#Gandhiforever
गांधी सर्व जगाला प्रेरणादायी वाटतात.पण प्रगत,पुरोगामी समजल्या जाणार्या,फक्त महाराष्ट्रातील मुठभर भिकारडे लोकच त्यांचा का द्वेष करत असतील? इतका द्वेष की हिंदू धर्माचे "मरणान्ताणि वैराणि" म्हणजे मेल्यावर वैर संपते हे तत्त्वसुद्धा हे हिंदूंचे तथाकथित तारणहार विसरतात.असं कुठलं यांचं घोडं मारलं या गांधी बाबांनी?
नक्कीच यांच्या काहीतरी मोठ्या स्वार्थाला गांधींनी झळ पोहोचवलेली दिसते! तरीच हे एवढे विखार मनात पक्का पकडून बसले आहेत.
पण यांना काहीच फायदा होणार नाही.कितीही द्वेष केला तरीही. उलट ते समाजाच्या मनातून उतरत जाणार.
मग मित्रांनो, का नाही तुम्ही पण माणूसकीच्या वाटेवर येऊन माणूस बनत?
बघा विचार करा. निदान आतल्या आत तरी.
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Wednesday, 4 October 2017
गांधी सर्व जगाला प्रेरणादायी वाटतात.पण प्रगत,पुरोगामी समजल्या जाणार्या,फक्त महाराष्ट्रातील मुठभर भिकारडे लोकच त्यांचा का द्वेष करत असतील
Bapu is strong and defiant -ajit joshi
That Gandhi is today associated with weakness and lost innocence is the most unfortunate thing! Bapu is strong and defiant to presumptuous superpower of the day on one hand and his own bloodthirsty countrymen on the other... Bapu is brilliant tactician manoeuvring diverse classes and their interests and channeling them against a very organized and experienced ruler!
The most amazing thing is his strength and wisdom was put to use for 'just' values, a rare occurance...!! How does one fight with a man, who is ethical and yet, intelligent and strong?? There is only one way... Shoot him!
And they did it....
#GandhiForever
गांधीजींच्या जवळ जाऊन त्यांना शिव्या द्यायला कुणालाही संकोच, भय, दहशत वाटत नाही हेच त्यांचे थोरपण आहे- राजेंद्र शिंदे
सेंन्ट्रल रेल्वेच्या माटूंगा स्टेशनला लागून रेल्वे वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपवर सुरवातीला गांधीजींचे मोठ्ठे चित्र होते.
काही दिवसांनी बाजूला शिवाजी महाराजांचे चित्र आले, त्यानंतर काही दिवसांनी बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आले. मी ठाण्यावरून CST ला जातांना आमच्या लोकलमधिल अनेक तरूण मित्र माटूंगा आल्यावर गांधीजींच्या चित्राकडे पाहून रोज अर्वाच्य शेरेबाजी आणि शिवीगाळ करायचे. यातले अनेक जण सुसंस्कृत ब्राम्हण घरातील होते. अनेक वर्ष त्यांचा हा पराक्रम मी पहात होतो.
त्यातील एकाने मला एकदा विचारले.. तू गांधीवादी ना मग तुला आमचा राग नाही येत..?
मी हसुन म्हटले.. इतके दिवस तुम्ही गांधीजींना शिव्या घालताय, तरीही तुम्ही जिंकला असं तुम्हालाच वाटत नाही, हे खरे ना?
तो मित्र झटकन बोलला... गोळी घालण्याच्या लायकीचाच होता तो, बरं झालं मेला...
मी म्हणालो... मेले नाहीत, ते अजुनही तुमच्या मानगुटीवर बसले आहेत आणि म्हणूनच तुम्ही आजही शिव्या देऊन त्यांचा उध्दार करता.
तो गप्प बसला.. हाच मित्र खाजगीत बाबासाहेबांचाही उध्दार करायचा.
