Monday, 2 March 2026

आर्थिक नियोजनातून आर्थिक वृद्धी , चला प्रामाणिक मार्गाने श्रीमंत होऊया - संकेत मुनोत, दिपालिका मासिकात प्रकाशन झालेला लेख

आर्थिक वृद्धी व्हावी ,अधिक पैसे असावे? असे कोणाला नाही वाटतं  सर्वांनाच वाटत . पैश्यांनी सर्व काही होत नाही हे खरे असले तरी पैशाशिवाय बऱ्याच गोष्टी शक्य होत नाही हेही तितकेच खरे आहे . आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासोबतच चांगले शिक्षण , चांगले आरोग्य आणि इतर सोयीसुविधा मिळवणायसाठी ही पैसे लागतातच . पण मग जवळपास बघतो ते कोणी लबाड्या करून , कुणाची संपत्ती लाटून ,भ्रष्टाचार करून  लोकांना फसवून झटपट श्रीमंत होणारे लोक दिसले कि आपल्यालाही वाट्ते कि सामान्य माणसाला  श्रीमंत व्हायला हेच करावे लागत असावे पण हे लोक झटपट श्रीमंत होतात तसे कंगालही होतातच . पण जे शाश्वत मार्गाने श्रीमंत होतात त्यांच्या बाबत मात्र असे होत नाही आणि त्यात लबाडी करण्याची , खोटे बोलण्याची किंवा कुणाला फसण्याची गरज नसते . त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे असावी लागते ती म्हणजे योग्य आर्थिक नियोजन . 
आर्थिक नियोजन ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे तर त्यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहूया 

बचत करणे - बचत म्हणजे सेविंग करणे , माझे जे काही उत्पन्न असेल त्यातील निदान ३०-६०% रक्कम मी बचत करेलच हे धोरण ठेवले पाहिजे . बचत म्हणजे काय असे विचारले तर बहुतेक जण म्हणतात कि 
उत्पन्न - खर्च = बचत
हे सूत्र वापरल्याने बचत फार कमी राहते किंवा राहतच नाही पण बचतचा खरा फॉर्मुला म्हणजे 
उत्पन्न - बचत = खर्च  
मी दर महिन्यात एवढे-एवढे % बचत करेनच आणि मग राहिलेले पैसे गुंतवणूक करेल आणि राहिलेल्या पैश्यातून माझा खर्च करेल असा फॉर्म्युला ठेवला तरच बचत होते 
आर्थिक गुंतवणुकीतून आर्थिक वृद्धी - पैसे फक्त बचत करून ठेवले तर ते वाचतात पण वाढत नाहीत तर त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ते वाढवणेही महत्वाचे आहे . म्युच्युअल फंड्स , SIP , सेविंग प्लॅन आणि विविध मार्ग त्यासाठी आहेत त्यात योग्य निवड आपण केली पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या सल्लागाराकडून ते करणे आवश्यक आहे . मी सलून मध्ये जाण्याऐवजी घरी केस कापले किंवा डॉक्टरला दाखवण्याऐवजी गुगलवर पाहून आरोग्यावर उपचार घेतले तर  केसांची किंवा आरोग्याची जशी अवस्था होते तशीच आपल्या गुंतवणुकीचीही अवस्था होते आपल्या समाधानासाठी ते थोडेफार वाढलेले असतात पण योग्य सल्लागाराच्या मार्गदशर्नाने ते गुंतवल्यास त्यात चांगली वृद्धी होते आणि आपण निश्चिन्त राहतो . 

कुठे किती % - आपले जे काही उत्पन्न असेल त्याचे ३०%+३०%+३०%+१०% असे विभाजन करा . उत्पन्न आले कि त्यातील ३०% इन्व्हेस्ट करा त्यानंतर राहिलेल्या ७० % तीळ ३० % लोन फेडण्यासाठी वापर लोन नसेल तर तेही इन्व्हेस्ट करा , आता राहिलेल्या ४० % तील ३०% घर खर्चासाठी वापरा आणि राहिलेले १० % हे स्वतःच्या मौज मजेसाठी आणि आनंदासाठी वापरा
 
फायनान्शियल पिरॅमिड- आर्थिक नियोजनाचा पिरॅमिड 
- हा आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा जर तुम्ही व्यवस्थित अमलात आणला तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कितीही मोठे आर्थिक संकट आले तरी त्यातून तुम्ही सहज बाहेर पडाल शिवाय आर्थिक वृद्धीही खूप चांगली होईल . तुमचे उत्पन्न १० हजार असू दे नाही तर ५० हजार , १ लाख किंवा १० लाख  सर्वांना हा सामान लागू होतो .  म्हणजे एखाद्या २० हजार उत्पन्न असलेल्या व्यक्तीने जरी हा फॉलो केला तर तो यातून स्वतःची चांगली वेल्थ निर्माण करू शकतो आणि एखादा ५ लाख उत्पन्न असणारा व्यक्तीही हे फॉलो न केल्यास कर्जबाजारी होऊ शकतो . पैश्याचे मानस शास्त्र  या पुस्तकात अश्याच २ व्यक्तींची सत्य घटना संगितली आहे ती नक्की वाचा . 
तर या पिरॅमिड मधील एक-एक  मजला समजून घेऊया सर्वात खाली म्हणजे पाया आहे तो बनतो  इन्शुरन्सने त्यात २ महत्वाचे इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स  त्यानंतर पुढचा मजला येतो तो म्हणजे दीर्घकालीन मुदतीचे प्लॅन आणि म्यूचुअल फंड्सचा त्यानंतर तिसरा मजला येतो तो emrgency कॅश चा , मग येते तुमचे घर , वाहन , सोने , चांदी , रियल इस्टेट इ आणि त्यावर शेवटचा मजला येतो तो शेयर्स वगैरेचा . यात बहुतेक लोक पाया नि त्यावरील मजले मजबूत कारण्याऐवजी डायरेक्ट वरती जातात आणि काही संकट आले तर पाया पक्का नसल्यामुळे  सर्व मजले खाली पडतात आणि आपण कर्जबाजारी होतो . तर आता एक एक मजला काय असतो ते पाहू 

टर्म इन्शुरन्स -  टर्म इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा  अर्थात लाईफ इन्शुरन्स  मला जर अचानक काही झाले तर त्यावेळी मला किंवा कुटुंबाला मिळणारी रक्कम ज्यात १०-१५ वर्षे किमान माझे कुटुंब भागू शकेल . प्रत्येक जबाबदार व्यक्तीने हा काढायलाच हवा . अनेक जणांचा असा गैरसमज असतो कि हे फक्त मृत्यूनंतरच मिळतात तर तसे नाही त्यात अपघाती  अपंगत्व हे रायडर आपण निवडले तर आपल्याला तेव्हाही मिळतात . कारण मृत्यू नाही झाला पण अपघाती अपंगत्व आले तर तेव्हाही अपंगत्व आल्याने काम करू शकत नाही मग पुढे घर खर्च आणि इतर जबाबदाऱ्या कश्या पार पाडणार ? तर त्यामुळे हा रायडर सुद्धा सोबत घ्यावा. यात बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो कि टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त गेल्यावरच पैसे मिळणार पण असे काही नाही आता असे सुद्धा टर्म इन्शुरन्स आले आहेत जे तुम्ही जिवंत राहिलात तरी तुम्हाला खूप चांगली रक्कम देतात . 
टर्म इन्शुरन्स चे ३ प्रकार आहेत 
१. नो रिटर्न टर्म इन्शुरन्स - यात तुम्हाला काही झाले तर पैसे मिळतात काही नाही झाले तर पैसे मिळत नाहीत 
२.  रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म इन्शुरन्स- यात तुम्हाला काही झाले नाही तर तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला रिटर्न मिळतात 
३. टर्म विथ वेल्थ क्रीएशन- यात तुम्ही जे काही पैसे टाकता त्यातील जवळपास ७०% मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात तर ३०% पहिले १० वर्षे टर्म साठी बाजूला ठेवतात जे ११ व्य वर्षांपासून दर वर्षी तुमच्या फंडमध्ये ऍड  केले जातात ज्यामुळे ११-२० या दरम्यान तुमच्या फंड्स ची value  खूप वाढते . आपल्या लहान मुलांचे मोठे झाल्यावर शिक्षण , लग्न , व्यवसाय , स्वतःची रिटायरमेंट आणि विवीध गोष्टीसाठी हा चांगला उपयोगी पडतो . विशेष म्हणजे यात आपला वार्षिक प्रीमियम २.५ लाख च्या कमी असल्यास मिळणारे सगळे पैसे टॅक्स फ्री असतात .आपल्या नॉर्मल म्यूचुयल फंड ला जो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तो याला लागत नाही . 
टर्म मध्ये तुमच्या उत्पन्नाच्या किमान २० पट तरी कव्हर घेतला पाहिजे जेणेकरून तुम्ही गेले तरी तुमच्यानंतर कुटुंबाला तुम्ही कमवत होता तेवढे उत्पन्न मिळून तुमचे कुटुंब भागवू  शकते, ज्यात तुमचा घर खर्च , मुलांचे शिक्षण , आई वडिलांचे आजारपण आणि अनेक गोष्टी येतात . तुम्हाला अपंगत्व आले किंवा मृत्यू झाला तर तुमचे उत्पन्न थांबणार आहे पण दुसरे कोणी तेवढे उत्पन्न तुमच्या कुटुंबाला देणार आहे का ? नाही ना ? त्यामुळे टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे. आता समजा एखाद्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख आहे आणि त्याने त्याच्या १०  पट म्हणजे १ कोटींचा टर्म काढला आणि त्याच्या मृत्यूनंतर १ कोटी मिळाले तर ते बँकेत ठेवले तर ६ % व्याजाने त्याच्या कुटुंबाला ६ लाख मिळतील जे त्याच्या उत्पन्नापेक्षा कमी असतील तेच २ कोटींचा असेल तर १२ लाख मिळतील जेणेकरून ज्या जीवनशैलीची सवय लागलेली असते ती खालावणार नाही . 
 
आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स - 
दवाखाना कोणाला कधी लागेल आणि त्याचा किती लाख  खर्च लागेल याचा भरोसा नाही. या खर्चापायी अनेकांना आपले घर विकावे लागते , साठवलेले सगळे पैसे आणि सोनेही मोडावे लागते, कर्ज काढावे लागते . त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने काढायलाच हवा . त्याचा कव्हर उत्पन्नाच्या किमान ५० लाख आणि त्याच्या वर असावा कारण आज एखाद्या अवयवाचे ते फुफ्फुस असो यकृत असो त्यासाठी ५० लाख पेक्षा अधिक खर्च येतो आणि सध्याच्या काळात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही . तेव्हा ५-१० लाख च्या कव्हर मध्ये भगत नाही म्हणून इकडे तिकडे आवाहन करण्यापेक्षा किंवा आपल्याकडील घर जमीन विकून वर कर्ज काढण्यापेक्षा काही हजर भरून तेवढ्या कव्हर चा हेल्थ इन्शुरन्स काढलेला कधीही चांगला . यात एका ३५ वर्षाच्या वयाच्या पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीचे उद्धरण घेतले तर त्याला ५ लाख कव्हर साठी अवर्षिक प्रीमियम ८ हजार येतो तर ५० लाख साठी किमान ७०-८० हजार यायला हवा पण ५० लाख साठी तो येतो फक्त  २१ हजार रुपये तर १ कोटी कव्हर साठी २४ हजार रुपये . मग जास्त जर कमी पैश्यात येत असेल तर जास्त घेतलेला काय वाईट ?

हेल्थ इन्शुरन्स घेताना मुख्य गोष्टी पाहाव्यात त्या म्हणजे सल्लागाराचा प्रामाणिकपणा , हॉस्पिटल्सचे नेटवर्क , क्लेम सेटलमेंट रेशो , कंपनी किती जुनी आहे इ . 
यात आरोग्य विमा काढल्यावर हेही लक्षात घ्यावे कि पहिल्याच दिवसापासून सगळे आजार कव्हर होत नसतात त्याला वेटिंग पिरियड असतो तो कशाला किती ते थोडक्यात पाहूया 
१ दिवस - अपघाती कव्हर पुढच्या दिवसापासून लगेच सुरु होतो 
१ महिना - अचानक होणारे आजार १ महिन्यानंतर लगेच कव्हर होतात . मलेरिया , कोविड आणि असंख्य आजार यात येतात 
२ वर्षे - हळूहळू होणारे आजार जसे कि गुडघ्याची वाटी बदलणे , मोतीबिंदू , पाइल्स , मुतखडा , शरीरातील गाठ काढणे असे अनेक आजार २ वर्षानंतर कव्हर होतात 
३ / ४वर्षे - एखाद्या व्यक्तीला पूर्वीपासून असलेले आजार जसे कि रक्तदाब , मधुमेह  वगैरे ३ किंवा ४ वर्षानंतर कव्हर होतात पण काही पॉलिसी मध्ये अतिरिक्त पैसे देऊन ते लगेच पण कव्हर करता येतात  
कधीच कव्हर न होणारे आजार - डोळे , दात , त्वचा यांचे आजार आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले उपचार कधीच कव्हर होत नाहीत . 

अजून काय गोष्टी पाहाव्यात - अमर्यादित रिस्टोरेशन , नॉन मेडिकल वस्तूचा कव्हर , बोनस आणि इतर बऱ्याच गोष्टीही पोलिसी घेताना पाहाव्यात . 

म्यूचुयल फंड्स - आपले पैसे वाढवण्याचा सगळ्यात चांगला आणि प्रामाणिक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड्स अर्थात यात थोडी फार रिस्कही असते. आम्ही ही गुंतवणूक करण्यापूर्वी दीर्घ मीटिंग घेतो त्यात गोल समजून घेऊन मग प्लांनिंग करतो . 

इ फ्लॅट - टॅक्स फ्री रेंट मिळवण्यासाठी इ फ्लॅट या नावाने दिल्या जाणाऱ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज  हा सुद्धा आयुष्यभर खात्रीशीर रक्कम दरवर्षी मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे . विशेष म्हणजे नॉर्मल फ्लॅट मध्ये लागते तशी एकदम रक्कम इथे द्यावी लागत नाही , इंटेरियर करावे लागत नाही , स्टॅम्प ड्युटी नाही , आणि लोन चा इ.एम.आय. पण नाही .  

