Tuesday, 14 July 2015

अतुल कुलकर्णी

अभिनेता अतुल कुलकर्णीचा मी मागे पोस्ट केलेला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील प्रेरणादायी लेख वाचला का?
मला कल्पना नव्हती असे होईल अतुल कुलकर्णी सरांनी स्वतः कमेंट केली आहे त्या पोस्टवर
एका Friend ने तो स्वतःच्या टाईमलाईनवर पोस्ट केला होता जो शेअर होत होत अतुल कुलकर्णी पर्यंत पोहचला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली
link
https://m.facebook.com/mahatmagandhipeace/posts/453973854754553:0
संकेत मुनोत

लेख खालीलप्रमाणे
असाही अतुल कुलकर्णी (नटरंग)
हा थोडासा वेगळा च कलाकार☀
एकदम भारी कलावंत 🌟
साधा ज्याच्या घरी आजही टीव्ही💻 नाही वॉशिंग मशिन नाही
जो वनराईत स्वतः जाऊन🌱🌱🌱 पुढच्या पिढीसाठी कार्य करतो
या कलावंताबद्दल वेगळ लिहायची गरज नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार🇮🇳 , आठ नाट्य पुरस्कार 👑 आणि इतर अनेक 💫पुरस्कार यांनी सन्मानित केल्या गेलेल्या या कलावंताने मराठी अन हिंदी चित्रपटसृष्टीत निश्चीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे. अतुल कुलकर्णी हा एक अत्यंत सक्षम, अभ्यासू, चौकस, अन् एक स्वतःचा स्पष्ट अन ठोस दृष्टीकोन असलेले कलावंत आहेस्वतःची व्यावसायिक वाटचाल, एकंदर चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शनाचे पैलू, तांत्रिक भाग, अभिनय, चित्रपटांचे बदललेले स्वरूप, अन् चित्रपट व्यवसाय अन कला यांतील संबंध, नाटक, इत्यादी
अतुल कुलकर्णी ची प्रेरक मुलाखत 🌞👏

अतुल- नटरंग’ चित्रपटातल्या गुणाच्या भूमिकेनं मला माझ्या शरीराकडं 💪 लक्ष द्यायला शिकवलं. आपल्याकडं समाजात बुद्धीला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामानानं शरीराकडं दुर्लक्ष केलं जातं. त्याला दुय्यम समजलं जातं. इतकंच नव्हे तर, खेळ, नृत्य, व्यायाम यांसारख्या शारीरिक गोष्टींकडं आपण साधारणतः दुर्लक्षच करत करतो. बौद्धिक यशाच्या आनंदाला आपण अधिक महत्त्व देतो. शारीरिक क्षमतेचा वापर करून मिळालेल्या यशाला दुय्यम मानलं जातं. लहानपणी कोणताही खेळ मी गांभीर्यानं घेतला नाही; त्याचबरोबर व्यायामही कधी केला नाही. सुदैवानं मला कुठलंही व्यसन नव्हतं, त्यामुळं माझ्या शरीराचं नुकसान मात्र झालं नाही. ‘नटरंग’ चित्रपटाच्या दोन वर्षं आधी मी शैलेश परुळेकर (माझे जिम-ट्रेनर आणि मित्र) यांच्या संपर्कात आलो आणि शरीराकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला. ‘गुणा’च्या भूमिकेची तयारी हा शरीराच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉइंट होता. भूमिकेची गरज म्हणून मी सहा महिन्यांत १६ किलो वजन वाढवलं आणि १७ ते १८ किलो वजन कमीही केलं! भूमिकेसाठी हे करत असताना शरीराकडं गंभीरपणे बघण्याची, त्याला महत्त्व देण्याची सवय मला लागली. बहुतेक लोक शरीराला गृहीत धरतात. हे इतक्‍या पातळीपर्यंत घडतं, की जोपर्यंत शरीर आपल्याला त्रास देत नाही, तोपर्यंत आपण त्याला गृहीत धरलेलं असतं! मात्र, त्रास सुरू होतो, तेव्हा उशीर झालेला असतो. सुदैवानं ‘गुणा’च्या भूमिकेनं मला लवकर जागं केलं. तुम्ही जेव्हा स्वतःच्या शरीराकडं टोकाची मागणी करता आणि ती मागणी तुमचं शरीर पुरवतं, तेव्हा त्या वेळी त्यात केवळ शारीरिक सामर्थ्याचा सहभाग असतो असं नाही, तर मानसिक शक्तीचाही मोठा भाग असतो. व्यायाम म्हणजे काय, तर तुमच्या शरीरात त्या क्षणी असलेल्या मर्यादांच्या पलीकडं शरीराला ढकलत नेणं. त्या मर्यादांची सवय झाली, की त्याला आणखी पलीकडं ढकलणं. रोजच्या रोज केलेला व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला तुम्ही ‘कम्फर्ट झोन’मधून ‘अनकम्फर्टेबल झोन’मध्ये नेत असता. सहा महिन्यांच्या कालावधीत माझ्या शरीरात बदलांचे जे चढ-उतार झाले, त्यासाठी माझ्या सगळ्या मर्यादा पणाला लागलेल्या होत्या; पण त्यामुळं माझं आरोग्यही उत्तम झालं. माझ्या क्षमता वाढल्या. शरीर सुडौल झालं. किरकोळ आजार दूर पळाले. मन आणि बुद्धी पहिल्यापेक्षा जास्त स्थिर झाली. शरीराचं आणि आहाराविषयीचं ज्ञान वाढलं
(तुम्हीही करु शकता नियमित व्यायाम करा शरीराकडे लक्ष द्या )

