Wednesday, 27 May 2015

नथुरामभक्तांचे गांधीजी ना नाव ठेवणारे खोटे मेसेज आणि सत्य खोटे मेसेज आणि तथ्य

सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त🐍🐍 मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 🔫हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण📢 केले जाते आहे. आपल्या शेवटच्या भाषणात📣 आपण गांधीहत्त्या का केली याचे १५ मुद्दे 📝नथुरामने सांगितले होते, असे हे मेसेज पाठवणारे विकृत लोक सांगतात. हे सर्व खोटे मुद्दे जुनेच आहेत पण ते पुन्हा पुन्हा सांगून महात्मा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातील काही मुद्यांचा येथे परामर्ष घेत आहे.
गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे-
१) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते. ✅२) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँग्रेस पक्षाचा होता.✅ ३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही. ✅४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.✅  https://www.facebook.com/sanegurujivichar/photos/a.1510997212448557.1073741828.1510990029115942/1612520702296207/?type=1&theater
५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.✅ ६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले. ✅७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.✅ ९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते. ✅१०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.✅११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती.   ✅ नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही.

आइनस्टाईन  म्हणाला होता,  की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती 
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या 2तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते 
व आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते
पण ज्या गोडसेनी ना अहिंसक ना  सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत  भाषणे दिली अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेश व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत?
असल्या खोट्या अफवांपासुन सावध रहा
मित्रांनो गांधी समजुनच घ्यायचे  असतील  तर डॉ अभय बंग,  प्रकाश बाबा आमटे, दलाई लामा,सत्यार्थी  मलाला असे कोट्यावधी लोक ज्यांनी गांधीविचारातुन आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्यासोबत काही क्षण राहुन पहा मंडेला,आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी, य दि फडकेंचे नथुरामायण ,महात्म्याची अखेर,  freedome at midnight   वाचा 
धर्म,जात-पात,गट यांच्या अफवांना बळी पडु नका

मित्रांनो तुम्ही जर नाही समजुन घेतल तर त्याच काहीच बिगडत नाही पण त्यात तुमचेच अडाणीपण दिसुन येते

खालील पेजवर सर्व माहिती मिळेल
https://m.facebook.com/mahtmahandhipeace

असेच अनेक जगभरातील गांधीजीना मानणारे समविचारी मित्र खालील  फेसबुक समुहात मिळतील

https://m.facebook.com/groups/562250187168592

प्रश्न विचारा चिकित्सा करा
संकेत मुनोत

संदर्भ-
1-Let's kill Gandhi- Tushar Gandhi 
2-Freedome at midnight 
3-Mahatmyachi akher- jagan fadnis
4-justice D.G,khosala
5- प्रो.डॉ. अशोक चौसाळकर ( राजनैतिक विश्लेषक ) का लेख -दै लोकमत
http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=6518937-Khosala G.D. -The murder of Mahatma and other cases from judge's Notebook
6-pyarelal :mahatma Gandhi- The Last phase 
नथुरामायण-य.दि.फडके
7--गोपाळ गोडसे - 55कोटीचे बळी 
8-आफळे की मनभडंग कहाणी-चारुदत्त आफळे
9-अभय बंग, कुमार सप्तर्षी,अन्वर राजन, सदानंद मोरे , संजय सोनवणी , सुगन बरंत , अजय मक्तेदार, संतोष लहामगे, प्रसाद वांजळे, ,लोकेश शेवडे, राहुल रांजणगावकर, मच्छिंद्र गोजामे , ऊत्तम कांबळे, रमेश ओझा, पद्मभुषण देशपांडे,  राहुल रांजणगावकर,राज कुलकर्णी, आनंद पटवर्धन  , यांच्याशी झालेली चर्चा व त्यांचे मार्गदर्शन अन्य अनेक मित्रांचेही आभार ज्यांनी 10-फेसबुकवर , whatsapp वर फिरणारे गांधीजी प्रतिचे विकृत लेख
11-अन्य अनेक पुस्तक व ईंटरनेट
पटतय का ?
सत्य शेयर करा