चुकीच्या ठिकाणी गुंतवू नये - वर पैसे वाचवा आणि गुंतवून वाढवा असे सांगितले पण  त्याचा अर्थ चुकीच्या ठिकाणी गुंतवणे असा होत नाही दुप्पट करून देतो , तिप्पट करून देतो , दर महिन्याला एवढे एवढे देतो असे सांगणाऱ्या अचानक गायब होणाऱ्या फसव्या स्किमलाही खूप लोक बाली पडतात  . आर्थिक नियोजन कार्यशाळा घेताना असे  खूप लोक भेटले ज्यांनी यातून लाखो रुपये यातून गमावले. 
विदर्भात माझ्यासमोर घडलेला किस्सा सांगतो . माझी आर्थिक नियोजनाची कार्यशाळा झाली तेथील एका काकांनी माझ्याकडून त्यांचे व्यवस्थित आर्थिक नियोजन करून घेतले  . हेल्थ इन्शुरन्स , टर्म इन्शुरन्स , म्युच्युअल फंड्स , सेविंग प्लॅन्स यातून त्यांचा आर्थिक नियोजनाचा बेस मी पक्का करून दिला पण त्यांच्याकडे जमिनीतून आलेली एक लम्पसम अमाऊंट होती ती कुठे गुंतवू असे त्यांनी विचारले त्यावर मी काही गोष्टी सुचवल्या पण त्या एवढ्या रिटर्न्स देत नाहीत असे त्यांना वाटले तेवढ्यात एक कुठली तरी ट्रेड करणारी कंपनी पुण्यात आहे आणि ती महिन्याला ४% म्हणजे वर्षाला ४८ % रिटर्न्स देते असे त्यांनी सांगितले . मी म्हटले हे कसे शक्य आहे ? तर विदर्भात त्या जिल्यात अनेक लोकांना हे मिळत आहेत असे त्यांनी सांगितले . मी त्यांना विचारले कि यावर नियंत्रण ठेवणारी कुठली रेग्युलेटरी बॉडी आहे का कि जी तुम्हाला याबाबत खात्री देते तर तसे काही नाही पण लवकरच त्यांना RBI कडून ही लायसन्स मिळणार आहे असे त्यांनी सांगितले सोबत गुंतवणूक केल्यावर ते स्टॅम्प पेपर वर लिहून देतात पार्ट तेवढ्याच रकमेचा चेक वगैरे देतात असेही ते म्हणाले . त्यांची खूप मोठी कंपनी आहे आणि पैसे गुंतवण्याचे चांगले मार्ग त्यांना माहित आहेत आणि आपल्याला पैसे देऊनही त्यांच्याकडे भरपूर पैसे शिल्लक राहतात असे ते म्हणाले. सोबत  त्यांच्याच जिल्ह्यातील अनेक चांगल्या लोकांनी त्यात पैसे गुंतवले आहेत ज्यात पोलीस , डॉक्टर ,वकील , शिक्षक , व्यापारी , मेडिकल वाले असे अनेक लोक आहेत असे त्यांनी सांगितले आणि सुरवातीला २० लाख आणि नंतर ३२ लाख असे एकूण ५२ लाख त्यांनी गुंतवले ज्यावर दार महिना २ लाख रुपये ते त्यांना देत होते ४ महिने त्यांनी ते दिलेही पण या दरम्यान त्यांची पत्नी व मुले यांना याबाबत शंका वाटत होती त्यांनी त्यांना समजावून सांगितले आणि संकेतभैया तुम्हीही त्यांना समजावून सांगा असे सांगितले मी त्यांना समजावून सांगितले आणि गुंतवणुकीचे इतर अनेक चांगले मार्ग सांगितले सोबत इथे नाही केले तरी चालेल तुम्ही त्या पैश्याची एक गाडी घ्या सोने घ्या किंवा नुसते असेच घरी ठेवा पण तिथून ते काढा असे मी त्यांना सांगितले . त्यावर अजून २ महिने झाल्यावर घरच्यांनी खूप विरोध केल्यावर त्यांनी ते परत काढणायसाठी नाराजीनेच का होईना कंपनिच्या ऑफिसमध्ये जाऊन इमेल केला कंपनी म्हणाली कि एक महिन्यात मिळतील म्ह्णून पण एक महिन्यात काहीच रिप्लाय नाही अजून काही दिवस काही दिवस करत अनेक दिवस गेले . याच दरम्यान दर महिन्याला मिळणारे पैसे सुद्धा बंद झाले होते त्याचे काय झाले तर मार्च एंडिंग आहे त्यामुळे ऑडिट झाल्यावर पुन्हा सुरु होईल आणि आधिचेही मिळतील वगैरे सांगण्यात आले पण ते काहीच झाले नाही आता अनेक महिने झाले ते पैसे आलेच नाही आणि बरेच गुंतवणूकदार त्या ऑफिस मध्ये चकरा मारू लागले तिकडे कंपनीचे मुख्य लोक मात्र गायब झाले . आता हे लोक मिळून त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार आणि कोर्ट वगैरे मध्ये जाणार आहेत . पण पहा थोड्याश्या लालचे पायी  स्वतःचेच पैसे आणि स्वतःलाच त्यासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत . तर असे कोणीही सांगितले तर त्याला बाली पडू नका तो जवळचा नातेवाईक असेल , मित्र असेल किंवा CA असेल कोणीही सांगितले तरी याला बळी पडू नका . 
  
तर या दिपावलीत आपले आर्थिक नियोजन करून आपली आर्थिक वृद्धी करूया . आपले प्रेमानी आर्थिक नियोजन करण्यासाठी संपर्क करा 

संकेत मुनोत 
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार 
संस्थापक ,वेल्थब्रिज फायनान्शियल सर्विसेस 
८६६८९७५१७८

Friday, 22 September 2023

जयहिंद लोक चळवळ भेटीगाठी ग्रेट भेट with मकबूल तांबोळी सर

आपल्या जवळपास अनेक प्रेरणादायी लोक असतात पण आपल्याला माहीत नसतात त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे माझे 75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर .


परवा त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त हा लेख. 

 तरुण यासाठी की ते गप्पा मारताना त्यांच्या अनुभवाबद्दल  बोलतातच पण आत्ता आमच्या पिढी समोर असलेल्या चॅलेंजेसचाही ते विचार करतात . आम्ही महिन्यातून एकदा एक तास सहज बोलतो..


तर यानिमित्त सरांचा परिचय पाहूया

सरांचा जन्म पुण्यात मराठमोळ्या मुस्लिम गरीब कुटुंबात,  फुलवाला चौक येथे 06 Sep 1948 रोजी गणेश चतुर्थी ला झाला .आणि काल 06 sep 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमी ला 75 वर्षे पूर्तता झाली. बालपणात आसपास जैन मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन, मराठी , मुस्लिम, सिंधी, तेलगू, सिंधी , शीख , कानडी असा संमिश्र जाती धर्माच्या वस्तीचा भाग होता. 

त्यांनी Telco मध्ये 35 वर्षे नोकरी केली आहे.


ते देवभक्त होते,  तळ्यातल्या गणपतीला ते रोज जात असत त्यामुळे एक मुस्लिम मुलगा जातोय त्याचे विशेष कौतुक होत असे. 1965 पासून काही वर्ष गणेश मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांच्या मनात मात्र वेगवेगळे विचार घोळवत असत. त्यांनी सावरकरांचा मानवाचा देव आणि विश्वाचा देव हा लेख वाचला आणि ते नास्तिक झाले.


मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते 5-6 लोकांपैकी एक असे संस्थापक सदस्य होते आणि त्यात ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा भाई वैद्य, निळू फुले, बाबा आढाव यांच्याशी ही जवळचा संबंध आला होता. 

अभिनेते निळू फुले यांच्याशी त्यांचा 1970 पासून चांगली मैत्री होती आणि निळू भाऊ यांनी मकबूल सरांचा त्यांच्या बालमित्रांमध्ये समवेश केला होता.2003 ते 2009 या कालावधी मध्ये ते निळू भाऊंच्या सोबत संबंध महाराष्ट्रभर दौऱ्यात असत. महाराष्ट्र आणि देशभर च्या दौऱ्या मध्ये भाई वैद्य यांच्या सोबत ही असत. सुधाताई वर्दे आणि खासदार संभाजीराव काकडे यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध होते.मकबूल सर राष्ट्र सेवा दल चे  ट्रस्टी Treasurar होते त्याच बरोबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट याचेही ट्रस्टी होते.


अगदी वयाच्या 6 व्या -7 व्या वर्षापासून वाचनाची गोडी लागल्यामुळे विविध विषयांवरील त्यांचे वाचन अफाट आहे. त्यांचे विचार हे सुस्पष्ट आणि balanced आहेत.

आमची ओळख फेसबुकवरच झाली. सर माझे बहुतेक लेख वाचत आणि त्यावर प्रतिक्रिया देत असत. गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद वाढवणे हा आम्हाला जोडणारा दुवा.

2021 मध्ये एकदा स्वतः साठी आणि कॉलनी तील लोकांच्या साठी जांभळे विकत घेण्याच्या निमित्ताने त्यांनी मला त्यांच्या पाषाण येथील घरी बोलवले तेव्हा त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट झाली. (Lock down मध्ये 2 महिने बहिणीने काही काळ जांभळाचा व्यवसाय सुरू केला होता त्याबद्दल मकबूल सरांनी फेसबुक वर वाचले आणि मला बोलवले). नंतर Wednesday कट्टा निम्मित गुडलक कॅफे, FC Road येथे भेटी होत असत. 


काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांशी भेट झाली ज्यात *डॉ. बाबा आढाव, डॉ कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, रत्नाकर महाजन ,प्रशांत कोठडीया , मुक्ता पुणतांबेकर, संग्राम खोपडे , सुरेश खोपडे  ,  यशोदा वाकणकर , संदीप बर्वे , मनीषा पाटील, संतोष म्हस्के, विकास देशपांडे, चंद्रकांत शेडगे, माणिक जोगदंड, संतोष पवार, पराग गायकवाड, सुकेश पासलकर* आणि अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

यानिमित्त सर्वांना भेटून जयहिंद चे brochures दिले आणि या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केलें सोबत चळवळ वाढवण्यासाठी आपण विचार द्यावेत हेही सुचवले. 

आपणही त्यांना फोन किंवा मेसेज करून सदिच्छा नक्की द्या. 

त्यांचा संपर्क Makbul Tamboli - 7020509654


हा लेख लिहिण्याचा एक हेतू हाही आहे कि चांगल्या लोकांचे असे चरित्र पुढे न आल्याने लोकांच्या समोर चुकीचे दंगली घडवणारे लोक आदर्श म्हणून  उभे केले जातात . 


संकेत मुनोत

8668975178



Share


दिग्दर्शक शार्दुल सराफ भेट - जयहिंद लोकचळवळ

 Actor, Director मित्र शार्दुल सराफ हे परवा भेटण्यास आले होते. त्यांच्या सोबत जवळपास 4-5 तास छान चर्चा झाली. 

