Tuesday, 18 July 2017

मोदी सरकारने सेन यांचे भारत रत्न परत घेऊन भांडरकरांना द्यावे

मधुर भंडारकर आणि अमर्त्य सेन यांच्यातील कला-गुणांची, अभ्यासू वृत्तीची आणि समाजाप्रतीच्या योगदानाची तुलना होऊ शकत नाही. मधुर भंडारकरांच्या नखाची सर सुद्धा अमर्त्य सेन यांना येणार नाही. सरकारने मधुर भंडारकरांना संपूर्ण पोलीस संरक्षण द्यावे जेणे करून  त्यांच्या पत्रकार परिषदा सुरळीत पार पडतील. अन्यथा, उगाच मरतुकड्या कॉंग्रेसला सरकार घाबरले अशी प्रतिमा उभी राहील. अमर्त्य सेन यांच्याशी संबंधीत माहितीपटावर सरकारी सेन्सर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपांवर मात्र कुणी आक्षेप घेऊ नये. 'आहे तरी कोण तो अमर्त्य सेन' अशी सरकारमधील थोर विद्वान मंडळींनी केलेली चौकशी योग्यच आहे. अमर्त्य सेन कोण आहे हे माहिती युगात सुद्धा न कळल्याने गोंधळून गेलेल्या वाजपेयींनी त्या माणसाचा चक्क भारत रत्न देऊन गौरव केला होता. मोदी सरकारने सेन यांचे भारत रत्न परत घ्यावे आणि मागील ९ महिन्यांपासून अहोरात्र नोटा मोजण्यात मग्न असणाऱ्या उर्जित पटेलांना ते द्यावे.      
परिमल माया सुधाकर
.लिंक-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10154745413596409&id=550121408

No comments:

Post a Comment