Blog Archive

Saturday, 31 December 2016

Changale_Vichar_Youth #Mission_Educatio-Nivara ashram jamkhed

#Changale_Vichar_Youth #Mission_Education

School bag distribution at Nivara Bal Ashram by Er.Nilesh Shinge at Jamkhed, Dist. Ahmednagar on 24Dec2016

This little smile of these little kids is our energy and achievement.
We are so grateful to all of you who've helped us reach our goal!
👫
"NIVARA- CHILDREN'S SHELTER HOME, the organisation which is a subsidiary organisation of GRAMIN VIKAS KENDRA, Jamkhed, located in the southern part of Ahmednagar Distric. Gramin Vikas Kendra, has been continuously working for the Deprived and Downtrodden sections of the society since 1995, particularly for the communities like Pardhi, kolhati, Dombari, Gondhali, Gosavi, Garudi.
The Director, Adv. Arun Jadhav came up with the idea of starting the Nivara, Childrens Shelter Home for childrens of various sections of the society especially the marginal, orphans, economically poor, socially exploited, dalits, nomadic tribes, childrens of the street play artists, Adhivasi etc. He was was successful by bringing people together and by raising the local funding, special assistance, food, educational material, clother etc.
NIVARA today has 20 childrren in its shelter home of whose entire education, care, food is managed by the this organisation through donations and help. But they also work with more than 100 childrens from socially deprived community  in the District, for their education, health, etc. This organisation is purey based on the value of equality as also enshrined in the Indian Constitution and part of the Fundamental Right- to Education, to live. Also, it is the only shelter home in the Ahmednagar District for childrens street play artists.

*How you can Support them:
1. By sponsoring a child by Donating ₹5000 per annum.
2. You can celebrate your birthday by making us part of your celebration by distributing gifts and Monetary help to our childrens.
3. Celebrate your dear one's  birthday in their loving memory.
4. Raising Monetary help for infrastructure
5. Educational Stationary like Pen, Books, Bags, etc.

Address:
NIVARA-Bal Grah
Gramin Vikas Kendra,
Rakhi Nivas,
Kumbhar Tale, In front of Goraba Talkies,
Tal- Jamkhed
Dist- Ahmednagar
State- Maharashtra
Pin: 413201
Contact no:
Adv. Dr. Arun Jadhav, Social Activist
9422226066,9850763666
Email- gvkjamkhed@gmail.com

Thursday, 29 December 2016

माझे हिंदुमुस्लिम भाईचारा अनुभव-संतोष लहामगे

इसी का नाम दोस्ती....

हिन्दू धर्म हैं जितना प्यारा उतना ही इस्लाम हैं।

जितनी पावन रामायण हैं उतनी पाक कुरान हैं.

हिंदी-उर्दू भाषा दोनों बहने हैं एक दूजे की.

हिन्दू से न मुस्लिम से दोनों से हिन्दुस्तान हैं.

मित्रांनो , हिंदू मुस्लिम धर्माबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते, पण माझे व माझ्या मित्रांमध्ये आजपर्यंत धर्म भेदभाव आलाच नाही.प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म आवडतोच. पण असे थोडेच आहे कि दुसऱ्या धर्माबद्दल आदरभाव नसतो.मित्रत्वाचे नात्यात तर धर्म आड येत नाहीच.माझे हे दोन्ही मित्र धर्माने मुस्लिम आहेत,शोहरब पठाण व सादिक तांबोळी.पण मी जेव्हा मंदिर पहायचे म्हणतो हे दोघे तयार असतात, ते त्यांच्या धर्माच्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ते करतातच,पण धार्मिक गोष्ट वेगळी व मित्रत्वाचे संबंध वेगळे.मंदिरात गेल्यावर
तेथील अनेक शिल्पांचे फोटो हे दोघेच घेत असतात.
मंदिराची माहिती करुन घेत असतात , मला तर अनेक दुर्मिळ शिल्प हे दाखवितात.मला या दोघांचा नक्कीच अभिमान आहे कि आमच्यात तरी धर्मभेद ,जातीभेद आजपर्यंत आले नाहीत.