जयहिंद  लोकचळवळ विशेषतः जयहिंद कला मंच ची त्यांना माहिती दिली. त्यांनी टीव्ही वरील अनेक मालिकांच्या साठी लेखन केले आहे , नाटके लिहली आहेत आणि अभिनय ही केला आहे. 

त्यांनी जयहिंद च्या माध्यमातून गांधी विचार कसे पोहचवता येतील याबाबत थोडे स्क्रिप्ट लिहून दिले आणि पुढे ही त्यात लागेल ती मदत ते करणार आहेत. आमची ओळख फेसबुक वरची . शार्दुल सर माझे सर्व लेख वाचतात. ते actor, director etc आहेत हे लक्षात नव्हते काल प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात आले. 

संकेत मुनोत

जयहिंद लोक चळवळ

8668975178


Monday, 30 January 2023

गांधीजींचे उपोषण, 'त्या' सात अटी आणि वास्तव


सध्या एक गांधीजींबद्दल एक तथ्यहीन पोस्ट ऐतिहासिक तथ्य वगैरे म्हणून viral होत आहे.पोस्ट लिहतांना सदर व्यक्तीने खूप संशोधन केल्याचा आव आणला आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याने सुद्धा सहज लॉजिक लावून विचार केला तर त्यातील असत्य सहज लक्षात येईल.
तर त्यातील मुद्दे पाहूया
फाळणी नंतर निर्माण झालेली बंगाल मधील हिंसा शांत करून गांधीजी दिल्लीत परतले ,तर दिल्लीतही असेच दंगे व लुटमार सुरु होती. महात्मा गांधींनी दंगे शांत होवून सौहार्द व शांतता निर्माण व्हावी, यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण सुरु केले. दोन दिवसांनी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी उपोषण सोडावे म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्मातील प्रमुख अशा १३० जणांची शांतता समिती नेमण्यात आली.या समितीत अगदी संघ आणि हिंदू महासभा यांचेही प्रतिनिधी होते. या समितीच्या वतीने १७ जानेवारी रोजी दिल्लीत जाहीर सभा घेण्यात आली. गांधींनी उपोषण सोडण्यासाठी ज्या अटी घातल्या होत्या , या सातही अटी मान्य करण्यात आल्या आहेत याची घोषणा डॉ राजेन्द्रप्रसाद यांनी त्या जाहीर सभेत केली.जगन फडणवीस यांच्या सन १९९४ साली प्रकाशित झालेल्या ‘ महात्म्याची अखेर’ या पुस्तकात पान क्र.४५ वर या सर्व अटी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत.
या अटीबद्दल कांही दिवसांपुर्वी त्या नव्यानेच जगासमोर आल्याचा कांगावा केला गेला. मात्र या अटी कोणत्या आणि काय आहेत, हे आजपर्यंत लपवून ठेवले होते असे अजिबात नव्हे! विशेष म्हणजे या अटी काय आहेत हे जाणण्यासाठी मला लंडनलाही जावे लागले नाही की दहाबारा ब्रिटीश वृत्तपत्रांची कार्यालये, लायब्ररीजही शोधाव्या लागल्या नाहीत किंवा प्रचंड परिश्रम आणि महान असे अविरत संशोधन देखील करावे लागले नाही. त्याची माहीती मला माझ्या भारतातीलच घरातील लायब्ररीत मिळाली!
वास्तविक या सातही अटी आजीबात हिंदूविरोधी नाहीत कि अगदी त्या मुस्लीमधार्जिण्या देखील नाहीत. उलट एखाद्या जवाबदार देशातील प्रगल्भ जनतेने यादवी हिंसेच्या कठीण काळात नेमक्या कोणत्या पद्धतीने निर्णय घ्यावा याचे मार्गदर्शन करणा-या आहेत. पण ती समजून घेण्याची वैचारीक प्रगल्भता स्वातंत्र्याच्या पहाटे अघटीतपणे अनुभवास आलेले हिंसेने प्रक्षुब्ध मनात नसणे एकवेळ समजू शकते पण एवढा काळ उलटूनही ती कांही भारतीयांत अद्याप रूजली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.
फाळणी नंतर जी स्थिती दिल्ली, अमृतसर आणि गुरुदासपूर भागात होती अगदी तशीच स्थिती पाकिस्तानातील लाहोर. हैद्राबाद, क्वेट्टा, पेशावर आणि कराची या शहरातही होती. कराची आणि आजूबाजूच्या परिसरातून अनेक सिंधी कुटुंबे आणि लाहोर परिसरातून शीख कुटुंब त्यांची घरदारे आणि जमीन जुमला सोडून भारतात परतली होती-परतत होती आणि त्यांना राहण्यासाठी तात्पुरती अधिवासाची व्यवस्था केली गेली होती. लाहोर भागात देखील भारतातून येणाऱ्या मुस्लिमांसाठी अशीच व्यवस्था लियाकत आली सरकारने केली होती!
भारतात येणाऱ्या हिंदू, शीख आणि सिंधी लोकांनी पाकिस्तानात सोडलेली संपत्ती ही भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांनी सोडलेल्या संपत्तीपेक्षा अधिक होती. मात्र पाकिस्तानात जवाबदार राज्यपद्धती, कायदा आणि सुव्यवस्था याची अवस्था अगदीच विस्कळीत झाली होती. शिवाय पाकीस्तान हे धर्माधिष्ठित राज्य होते, कायदे आझम जीन्नांनी अल्पसंख्यांकाच्या हक्काची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात स्थिती त्यांच्याही नियंत्रणाबाहेर गेली होती. खरेतर फाळणी मुळे दोन्ही देशातील सर्व धर्मिय जनतेला हिंसेचा सामना करावा लागला होता आणि सर्वच धर्मियातील निरपराध सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसली होती.
पाकीस्तानात आपली संपत्ती, घरदार सोडून दिल्लीत निर्वासित म्हणून राहणारे आपल्यासमोरील सकंटांचा समाना करत होते. पण स्थानिक लोक त्यांना सहानुभूती दर्शविण्याच्या प्रयत्नात हा देश हिंदू राष्ट्र निर्माण झाल्याच्या अविर्भावात दिल्ली आणि परिसरातील अनेक मशिदींचा ताबा घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. जी घरे मुस्लीम भारतात सोडून पाकीस्तानात गेले होते, त्यांची घरे बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली जात होती. अनेकांनी ट्रेन मधून पाकिस्तानात जाणा-या मुस्लिमांवर हल्ले करायला सुरुवात केली होती तर अनेक मुस्लिमांना पाकिस्तानात जाण्यास देखील सांगितले जात होते. कांही ठिकाणी मुस्लिमांवर बहिष्कार देखील टाकला होता. हे भारतातच होत होते असे नव्हे तर अगदी अशीच परिस्थिती पाकिस्तानातील गैर मुस्लिमांबाबत होती. पाकिस्तानातील मंदिरे, गुरूद्वारे, मठ यांचा ताबा धर्मांध मुस्लिमांनी असाच घेतला होता. सिंधी आणि शीख लोकांवर ते हल्ले करत होते आणि त्यांना भारतात जा अशा धमक्याही देत होते. ज्या प्रमाणे भारतातले सरकार भारतात ही परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते तशा प्रयत्नांची हमी पाकिस्तान सरकारने देखील दिली होती परंतु तीथे या हमीची अंमलबजावणी मात्र व्यवस्थित होत नव्हती.