वैचारिक😇 जडण घडण-
भारतात 🇮🇳; विशेषतः महाराष्ट्रात 🎭गांधीजींच्या विरोधी विचारांचा खूप मोठा इतिहास आहे📖👺🔥. तुमची इच्छा असो किंवा नसो, या विरोधी वातावरणाचा परिणाम तुमच्यावर होतोच. मात्र, हा विरोध तुटपुंज्या माहितीवर, तसंच गांधीजींच्या जीवनाचा पूर्ण अभ्यास न करता ठराविक गोष्टी भिंगाखाली बघितले आणि‘त्या गोष्टी म्हणजेच तो माणूस’ असं गृहीत धरून जे गैरसमज पसरवले गेले व जे विरोधी वातावरण निर्माण🌘 केलं गेलं, त्याचा मीही एक बळी होतो😞! नाटकासाठी या📝📝 भूमिकेचा मी अभ्यास सुरू केला, तेव्हा गांधीजींचं ‘सत्याचे प्रयोग📔’ हे पुस्तक, तसंच त्यांची अन्य पुस्तकं📖📚, त्यांच्यावर इतरांनी लिहिलेली पुस्तक📗📘📙, गांधीजींनी केलेला पत्रव्यवहार 📩📮हे सर्व मी अभ्यासलं. गांधीजींच्या विरोधातल्या 👽👹लेखनाचाही अभ्यास केला. तीन भाषांमध्ये तीन वर्षं ही भूमिका😇 मी केली. या सगळ्या काळात एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे जशी शून्य 0⃣ही संकल्पना 🇮🇳भारतानं संपूर्ण जगाला 🌏दिली, तशीच भारतानं संपूर्ण जगाला दुसरी कुठली महत्त्वाची गोष्ट 🎁दिली असेल, तर ती म्हणजे गांधीजी 🌞होय! व्यक्ती म्हणून अभ्यासातून आलेलं स्वतःचं असं तत्त्वज्ञान😇 असणं, ते बदलण्याची क्षमता बाळगणं💪 (म्हणजेच प्रवाही असणं !), हे तत्त्वज्ञान दृश्‍य स्वरूपात👀 आणि कृतीतून जगणं आणि लोकांपर्यंत पोचवणं 📥👫👪👬👭👯📨हे सारं अवघड आहे. त्याचबरोबर त्या तत्त्वज्ञानाचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी उभं करणं, हेही सोपं😱 नाही.
हे सगळं गांधीजींच्या बाबतीत घडलं.
आयुष्य जगत असताना ज्या ज्या क्षेत्रांशी संबंध येतो, मग ते 'समाजकारण🌍 असेल, राजकारण🌎 असेल किंवा आरोग्य, शिक्षण🎓, अर्थ, धर्म असं कुठलंही असेल, या सगळ्यांविषयी अगदी बारकाव्यांसह🌞 गांधीजींचा अभ्यास होता. त्याबद्दल त्यांचा स्वतःचा विचार🌝 होता; त्याचप्रमाणे या सर्व क्षेत्रांचा विचार करताना मानवजातीच्या कल्याणाचा👌👌 मुद्दा त्यांच्या विचारात अग्रस्थानी👑 ☝असे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गांधीजींचे विचार माझ्यावर माणूस म्हणून खूप परिणाम 😇करून गेले. त्यांच्या सगळ्या गोष्टींशी मी संपूर्णपणे सहमत 😇आहेच असं नाही; पण एक मोठी व्यक्ती आपल्याला विचारप्रवृत्त 😃करते आणि स्वतःच्या व्याख्या ठरवायला मदत करते, याचं श्रेय माझ्या आयुष्यात गांधीजींना आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला इथं आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, गांधीजी नेहमी म्हणत असत ः ‘माझी दोन वाक्‍यं जर तुम्हाला परस्परविरोधी वाटली🙈, तर त्याच्या तारखा 📅बघा. जे नंतरच्या तारखेचं 📆वाक्‍य असेल, ते माझं आजचं मत समजा.’ तत्त्वज्ञान हे असं प्रवाही असणं मला महत्त्वाचं वाटतं. हे मी गांधीजींकडून शिकलो.😀