त्याला जवळ घेऊन मी म्हणालो... काय रे, त्यांच्याबद्दल हेच जोराने बोलून दाखवतो का ?
तो पटकन् बोलला- येडा आहेस का.?
यानंतर रोज जातांना मी ती तीन महापुरूषांची चित्रे रोज पहायचो, गांधीजींचा चेहरा रोज हसराच भासायचा...
लोकांनी शिवाजी महाराज व बाबासाहेबांना देवत्व बहाल केलंय, त्यांच्याबद्दल अपशब्द काढण्याची हिम्मत कोणाही माणसात नाही.
पण, आपण गांधीजींना काहीही बोलू शकतो कारण ते स्वातंत्र्य त्यांनी सर्वांनाच दिलंय, गांधीजींच्या जवळ जाऊन त्यांना शिव्या द्यायला कुणालाही संकोच, भय, दहशत वाटत नाही हेच त्यांचे थोरपण आहे....
आणि
म्हणूनच मला ते भावतात....
#Gandhiforever
Rajesh Shinde
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा पगडा होता , महात्मा गांधींना ते आदर्श मानीत .महात्मा गांधींना प्रेरणा मानून त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेले .
कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा गांधीजी यांचे 1920 पासून जवळचे संबंध होते. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत आले. त्यावेळी अण्णा मुंबईत गेले होते. त्यावेळी ते महात्मा गांधींच्या भाषणाने प्रभावित झाले. कर्मवीरांनी तळागाळातील व सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण सुलभपणे मिळावे, यासाठी "रयत‘ची स्थापना केली. महात्मा गांधी यांनी "नयी तालीम‘द्वारे आपली ग्रामीण शिक्षणाची संकल्पना मांडली होती. गांधीजींचे मार्गदर्शन घेऊन त्याच तत्त्वावर अण्णांनी 548 व्हॉलंटरी शाळांची स्थापना केली. 20 फेब्रुवारी 1927 मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते साताऱ्यात शाहू बोर्डिंगचे नामकरण केले. 1932 मध्ये मतदार संघावरून गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात मतभेद झाले. गांधीजींनी उपोषण केले. त्यावेळीही अण्णांनी गांधीजींची भेट घेतली होती. पाचगणी येथे महात्मा गांधी आले होते. त्यावेळी आवर्जून कर्मवीरअण्णा तेथे उपस्थित राहिले. कर्मवीरांची तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ पाहून गांधीजींनी हरिजन फंडातून दरवर्षी 500 रुपये अशी सलग तीन वर्षे मदत केली होती. प्रत्यक्ष महात्मा गांधीजीही रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार होते. त्यावेळी इंग्रज सरकारने "महात्मा गांधीजींची ही मदत नाकारा, आम्ही तुम्हाला मदत देतो‘, असे सांगितले होते. पण, ही सरकारची सूचना अण्णांनी धुडकावून लावली होती. अशा अनेक भेटी महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामध्ये झाल्या होत्या.
कर्मवीरांचे कार्य खूप मोठे आहे , त्यांचे उपकार आपल्या पुढील 7 पिढ्याही फिटवू शकणार नाही .
कर्मवीर भाऊराव पाटील ही अशी व्यक्ती होती की, त्यांनी ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर हे कार्य उभे केले आहे, ते समजले, तरच कर्मवीर भाऊरावांसारखा कर्तृत्ववान पुरुष समजू शकेल.
त्यांना कोणतीच गोष्ट लढाई लढल्याशिवाय मिळाली नाही. महात्मा गांधींनी धनिणीच्या बागेला दिलेली भेट ही काही भाऊरावांच्या सहजासहजी पदरी पडली नाही; त्यासाठी एका अर्थाने भाऊरावांना सत्याग्रह करावा लागला.
महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले.
