[14/07 11:44 am] Amit Tribhuvan cv: मला उलट प्रश्न पडतो. तेव्हा रोखठोक असलेली माणसं (लग्नपत्रिकेत अमुक याचा शरीरसंबंध अमुक हिचेशी योजिला आहे, असं लिहिणारी) नंतर नक्की कधी व का दांभिक झाली असतील?
[14/07 11:44 am] Amit Tribhuvan cv: कसा असेल न तो काळ!हा विचार करतोय....असा विशेष दर का बर लिहावा लागत असेल?
[14/07 11:48 am] Y Kaustubh: जरा वेश्या ह्या मुद्द्यावरही चर्चा होऊ द्या. समाजातील शोषित घटक. समाजाची गरज, वैवाहिक समाजव्यवस्थेचा side effect? Should it be legal? का वेश्या बनतात? बनवल्या जातात? कायदेशीर करण्याचे फायदे-तोटे आदी आदी गोष्टींवर सारासार विचार होऊ शकतो.
[14/07 11:50 am] Y Kaustubh: 😳 कधी छापल्या जायच्या अशा पत्रिका? काही संदर्भ? तो विवाहप्रथा सुरू होण्याचा व व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर वैवाहिक जोडिदाराचा अधिकार देण्याचा अगदी सुरवातीचा काळ असावा.
[14/07 11:51 am] +: 👍🏼 हो कुठे पहिला
[14/07 11:52 am] Y Kaustubh: प्रथा परंपरा आकार घेतघेत येतात. आपण आत्ता पाहतो तश्याच त्या सुरवातीपासून होत्या अश्या नाही. दांभिकता हि राजकारणासोबत उत्तरात्तर वाढत जाते.
[14/07 11:58 am] Y Kaustubh: ज्या देशांत वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे तेथील अर्थव्यवस्था कमजोर आहे आणि पर्यटन हा प्रमुख स्त्रोत आहे. पण वेश्याव्यवसाय हे मानवाचे अवमुल्यन आहे. समोरच्या माणसाला क्रय उपभोग्य वस्तू मानणे हे त्याच्या स्वाभिमानाचे व मानवी अधिकाराचे अक्षम्य अवमुल्यनही आहे.वेश्या व्यवसाय भांडवलशाहीची देण आहे. ज्या कायदेशीर नाही तेथे तो चालत नाही असे नाही उलट तेथे चोरट्या मार्गाने चालतो व त्याचा सर्वस्वी दुष्परिणाम वेश्यांना भोगावा लागतो. सरकारी दफ्तरी त्यांची व त्यांच्या व्यवसायांची नोंद नसते. ते त्या देशाचे नागरिक असून नसल्यासारखे
[14/07 12:00 pm] +: Mag legal karava ase mhanayche ahe kay
Ani men pn astat veshya
Jigolo
play boy
[14/07 12:05 pm] Rajendra inamdar Cv: वेश्याव्यवसाय हा पुरातनकाळापासुन चालत असावा... भांडवलशाही तर नजिकच्या काळातील आहे.
ज्या देशांत अर्थव्यवस्था भक्कम आहे तिथे हा व्यवसाय चालत नाही का...???
गेल्या काही शतकांत मानवानेच मुल्ये व अवमुल्ये ठरवली आहेत.. नाहीतर खजुराहोची जागतिक वारसाची शिल्प दिसली नसती आपल्याला.
[14/07 12:07 pm] Y Kaustubh: वेश्या व्यवसाय आणि मुक्त लैंगिक पुरातन जीवन यात फरक आहे
[14/07 12:10 pm] Y Kaustubh: भांडवलशाही हि व्यवस्था नजीकच्या काळातील वाटत असती तरी ती वृत्ती पुरातन आहे. राजेशाही व व्यापारीवृत्ती हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
[14/07 12:17 pm] Pradip Khelurkar Sir Mg: अश्या पत्रिका अगदी आजदेखील काही ठिकाणी प्रचलित आहे. माझ्याकडे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी देखील आलेली होती. मराठवाडा किंवा विदर्भातून होती.