माणसाचा पशू 🐗🐍🐸तेव्हा होतो, जेव्हा तो संकल्पनांना चिकटून बसतो🐣.  त्याचा अहंकार त्याला चुकीच्या गोष्टी आणि चुकीचं तत्त्वज्ञान अमलात🐙🐊 आणायला भाग पाडतो .‘माझं मत बदललं 🐥😀आहे’  हे स्वतःशी आणि जाहीरपणेही कबूल करायला खूप मोठी ताकद💪 लागते. अर्थात स्वतःमधला हा बदल अभ्यासावर📓 आणि अनुभवावर आधारित 👀असावा लागतो. ‘स्वतःपेक्षा संपूर्ण 👲👳👮🌞👷👩👧👦मानवसमूहाचा आणि प्राणिमात्रांचा विचार करून हा बदल🌻 करावा...तो सकारात्मक🌼 असावा... बहुमत काय आहे, याचा विचार करून त्याच्यासमोर झुकण्याऐवजी आपल्या विचारांतलं सत्य शोधून ते जगणं आणि अनुभव, अभ्यास यातून जर सत्य 👀बदललं, तर या बदललेल्या सत्याचा स्वीकार करणं, हे उत्तम आयुष्य जगण्याचं गमक आहे, हे मला गांधीजींनी शिकवलं आणि तसं जगण्याचा प्रयत्न मी करतोय. आज १८ वर्षं झाली, तरी माझ्यावर तो पगडा कायम आहे.
(पुर्ण लेख खालील लिंकवर अथवा सप्तरंगमध्ये ऊपलब्ध आहे
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx)
जसे अतुल कुलकर्णीही  महाराष्ट्रातील गैरसमज पसरवणार्या व महान लोकांबद्दल वाईट गोष्टी पसरवणार्या गोष्टीला व कोणा एका व्यक्तीला एकाच भिंगातुन👓😡 पाहणार्या विचारशैलीला पुर्वी बळी पडले होते तसे मी पण 😓त्याचा बळी होतो व आपल्यातील असंख्य जण ✔असतील पण जेव्हा त्याने सखोल ♻💯📚अभ्यास केला तेव्हा अतुल आतुन पुर्णच बदलला , तसे आपण कधी स्वतःत सकारात्मक बदल करणार चला आता तरी सखोल अभ्यास करुया.
संदर्भ- 1-सकाळ
2-महाराष्ट्र टाईम्स
3-Wikipedia

संकेत मुनोत

आवडला वाटला स्वतः. सकाररात्मक रीत्या बदलावं तर
शेयर करा🌸🌸🌺🌺

कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा....
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुले वाटतात,🌺🌸🌹🌺🌺🌸🌸
त्यांच्या हातांनाही🙌👏 नेहमी सुगंध दरवळत राहतो.."
शेयर करा🌸🌸🌺🌺

Thursday, 18 June 2015

ब्राम्हण व ब्राम्हण्य

✒📃✅
ब्राम्हण व ब्राम्हण्य !