महात्मा गांधींची अस्पृश्यता निवारण चळवळ असो वा सर्वांना(बहुजनांना) शिक्षण, राजकारण , समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण आदी सर्वच गोष्टीवरून एखाद्या जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी न ठेवता ते सर्वांसाठी खुले करण्याचे त्यांचे धोरण असो याला पुण्यातील तथाकथित उच्चवर्णीयांचा तीव्र विरोध होता यातूनच संतापून गोडसेने त्त्यांची हत्या केली पण त्यांनतर तर ही चळवळ अजून वाढली त्याानंतर भाऊरावांनी या हत्येच्या निषेधार्थ आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा केवळ १० वर्षात पूर्ण केली.
गांधी आणि डॉ.हेडगेवार भेटीचा लोकसत्तेतील लेख आणि वास्तव! राज कुलकर्णी
गांधी आणि डॉ.हेडगेवार भेटीचा लोकसत्तेतील लेख आणि वास्तव!
महात्मा गांधी जयंती निमित्त लोकसत्तेने या वर्षी भाजपचे माजी आमदार मधु देवळेकर यांचा लेख छापला असून ,या लेखात गांधीजी आणि हेडगेवार यांच्या झालेल्या कथित भेटीचा वृत्तांत दिला आहे ! देवळेकर म्हणतात ही माहिती हेडगेवारांचे सहकारी अप्पाजी जोशी यांच्या लेखानुसार आहे !
अप्पाजी जोशी हे त्याकाळी वर्ध्यातील कॉंग्रेस चे एक नेते होते, शिवाय कॉंग्रेस मध्ये हेडगेवार असताना देखील ते त्यांचे सहकारी होते ! सन १९३५ मध्ये अप्पाजी जोशी यांनी कॉंग्रेस सोडली. देवळेकरांच्या लेखाचा मुख्य स्रोत अप्पाजी जोशी असून त्यांची माहिती ही मुख्य सुत्राकडील माहिती म्हणावी लागेल !
‘युगप्रवर्तक डॉ हेडगेवार’ या गोव्यातून प्रकाशित होणा-या वार्तापत्राच्या ३१ मार्च २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या अंकाचे संपादक आहेत डॉ श्रीरंग अरविंद गोडबोले ! या विशेषांकात पान क्र. २१ वर संपादक गोडबोले यांनी हेडगेवार यांची जीवनपट मांडला आहे ! त्यातील पान क्र. २४ वर...
‘फेब्रुवारी १९२४ : वर्धा येथे गांधीची भेट. भेटीच्या वेळेस वर्धा जिल्हा कॉंग्रेस समिती कार्यवाह त्र्यंबकराव देशपांडे , उपाध्यक्ष लक्ष्मण राजाराम अत्रे , अप्पाजी जोशी आणि इतर मंडळी .प्रतियोगी सहकार आणि हिंदू मुस्लीम एकीविषयी चर्चा'
असा उल्लेख आहे.
याच अंकात पान क्र. ३३ वर वरील उल्लेख असा आहे .......
- २६ डिसेंबर १९३४ , वर्ध्याच्या संघशाखेच्या आठव्या छावणीला भेट ,सोबत ल.भ भोपटकर ,त्याच्या आदल्या दिवशी गांधीजींची संघस्थानाला भेट. त्याच दिवशी रात्री ७.४० वाजता गांधीजी हेडगेवार भेट , मीरा बहन, ल. भ. भोपटकर ,दादा नाईक आणि आपाजी जोशी .
या माहितीनुसार गांधी आणि हेडगेवार यांची भेट दोनवेळा म्हणजेच फेब्रुवारी १९२४ आणि २६ डिसेंबर १९३४ साली झाली असल्याचे दिसून येते व दोन्ही वेळा अप्पाजी सोबत होते!