सावरकर: पुरोगामीत्वापासून प्रतिगामीत्वाचा उलटा प्रवासी

सावरकर: पुरोगामीत्वापासून प्रतिगामीत्वाचा उलटा प्रवासी

लहानपणी शालेय पाठय पुस्तकातून किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून सावरकर जसे ऐकले, वाचले होते तसे ते खूपच ज्वलंत , विज्ञानवादी, बुद्धिवादी वगैरे वाटत. त्यांची माझी जन्मठेप सारखी पुस्तके वाचतांना तर डोळे भरून येई काय तो अंदमानचा त्रास आणि काय ते "ने मजसी ने परत मायभूमीला नावाचे काव्य सगळे एकदम थक्क करणारेच पण नंतर जसजसा अभ्यास वाढला तसे लक्षात आले की सावरकर तर अंदमान मधून सुटून आल्यानंतर प्रतिगामी झाले होते.जो मनुष्य पूर्वी हिनु मुस्लिम ऐक्यावर लिहितो तोच मनुष्य नंतर भारत हे फक्त हिंदुराष्ट्र झाले पाहिजे अशी प्रतिगामी मांडणी कशी करू शकतो??त्यांनतर अजून अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि सावरकरांच्या आयुष्याचे मुख्य 2 पैलू पडतात 

एक-अंदमान शिक्षे पूर्वी -पुरोगामी

दोन -अंदमान शिक्षेनंतर -प्रतिगामी

अंदमानच्या तुरुंगात त्यांचा पुरोगामी ते प्रतिगामी होण्याकडे प्रवास झाला असावा

     स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा मागोवा घेतला तर एक गोष्ट आपल्या ठळकपणे लक्षात येते कि अंदमानच्या आधी ते पुरोगामी विचारांचे होते आणि अंदमानानंतर ते प्रतिगाम्यांचे पक्षधर झाले. पुरोगामी सुधारक ते हिंदुहृदयसम्राट ह्या ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांचा विरोधाभास त्या एकाच व्यक्तीत त्याच क्रमाने प्रकट झाल्याचा जाणवतो. आधी हिंदू मुसलमान एकतेचे गोडवे गात '1857 चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक लिहिणारे, गाय  केवळ एक उपयुक्त पशू आहे म्हणणारे, यज्ञाच्या धुराने वातावरण पवित्र होते या युक्तिवादाची चेष्टा करणारे सावरकर अंदमाननंतर त्याच वैदिक धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्मितीचे पक्षधर झाले. पुरोगामी - हिंदुहृदयसम्राट - आंबेडकरांच्या बौद्धधम्म प्रवेशाबद्दल त्यांच्यावर सडकून टिका - गांधीहत्येच्या कटात सहभाग हा सावरकरांचा प्रवास निश्चित कोणतेही संवेदनशील मन अस्वस्थ करणारा आहे. सावरकरांच्या ह्या सर्व वाल्मिकी ते वाल्या कोळ्याच्या प्रवासात एक मध्यवर्ती आस दिसतो आणि तो म्हणजे आर्यवंशीयत्वाचा अभिमान. जसा हिटलरला होता तसाच काहिसा सावरकरांत सापडतो. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आधी संस्थानिकांचे स्वातंत्र्यसंग्राम होता तोपर्यंत सावरकर स्वातंत्र्ययोद्धे होते परंतु सुधारकांच्या प्रयत्नांनी सर्व तळागाळातील, दलित, हरिजन आदी लोकांना जागरुक केले आणि तोच स्वातंत्र्य संग्राम लोकशाही, समता, बंधुता ह्या मुल्यांचा पक्षधर झाला. संस्थाने खालसा होतील आणि सामान्य जनता राज्य करेल असे दिसू लागताच सावरकर वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवत सनातन वैदिक धर्माचे पक्षधर आणि धार्मिक सुधारणांकडून धर्मांध राजकारणाकडे घसरले हे विशेष आहे. स्वातंत्र्य मिळता मिळता दिल्लीच्या चाव्या नक्की कोणाकडे द्याव्या हिंदूंकडे कि मुसलमानांकडे? हा प्रश्न उद्भवला होता. कारण ब्रिटिशांनी जसजसा भारत घेतला तसतसा (एकेक संस्थान) स्वतंत्र करत जाणार असे म्हणाले होते. त्यामुळे वातावरण अधिक चिघळले होते आणि सत्ता आपल्या हातात रहावी आणि राजेशाही टिकून रहावी, सर्व सुधारणा रद्द व्हाव्या, जातीयता आणि राजवंशाची गरिमा अबाधित रहावी म्हणून सर्व हिंदु-मुस्लिम संघटनांनी धार्मिक अस्मितेचे राजकारण करण्यास सुरवात केली. मग हिंदूमहासभा, मुस्लीम लीग, रझाकार अशा संघटना अस्तित्वात आल्या वा त्यांना बळ मिळाले आणि देश यादवी कडे वाटचाल करु लागला. त्यातल्याच हिंदू धर्मांध गटाचे सारथ्य केले ते पुर्वाश्रमीच्या सुधारक सावरकरांनी. ह्या पार्श्वभुमीवर ते विचारवंत जरी असले तरी स्वभावतःच असणारा आततायीपणा त्याने होणारी विचारभ्रष्टता दिसुन येते.