ब्राम्हण ही जात आहे.
ब्राम्हण्य हा गुणधर्म आहे , वृत्ती आहे. इतरांना तुच्छ आणि कमी प्रतीचे लेखणे व स्वत:ला श्रेष्ठत्व उच्च समजणे ही ब्राम्हण्याची लक्षणे आहेत. धुर्तपणा, फसविण्याची कला, गर्विष्ठपणा ही आणखी काही लक्षणे आहेत.  अहंगंड जोपासणे व वाढवीत रहाणे हे ब्राम्हण्यच आहे.  ब्राम्हण्य दीर्घद्वेशी असते. खोटे बोलणे, रेटून बोलणे एकाच वेळा वेगवेगळे बोलणे ही आणखी काही वैशिष्टे सांगता येतील. जात जन्माने मिळते. स्वछता, नीटनेटकेपणा,अभ्यास, करण्याची लालसा ब्राम्हण कुटुंबात जोपासली जाते.  शिक्षणाची व ज्ञानाची परंपरा असते त्याचे लाभ मिळतात. ब्राम्हणांत कांही चांगले असते. व्यक्तीला व्यक्ती म्हणून त्याचा लाभ मिळतो. समाज घटक म्हणून ब्राम्हण्य हानिकारक असते.  ब्राम्हण्य जपणारे थोडे असतील परंतु ब्राम्हणांत सुध्दा ब्राम्हण्य नसलेले काही असतात. तसेच ब्राम्हणरहीत (ब्राह्मणेत्तरांत) काही ब्राम्हण्य धारण कलेले असतात. ब्राम्हण्य हे मुलतः व मुख्यत: ब्राम्हण जातीनेच जन्माला घातले व वाढविले, परंतु आणि ती अलीकडे वाढत आहे. ब्राम्हणातले ब्राम्हण्य तर वाईट आहे.  अब्राम्हणातले ब्राम्हण्य सुधा वाईटच असते व आहे. अनेकदा ब्राम्हणरहितांतील (जातीने ब्राम्हण नसलेला) ब्राम्हण्य सामाजिकदृष्ट्या जास्त हानिकारक असते. ब्राम्हनांचे ब्राम्हण्य मी खपवून घेणार नाही. ही भूमिका असावीच परंतु मी ब्राम्हण्यकृती स्वीकारणार नाही. ही सुद्धा भूमिका असावी.  मी कुणाचा गुलाम राहणार नाही. हे तर हवेच हवे परंतु मी कुणाला गुलाम करणार नाही. हे सुधा हवे. ब्राम्हण्य हा संसग्रजन्य महारोग आहे. या रोगाची उत्पत्ती जातीने ब्राम्हण असलेल्यातच झाली.  आजही ब्राम्हणांतच ब्राम्हण्यग्रस्तांचे प्रमाण जास्त आहे. कुठे ते उघड आहे. कुठे ते छुपे आहे. पण हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे हा रोग ब्राम्हणेत्तरांतही पसरला आहे. मराठयात ब्राम्हण्य आहे. महारत आहे, मातंगात आहे.  चांभारात आहे, ढोरात आहे. सर्वात आहे आणि हे वाढीत आहे.  समाजाचा इतिहास असे सांगतो की मराठ्यांनी पुढाकार घेऊन ब्राम्हनेत्तर वाद जोपासला स्वत: ब्राम्हण्यवादी बनले.  इतरांना तुच्छ लेखू लागले. पुढे हीच ब्राम्हण्यवादी प्रकृती सर्वजातींत पसरला आहे. ब्राम्हण्य हे कोणत्याही जन्मजात जातीत असले तरी ते वाईट असते व आहे. सर्वात पुरोगामी सुधा ब्राम्हण जातीतच आहेत. ज्याअर्थी अमुक एक व्यक्ती जन्माने ब्राम्हण आहे. त्याअर्थी तो प्रतिगामी आहे आणि ज्याअर्थी अमुक एक म्हणजे मराठा किंवा दलित किंवा ओबीसी आहे. त्याअर्थी तो पुरोगामी आहे. ही दोन्ही प्रमेये चूक आहेत.

