळाला तर पुण्यात आपण तुषारजी आणि श्रीमद राजचंद्रजीच्या शिष्याची भेट घडवून आणू म्हणून(श्रीमद राजचंद्रजी म्हणजे ते ज्यांचा गांधीजींवर प्रभाव होता सत्संगच्या माध्यमातून त्यांचे शिष्य आजही जगभर अहिंसेचा प्रसार करत आहेत), कार्यक्रम संपल्यावर त्यांना भेटता येईल का हे पाहू व जाताना रात्री उशीर होईल म्हणून तुषार सरांसाठी special गाडी पाठवू असे बोलणे झाले याबाबत विचारले असता तुषार सरांनी गाडीला नाही म्हणून सांगितले ते म्हणाले 'मला एकट्याला सोडायला ती गाडी येणार परत पुण्याला मोकळीच जाणार नको मी बसनेच जातो पण मग एक मुंबईवरूनच गाडी arange झाली जी त्यांना घेऊन ही येईल व सोडेल ही तेव्हाही सरांनी तुम्हाला जास्त त्रास होत नाही ना हे विचारले.
सर घरी आले तेव्हा बराच वेळ सर्वांशी छान गप्पा झाल्या मम्मी पप्पा आणि सर्वांशी सर बोलले त्यांनतर सर म्हणाले कि "ते बिस्किट्स आतमध्ये घेऊन जा डब्यात ठेव त्याला हवा लागेल" एवढा मोठा माणूस पण त्याचे किती बारीक लक्ष
कार्यकर्मस्थळी प्रवेश केल्यावर तर त्यांच्या मागे लोकांची रांगच लागली फोटो काढण्यासाठी .
मुंबईहून एवढ्या लांबून आलेला माणूस पण सगळ्यांशी हसत खेळत संवाद साधत होता.
व्याख्यानानंतर सरांना मिळालेला भव्य प्रतिसाद पाहिला आणि थक्क झालो सर्व लोकांनी (त्यातही विशेष म्हणजे तरुणांची संख्या जास्त होती) त्यांनी सलग कितीतरी वेळ टाळ्या आणि त्यानंतर घोषणा असा प्रतिसाद , व्याख्यान देताना त्यांना गहिवरून आले होते पन जेव्हा सर्वानी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला तेव्हा सरांच्या डोळ्यात पाणी आले होते.
त्यांचे व्याख्यन भारतभर ठिकठिकाणी व्हावे अशी मनोमन खूप इच्छा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण हे गैरसमज दूर होणं खूप महत्वाचे आहे
असो अजून बरेच लिहायचे पण शब्द मर्यादा आहेत
खरच भाग्य असत का नसत हे मला माहित नाही पण जर ते असेल तर मी तसा खूप भाग्यवान आहे कारण काहीच नसताना खूप काही माझ्याजवळ आहे
लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व
©संकेत मुनोत
8087446346
#Great Bhet
No comments:
Post a Comment