सावरकरकरांनी एका विचारप्रवाहाचे प्रतिनिधित्व केले हे निश्चित, जो आता टाकावू आणि धोकादायक आहे हे सिद्ध झाले आहे. अस्मितेचे राजकारण हे प्रस्थापितांचे राजकारण असते आणि त्यात सामान्य भरडले जातात. द्विराष्ट्रवाद सिद्धांत स्वातंत्र्याच्या चळवळीतच उदयास आला, परंतु सावरकरांनी त्याला ठासून मांडले आणि त्यानुसार सक्रिय राजकारण केले आणि मग परिस्थिति आणखी चिघळत गेली. आंबेडकरांनी धर्मांतर केले त्यावेळी इतर लोक त्यांचे अभिनंदन करत असताना सावरकर आपल्या धार्मिक राजकारणात बळी चढणार्या प्याद्यांची संख्या कमी झाली म्हणून टीका करत होते. हिंदुसंस्थानिकांच्या फौजा वाढवून मुस्लिमांची कत्तल करत अखंड हिंदुस्थानावर सनातनी धर्माचे राज्य आणावे असे त्यांच्या मनात होते. म्हणूनच मुस्लिम रहित अखंड हिदुस्थान आणि ख्रिश्चन व मुस्लिमेतर सर्व  हिंदूच म्हणताना सनातनी धर्म सोडुन विद्रोही धर्मात गेलेल्या आंबेडकरांविषयी आगपाखड यांचा संदर्भ जुळतो. त्यांचे हेच विचार विज्ञानयुगात हिंदुत्त्ववादी संघटना पुढे नेताना दिसत आहेत.

     सावरकरांचा विवेकवाद मानवतावादावरून हिंसक टोळियुद्धाच्या मानसिकतेपर्यंत घसरलेला दिसतो. त्यांनी द्वेषाची इतकी परिसीमा गाठली होती कि, हिंदुद्वेष्टे मुस्लिमच नाही तर धार्मिक सहिष्णु हिंदू-मुस्लिम जे धार्मिक द्वेषाला शह देत सहजीवनावर भर देत होते ते ही डोळ्यात खटकू लागले. दारुड्याला दारू सोडवणारा दुष्मन वाटतो आणि मनोविकृताला वैद्य शत्रू वाटतो त्याप्रमाणेच आपले द्वेषाने खदखदलेले खुनशी मनसुबे तडिस नेण्यास जे सहिष्णू उदारमतवादी लोक अडचण होत होते ते डोळ्यात सलू लागले आणि सगळ्यात जास्त सलत होते ते त्याच आदर्शांसाठी जीवाची पर्वा न करता उभे राहणारे महात्मा गांधी. कारण गांधी असेपर्यंत धर्मांध राजकारण शक्य नव्हते, लाखो-करोडो हिंदू-मुस्लिमादी सर्वधर्मिय भारतीय त्यांचा शब्द साधू-संत-धर्मसंस्थापकासम मानून अहिंसा-बंधुतेचा पाठ गिरवत होते. म्हणून गांधींजींच्या हत्येत अप्रत्यक्ष सहभाग घ्यायला म्हणजेच गांधीहत्येचा कट राचायला सावरकरांना काहीच चुकिचे वाटले नाही. योग्य तत्त्वांची तटबंदी नसेल तर विचारवंत म्हणून नावाजला जाणारा कसा भरकटत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणून सावरकर अभ्यासता येतील.
     तरी त्यांच्या त्यागाबद्दल आणि बुद्धीबद्दल मनाच्या कोणत्यातरी कोपर्यात आदर करतो.