📋विचार-

कॉम्रेड गोविंद पानसरे....!

👦🇮🇳✊

Monday, 15 June 2015

गांधीजी आणि आंबेडकर

#गांधी आणि #आंबेडकर नेहमीच विरोधी दाखवले जातात पण सत्य काय ते नीट समजुन घेऊया
भाग 1
आंबेडकरांना गांधीजींची अस्पृश्योद्धाराची भुमिका नेहमीच दांभिक वाटत होती. स्वत: गांधीजींची अस्प्रूश्योद्धाराची तळमळ प्रामाणिक होती, असे मी मानतो. गांधीजी स्वत: वैयक्तिक अस्पृश्यता पाळत नसत, अस्पृश्यता न पाळणारे व अस्पृश्योद्धाराचे काम करणारे शेकडो स्पृश्य कार्यकर्ते गांधीजींच्या चळवळीमुळे निर्माण झाले, हे उघड सत्य आहे.

गांधीजींंच्या धर्मकल्पनेत रुढी आणि चालीरितींना जागा नव्हती. ते परंपरागत जीवनाचे अभिमानी होते, पण त्यांना स्त्रीशिक्षण आवश्यक वाटे. प्रौढविवाह, प्रेमविवाह, हिंदू धर्मातल्या धर्मात आंतरजातीय विवाह या सा-यांनाच गांधीजींचा सक्रीय पाठींबा होता. अस्पृश्यांविषयीची त्यांची तळमळ प्रामाणिक होती, तो त्यांचा नित्य कार्यक्रम होता. अस्पृश्यांचा प्रश्न गांधीजी हिंदू समाजांतर्गत प्रश्न म्हणून सोडवु इच्छित होते. ज्यामुळे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी अस्पृश्य समाजाच्या मनात तिरस्कार व तिटकारा निर्माण होईल असे काही करण्यास गांधीजी तयार नव्हते. परंपरावादी हिंदूंचे परंपरावादी मन न दुखावता परंपरेच्या भाषेत बोलुन गांधीजी परंपरेच्या चालीरिती बदलु इच्छित होते. ह्यातील तथ्य इतकेच की, गांधी प्रामुख्याने सुधारणावादी होते.

गांधीजींचा कार्यक्रम अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, अस्पृश्यांमध्ये काही सुधारणा घडवुन आणणारा होता गांधीजी अस्पृश्यतेवर बोलत तरी होते, नेहरु-पटेल यांच्यासारख्या कॉंग्रेसी सवर्ण नेत्यांना अस्प्रुश्यांचा प्रश्न नित्य चर्चेचा कधी वाटलाच नाही. सगळीकडेच मुलभुत सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे, न्याय व समतेवर आधारलेले नवे जीवन उभारायचे आहे.. त्यात अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआपच संपून जातील असंच या नेत्यांना वाटत आलं. गांधीजींच्या प्रामाणिक अनुयायांची अशी संख्या किती होती ? फार थोडी ! उरलेली सगळी कॉंग्रेस ही वरिष्ठवर्णीय, सामाजिक दृष्ट्या सनातनी आणि आर्थिक दृष्ट्या स्थितीवादी अशीच होती.

गांधीजींचा आर्थिक कार्यक्रम(ग्रामस्वावलंबनावर आधारित) आंबेडकरांना मान्य नव्हता. ग्रामीण जीवनाला प्राधान्य देणारी ग्रामप्रधान अर्थरचना परंपरागत जीवन आणि परंपरागत अस्पृश्यता टिकवुन धरील असे आंबेडकरांना वाटे. वरिष्ठ वर्णीयांच्या नेतृत्वाखाली असणा-या संघटना अस्पृश्यांना प्रतिष्ठा आणि न्याय मिळवुन देतील असं आंबेडकरांना वाटण्याचा संभवच नव्हता. म्हणुन त्यांचे गांधीजींशी फारसे जुळले नाही.

आंबेडकर आणि गांधी या दोघांचे टारगेट ऑडियन्स वेगवेगळे होते हे लक्षात घ्यायला हवे. गांधी सवर्णांना सुधरवायचा प्रयत्न करत होते, तर आंबेडकर दलितांना. दोघांच्या भुमिका एकमेकांना पुरक होत्या.