दंगे शमवणे, पुनर्वसन छावण्या उभारणे, पुनर्वसितांना सुविधा देणे, त्यांना रोजगार देणे आदी कामे अग्रक्रमाची होती. त्यात कश्मिर मधे युद्ध सुरू होते. नोव्हेंबर १९४७ मध्ये अनेक हिंदू आणि मुस्लीम निर्वासित अजमेर मध्ये एकत्र झाले त्यातून स्थानिकांशी वाद सुरु झाले. अगदी स्थानिक मुस्लिमांनी मुस्लीम निर्वासितांना देखील विरोध केला. याच दरम्यान १६ नोव्हेंबरला कॉंग्रेसतर्फे पुनर्वसन कार्य तातडीने करण्याचा आणि अल्पसंख्यांक समाजाचे संरक्षण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. भारत जे अल्पसंख्याकांच्या सरंक्षणाचे व सुरक्षित स्थलांतराचे प्रयत्न चालू होते अगदी तसेच प्रयत्न पाकिस्तानने करावे याबद्दल १४ सप्टेंबर १९४७ रोजी Inter Dominion Agreement करण्यात आले होते त्याची अंमलबजावणी करावी यासाठी पाकिस्तानवर दबाव निर्माण केला जात होता. म्हणून ४ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तान सरकारला याबाबत सुचना देण्यात आली.
दिल्लीत जानेवारी १९४८ मध्ये आलेल्या निर्वासितांची संख्या ही जवळपास ४ लाख एवढी होती. पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांचे प्रश्न सोडविणे महत्वाचे असताना , दंग्यामुळे दंगलग्रस्तांचे प्रश्न देखील निर्माण झाले होते! म्हणून दंगे थांबवून शांतता आणणे अगत्याचे होते. दिल्लीत मुस्लिमांची संख्या ३.५ लाख एवढी होती त्यापैकी २ लाख मुस्लिमांनी दिल्ली सोडली होती. त्यांनी सोडलेल्या मिळकतीवर कब्जा करण्यासाठी निर्वासितांना उचकविण्याचे काम अनेक संघटना करत होत्या. मुस्लिम नँशनल गार्ड आणि संघ या संघटना यात अग्रेसर होत्या! वास्तविक या मिळकती बाबत स्वतंत्र कायदा करून त्या मिळकती पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना दिल्या जाणार होत्या. मात्र दंगलीतील गोंधळाचा फायदा घेवून भारतातीलच कांही लोक या मिळकतीवर कब्जा करू पाहत होते.
भारत सरकारची स्पष्ट भूमिका अशी होती की, जे मुस्लीम लोक स्वेच्छेने पाकिस्तानांत जात असतील तर त्यांना रोखू नये मात्र बळजबरीने कोणासही पाकिस्तानात पाठवू नये किंवा अशी स्थितीही निर्माण करू नये की ते भीतीने पाकिस्तानात जातील. भारतातील हिंदुत्ववादी संघटनांची इच्छा अशी होती की, पाकिस्तानात हिंदुवर हल्ले होताहेत, हिंदूंची मंदीरे व संपत्ती मुस्लीम ताब्यात घेत आहेत म्हणून भारतात देखील मुस्लिमांवर हल्ले करून त्यांची संपत्ती किंवा मशिदी हिंदुंनी ताब्यात घ्यायला हवी ! अर्थातच हे सुड घेण्याच्या वृत्तीचे अजब तर्कट होते !
देशातील जवाबदार सरकार पुनर्वसनाच्या योजना पूर्ण करत असताना स्वतःच्या हितासाठी, कायदा हातात घेवून स्वेच्छेने पुनर्वसनाचे स्वत:च्या राजकीय स्वार्थाचे हातखंडे अजमावणे चुकीचेच होते! जे लोक पाकीस्तानात आपला जमीनजुमला सोडून मोठ्या आशेने भारतभुमीकडे आले होते त्यांच्या पुनर्वसनाचे काम अत्यंत महत्वाचे होते! मात्र हिंसा शांत झाली तरच पुनर्वसनाचे कार्य त्वरेने करता येणे शक्य होते. याशिवाय सर्वात महत्वाचे कार्य होते ते म्हणजे दोन्ही देशातील स्त्रिया, मुली आणि लहान मुले यांची सर्व प्रकारच्या हिंसेतून सोडवणूक करणे आणि त्यांना सुरक्षित त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचविणे.
पाकिस्तानची निर्मिती १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली आणि खंडित भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिले गेले तेंव्हा , पाकिस्तान हे राष्ट्र जरी धर्माच्या अधरावर इस्लामिक राष्ट्र म्हणून उदयास आले असले तरीही भारत हे राष्ट्र मात्र त्याची प्रतिक्रिया अथवा भ्रष्ट नक्कल या स्वरुपात हिंदू राष्ट्र म्हणून उदयास आलेले आजीबात नव्हते. याचे भान त्यावेळीही कांहींना नव्हते आणि दुर्दैवाने आजही नाही. त्याकाळात ज्याच्या निर्णय क्षमता होती असे सर्वच नेते भारतात लोकशाही आणि जवाबदार राज्यपद्धतीसाठी आग्रही असणारे नेते होते. पाकिस्तानात मात्र त्यांचे बाबा-ई-कौम अर्थात राष्ट्रपिता क्षयरोगाने अखेरच्या मोजत असताना , वजीर-ए-आझम लियाकत अलीही कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्यात निष्प्रभ ठरले होते.
सरकार जवाबदारीने काम करत असताना लोकांवर नैतिक दबाव निर्माण करून दंगल शमविणारे आणि सौहार्द निर्माण करण्याची क्षमता असणारे खरेखुरे राष्ट्रपिता भारताली लाभले होते आणि ते आपले काम चोखपणे करत होते. असी कोणीही व्यक्ती पाकिस्तानात नव्हता, हे पाकीस्तानचे राष्ट्रीय दारिद्रय होते. पाकीस्तानती निर्मीती करणा-या जीन्नांनी पाकीस्तानसाठी कांहीही केले नाही, अशी भुमिका आज 'जमाते उलेमा इस्लाम' हा 'इस्लामित्ववादी' पक्ष घेतो तर सन २००६ साली पाकीस्तानी स्वांतंत्र्ययोद्धांच्या गौरवासाठी तयार केलेल्यै यादीतून जीन्नांचे नांव वगळण्यात आले होते. अर्थात पाकीस्तान हे मुळातच बेजवाबदार असे राष्ट्र आहे! परंतु राष्ट्रपित्याचेच योगदान नाकारण्याची क्षुद्र वृत्ती हल्ली भारतातही फोफावत आहे, जी भारतासारख्या महान देशाला पाकीस्तानच्या पातळीवर घसरवणारी आहे. नेहरू त्यांच्या 'Do not copy Pakistan' या १५ जानेवारीच्या भाषणात म्हणाले होते " We are not framing the destinies of India on the lines adopted by Pakistan ' म्हणूनच आज भारतातील 'धर्मनिरपेक्ष संसदीय लोकशाही' जगात आदर्श आहे आणि पाकीस्तान एक 'Failed nation' आहे!
फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारताची अवस्था त्याकाऴी दारूगोळा भरलेल्या, फुटलेल्या, आग लागलेल्या आणि समुद्रात मध्यभागी असलेल्या जहाजासारखी होती. धार्मिक विद्वेष समाजात टिपेला पोचला असताना समाजावर नैतिक दबाव निर्माण करण्याचे सामर्थ्य असणारे, राष्ट्रीय ऐश्वर्याचे वैचारीक प्रतिक असणारे खरेखुरे राष्ट्रपिता गांधीजी केवळ भारताकडे त्याकाळीही होते आणि आजही आहेत! हे समजायला केवळ उच्चशिक्षण असून उपयोग नाही तर प्रगल्भता लागते.
© राज कुलकर्णी.
संदर्भ.
1) महात्म्याची अखेर – जगन फडणीस , लोक वाड़मय गृह , मुंबई
2) Freedom at Midnight -Larry Collins and Dominique Lapierre. Vikas Publishing House Pvt. Ltd.
3) वल्लभभाई पटेल चरित्र आणि काळ – त्र्यं. र. देवगिरीकर , भारत ग्रंथमाला पुणे
4) पाकिस्तान अस्मितेच्या शोधात – प्रतिभा रानडे राजहंस प्रकाशन, पुणे.
5) Jinnah – India –Partition and Independence
Jaswant Singh , Rupa & Co. New Dehli.
6) Selected Works Of J.Nehru , Second Series Vol.5 ,JNMF ,New Dehli.
महात्मा गांधी यांच्या बद्दलचे समज गैरसमज आणि ऐतिहासिक साहित्य जाणून घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा knowing Gandhi व्हाट्सअप्प समूह जॉईन करा
शेयर करा