              -डॉ. कौस्तुभ कल्पना विलास
संकेत मुनोत

Thursday, 14 May 2015

छत्रपती शाहू महाराज

समाजसुधारक जाणता राजा
     छत्रपती शाहू महाराज
ांचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ, लोकमान्य टिळक धार्मिक अस्मितेचे राजकारण करत ती अस्मिता ब्रिटिश राजवटीविरूद्ध वापरण्यासाठी जंग जंग पछाडत होते. म.फुले हाती शेतकर्यांचा आसूड घेऊन हिंदू धर्मातील पाखंड आणि जातपात, पुरुष प्रधान संस्कृती यांवर जबर कोरडे ओढत होते आणि शिक्षणाचा जागर करत होते. गांधी नावाचा जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर अरुणोदय होत होता. राष्ट्रसंत गाडगे बाबा ठिकठिकाणी जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत अंधश्रद्धांच्या चिंधड्या उडवित होते. राजा राम मोहन् रॉय, लोकहितवादी, न्या.रानडे, आगरकर, गोखले आदि सुधारक संपूर्ण देशात समाजसुधारणेचा अहोरात्र अविश्रांत जागर घालत होते. अशा कालखंडात कोल्हापुरातील शिवछत्रपतींच्या गादीवर आणि संपूर्ण मराठी मनावर  त्यांचा खरा वारस शोभेल अशी व्यक्ति आसनस्थ झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज!
     राजबिंडे व्यक्तिमत्त्व पण तितकेच सुधारक आणि पुरोगामी विचार. तळागाळातील लोकांचा दिनदुबळ्यांचा कैवार घेणारा, संवेदनशील मनाचा जाणता संवेदनशील राजा.
    लोकमान्य टिळकांबरोबर झालेले वेदोक्त आणि उपनिषदोक्त प्रकरण तर सर्वांना माहितच आहे. वेदोक्त मंत्र फक्त खरे क्षत्रियासाठीच म्हटले जातात, म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणेच शाहू महाराजांनाही त्यांचे क्षत्रियत्व अमान्य करणार्या भटाची बाजू घेत टिळकांनी शाहू महाराजांवर केसरीवर आगपाखड केली होती आणि शाहू महाराजांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले होते. तरी शाहू महाराज आणि टिळकांमधील फरक हा कि फुले वारल्यावर टिळकांनी एक वाक्यही केसरीत लिहिले नाही पण छ.शाहू मात्र टिळक गेल्यावर मातब्बर विरोधक गेला म्हणून हळहळले. विरोधकांचेही गुण आणि विद्वत्तेचा आदर करणारे शाहू महाराज.
     शाहू महाराजांची एक गोष्ट सांगतो, शाहू महाराजांच्या वैयक्तिक वकिलांत त्यांनी एक बॅरिस्टर दलित मुद्दाम घेतला. तोपर्यंत सर्व ब्राह्मणांचाच दबदबा होता. एक शूद्र आला हे पाहून त्या वकिलांना कसेसेच झाले. त्यांनी अर्थातच त्याला वाळीत टाकले आणि एकही प्रकरण वा कसलेच काम त्याच्या वाटेला येणार नाही असे पाहिले. येणे हजेरी लावणे डबा खाणे आणि घरी जाणे हेच काम त्याला करावे लागले. मग त्यांचा वरिष्ठ कामाच्या आढाव्यात लिहायचा कि अत्यंत सुमार काम, कामच करत नाही,नुसता बसून असतो, त्वरित कमी करावे इ.इ. शाहू महाराज वाचतात आणि सर्व हेरून लिहितात,"तोतूमचा कनिष्ठ आहे, तुम्हाला त्याची कामगिरी सुधारण्यासाठी नेमण्यात आले आहे, जर त्याची कामगिरी सुधारली नाही तर तुमचा पगार कापण्यात येईल." आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याची कामगिरी नुसती सुधारलीच नाही तर अत्युत्कृष्ट म्हणून नोंदवली गेली. अशा अनेक कथा आहेत त्यातील ही एक.
    भारतीय राजपटलावर धार्मिक सवर्णिय आरक्षणाविरूदध राजकिय-सामाजिक दलित आरक्षण आणले त्याचे श्रेय जाते ते शाहू महाराजांना. त्यांनी दलितांसाठी शाळाच काढल्या नाहित तर आपल्या दरबारी सवर्ण रोषाची पर्वा न करता समतेशी निष्ठा राखत रोजगारही दिले. आंबेडकरांचा मूकनायक निधि अभावी मूक झाला होता, शाहू महाराजांच्या देणगीनेच पुन्हा तो बोलू लागला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना वेळोवेळी मदत तर केलीच पण त्यांचे गुण आणि क्षमता हेरून माझ्या नंतर समाज सुधारणेचा वारसा हा चालवेल असेही सांगितले.
     तर असा महान समाजसुधारक, दिनांचा कैवारी, गुणग्राहक, प्रजेचा मायाळू पालक, दूरदर्शी जाणता राजा छत्रपती शाहू महाराज! त्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!!
👑👑👑👑👑👑👑👑👑👑
                