गांधी नसते तर तर आंबेडकरांना सवर्णांकडुन खुप स्ट्रॉंग रिऍक्शन मिळाली असती. आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती.

१९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचं अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं. वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत "हरिजन", हिंदीत "हरिजन सेवक", व गुजरातीत "हरिजन बंधु" ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. या सर्व पत्रांचं काम गांधी स्वत: करत होते. एकादशव्रतातही त्यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता. येरवडा जेलमधुन सुटल्यावर गांधींनी हरिजनयात्रा काढली होती. #हरिजन  संघ स्थापन करुन फंड गोळा केला होता. कधी काळी वर्णाश्रम मानणारे गांधी "हरिजन सेवक" बनले होते.

विभक्त मतदारसंघाच्या मुद्द्यावरुन गांधी-आंबेडकरांचे तीव्र मतभेद झाले. विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यांतील फरक समजुन घ्या. विभक्त मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ जो विशिष्ट जमातीसाठी आरक्षित असेल आणि त्या मतदारसंघात फक्त त्या जमातीचे लोकच मतदान करु शकतील. म्हणजे समजा पुणे हा दलितांसाठी विभक्त मतदारसंघ आहे, तर इथे फक्त दलित मतदारच मतदान करु शकतील; इतर लोक नाही ! राखीव मतदारसंघात सर्व मतदान करु शकतात, फक्त उमेदवार हे ठराविक जमातीचेच असावे लागतात. १९१६ च्या टिळक-जीना यांच्यातील लखनौ येथे झालेल्या कराराने असे विभक्त मतदारसंघ मुस्लिमांना दिले होते आणि तेही लोकसंख्येच्या प्रमाणात नाही तर एकुण जागांच्या एक तृतीयांश!!!

१९१९ साली आंबेडकरांनी साउथबरो समितीसमोर विभक्त मतदारसंघ मागितला. १९२८ साली सायमन कमिशनसमोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ तर नको हे तर त्यांनी सांगितलेच; पण मुसलमान, ख्रिश्चन इ. कुणालाच विभक्त मतदारसंघ नको असे प्रतिपादन केले. १९३१ साली दुस-या गोलमेज परिषदेच्या वेळी विभक्त मतदारसंघ मागितला, पुढे येरवडा करारानंतर त्यांनी ही मागणी सोडुन दिली. भारतीय संविधान बनविताना विभक्त मतदारसंघाला विरोध केला. तोपर्यंत चालत आलेले मुस्लिमांचे विभक्त मतदारसंघांना संविधानात जागा दिली नाही.

दुस-या गोलमेज परिषदेत वेगवेगळे पक्ष जमले होते. कुणी मुस्लिमांचे प्रतिनिधी होते, कुणी ख्रिश्चनांचे होते. गांधींजींनी संपूर्ण भारताचे, त्यातील सर्व जातीधर्माचे आपण प्रतिनीधी आहोत अशी भूमिका घेतली. गांधीजींच्या या भूमिकेमुळे जे अनेकजण दुखावले गेले त्यांत आंबेडकर एक होते. गांधींना प्रतिशह म्हणुन आगाखान यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांकांनी एक वेगळा करार केला. ह्या करारात बाबासाहेब सहभागी होते. ह्या करारानुसार अस्पृश्यांना सर्व भारतभर विभक्त मतदारसंघ आणि १८० जागा ठरविलेल्या होत्या! त्यात अल्पसंख्यांकांसाठी सुद्धा काही तरतुदी होत्या पण त्याच्या डीटेल्स मध्ये जात नाही. हा एक शहकाटशहचा प्रकार होता इतकाच त्याचा अर्थ आहे ! परिषदेत काही निर्णय झाला नाही. परिषद अयशस्वी ठरली. पण या ठरावावर पंतप्रधानाने निर्णय घ्यावा असे ठरले.