Monday, 28 March 2022

TV वर पहिल्यांदाच

व्याख्याने आयोजित केली, वृत्तपत्रात एखादा लेख प्रकाशित झाला पण एखाद्या वृत्त वाहिनीवर बोलण्याची ही पहिलीच वेळ होती..ती म्हणजे २६ मार्च २०१६
नितीन सोनवणे, अजय नेमाने , अप्पा अनारसे, ज्ञानेश्वर अनारसे या मित्रांना मी त्यावेळी बोलवून घेतले होते...आज चौघेही आपापल्या पातळीवर मोठे कार्य करत आहेत. या शो वर जाऊन आलो आणि ४ च दिवसात नितीनचा फोन आला की गांधिविचार प्रसारासाठी वेगवेगळ्या देशात जायचे आहे येतोस का? मला तर योजना आवडली, घरी विचारले तर घरचे म्हणे नोकरी, लग्न आणि इतर गोष्टीचे काय. तू गेला तर घर कस चालणार आणि त्या जबाबदारीमुळे एका स्वप्नाला नकार द्यावा लागला..सन्मित्र नितीन आज ४६ देश फिरून आला त्याला आलेले अनुभव अप्रतिम आहेत..
 म्हणजे मी ही इथे नोकरी व्यवसाय सांभाळत गंधिविचार प्रसाराचे आणि संघटन वाढवण्याचे कार्य करतच राहिलो पण एक गोष्ट वास्तव आहे कि भारतापेक्षा इतर देशांमध्ये गांधींना जास्त महत्व आहे....इथे लोक आपापल्या जातीचे महापुरुष घेऊन बसले आहेत..म्हणजे मी जास्त वाचन केले नसते तर मी माझ्या जाती वा धर्मातील महापुरुष च कसे श्रेष्ठ म्हणत तेवढ्याच कंपूत संकुचित राहिलो असतो...
असो तेव्हा लीहलेली पोस्ट
नवल आहे ना पुर्ण जग ज्याला प्रेरणा मानते आम्ही त्याचा तिरस्कार करतो 
 साम टीव्हीवरील आपला सहभाग असलेला 'आवाज महाराष्ट्राचा' (26march)या कार्यक्रमामुळे अनेक मित्र मैत्रिणीचे '#आम्ही_एकदा_तरी_गांधी व ईतर महापुरुषांबद्दलची_दुसरी_बाजु_वाचतो' असे मेसेजेस व फोन आले तेही अशा मित्र मैत्रिणींकडुन जे नेहमीच मला व समविचारी मित्रमैत्रिणीांना विरोध करत असत किंवा चेष्टा करत असत. काहींनी तर जास्त वाचनानंतर विचारात बदल झाल्याचेही कबुल केले आहे '#आम्हाला_आत्तापर्यंत_हे_कुणी_सांगितलच_नव्हते वगैरे वगैरे मत आली आहेत
ते बदलो ना बदलो नाण्याची दुसरी बाजु वा सत्यता पडताळणी करण्याचे त्यांनी ठरवले हेच माझ्यासाठी खुप आहे.

पुर्ण जगभर ज्या भारतीयाची प्रेरणा घेऊन लाखो लोक आपले जीवन बदलतात त्याच भारतीयाचा त्याच्याच देशातल्या लोकांकडुन एवढा द्वेष , दुर्लक्ष व तिरस्कार का केला जातो कोण जाणे.
अँपलचा #स्टीव्ह_जॉब्स, #अल्बर्ट_आईनस्टाईन , #हेन्री_फोर्ड, #चार्लि_चँपलिन सारखे आधुनिक लोक या माणसाचे चाहते होते आणि या माणसाच्या विचारांनी चाललो तर जगातील अनेक प्रश्न मिटुन जग सुंदर होईल अस यांनी लिहुन ठेवलय हे कुणी वाचतच का नाही?

संजय आवटे सर,साम टीव्ही, knowing Gandhism team आणि आपणा सर्वांचे जेवढे आभार मानावे तितके कमीच आहेत

संजय आवटे सरांचे खुप कौतुक वाटते एवढा मोठा माणुस पण किती साधा , सिंपल, अहंकाराचा लवलेशही नसणारा 
एकीकडे अर्णब गोस्वामी, भरतकुमार राऊत, रजत शर्मासारखे लोक जे स्वार्थासाठी काहीही बोलतात आणि काहीही करतात 
तर एकीकडे संजय आवटे, रविशकुमार, रविंद्र सरांसारखे निस्वार्थी , परखड व सत्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार 

सामाजिक चळवळीतील अनेक मित्रांच्या प्रतिक्रीया आल्या कि तुझे दरवेळी वेगवेगळ्या सामाजिक ऊपक्रमांबद्दलचे, व्याख्यानाचे, पर्सनल मेसेज येत असतात (तुषार गांधींची मुलाखत असो वा असिम सरोदे, राम पुनियानी वा ईतर कुणाची किंवा श्रीरंजन आवटे किंवा प्रकाश आमटेंचे काही ईतरांनी पुण्यात अरेंज केलेला सामाजिक कार्यक्रम वा व्याख्यान असो)
 मग यावेळी तु स्वतः सहभागी असताना का नाही केला ?मित्रांनो  नेमकी अात्ताच्या साम टीव्हीच्या कार्यक्रमाबाबत मोबाईल ईश्युमुळे व प्रवासात असल्यामुळे  बर्याच जणांना पर्सनल मेसेज करु नाही शकलो  त्याबद्दल क्षमस्व

शनिवार
* सकाळी 12.15वा
 साम टीव्हीतील आवाज महाराष्ट्राचा शो मध्ये सहभाग
.
2.00 वा तेथील एन एस एस कँपमधील engineering college च्या विद्यार्थी व विद्यार्थींनींशी मुक्त संवाद व चर्चा , कँमेरासमोर अनेक गोष्टी बोलण्याच्या राहुन गेल्या त्याबद्दल त्यांच्याशी बोललो

2.30 वा 
संजय आवटे, देविदास सर , यांच्यासोबत जेवण 
 
त्यानंतर अनेक मित्रांची, मान्यवरांची,  भेट , ओळख, एकमेकांना सामाजिक कार्यात कशी मदत करता येईल याबद्दल चर्चा

नंतर युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये चालत असलेल्या वेगवेगळ्या ऊपक्रमांना भेट

पनवेल येथे डॉ धनंजय क्षिरसागर यांची भेट ज्युस व गप्पा

मुंबईत अजय मक्तेदार सरांची भेट, खमंग ईडलीवर ताव व गप्पा 

पुन्हा पुण्याकडे प्रस्थान 

होय बदल शक्य आहे असं खात्रीने वाटतय 
जग किंवा देश बदलेल न बदलेल
एक गाव किंवा त्यातील एक कोपरा तरी बदलुनच जाऊ
#Be_The_Change
#Yes_we_can



Friday, 11 September 2020

#स्वामी_अग्निवेश एक निर्मळ माणूस

#स्वामी_अग्निवेश यांचे निधन 
एक खूप मोठा आणि निर्मळ माणूस आपण गमावला आहे
काही वर्षापूर्वी गांधीभवन मध्ये त्यांची भेट झाली होती, खूप छान बोलले , त्यावेळी एक मित्र त्यांच्या पाया पडायला गेला तर त्यांनी त्याला अडवले आणि गळा भेट घेतली
तारीख अजून ही आठवते 01 ऑक्टोबर 2016, त्यांच्यासोबत त्यांना पुस्तक देतांना फोटो ही काढला होता , त्यांनी तिथे जे भाषण दिले ते अजूनही आठवते
दिल्लीत गेलो तेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते दिल्लीत नव्हते

धर्माचा मानव कल्याणासाठी विधायक उपयोग त्यांनी केला, धर्माच्या नावावर बाजार करणाऱ्या, द्वेष पसर्वणार्या वातावरणात धर्माचा खरा अर्थ त्यांनी सांगितला आणि जगला
अनेक धर्मांध लोकांचे त्यांच्यामुळे धाबे दणाणले होते त्या लोकांनी त्यांच्यावर हल्लेही केले पण ते लढत राहिले गरीबांसाठी
Youtube वर जाऊन त्यांचे काही एपिसोडेस पहा बरेच काही शिकायला मिळेल
त्यांना तर आपण परत आणू शकत नाही पण त्यांचे विधायक विचार आपण ठिकठिकाणी पोहचवू शकतो त्याचा प्रयत्न करूया

संकेत मुनोत
11-sep-2020

Thursday, 10 September 2020

विनोबा- अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठ नाव...