शंभूराजे :राजकारणाचे बळी

शंभूराजे: राजकारणाचे बळी!
शंभूराजे जन्मतःच आईचे छत्र गमावून बसले. वडिल राजकारण आणि समाजकारणाने ठिकसे लाभलेच नाहित! आजीच्या कुशीत वाढले, आजीने शक्य तितके लाडाकोडात वाढवले. शेवटी सईबाईंच्या म्हणजे दुसर्याच्याच पोटचा गोळा, त्याला धोक्यात घालणे वा शासन करणे, वळण लावण्यासाठी प्रसंगी रूक्ष वागणे जमले नाही. ठेव सांभाळावी तसे सांभाळले आणि शेवटी पुत्र आणि नातवात फरक पडतोच!
     वडिल समाजकारणात गुंतलेले असताना दरबारी राजकारणाचा वेढा संभाजी महाराजांभोवती पडू लागला. तरुण तडफदार सळसळणारे रक्त, वडिलांनी कर्तृत्वाने कमावलेले राज्य जे निश्चित वारश्याने मिळणार होते, आणि त्या सिंहासनाभोवती घोंघावणार्या माश्या, पौगंडावस्थेतच अपेक्षांचे भले मोठे ओझे आणि त्यात होणारी घुसमट. परिणामी घडलेल्या चुका जश्या औरंगजेबाच्या मुलासोबत स्वराज्यावरच चाल करून येणे, परस्त्रीचे अपहरण, शौकिनपणा, मद्यपान इ.इ. परिणामी महाराज आणि जनतेच्या नजरेतून ढासळणे. मध्ये बुधभुषण पुस्तक वाचायला मिळाले होते, त्यात खुद्द संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हणत होते. ते पुस्तक लगेच पुन्हा खाली ठेऊन दिले. आपल्याच वडिलांना दैवी अवतार म्हणणार्या मुलाची मानसिकता काय असू शकते? आपल्या बापाचे माणूसपण न जाणवण्या इतपत दरी दिसत होतीच, पण त्याकाळच्या अंधश्रद्धाही. संस्कृतभाषेत प्रभुत्व मिळवले पण संस्कृतचा अंधश्रद्धाळू पुराणकथांत रमणारा दोषही लागला. बापही प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचल्याने असे घडले असावे. बाप शिव आणि आपण साहजिकच शिवपुत्र या संकल्पनेने संस्कृत ज्ञाते संभाजी धर्माच्या प्रेमात अधिक पडले असावेत!
     संभाजी महाराज शौकिन होते आणि राजनितीज्ञ नाही तर औरंगजेबाचा पुत्र आणि एक कवि याला जीवाभावाचा मानत होते. त्यांच्या वयाला, युवराजपदाला साजेसे होते तरी त्यामागे मानसिक घुसमटीला वाव करून देणेही एक कारण असावे.
    तख्तावर अजान राजाराम हवा पण संभाजी नको म्हणून काही पंत राजकारण आखत होते आणि संभाजी महाराजांच्या वाईटावर होते. आपण बसो कि भाऊ याने राजारामांना काही फरक पडणार नव्हता आणि संभाजी महाराजांचेही धाकट्या भावावर प्रेम होते. पण पाय खेचणार्या आणि खोचून बोलणार्या दरबारी राजकारणी पंतांचा खूप राग होता. म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणे उपद्रवी ब्राह्मणांना नुसती तंबी न देता त्या पंतांना औरंगजेबासारखे हत्तीच्या पायाखाली सिंहासनावर आल्या आल्या दिले. पण आपल्या सावत्र आईला पूर्ण सन्मान दिला. यावरूनच संभाजी राजांना खरा त्रास कोणाचा होत होता हे कळते.  