हा करार इंग्रजांनी जशाच्या तसा मान्य केला नाही. काही बदल करुन पंतप्रधानाने Communal Accord (जातीय निवाडा) जाहीर केला. इंग्रजांनी अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिला पण जागा मात्र ७१ च दिल्या (ठरल्या होत्या १८०) !
.
"वेगळ्या मतदारसंघाने स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यात आणखी दुफळी निर्माण होइल. माझ्या हरिजन बांधवांच्या प्रगतीत अडसर निर्माण होईल. इंग्रजांच्या जातीय निवाड्याने अस्पृश्यतेचा कलंक अधिक गडद होईल."

अशी भूमिका मांडुन या कराराच्या विरुद्ध गांधीजींनी येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरु केले. आंबेडकरांनी सर्वांनाच लक्षात राहिल इतका ताण दिला आणि शेवटी गांधीजींच्या बरोबर प्रसिद्ध येरवडा करार करुन टाकला.

आंबेडकर त्यावेळी गांधींना म्हणाले, "आम्हाला वेगळा मतदारसंघ मिळत असताना आपण विरोध का करत आहात? तुम्ही आम्हाला काय देणार आहात सांगा". त्यावर गांधी म्हणाले, "तुम्ही जन्माने दलित आहात, मी स्वेच्छेने दलित झालो आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावुन दलितांसाठी लढायला मी तयार आहे. अस्पृश्यांनी कायम अस्पृश्य राहणं मला पसंत नाही. म्हणून विभक्त मतदारसंघाला माझा विरोध आहे. प्रांतिक निवडणुकांत मात्र तुम्हाला कमी जागा मिळाव्यात, हे स्वीकारायला मी तयार नाही."

गांधीजींना जो वारसा मिळालेला आहे तोच पुरेसा गुंतागुंतीचा आहे. या देशाची विविधता, समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरीपणा जितका संकीर्ण होता, तितकेच गांधीजींचे व्यक्तीमत्व संकीर्ण आहे, कमालीचे गुंतागुंतीचे व संदिग्ध असे आहे. प्रत्येकाला गांधीजींचा थोडाफार आधार सापडतोच.

गांधीजी वर्णाश्रम मानत होते ही १९१५ पुर्वीची बाब आहे. का मानत होते याची कारणे तुम्हाला त्याच्या बालपणीच्या संस्कारात मिळतील. गांधीजींची वर्णाश्रमाबद्दलची मते कालांतराने बदलत गेली.

गांधीजींनी सुरु केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या मोहिमेमुळे काही कर्मठ सनातनी हिंदू दुखावले गेले होते  काहींनी १९३४ साली पुण्यात मोटारीवर बॉम्ब टाकुन गांधीजींना ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता.
गांधीजीच्या मृत्युचे कारणही ही अस्पृश्यता निवारणच होत
(गांधीच्या राजकारणात प्रवेश होण्यापुर्वी म्हणजे टिळकांर्यंत राजकारणावर फक्त ऊच्चवर्णीयांचा पगडा होता
1920 पर्यंत चा ईतिहास तपासुन पहा आणि यामुळेच त्यांचा खुन झाला होता 55कोटी फाळणी ई. सर्व बनाव आहेत कारण गोडसे व तत्सम लोकांनी जेव्हा पहिले 6हल्ले(1934पासुन) केले त्यावेळी ना पाकिस्तान चा विषय होता ना 55कोटीचा कारण होत)

परंतु गांधीजी
गांधींजींना जो वारसा मिळाला त्यामध्ये -

१. त्यांच्यामागे राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, महर्षी दयानंद अश्या आधुनिक संतांची परंपरा आहे. या संताचं एक वैशिष्ट्य असं की, त्यांचा हिंदू धर्माभिमान जितका उत्कट आहे तितकाच त्यांचा राष्ट्राभिमानही उत्कट आहे. या आधुनिक संतांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते परंपरागत रुढींचे समर्थक नाहीत. किंबहुना रुढी हा धर्म नसुन अज्ञानाने चढलेला कलंक आहे असे त्यांना वाटते. यामुळे प्रमुख समाजसुधारणांना या संतांचा पाठींबा असतो.