आज आचार्य विनोबांची जयंती 
अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात मोठ नाव...
जगातील प्रमुख 22 भाषा त्यांना अवगत होत्या आणि सर्व धर्मांबद्दल सखोल अभ्यास असणारे आणि ते सोप्पे करून सांगणारे त्यावर त्यांचे साहित्य आहे
तरुणपणी त्यांच्या मनात दोन स्वप्ने होती एक तर बंगालच्या सशस्त्र क्रांतिकारकांना जोडून सशस्त्र क्रांती करायची किंवा हिमालयात जाऊन अध्यात्मिक क्रांती करायची
 पण त्याच वेळी महात्मा गांधींचा एक लेख त्यांच्या वाचनात आला
त्यांना हिमालयाची शांती आणि बंगालची क्रांती दोन्हीचा संगम तिथे दिसला , ते त्यांना भेटले आणि त्यांनतर ते त्यांना जोडले गेले ते कायमचेच..
 पुढे याच विनोबांनी चंबळ मधील एकदम अवघड समजल्या जाणाऱ्या डाकूंचे हृदयपरिवर्तन घडवून आणले।
जिथे माणूस एक तुकडा जमिनीसाठी स्वतःच्या सख्ख्या नातेवकाशी भांडायला ही कमी करत नाही तिथे विनोबांच्या प्रेरणेने लाखो एकर जमिनी लोकांनी हरीजनांसाठी दान केल्या हे जगात पहिल्यांदाच घडले होते.
 जगातील सर्व प्रमुख धर्मग्रन्थाचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यावर त्यांनी लिहलेले ग्रंथ त्या-त्या धर्मात आणि इतर धर्मात ही मार्गदर्शक ठरले 
उदा- जैन धर्मातील अनेक पंथाच्या आचार्यांना आणि अभ्यासकांना एकत्र बसवून त्यांनी 32 आगम चा सार काढला ज्याचे नाव समणसुत्तम 
हा ग्रंथ फक्त जैन धर्मियांनाच नव्हे तर जगात ज्यांना कुणाला जैन धर्म जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे.
त्यांनी फक्त धार्मिक आणि साहित्यिक उंचीचं नाही गाठली तर स्वतः शेवटपर्यँत कष्टाची कार्ये ही करत राहिले
ज्या कामांना खालच्या दर्जाची कामे म्हटले जाई आणि जी एका कुठल्या तरी जातिकडून केली जात ती विनोबांनी स्वतः तर केलीच पण लाखो लोकांना करायला लावली.ते शौचालय साफ करणे असो, शेती करणे असो वा इतर काही...

आत्ता जेवढे आठवले तेवढे लिहले अजूनही खूप लिहण्याची इच्छा आहे पण ऑफिस ची वेळ झाली 

11-sep-2019

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2606626132721755&id=100001231821936

चुकभुल क्षमस्व
संकेत मुनोत

Monday, 9 December 2019

जवाहरलाल नेहरू-१६ ऑगस्ट १९४७ लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळा-भाषण

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ...........

“आज या प्राचीन किल्ल्याच्या परिसरात आपण एका ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने जे आपण गमावले होते ते पुन्हा जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा ध्वज कोण्या एका व्यक्तीच्या व कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचे प्रतिक नसून,तो संपूर्ण देशाच्या विजयाचे प्रतिक आहे. भारताचा हा मुक्त ध्वज केवळ भारताच्या नव्हेतर संपूर्ण जगातील स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा प्रतिक म्हणावा लागेल. भारत, आशिया आणि संपूर्ण जगाने हा महान दिवस आनंदाने साजरा करायला हवा !

'भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ,ज्यांनी त्याग केला त्या सर्वांचे स्मरण आजच्या दिवशी महत्वाचे आहे. प्रत्येकाचे नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही मात्र सुभाषचंद्र बोस यांचे नाव मी आवर्जून घेईन. ज्यांनी भारताबाहेर जावून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि मोठ्या धैर्याने स्वातंत्र्यासाठी ते लढले. भारताचा हा तिरंगा ध्वज त्यांनीच प्रथमतः विदेशात फडकाविला. त्यांचे स्वप्न आज पुर्ण होऊन हा ध्वज लाल किल्ल्यावर  फडकविण्याची वेळ आली आहे. त्यांनी भारतात परत येण्याचा हाच दिवस असायला हवा होता ,पण दुर्दैवाने ते या जगात नाहीत'

'एक सशक्त आणि कणखर भारत घडविण्याचे आपले ध्येय आहे. मजबूत पायाभरणीच्या आधारावरच देश महान बनू शकतो. स्वातंत्र्याची पहाट आपल्यासाठी मोठ्या जवाबदा-या  घेवून आली आहे आणि या जवाबदा-या पूर्ण कार्यक्षम होवून आपल्याला पार पाडावयाच्या आहेत. पण  जनतेच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जावू शकत नाहीत. आपल्यापैकी कोणीही इथे प्रधानमंत्री अथवा मंत्री नसून,आपण सर्वजन या देशाचे विनम्र सेवक आहोत. माझे सरकार जनतेचे ख-या अर्थाने प्रतिनिधी म्हणून कामकाज करेल, अशी मला आशा आहे. आज जनता हीच ख-या अर्थाने खरी सत्ताधीश असून सरकारचे सशक्त असणे वा नसणे केवळ जनतेवरच अवलंबून आहे. जनतेची इच्छा आपण सरकार मध्ये असावे अशी असल्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकजण आज सरकार मध्ये आहोत आणि जनतेच्या  इच्छेनुसारच आपल्याला  ही पदे  त्यागावी लागतील'

'आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हा केवळ एक पडाव आहे, विश्वशांतीचे आणि उन्नतीचे अत्युच्च ध्येय प्राप्त करण्याच्या प्रवासातील ही केवळ एक पायरी आहे आणि  आपल्याला खूप दुरचा प्रवास करायचा आहे !"

जवाहरलाल नेहरू
(१६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून ....)
अनुवाद :- राज कुलकर्णी.

आमदार सुनील अण्णा टिंगरे यांची भेट आणि चर्चा

माझे साडूबंधू व वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कांग्रेसचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुनिलआण्णा टिंगरे यांची कालच्या रविवारी सकाळी त्यांच्या कार्यालयामध्ये आपल्या समविचारी मित्रपरिवारासह भेट घेण्याचा योग जुळून आला. गेला सव्वा महिना चाललेल्या राजकीय गदरोळाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांची मिळालेली भेट, ही अपेक्षेनुसार "निवांत" अशीच होती. त्यामुळेच सर्वांशी वेगवेगळ्या विषयांवर दीर्घकाळ व सविस्तर बोलता आले.

दोन वेळा नगरसेवक व आत्ता विद्यमान आमदार असलेल्या सुनिलअण्णा टिंगरे यांची प्रतिमा, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून 'पक्षातीत' अशीच राहिलेली आहे. किंबहुना अशी प्रतिमा हे सुनिलजी यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. २००७ साली पहिल्यांदा महानगरपालिकेवर निवडून गेल्यापासून आजपर्यंत त्यांचा जनमानसातला  'सार्वजनिक अहवालाचा' (पी.आर.चा) आलेख हा सतत चढता राहिलेला आहे. त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता त्यांची लोकांसाठीची उपलब्धता, मतदारसंघाच्या प्रश्नांची चांगली जाण, समस्यांचा गरजेनुसार प्राध्यान्यक्रम ठरवून योग्य दिशेने व प्रामाणिक तळमळीने केलेला सुसूत्र - नियोजनबद्ध विकास व आपल्या विरोधकांनाही आपलेसे करून घेण्याचे कसब या चार-पाच गोष्टी त्यांचा हा 'पी.आर.' वाढण्यात महत्वाच्या ठरलेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते.

आम्हा सर्व समविचारी मित्रमंडळींनी, कामाचा दांडगा अनुभव असलेल्या या आमदारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणे, हा या भेटीचा एक भाग होताच. पण त्याबरोबर शाश्वत मानवी मूल्यांचा आग्रह धरण्यासाठी जातपात, धर्म, लिंग, वंश, वर्ग व प्रांत या भेदांच्या पलीकडे जाऊन, भारतीय संविधानात मांडलेल्या मूलभूत तत्त्वांनुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारलेला व सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाची कास धरणारा समाज निर्माण करण्याकामीच्या कल्पक योजनांना आमदार साहेबांकडूनही एक जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने भरभक्कम साथ मिळावी, तशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त करणे, हा देखील प्रमुख उद्देश होता. अपेक्षेनुसार आमदारसाहेबांचा यास मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. याकामी शक्य ती सर्व मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आम्ही सर्वांनी त्यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचं अभिनंदन पुष्पगुच्छ वगैरे देऊन करण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं, भेट स्वरूपात देत अभिनव पद्धतीने करण्याचे योजले होते. त्याचाच भाग म्हणून...