एकमेकांच्या धर्माचा आदर राखुन मित्रत्वाचे संबंध जपता येतात....

३१ डिसेंबरच्या शुभेच्छा आणि आपण

हल्ली हे फ्याड फार जोरात आहे. हिंदूच राहणार , कट्टर हिंदू .. कापून काढू इत्यादी इत्यादी . काही प्रश्न पडले
१. मला ३१ डिसेंबरच्या शुभेच्छा देण्याची सक्ती केली होती काय ? किंवा पाडव्याला शुभेच्छा दिल्यास हत्तीच्या पायाखाली देण्याचा रिवाज होता काय ? म्हणजे जसे श्राद्ध  वगैरे करणे म्यांडेटरी असते तसे ..
२ . मी इतके दिवस हिंदू होतो हे किती जणांना माहित होतं
३. मी इतके दिवस हिंदू आहे यामुळे किती जणांना फरक पडला ?
४. मी उद्या हिंदू राहणार नाही (जबरदस्तीने वगैरे ) याची कितपत शक्यता आहे ?
५. मी उद्या हिंदू नाही राहिलो (किंबहुना नाहीच राहिलो ) तर किती जणांना फरक पडेल ?
६. मला एवढाच हिंदू असल्याचा पुळका आहे तर मी फेसबुक नावाचे नॉनहिंदू प्रोडक्ट का वापरतो ?
७. भारताने ( पक्षी हिंदूंनी ) जगाला शून्य सोडून काय दिले आहे हे चटकन ( आणि गुगलुनही) का सापडत नाही ?
८. मी नॉनहिंदू कंपनी मध्ये काम करतो , माझा क्लायंट नॉनहिंदू आहे थोडक्यात माझी रोजीरोटी नॉनहिंदू आहे , मग मी काय करावे ? गोमुत्र पिऊन काम भागेल काय ?
९. माझ्या भोवतालची ९९.९९% गोष्ट नॉनहिंदू आहे, उदा.फोन ,कम्प्युटर , टीव्ही , फ्यान , गाडी ... अंडरवेयर. इतकंच काय , बऱ्याचदा आजारी पडल्यावर मला गैरहिंदू औषधांचाच सहारा घ्यावा लागला. एलीयोपथी आणि आधुनिक उपचार भारतात येण्यापूर्वी भारताचा डेथरेट काय होता हे एकदा चेकवावे.
१०. आपल्याकडे लाकडी फाळ आणि जनावरांच्या सहाय्याने शेती करत. लोखंडी फाळ वापरल्यास विषबाधा होते असा एक हिंदू समज होता. आधुनिक उपकरणेही पाशिमात्य देण आहे. तीही त्यागावी काय ??

थोडक्यात प्रामाणिकपणे १००% कट्टर हिंदू म्हणून जगायचे असल्यास माझ्याकडे (माझ्यालेखी रद्दी असणारे ) वेद, (बिनकामाची) गीता , आणि तो भारतीयांनी दिलेला शून्य .. इतकेच हातात राहील . मग मी अश्मयुगीन जीवन जगेन. चालेल का मला ? बाकी यात हिंदू असल्याची लाज वाटणे किंवा कमीपणा वाटणे असली कुठलीही भावना नाही ही आणि एक बळेच थोपलेली रट असते. म्हणजे हेच ठरवणार, आम्ही सांगतो त्यात अभिमान बाळगा, अन्यथा तुम्हाला त्याची शरम / लाज वाटते वगैरे.

असो, हल्ली तसाही पंचवार्षिक मूर्खोत्सव चालू राहणार आहे.  आणि हे अस काही ऐकवल्यावर बिनबुडाच्या धार्मिक अस्मितेच्या बाता हाणायच्या :)

अरे गर्वसे कहो  ..