पण संस्कृतात ब्राह्मण नसताना लिहिणे हि चूक एकवेळ जातीयवाद्यांनी दुर्लक्षिली असती पण सरसकट ब्रह्महत्या करून संभाजींनी मोठा अधर्म केला होता, जो त्यांना नंतर भोवला. औरंगजेबाला त्यांचा ठावठिकाणा लागला आणि मद्यधुंद अवस्थेत आपल्या विद्रोही मुलाला शरण देणार्याला पकडले. पण संभाजी महाराजांच्या बहादुरीवर खूष होऊन औरंगजेबाने मुसलमान होण्याचाही प्रस्ताव ठेवला जो संस्कृतज्ञाते स्वधर्माभिमानी संभाजी महाराजांनी नाकारला. आता औरंगजेबाने जावई करण्याचाही प्रस्ताव ठेवला होता असे काही म्हणतात तर काही धर्मांतर करायला सांगणार्या औरंगजेबाला "तुझी मुलगी देशील का?"अशी घाणेरडी विचारणा केली असे म्हणतात. राजे कितीही मद्यधुंद असले आणि शीघ्रकोपी व शौकिन असले तरी ते सुशिक्षित, संस्कारात वाढलेले होते, शिवाजी महाराजांच्या सावलीत वाढले होते, ते अशी विचारणा करणे मनाला पटत नाही. आणि जावई करण्याइतपत ज्याच्यावर मन् आले अशा माणसाला औरंगजेब इतके वाईट मरण का देतो? आणि आख्खी मराठी सेना का अंगावर घेऊ इच्छितो ते कळत नाही. औरंगजेबासारखा संभाजी महाराजांत मुलगा पाहणारा धूर्त मुत्सद्दी एवढी मोठी घोडचूक का करेल ते कळत नाही. मराठीराज्य संभाजी महाराजांच्या मृत्यूने निश्चित संपणार नव्हते. त्याला मराठी राज्य संपवायचे असते तर संभाजी महाराजांना सोडून राजाराम आणि संभाजीत वैमनस्य वाढवून त्या दुफळीचा फायदा घेणे अत्यंत सोपे होते. ज्या औरंगजेबाने ताजमहाल बांधणार्या उधळ्या बापाला आणि भावांना मुघल साम्राज्याची संपत्ती आणि दबदबा राखण्यासाठी रस्त्यातून बाजूला केले आणि घरातच महाभारत घडवून आणले त्याच मुघल साम्राज्यासाठी संभाजींना जावई करून मुलावर जावयाला  ठेवून मुघलसाम्राज्यासाठीच रामायण घडवू पाहणारा औरंगजेब आणि लगेचच संभाजींची हत्या करु इच्छिणारा औरंगजेब यांच्यातली दरी कोणी पुराव्यानिशी नीट सांधली तर बरे होईल. निश्चितच औरंगजेबाला संभाजींचा वध करुन संपूर्ण मराठी सेना अंगावर घेण्याच्या तोट्यपेक्षाही मुघल साम्राज्यासाठी अधिक हिताचे काहितरी दिसले असेल, असे असेल तर ते काय??? औरंगजेब सूड उगवू इच्छित होता कि कोणाला तरी खूश करु इच्छित होता, ज्याने मुघल साम्राज्याचा अधिक फायदा झाला असता????? नेताजी पालकरांनी