१) तरुण गांधीविचार अभ्यासक, Knowing gandhism global friends, चांगले विचार समूह व नाते टिकवूया या समाज माध्यमावरील समूहाचे संघटक श्री. संकेत मुनोत यांनी स्वतः संकलित केलेलं "एक धैर्यशील योद्धा - गांधी" हे पुस्तक, त्यांच्यासह श्री. निलेश शिंगे व सचिन देशमुख यांच्या हस्ते आमदारसाहेबांना भेट देण्यात आलं.

२) 'सिंगल मिंगल' या आपल्या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेले तरुण लेखक, कवी व विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात आपली भूमिका व विश्लेषण प्रभावीपणे मांडणारे राजकीय अभ्यासक श्री.श्रीरंजन आवटे यांनी लिहिलेलं, संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं, "आपलं आयकार्ड" हे पुस्तक त्यांच्या स्वहस्ते आमदारांना भेट देण्यात आलं.

३) युवक क्रांती दल (युक्रांद) चे राज्य कार्यवाह श्री. संदीप बर्वे यांनी प्रख्यात लेखिका, राजकीय अभ्यासक तिस्ता सेटलवाड यांची, सध्या देशात प्रचंड गाजत असलेल्या एन. आर. सी. या वादग्रस्त विषयाचं वास्तव मांडणारी, माहिती पुस्तिका आमदारांना दिली.

४) Knowing Gandhism Global Friends चे मार्गदर्शक सदस्य  व सोशल मीडियावर आपले परखड विचार मांडणारे श्री.राजा परांजपे काका यांच्या हस्ते आमदारसाहेबांना श्री. संजय आवटे सरांचं, भारतीयत्व म्हणजे नेमकं काय यावर प्रकाश टाकणारं, "We the change - आम्ही भारतीय लोक" हे पुस्तक भेट देण्यात आलं.

तर

५) Knowing Gandhism Global Friends कोअर कमिटी सदस्य व पुणे शहर काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सर्वश्री उमेश ठाकूर, संजय मानकर, शशांक पाटील, युक्रांदचे पुणे शहर सचिव श्री.सुदर्शन चखाले व भोसरी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयपाल गोरडे यांच्या हस्ते भारताची राजमुद्राधारी अशोक स्तंभ प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

आम्हा मित्रपरिवाराची आणि आमदार साहेबांची आजची भेट अनेक अर्थाने महत्वपूर्ण होती. भौतिक विकास कामांबरोबर, एक परिपूर्ण विकसित समाज घडविणे देखील महत्वाचे आहे. त्या कामात आम्ही मित्रपरिवार नेहमी आमदार साहेबांबरोबरच राहू आणि संविधानाला अपेक्षित समाज बांधणी व विकास करण्यात आमदार साहेबांचे आम्हाला सहकार्य लाभेल.
भौतिक विकास कामांच्या बरोबरीने, समाजातील सर्व थरांचा सर्वांगीण विकास करून #वडगावशेरी एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रात एक आदर्श घालून देईल अशी आशा नक्कीच करू या.

गणेश चोंधे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2589877201089401&id=100002014396029

Friday, 22 November 2019

संकेत मुनोत सामाजिक परिचय


·         नाव- संकेत मुनोत
·         संपर्क-8087446346
·         इ-मेल -changalevichar1@gmail.com
·         शिक्षण - बी - फार्मसी , डी - फार्मसी
·         व्यवसाय/ नोकरी - senior Clinical Research Document specialist in Healthcare IT , Pune
·         जन्मतारीख*-१२ ऑक्टोबर १९८९
·         पत्तापुणे 
·         कार्य -
मु   १.काही वृत्तपत्रात आणि मासिकात लेखन
२. टीव्ही वरील अनेक चर्चांमध्ये युवा अभ्यासक म्हणून सहभाग 
३. संकलक - 'एक धैर्यशील योद्धा गांधी' पुस्तक  ३ आवृत्या प्रकाशित
४..अन्नदात्यासाठी अन्नत्याग  मोहिमेची सुरवात-  रात्री ११ वाजता मेसेज पाठवला कि आपण आपल्याला जो अन्न देतोय त्याच्या प्रति(शेतकरी) सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस उपवास ठेवायचा आणि आता रात्री १२ नंतर २४ तास काही खायचे नाही, बघता बघता लोक जुळत गेले ज्यात २२ जिल्ह्या सोबतच हैद्राबाद आणि जपान मधील तरुण असे एकूण २५३ सहभागी झाले.
५. अंबेजोगाई, कणकवली , कर्जत , अहमदनगर, पुणे, सातारा, जालना अश्या वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने.
i. पुणे विद्यापीठात - Role of Social media for social Harmony या विषयावर व्याख्यान
ii.वालचंद  कॉलेज , संगमेश्वर कॉलेज आणि कै. कमळे शिक्षण संस्था  सोलापूर, येथे गांधीविचारांवर व्याख्यान.
६. संस्थापक . 
1. चांगले विचार समूह- महाराष्ट्र भरातून चांगले कार्य करणारे लोक. 
 2. Knowing Gandhism Global Friends- जगभरातून मानवता, अहिंसा आदींवर कार्य करणारे लोक
तुषार गांधी , राजदीप सरदेसाई आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर आणि युवा असे जगभरातून  १० हजार पेक्षा  अधिक लोक या समूहात आहेत. 
3. Women Empowerment Group
राज्यभरातून सामाजिक कार्यात असणाऱ्या महिला आणि गृहिणी विद्यार्थिनी यांना जोडणारा समूह 
महिला हक्काबाबत जागृती करणारे व्यासपीठ( मुक्ता दाभोळकर ,अरुणा सबाने आणि अनेक मान्यवर महिलांना एकत्रित जोडणारे व्यासपीठ).
4. Scientific Temperament Group -वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार 

वरील समूह फक्त फेसबुक किंवा Whatsapp पुरते मर्यादित नसून  यांच्यातर्फे प्रत्यक्ष जमिनीवर विविध प्रकारचे उपक्रम ही सुरु आहेत. 

Knowing Gandhism Global Friends  आणि  चांगले विचार समूह या समूहांच्या तर्फे दर महिन्याला एक सामाजिक प्रश्न घेऊन चांगले विचार युवा व्याख्यानमाला घेतली जाते . आत्तापर्यत आरोग्य , शिक्षण , पर्यावरण , पाणी प्रश्न अश्या वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहेत, वर्षातून एक अशी  स्नेह संमेलने घेतली, गरजू संस्थांना शैक्षणिक मदत केली जाते, जेथे जेथे शक्य आहे व गरज आहे अश्या शाळांमध्ये वाचनालय निर्मिती.
 फेसबुक, व्हाट्सअँप वा इतर माध्यमांचा वापर करून जो सामजिक , जातीय वा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो खोडून काढून माणूस माणसाशी जोडला जाऊन परस्पर प्रेम व आपुलकी कशी वाढेल याचे प्रयत्न.
७. फेसबुकवर समाजप्रबोधन करणारी ५० पेक्षा अधिक पेजेस.
८. दंगलसदृष्य पर्रीस्थितीत मदतीसाठी शांती सेनेची निर्मिती. 
..पुरस्कार
i . सामजिक कार्याबाद्दलचा नवरत्न पुरस्कार २०१८- Helping Hands Wellfare society यांच्याकडून 
ii. REX Karmaveer Chakra Global Award instituted by iCONGO in Partnership with the United Nations (वर्ष २०१९)
१०.वेळोवेळी गरजू किंवा आपत्तीग्रस्तांना समूहातर्फे मदत(केरळ , कर्नाटक , फैजपूर ), गोधडी वाटप ,आपत्तीग्रस्त राज्याला मदत असे अनेक उपक्रम
११.नातेटिकवूया - नाते समृद्ध करणारी सामाजिक चळवळ नात्यामधील गोडवा , प्रेम, त्याग संपर्पण . भावनांची छोट छोट्या गोष्टीतून जाणीव करुन देऊन ते बळकट करणे, कुणाचे नाते तुटत असेल आणि त्या व्यक्तीला ते टिकवायचे असेल तर ते समुपदेशन करून ते टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करणे, त्याला मानसिक आधार देणे , समुपदेशन करणे.
१२.मिशन एजुकेशन - गरीब आणि गरजू मुले ज्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण मध्यातच सोडून द्यावे लागते अश्यांना
आर्थिक मदत देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे 
१३. वाचनालय निर्मिती - गोसासे येहून वाचनालय निर्मितीची सुरवात 
१४. कलम से कलाम कि ओर स्कूल बॅग - ज्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य नाही अश्या ठिकाणी असे साहित्य पोहोचवणे.