अप्पाजी यांचा जन्म ३० मार्च १८९७ रोजीचा असून त्यांचा मृत्यू २१ डिसेंबर १९७९ रोजी झालेला आहे. त्यांनी ५ एप्रिल १९६२ रोजी नागपूर तरुण भारत या दैनिकाने काढलेल्या 'डॉ. हेडगेवार स्मृती गौरव' अंकात “ महान दृष्टे : डॉ. हेडगेवार” असे दोन लेख लिहिले होते. हे दोन्ही लेख ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या वार्तापत्राच्या ३१ मार्च २०१४ च्या अंकात पुन्हा छापले आहेत!
या अंकातील लेखात प्रत्यक्ष अप्पाजी जोशी काय म्हणतात ते पाहणे महत्वाचे ठरते !
महात्मा गांधींच्या अपेंडीसायचीसच्या आजारामुळे , दोन वर्षाच्या आताच सरकारला –दि ५ फेब्रुवारी १९२४ ला त्यांची सुटका करावी झाली. त्यानंतर कांही दिवस ते वर्ध्याला असताना डॉ. हेडगेवार त्यांच्या भेटीसाठी आले. ही मुलाखत लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण त्यावेळी मी , त्र्यंबकराव देशपांडे लक्षमणराव अत्रे आणि इतर मंडळी उपस्थित होतो ! (पान क्र.८५ )
अप्पाजी जोशी यांनी १९३४ सालातील कथित गांधी भेटीचा उल्लेख त्यांच्या दोन्ही लेखात केलेला नाही. शिवाय या लेखात देवळेकर म्हणतात तसा संवाद झाल्याचा अप्पाजी जोशी अजिबात उल्लेख करत नाहीत ! वास्तविक १९३४ सालातील भेट महत्वपूर्ण आहे कारण त्यावेळी देवळेकर यांच्या मतानुसार गांधीजी संघस्थानावर स्वतः भेटीसाठी आले होते आणि त्यांनी पुन्हा हेडगेवारांना भेटीचे आमंत्रण दिले होते ! मात्र अप्पाजी जोशी या डिसेंबर १९३४ मधील भेटीचा उल्लेखाच करत नाहीत. यावरून ही भेट झाली नसल्याची शक्यता जास्त आहे!
अप्पाजी जोशी ज्या भेटीचा उल्लेख करतात ती भेट फेब्रुवारी १९२४ सालातील आहे. अप्पाजी यांची ही माहिती इतर संदर्भाशी जोडून पहिली असता ,ती वास्तव असल्याचे जाणवते ! 'गांधी ऑन नेहरू' या आनंद हिंगोरानी यांनी संपादित केलेल्या ग्रंथातील पान क्र ५५३ वरील माहितीनुसार , १२ जानेवारी १९२४ ला गांधीजींचे पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये अपेंडीसायटिसचे ऑपरेशन झाले आणि त्यांना डिस्चार्ज ५ तारखेला मिळाला !
अप्पाजींच्या माहितीतील अपेंडीसायटीसचे ऑपरेशन आणि तारीख एकमेंकाशी जुळणारी आहे. याचा अर्थ अप्पाजी जोशी यांच्या माहितीनुसार डॉ. हेडगेवार आणि गांधी यांची पहिली भेट सन १९२४ सालातील आहे !
दैनिक लोकसत्ताच्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखातील मजकूर प्रत्यक्ष आप्पाजींच्या माहितीशी विसंगत असून ,हा मजकूर कोणत्याही संदर्भाविना अप्पाजी जोशी यांच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते. देवळेकर यांच्या लेखातील मजकूर खालील प्रमाणे .......
“.............ध्वजारोहण पूर्ण झाल्यावर आप्पाजींबरोबरच महात्माजींनी भगव्या ध्वजाला संघाच्या पद्धतीने प्रणाम केला. ध्वजप्रणामानंतर महात्माजी शिबिरात असलेल्या संघ वस्तुभांडाराच्या जागी गेले. त्या भांडाराच्या एका बाजूला म्हणी, छायाचित्रे, घोष-वाक्ये व आयुधे वगरेंचे एक लहानसे प्रदर्शनच ठेवलेले हेाते. त्याच्या मध्यावर लक्ष वेधून घेणारे एक छायाचित्र आरास करून नीट मांडलेले होते. ते महात्माजींच्या पाहण्यात आले व त्यांनी नीट निरखून ‘हे कोणाचे?’ अशी पृच्छा केली.