[14/07 12:18 pm] +91 : 🙄
[14/07 12:21 pm] Amit Tribhuvan cv: Purvi hotyaa asha patrika
[14/07 12:21 pm] Y Kaustubh: 😳😳😳😳😳
फोटो पाठवता येईल का??? (तसे पाठवणे ठिक राहिल???) पाठवता आले तर पहा.
[14/07 12:25 pm] Rajendra inamdar Cv: पुर्वी आमच्या कडे टाइम्स आॅफ ईंडीया घ्यायचो त्यात मसाज च्या नावाखाली भरपुर फोन नंबर्स असायचे आमफिशीयली....
[14/07 12:26 pm] Rajendra inamdar Cv: आॅफिशीयली...
[14/07 12:27 pm] Pradip Khelurkar Sir Mg: मी देखील विचार करत होतो अशी पत्रिका घरात शोधण्याचा. पण ते कठीणच दिसतेय. सापडल्यास पोस्ट करेन. नशीब बलवत्तर (?) असेल तर लग्न मुहूर्ताच्या नव्या मोसमात एखाद् वेळी पुन्हा येईल सुद्धा.
[14/07 12:31 pm] Pradip Khelurkar Sir Mg: याच प्रवृत्तीचा नवा आविष्कार pornography हा आहे. आणि हा तर आर्थिक दृष्ट्या सबळ असलेल्या देशात मोठ्या प्रमाणात चालवला जाणार व्यवसाय झाला आहे.
[14/07 12:33 pm] Rajendra inamdar Cv: सध्याच्या हिंदू संस्कृतीरक्षक सरकारने डान्स बार ला परवानगी मिळवून दिलीच की....
[14/07 12:40 pm] Amit Tribhuvan cv: वसंतसेना ही आपल्या संस्कृतीची देणगी की मजबूरी?..वसंतसेना जर संस्कृतीत चालते तर porno का नाही...
[14/07 12:40 pm] Amit Tribhuvan cv: असा एक प्रश्न पडला.
[14/07 3:43 pm] +91 : मलाही इच्छा झाली, पण जगाने रांड म्हणून पाहिलं....
पोरगी अंगानं मोठी दिसू लागली की नातेवाईकांचा जीव वर खाली व्हायचा. कांता अगं पोरीच्या लग्नाचं कर कायतरी, छाती किती दिसायली बघ. कुणासोबत पळून जायच्याआधी करून टाक. आईचा जीव घाबरा व्हायचा. त्यात शेजारची संगी मळ्यातल्या घरात सापडल्यापासून सगळ्यांच्याचं डोळ्यावर आलेलं. तिच्या आईनं खिडकीतून पाहिलं तर, हि त्या पोराला उरावर घेऊन टंगड्या वर करून पडलेली. गावात कालवा झाला.
आप्पांनी एकदिवस स्थळ आणलं आणि लग्न लावून दिलं माझं.लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी नवरा अचानक गायब. कुठं गेला काही पत्ता नाही. पोलिसात सांगितलं, सगळं केलं.कुठंच मिळाला नाही.
तो येईल वाटायचं मला सुरवातीला, पण जशी जशी वर्ष सरली, सगळ्याचं आशा संपल्या.
धड विधवा नाही धड सुवासन नाही. धूणं धुतल्यावर भिजलेल्या साडीकडं गावातली पोरं पाहायची. डोळ्यानं इशारा करायची. वाळत टाकलेल्या परकरवर पेनानं चित्र काढायची. रात्री दारावर वाजवून जायची. कामावर चाललं तर मागं मागं येणार.. गावातली जाणती माणसं म्हणावं तर ती पण मांड्यांकडं पाहणार. कधी कोणत्या पुरुषासोबत बोलत थांबावं तर गावात चर्चेला विषय.
दुसर लग्न नाही करावं वाटलं कधी ?