.. पोस्टेड फ्रॉम फेसबुक ( अ मार्क झुकरबर्ग ज्यु कंपनी )

Wednesday, 28 December 2016

मत मांडण्याचा अधिकार फक्त मोदी भक्तांनाच आहे का ?*

१९९८ ला मी माझ्या पत्रकारितेस प्रारंभ केला .जवळपास आज १८ वर्षे झाली .सुरवातीस काही काळ वार्ताहार म्हणूण काम केले.२००२ ते २००६ पर्यंत उपसंपादक म्हणूण काम केले .२००६ ते आजतागायत संपादक म्हणूण काम करतो आहे .या संपुर्ण काळात माझी बांधिलकी केवळ या मातीशी व सत्याशी राहिली आहे.कधी कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याच्या वळचणीला जावून काम केले नाही.कुणाची तळी उचलली नाहीत .परखडपणे जे सत्य असेल ते मांडत राहिलो.देशापेक्षा कुणी नेता किंवा पक्ष कधीच मोठा वाटला नाही . *काँग्रेसच्या सत्ता काळात काँग्रेसवर ,त्यांच्या बहूतेक प्रमुख नेत्यांच्यावर सडकून टिका केली आहे .राष्ट्रवादी पक्ष व त्यांच्या नेत्यावरही टिका केली आहे .सेना मनसे ,डावे, पुरोगामी कुणाला सोडले नाही.* देशहिताचा निकष डोळ्यासमोर ठेवून लिहीले.व्यक्तीगत स्वार्थ ,राग ,लोभ याचा कधीच विचार केला नाही ." शेतकर्यांचा कैवारी नव्हे वैरी , शरद पवारांना म्हातारचळ लागले का ?,वगैरे लेखातून शरद पवारांच्यावर अतिशय घणाघाती टिका केली .अजित पवारांनी धरणाच्या पाण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यावर "अजितराव धरणात नको काकांच्या कानात मुता " या मथळ्याचे सणसणीत संपादकीय लिहीले .शिवराज पाटील चाकुरकर केंद्रात गृहमंत्री होते .तेव्हा बाँबस्फोट झाला होता .ते बाँबस्फोटाच्या स्थळी नटून थटून गेले .त्यावेळी " हा तर महाराष्ट्राच्या मस्तकावरचा कलंक " या मथळ्याचे संपादकीय होते.राहूल गांधी महाराष्ट्राच्या योगदानाबाबत बोलले तेव्हा " बेट्या इतिहास वाच " या मथळ्याचे परखड संपादकीय होते.आझाद मैदानावर ज्यावेळी रझा अकादमीने दंगल केली व सरकारने कारवाई केली नाही .तेव्हा "आर आर सुंता झाली काय ? "या मथळ्याचे अतिशय परखड संपादकीय लिहीले आहे.काँग्रेसच्या एका मंत्र्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केल्यावर त्याला नागडं उघडं करणारी लेखमाला एक महिनाभर वज्रधारीतून सुरू होती .असे शेकडोवेळा लिहीले असेल.हे लिहीत असताना सरकार कुणाचे आहे ,पक्ष कोणता आहे ? नेता कोणता आहे ? हे कधीच पाहिले नाही. पाहिले फक्त व्यापक देशहीत. *हे सगळे लिहीले पण आपला आवाज गुदमरल्यासारखे कधी झाले नाही.आपली मुस्कटदाबी होतेय असे कधी वाटले नाही पण आज तसे वाटते आहे.* कधी कधी वाद व्हायचे ,क्वचीत एखादा अती शहाणा धमकवायचा.पण आवाजच बंद झाला पाहिजे ,विरोधात लिहीलेच नाही पाहिजे असा प्रयत्न कुणी केला नाही.त्यावेळी काँग्रेस सरकारच्या विरोधात लिहीले म्हणूण भाजपा समर्थक ,गद्दार ,देशद्रोही अशा उपाध्या कोणी बहाल केल्या नाहीत . आज मात्र चित्र वेगळे आहे .या देशात मत मांडायचा ,टिका करावयाचा अधिकार फक्त मोदी समर्थकांनाच आहे की काय ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही .कारण त्यांनी कुणाला काहीही म्हंटले तर चालते .ते सर्व संस्कृतीत ,सभ्यतेत बसते .मग ते कितीही असभ्य असले तरी .मोदी समर्थक सोडून बाकी कुणाला विरोधात बोलायचा, लिहायचा हक्क नाहीच .असे अघोषीत वातावरण निर्माण केले जात आहे .लिहीले तर बरीच भक्तमंडळी शिव्या घालते.देशद्रोही ठरवते ,काँग्रेसचे हस्तक ,केजरीवाल समर्थक ठरवून मोकळी होते. काही मोदी समर्थक खुप संयमाने बोलतात .विचाराला विचाराने वाद घालतात .पण बर्यापैकी मंडळी अकलेशी पिढीजात वैर असल्यासारखे बोलतात. *बर्याचवेळा निट न वाचताच वाद घालतात.ते मोदींचे समर्थक आहेत याचा अर्थ मोदींनी त्यांना देश सातबार्यावर लिहून दिला आहे किंवा मोदी या देशाचे मालक आहेत व हे त्यांचे वारस आहेत. अशाच मानसिकतेत ते वावरत आहेत.देशहिताचे फक्त आपल्याला व मोदींनाच कळते .बाकी सगळे बेअक्कल आहेत .शिवाय देशभक्तीचे टेंडर यांनीच भरले आहे.आणि मोदींनी यांनाच ठेका दिलाय .या मानसिकतेत हे आहेत.देशभक्ती म्हणजे काय तर हे जे म्हणतात तीच देशभक्ती ,मोदी जे करतात तेच देशप्रेम . बाकी सगळे देशाचे शत्रू आहेत* अशी रितसर घोषणा करणेच फक्त बाकी राहिले आहे. हा सगळा प्रकार लोकशाहीच्या मुळावर उठणारा आहे.आजवर जगातल्या प्रत्येक मोठ्या माणसाची वाट त्याच्याच आंधळ्या व मुर्ख भक्तांनी लावली आहे.हा इतिहास आहे.मोदींना जर या देशात काही वेगळे करावयाचे असेल तर हेच मोदींचे आंधळे भक्त मोदींच्या कामाची वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीत .स्वताच्या झुंडशाहीतून मोदींची प्रतिमा मलिन केल्याशिवाय राहणार नाहीत.मोदींच्या कामातला सर्वात मोठा अडसर हीच आंधळ्यांची जत्रा ठरेल .यात शंका नाही.मोदींनी काळ्या पैशाला आवरण्यासाठी जेवढे प्रयत्न चालवले आहेत तेवढेच प्रयत्न या आंधळ्या भक्तांना आवरण्यासाठी करावेत. गेल्या  दोन अडीच वर्षात पाहतोय .येणार्या प्रतिक्रिया ऐकतोय .मोदी भक्त ज्या भाषेत बोलताहेत ,ज्या पध्दतीने बोलताहेत ते भयंकर आहे .खरेतर भक्त व्हायला अक्कल लागत नाही .पण पवित्र ह्रदय मात्र लागते .इथे भक्त मंडळी द्वेषाने ,तिरस्काराने भरली आहे.अकलेचा पत्ताच नाही पण ह्रदयातही पवित्रता नाही .याला काही अपवाद आहेत .पण बावळटांची गर्दी जास्त आहे. हम करे सो । मानसिकता अशीच राहिली तर घटनेचे व लोकशाहीचे अस्तित्व फार काळ राहणार नाही.कारण या  *अंध भक्तांना लोकशाही प्रक्रीयाच मान्य नाही.सत्य मांडायचेच नाही हे कसे काय ? मोदी सर्व देशासाठी करतायत तुम्ही का आडवे पडताय ? असा प्रश्न करून दमबाजी करणारे ,देशद्रोही ठरवणारे अनेकजन भेटले .नोटबंदीनंतरच्या गचाळपणाचा लोकांना होणारा त्रास मांडल्यावर अनेकांना राग आला.* पत्रकारांनी वास्तव लिहीणेे हा पत्रकारांचा धर्म आहे .तो धर्म मी निभावतो आहे .हा देश घटनेनुसार चालतो अन चालला पाहिजे .कारण देशात लोकशाही व्यवस्था आहे."लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही " ही लोकशाहीची व्याख्या आहे. प्रसिध्द तत्ववेत्ता व्हाॅलटेअर असे म्हणतो की, *"मला तुमचे मत मान्य असेलच असे नाही पण तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. अन त्या अधिकाराचे मी प्राणपणाने रक्षण करेन"*  इथे हे सांगितले तर कोण व्हाॅलटेअर ,त्याचा काय संबंध ? असे विचारले जाईल .मुळातच आहे ही घटणाच मान्य नाही .दुसर्यालाही काही मतं असू शकतात .हेच स्विकारले जात नाही . तिथे मत मांडण्याच्या अधिकाराचे व ते मांडणार्याचे रक्षण कोण करणार ?अशा स्थितीत  व्हाॅलटेअर कोण स्विकारणार व समजून घेणार ? भक्तांना हे कोण समजून सांगणार ?केवळ भक्तांनाच नव्हे तर त्यांच्या दैवतालाही हे समजवून सांगावे लागेल .कारण आडातच नसेल तर पोहर्यात कोठून येणार ?मोदी संसदेत जात नाहीत.त्यांना संसदीय चौकट पेलवत नाही.संसदेत उपस्थित राहात नाहीत .बहूमताच्या जोरावर विरोधकांचीच नव्हे तर संसदेची मुस्कटदाबी सुरू आहे .मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत .त्यांचे व आमचे काही वैर नाही .मोदींनी आमचा बांधही बळकावला नाही.आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे .पण म्हणूण त्यांच्या काही निर्णयाचा ,कामाचा फटका लोकांना होत असेल,त्याचा त्रास लोकांना होत असेल तर ते मांडणे गुन्हा आहे काय ? आम्हीही देशहिताचाच विचार करतो .त्याच विचारापोटी  सरकारच्या,प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणूण देतो.आमचेही या मातीवर निस्सिम प्रेम आहे .मग आमच्या देशप्रेमावर शंका घेणारी ,आम्हाला देशद्रोही ठरवणारी  ही बांडगुळं कोण  ? देशभक्तीची सर्टीफिकेट वाटण्याचा अधिकार ,ठेका यांना कुणी दिला ? बहूमताच्या घमेंडीत इंदीरा गांधीनी देशात आणीबाणी लादली .लोकांनी ते सरकार उलथवून टाकले.मोदी भक्त असेच मग्रूरी करत राहिले तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही .याचे भान मोदींच्या भक्तांना ठेवावे लागेल. लोकशाहीत कोणतीही सत्ता निरंकुश असेल तर बिथरल्या शिवाय राहत नाही .जे इंदिरा गांधींचे झाले तेच मोदींचे होणार का ? हा प्रश्न आहे.पण गमत्तीचा भाग म्हणजे मोदी बिथरण्याधी त्यांचे भक्त बिथरले आहेत .त्यांनी संयमाने राहिले पाहिजे.एखाद्याचा विचार पटत नाही तर तो मुद्याने खोडून काढावा .सदर लेखाचा प्रतीवाद करणारा दुसरा लेख लिहावा .पण देशद्रोही ,गद्दार ,काँग्रेसी वगैरे भाषा का ? आपण एका दावणीला आहे याचा अर्थ प्रत्येकजन असतोच असे नाही .मतं पटत नसतील तर संयमाने खुषाल खोडून काढा ना ! पण मुद्दयावर न बोलता देशभक्तीचे डोस दुसर्याला पाजू नये.कारण या मातीवर प्रत्येकाचेच प्रेम आहे .आपल्याच देशात आपल्यालाच देशद्रोही म्हंटल्यावर वेदना होतात .जिभ उचलून टाळ्याला लावण्याधी अकलेचा उपयोग केला तर बरे होईल.
*- दत्तकुमार खंडागळे*
*संपादक- वज्रधारी*