‘‘हेच डॉ. केशवराव हेडगेवार!’’ आप्पाजींनी सांगितले.
‘‘अस्पृश्यता नष्ट करण्याच्या संदर्भात आपण ज्यांचा उल्लेख केलात ते डॉक्टर हेडगेवार हेच काय? यांचा संघाशी काय संबंध?’’ – महात्माजी.
‘‘हे संघाचे प्रमुख आहेत. यांना आम्ही सरसंघचालक म्हणतो. यांच्या नेतृत्वाखाली संघाचे सर्व काम चाललेले असते. यांनी तर हा संघ सुरू केला.’’ – आप्पाजी.
‘‘डॉ. हेडगेवार यांची भेट होऊ शकेल काय? तशी भेट झाल्यास प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच या संघटनेची माहिती करून घेण्याचा विचार आहे.’’ – महात्माजी. ‘‘उद्या शिबिराला डॉ. हेडगेवार भेट देणार आहेत. आपली इच्छा असेल तर ते आपणास भेटतील.’’याप्रमाणे संवाद झाल्यानंतर महात्माजी आश्रमात परत गेले. जाता जाता ‘‘हे काम केवळ हिंदूंपुरतेच आहे; त्यात सर्वाना मोकळीक असती तर अधिक बरे झाले असते,’’ असे अभिमत व्यक्त करण्यास ते विसरले नाहीत. अर्थात त्यावर थोडी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी ‘‘इतरांचा द्वेष न करता केवळ हिंदु-संघटन करणे हे राष्ट्रविघातक नाही,’’ ही गोष्ट मान्य केली”
देवळेकर यांचा हा मजकूर म्हणजे २६ डिसेंबर १९३४ रोजी गांधीजी आणि हेडगेवार यांची प्रथमच भेट झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न करणारी आहे. वास्तविक अप्पाजी जोशी यांच्या मतानुसार गांधीजी आणि हेडगेवार यांची भेट फेब्रुवारी १९२४ मधेच झाली आहे. जर १९२४ मध्ये गांधीजी हेडगेवारांना भेटले असतील तर , ते हेडगेवारांच्या छायाचित्रास पाहून हा , "हे कोणाचे? " असा प्रश्न १९३४ साली विचारणार नाहीत ! त्यामुळे देवळेकर यांच्या लेखातील या संपूर्ण संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि त्याच बरोबर या अनुषंगाने त्यांनी लेखात मांडलेल्या प्रसंगाविषयी आणि त्यातील कथित संवादाची विश्वासार्ह्यताच राहत नाही !
गांधी आणि हेडगेवार यांच्या भेटीचा प्रसंग एम. जी. चितकारा यांच्या 'हिंदुत्व' या पुस्तकात पान क्र ४७ आणि आणि ४८ वर दिलेला आहे. यामध्येही २६ डिसेंबर १९३४ रोजी रात्री ८.३० वाजता हेडगेवार, अप्पाजी जोशी आणि भोपटकर यांना गांधीजींनी भेटायला बोलावले असे ,म्हटले आहे मात्र देवळेकर लेखात मांडतात तसा , नाट्यमय संवाद मात्र या पुस्तकात देखील नमूद केलेला नाही आणि स्रोत म्हणून पुन्हा त्यांनीही अप्पाजी जोशींचेच नाव दिले आहे.