जी धर्मांतर करुन पुन्हा घरवापसी केली तो शहाणपणा संभाजीमहाराजांनी केला असता तर मराठी सत्तेचा पराक्रमी राजा तरी वाचला असता. पण पालकरांना जातीयवाद्यांनी कधीच परत हिंदू मानले नाही, हेही खरे. तरी बरेच गूढ आहे. काही म्हणतात औरंगजेबाने केवळ संभाजी महाराजांनाच तसे मारले, आणि संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणेच मारले गेले. मला संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत खोलात माहित नाही म्हणून मीही हे असेच आहे हे ठासून सांगू शकत नाही. फक्त रास्त शक्यता वर्तवत आहे. जाणकारांनी अधिक माहिति पुरवल्यास आभारी राहिल.
     शिवाजी महाराजांवर धार्मिक राजकारण करता येत नाही म्हटल्यावर सवर्ण जातीयवादी मंडळी संभाजींवर घसरली आहे. आणि संभाजींवर जातीयवादी राजकारण आणखी कडवट रुपात येत आहे. ब्राह्मण्यवादी संभाजी महाराज कट्टर  हिंदूधर्माभिमानी होते असे रंगवण्याचा प्रयत्न करताहेत. तर संभाजी ब्रिगेड सारखी संघटना संभाजींचे खरे शत्रू ब्राह्मणच होते हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणतात ना जाणारी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी? संभाजी महाराजांच्या चितेवर आपापली पोळी भाजून घेण्याचे राजकारण जोरात चालू आहे. शिवाजी महाराज संयत होते म्हणून त्यांना ताणता आले नाही. मात्र संभाजी महाराजांना दोन्हीकडचे जातीयवादी दातओठ खात आपापल्या गोटात खेचायचा प्रयत्न करत आहेत. प्रतिकांचे राजकारण प्रतिकांना धुळीस मिळवण्यापर्यंत नाही गेले म्हणजे मिळवले. किती व्यक्तिवाद आणि किती जातिय तेढ???? आता तरी आपण शहाणे व्हावे!
                  
(नोंद:- हे लिहिताना कोणाच्या भावना दुखावण्याचा मानस नाही. दुखावल्यास क्षमस्व. राजकारणानेच संभाजी महाराजांचा जीव गेला आणि त्यावरून पुन्हा राजकारण नको एवढीच माफक अपेक्षा. 21 व्या शतकात धर्मही टाकाऊ गोष्ट झाली असताना आणि जातपात विषारी आहे हे सिद्ध झाले असताना संभाजी महाराज धर्मासाठी मेले कि ब्राह्मण्यवादी जातिय मंडळीनी त्यांचा जीव घेतला हि चीरफाड करत बसण्यात काय हशील? धर्मांधता वा जातिय तेढ दोन्ही देशासाठी घातकच मग हा देशद्रोह करणार्यांना कोठवर चुचकारायचे? संभाजीमहाराजांना खरी श्रद्धांजली ही जातीपातीचे विसर्जन हिच आहे. जातीयतेढ निश्चित नाही आणि धर्मांधता तर नाहीच नाही. धर्मांधता येणार्या पिढ्यांशी गद्दारी ठरेल)
                   - डॉ कौस्तुभ कल्पना विलास