२. दुसरा धागा उदारमतवादी राजकारणाचा आहे. न्या.रानडे आणि गोखले यांचा गांधीजींवर सर्वात जास्त प्रभाव आहे. त्यांनीही सर्व प्रकारच्या रुढी व विषमतेचा विरोध केला. स्त्रियांना शिक्षण, प्रौढ वयात विवाह, विधवा-विवाह, प्रेमविवाह, स्त्रियांना समान हक्क यांचा तर गांधीजींनी पुरस्कार केलाच, ते आंतरजातीय विवाह चे समर्थक व अस्पृश्यतेचे विरोधकही राहिले.

मग gaandhini मुसलंमनाना का विभक्त मतदारसंग का मिळू दिले ?
व ते संविधान बनवे पर्यंत का चालू दिले ?
त्यांना हिदू- मुसलीम दुफळी निर्माण करायची होती का ?
कि मुसलीम लोकांना खुष करायला त्यांनी होणाऱ्या दुफालीकडे दुर्लक्ष केले ?
.
लखनौ करार १९१६ साली झाला, टिळक-जीना यांच्या मध्ये ! त्याला बेस होता - १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा. मुस्लिमांना १/३ प्रतिनिधीत्व मिळेल, असे इंग्रजांनी या कायद्यात म्हटले होते. मुस्लिम लीगने या कायद्याला समर्थन दिले होते. १९१६ पुर्वी लीगने कधीही इंग्रजविरोधी भुमिका घेतली नव्हती. टिळकांनी हा करार करुन मुस्लिमांचे १/३ प्रतिनिधीत्व मान्य केले पण लीगने स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या बरोबरीने इंग्रजांविरोधात लढायला तयार व्हावे असे ठरले. लीगने ते मान्य केले.

कायदा तर इंग्रजांनी पूर्वी केलेला होताच, मुस्लिमांचे वेगळे मतदारसंघ त्यांनी मान्य केले होतेच. इथे कॉंग्रेसने त्याला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसच्या हातात एक तर विरोध करणे, अथवा विरोध न करणे एवढेच होते. कायदा करणारे, वेगळे मतदारसंघ देणारे इंग्रज होते.

जेव्हा गांधींचा राजपटलावर उदय झाला, तेव्हा लीगचे अस्तित्व ब-यापैकी वाढलं होतं. अश्या वेळी विभक्त मतदारसंघांना विरोध केला असता, तर लीगने कॉंग्रेसविरोधी भुमिका घेतली असती आणि इंग्रजांना मदत केली असती. इंग्रजांना ते हवेच होते. त्यांना मुस्लिमांना लालुच दाखवुन वेगळे करायचेच होते. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात लीगचे समर्थन राहावे म्हणुन विभक्त मतदारसंघांना तात्काळ विरोध केला नाही.

१९०९ च्या कायद्याविषयी बोलताना गांधीजींनी म्हटले आहे - "This act has finished us!"

विभक्त मतदारसंघ रद्द व्हावेत यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत असे नाही. १९२८ मध्ये भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी जेव्हा पहिली समिती स्थापन करण्यात आली, तेव्हा त्या समितीत एकुण २८ मेंबर होते. समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरु होते. इतर सदस्यांमध्ये सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु सुद्धा होते. या समितीने एक रिपोर्ट सादर केला - "नेहरु रिपोर्ट" ! या रिपोर्टनुसार धर्माच्या आधारावर असलेले विभक्त मतदारसंघ अमान्य केले. गांधीजींशी चर्चेशिवाय ही तरतुद त्यात असणे शक्य नाही.

मुस्लिम लीगने अर्थातच रिपोर्ट फेटाळला. ब्रिटीशांनी देखील हा रिपोर्ट फेटाळला

या लेखाचा ऊद्देश हाच कि आपण या दोन्ही महान नेत्यांना व्यवस्थित समजुन घेतले पाहिजे वैचारिक मतभेद असले तरी ध्येयासाठी ते एकत्र लढत होते आपणही एकत्र झाले पाहिजे

महापुरुषांवरील व चालु घडामोडींवरील  निवडक व माहिती नसलेले असे प्रेरणादायी लेख व अफवावरील ऊत्तरे खालील पेजवर मिळतील
https://m.facebook.com/mahatmagandhipeace
संदर्भ
1.महात्म्याची अखेर
2.दीपक साळुंखे यांचे लेख
3.नथुरामायण
4.Wikipedia 
संकेत मुनोत

शेयर करा