कॉंग्रेस ने १९३४ मध्ये ठराव करून कॉंग्रेस सदस्यांना संघापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. शिवाय १९३५ च्या भारत कायद्यानुसार प्रांतिक सरकारांसाठी निवडणुकाची तयारी प्रत्येक पक्ष करत असल्यामुळे कॉंग्रेस मधील विविध विचारांचे गट कॉंग्रेस पासून दूर जावून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत होते. अशा वेळी गांधीजी संघस्थानावर भेट द्यायला जातील ही बाब शक्य वाटत नाही. असे असेल तर गांधीजी आणि हेडगेवार यांची भेट झाली होती ,ही माहिती कशी काय पसरली गेली असा प्रश्न उभा राहतो !
हेडगेवार यांचे चरित्रकार चं.प. भिशीकर यांच्याच ‘ संघ वृक्ष के बीज –डॉ केशवराव हेडगेवार” या पुस्तकात म्हणतात की, गांधीजींनी संघाच्या शिबिरास भेट द्यावी म्हणून जमनालाल बजाज यांनी आग्रह धरल्यावर गांधीजींनी संघाला कांही प्रश्न विचारले होते. या प्रश्नाची उत्तरे न देता , डॉ. हेडगेवार स्वतःच गांधीजींना भेटायला आले. विशेषतः गांधीजींनी त्यांना संघाचा आर्थिक स्रोत विचारला होता आणि त्यावर हेडगेवार यांनी गुरुदक्षिणा हे उत्तर दिल्यावर गांधीजींचे त्यावर समाधान झाले नाही. एकदा एका प्रसंगात संघाबद्दल चर्चा चालु असताना एकाने संघाच्या शिस्तीचा उल्लेख केल्यावर गांधीजी म्हणतात 'शिस्त तर हिटलर आणि मुसोलिनीची पण आहे ,असा उल्लेख प्यारेलाल यांच्या 'महात्मा दि लास्ट फेज' या पुस्तकात आहे !
गमतीशीर बाब अशी की , गांधीनगर येथील 'गांधी कुटीर' मधील प्रदर्शनात गांधी हेडगेवार यांची भेट १९३० साली झाली असल्याचे नमूद करून ही भेट घनश्यामदास बिर्ला यांनी घडविल्याचे म्हटल्याचा उल्लेख रामचंद्र गुहा यांनी केला आहे! ही गांधी हेडगेवार भेटीची तिसरी तारीख म्हणावी लागेल!
गांधीजी या भेटीबद्दल स्वतः काय म्हणतात ते खूप महत्वपूर्ण आहे. गांधीजींच्या हत्येच्या पूर्वी १६ सप्टेंबर १९४७ रोजी भंगी कॉलनीतील एका सभेस अनेक संघ स्वयंसेवकांनी देखील हजेरी लावली. गांधींजी त्यांना पाहून, आपुलकीच्या स्वरात म्हणाले , कितीतरी वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार हयात असताना वर्ध्यात मी त्यांच्या शिबिराला भेट दिली होती !
गांधीजींचे हे भाषण १९४७ चे असून , डॉ. हेडगेवार यांचा मृत्यू सन १९४० सालातील आहे. अशा वेळी 'कितीतरी वर्षांपूर्वी' हा उल्लेख १९२४ सालातील भेटीबद्दल असणे स्वाभाविक आहे ! कारण प्रत्यक्ष संघस्थापना होण्यापुर्वी पासूनच हेडगेवार अशी स्वंयसेवकांची शिबिरे आयोजित करत असल्याच्या उल्लेख 'युगप्रवर्तक हेडगेवार' स्वत: अप्पाजींच्याच या लेखात आहे.
एकंदर पाहता देवळेकर यांचा लेख म्हणजे अत्यल्प सत्य सांगून, भरपुर प्रमाणात सत्याचा अपलाप करून, अप्पाजींचे नाव पुढे करून स्वतःच्या कल्पनेच्या तीरांवर गांधी आणि हेडगेवार यांच्या भेटीचा प्रसंग रंगविण्याचा धूर्तपणा म्हणावा लागेल !
© राज कुलकर्णी
भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय ?-राज कुलकर्णी
भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय ?
"भगतसिंगांसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगांची फाशी वाचवु शकले असते, परंतु जाणुनबुजुन त्यांनी तसं केलं नाही. " अशी एक चर्चा सध्या मुद्दामहून होत आहे . पण त्याबाबत ची वस्तुस्थिती वेगळीच आहे .
गांधी वर टीका करण्यासाठी भगत सिंग च्या खांद्यावर बंदूक ठेवणारे लोक कोणत्या विचाराचे आहेत ,हे सांगायची गरज नाही .
भगत सिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी ची शिक्षा ,७ ऑक्टोबर १९३० ला सुनावण्यात आली या शिक्षेच्या विरुद्ध केलेले special petition हे त्यावेळी privy council समोर करावे लागत होते . ते petition ११ फेब्रुवारी रोजी फेटाळले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष होते. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी -आयर्विन कराराचा मसुदा त्यांचाच होता, या कराराच्या वेळी ही भगत सिंह ला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता, नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ ला दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळली गेली . गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा १७ फेब्रुवारी पासून सुरू होऊन ५ मार्च १९३१ ला पुर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला आणि त्यावेळी देखील भगत सिंह च्या माफीवर चर्चा झाली. या वेळी करारादरम्यान गांधीजींनी ९० हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली.
हा प्रसंग अजय देवगण याच्या ' दि लेजंड ऑफ भगत सिंग ' या चित्रपटात खूप चपखलपणे दर्शविला आहे ,जो वास्तवाशी जवळीक असणारा टिपला आहे . त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा २१ मार्च ला गांधीजीनी लॉर्ड आयर्विन ची भेट घेवून भगत सिंह ला माफी देण्याची विनंती केली , याच अनुषंगाने २२ मार्च ला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंग च्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
गांधीजींनी २३ मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली ,हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिले. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील कांही उपयोग झाला नाही . भगत आणि त्याच्या सहकार्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला, १९३१ मध्ये कराची मध्ये होणाऱ्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते ,त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले .गांधींनी काय प्रयत्न केले याची माहिती नेहरूंच्या आत्मचरित्रातून किंवा संन्याल वगैरेंच्या लिखाणातून मिळते अगदी याचा दाखला लॉर्ड आयर्विन यांच्याही लिखाणात आहे.
"As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved."-
इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याची हि काही कारणे होती .भगत विरोधात प्रचंड नाराजी civil services officers मध्ये होती . पंजाब प्रांताच्या गवर्नर ने भगत सिंग ला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती ,कारण भगत ला फाशी Saunders च्या हत्येच्या खटल्यात झाली होती ,त्यामुळे युरोपियन ICS केडर फाशीचे समर्थक होते. ICS केडर च्या नाराजीचा परिणाम असा होता की ,संपूर्ण वसाहती देशातील ICS केडर च्या अधिकाऱ्यांची एकी निर्माण झाली होती , ब्रिटीश त्यांच्या राज कारभाराच्या दृष्टीने भारतातील भगत सिंह साठी आफ्रिका , म्यानमार , अफगाणिस्तान , अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते. याचा दुसरा परिणाम देखील असा होता की ,ब्रिटीश युवक वसाहतीतील नौकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत , ICS केडर च्या एकजुटीचा उइद्देश हा देखील होता !
या सर्व कारणास्तव भगत सिंह ला माफी मिळणे कठीण गोष्ट होती आणि एकदा दया याचिका फेटाळली कि निर्णय पूर्णतः पंजाब गवर्नर च्या हातात होता. या बाबत विस्तृत माहिती असफ अली, अरुणा असफ अली, आणि जे. एन . सन्याल यांनी लिहिली आहे . वी.एन . दत्त यांनी गांधीनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. भगत सिंह यांना वाचविण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे, खुद्द पटेल आणि नेहरूंनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले .
पण महत्वाची गोष्ट अशी कि , भगत सिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी -नेहरू -पटेल यांनीच केला , आज भगत सिंह यांची बाजू घेवून गांधी वर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही. स्वातंत्र्य वीर सावरकर त्यावेळी रत्नागिरी इथे वास्तव्यास होते ,त्यांनी एखादे पत्रक काढून किंवा लेख लिहून भगत सिंह, सुखदेव ,राजगुरू यांना माफी द्यावी असे आवाहन केले नाही. त्यावेळी केशव बळीराम हेडगेवार हे सरसंघचालक होते, मात्र त्यांनी पत्रक काढून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे असे आव्हान केले, ही बाब संघ विचारांचे लेखक चं. प. भिशीकर यांनी नमूद केली आहे . मात्र सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे म्हणून पत्रक काढणाऱ्या संघाने भगत सिंह चे समर्थन करणारे किंवा भगत सिंह ला माफी द्यावी असे कोणतेही पत्रक काढले नाहीत ,किंवा तसे प्रयत्न देखील केले नाहीत .
भगत सिंह चे कार्य महान आहेच ,पण भगत सिंह ला माफी मिळाली असती तर काही अटी नक्कीच लादल्या गेल्या असता, कारण सरकार माफी देताना अशा अटीवरच माफी देत असे. उदाहरणार्थ सांगायचे तर, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अंदमान हून सुटका करून घेताना सरकार विरोधात कोणतेही कार्य करणार नाही , स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही , नेहमी मायबाप इंग्रज सरकारच्या आदेशाचा सन्मान केला जाईल ,अशा अटी लादल्या होत्या ! सावरकर यांनी प्रामाणिकपणे ब्रिटीशांच्या अटीचे तंतोतंत पालन केल्यामुळे सावरकर यांच्यावर ब्रिटिशांनी कोणतीही कारवाई केली नाही ,पण भगत सिंह यांचे एकंदर क्रांतिकारी विचार पाहता आणि स्वाभिमानी स्वभाव पाहता भगत सिंह याने या अटीचे पालन केले असते ,असे आपण ठामपणे म्हणून शकत नाही आणि अटी न पाळणाऱ्या भगत सिंह ला सतत माफी मिळणे देखील अशक्य होते . भगत सिंह ला माफी मिळाली असती ,तर त्याचे नाव कदाचित एवढे अजरामर झालेच नसते.
भगत सिंह हिंदुत्ववादी नव्हता तर तो मार्क्सवादी होता ,नास्तिक होता आणि जन्माने तथाकथित उच्चवर्णीय देखील नव्हता ! त्यामुळे माफी मिळाल्यानंतर माफिनाम्यातील अटीनुसार ब्रिटीश मायबाप सरकारचे आदेश तंतोतंत पालन त्यास करावे लागले असते आणि असे पालन त्यानेही केले असते तर माफी मागणाऱ्या इतरांना ज्याप्रमाणे गौरविण्यात आले ,तो गौरव ,तो सन्मान त्याच्या मिळाला असता किंवा दिला गेला असता ,याची शक्यता खूप धुसर असल्याचे चित्र दिसते ! भारतीय समाज रचनेचे ते एक वास्तव आहे !
© राज कुलकर्णी .
( संदर्भ: -
1) Gandhi Marg Vol no.32 Issue no .3 Oct-Dec.2010 - Chander Pal Singh
2) Bhagat Singh Diaries - J.N.Sanyal
3) Selected writings of Bhagat Singh - Shiv Varma, Samajvadi Sadan Kanpur.
4) Fragments of Past - Aruna Asaf Ali.
5) Homage to Martyrs- Pub.Shahid Ardh shatabdi Samaroh Samiti, Dehli 1981.
6) Towards Freedom- Jawaharlal Nehru.
7) Savarkars Mercy Petition - Frontline Volume 22 - Issue 07, Mar. 12 - 25, 2005