वाटायचं ना, खूप वाटायचं. पण कोण करणार. बाटलीए म्हणायचे. कसली बाटलेली आणि कसलं काय. वसवसल्यासारखं अंग हुंगायचा, साडी वर कारायचा, स्वतः थंड व्हायचा आणि उताणा पडायचा. तो गेल्यापासून हे जंगलीपणही संपलं.
शरीर आहे रे, इच्छा तर होणारचं. तोल जाणारचं. कुठंतरी काहीतरी आकर्षित करणार, मोहात पाडणार, स्वतःकडे ओढणार. पाय टाकावा तर सगळी बंधनं जखडून ठेवणार. पोटाची भूक भागवता येती, पण शरीराचं काय. पाझरायचं ते पाझरणारचं, त्याला कसं रोखणार.
एका तरण्याबांड पोराकडे पाहिलं कि माझंदेखील मन साखरेसारखं विरघळायचं, हळव्या क्षणी त्याच्याकडे खेचले गेले. सर्वस्व द्यायचा निर्णयही घेतला मनाशी. त्यानं त्याला हव तसं मला भोगलं देखील. मीदेखील त्याच्या श्वासात गुंतले. आधाश्यासारखा पुरुषाचा स्पर्श अनुभवला. इच्छा माझीही झालेलीच पण त्यानेही माझ्याकडे रांड म्हणूनचं पाहिलं....
- अभिनव ब. बसवर
[14/07 3:48 pm] Rajendra inamdar Cv: 🙏🏻🙏🏻🙏🏻
भयानक ... पण सत्य आहे
अशाच वखवखल्या नजरांसाठी वेश्यांची गरज निर्माण झाली असावी... अन निरंतर चालूच रहाणार...
🙏🏻🙏🏻🙏🏻
[14/07 3:50 pm] +91 : शारीरिक गरज ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे
[14/07 3:50 pm] +91 : या कडे दुलर्शे होत आहे
[14/07 3:55 pm] +91 : किती गैरसमज असतो ना आज कालच्या नवरदेव आणि नवरी चा की आपल्याला कोरा करकरीत जोडीदार भेटलाय पण मी कॉलेज कुमार आहे आणि नगर औरंगाबाद हे दोन्ही जिल्हे खेडोपाडी आणि शहरे दोन्ही जवळून पाहिले आहेत खूप कमी मुले मुली असतात जे लग्न होईपर्यंत दम मारतात
[14/07 4:11 pm] +91 : याला अपवाद खूपच दुर्मिळ
[14/07 4:54 pm] Amit Tribhuvan cv: स्पर्श वासनेचा
तो स्पर्श वासनेचा नाही मला पसंत
झाला मलीन आहे माझा इथे वसंत
ना हात लावताही होतोय स्पर्श तोच
डोळ्यात वासना त्या मी पाहिल्या अनंत
आनंद त्यास वाटे गर्दीत खेटण्यात
त्याच्या मनास तृप्ती माझ्या मनास खंत
आहेच ना तुलाही माता बहीण लेक
रे वाग संयमाने नाही जरी तू संत
मोठ्या घरातला तू उन्मत्त वागण्यात
ना लायकी तरीही मानी स्वतःस पंत
तू एक बुद्धिवादी नाही पशू समान
हा जन्म माणसाचा होऊ नकोस जंत
हे नाग भोवताली मारावयास डंख
का जन्म घेत नाही आता कुणी महंत ?
अशोक भांबुरे,
मो. :
ashokbhambure123@gmail.com
[14/07 11:49 pm] Y Kaustubh: Porno हे fantasy आहे. तर Prostitute हे वास्तव आहे. Porno हि लैंगिक भावना भडकवणारी फिल्म आहे व त्याचा व्यवसाय आहे पण वेश्या व्यवसाय हा त्याहून थोडा भिन्न आहे. तरी त्यांची जातकुळी एकच आहे.
No comments:
Post a Comment