Monday, 26 December 2016

एक-एक को क्यों गालियां देते हो, ग्लोब पर ही बुर्का डाल दो न मुबारक अली

एक बार फिर से इस्लाम ख़तरे में है. एक बार फिर मज़हब मरने की कगार पर पहुंच गया है. एक बार फिर ज़हनियत का कचरा कूड़ेदान से उबल-उबल कर बाहर गिर रहा है. एक बार फिर दीन की दुकान का बदसूरत इश्तेहार मार्केट में है. हज़ारों हज़ार बार की तरह, एक बार फिर किसी औरत के लिबास ने मुल्लाशाही की चूलें हिला दी हैं.

क्रिकेटर मुहम्मद शमी ने अपनी पत्नी के साथ एक तस्वीर क्या शेयर की, मज़हब के रखवालों का हुजूम टूट पड़ा है उनपर. चुन-चुन के इस्लाम सिखाया जा रहा है. उनकी फेसबुक पोस्ट पर लोगों ने इतने ऊट-पटांग कमेन्ट किए हैं कि शर्म भी मुंह छिपाकर पड़ी होगी कहीं.

कुछ एक कमेंट्स मुलाहिज़ा फरमाइये.

‘तुम मुस्लिम हो और अच्छी तरह जानते हो कि औरत को कैसे रखा जाता है, ये शोभा नहीं देता’
‘शर्म करो आप एक मुस्लिम हो, बीवी को परदे में रखो. कुछ सीख लो अमला से’
‘शर्म आनी चाहिए शमी, मरना है एक दिन ये मत भूलो. बीवियों को कैसे रखा जाए अपने साथी क्रिकेटर पठान से सीखो’
‘तुम्हारी वजह से सारा इस्लाम बदनाम हो रहा है’
‘क्या आपको अल्लाह और रसूल का डर नहीं है?’
‘शमी भाई, बीवी को परदे में रखो, अभी तो ये खुली चॉकलेट के जैसी है’
‘आर यू ट्रू मुस्लिम? शेम ऑन यू’
‘तुम्हारा तो बस नाम मुस्लिम है, काम तो गैरों वाले है’

और पता नहीं क्या क्या! सारे तो लिखे भी नहीं जा सकते किसी पब्लिक प्लेटफार्म पर. एक आदमी ने तो ये तक दावा किया कि मॉडल रह चुकी शमी की पत्नी हसीन जहां का आधे कोलकाता से अवैध संबंध रहा है.

भाई हो कौन तुम लोग? एलियन हो? मंगल ग्रह से आए हो? देश, समाज, दुनिया से बिल्कुल कटे हुए हो? हदीसों के हवाले से ही हांकोगे दुनिया को? आपको पता भी है आप अपने ही मज़हब का मज़ाक बना रहे हो? किसको क्या पहनना है ये जब उसकी व्यक्तिगत चॉइस है, तो आप क्यों हर औरत के पीछे बुर्का/हिजाब ले कर दौड़ लगाते हो? पूरी दुनिया को ही काला-लबादा ओढ़ा दो भाई! ढंक दो ग्लोब को. अल्लाह अल्लाह खैर सल्ला.

सुन्नती लाइफस्टाइल का शोर मचाने वाले तमाम मज़हबी लड़ाके अपनी सहूलियत के लिए तो हदीसों को बायपास करने से नहीं चूकते. यहूदियों को एक सांस में छत्तीस गालियां देते हुए उन्हीं का बनाया फेसबुक मज़े से चलाते हैं. लेकिन जब ‘मसला-ए-लिबास-ए-औरत’ आ जाता है, इंची टेप कान पर धरे कूद पड़ते हैं. क्या पहनना है, क्या सुनना है, औरत को कैसे रखना है इन सब कामों की ‘आदर्श आचार संहिता’ है इन लोगों के पास. नबियों के, पैगम्बरों के हवालों से साबित कर के दम लेते हैं कि औरत है ही जहन्नुम की मुस्तहक़. सारी बदबख्तियां जनाना कौम की देन है. ये नहीं समझते कि इस क्रम में उनका खुद का मज़हब जी भर के ज़लील हो रहा है.

शमी की फेसबुक पोस्ट को लोगों ने ख़ूब शेयर किया. ये कहते हुए कि कमेंट्स पढ़िए. ना सिर्फ मज़ाक उड़ाया जा रहा है बल्कि जम के मजम्मत भी हो रही है. ‘टायर पंक्चर लगाने वालों की मानसिकता’ जैसे जुमले उछल रहे हैं मुसलमानों के लिए. अव्वल तो वैसे ही इस्लाम की छवि दागदार है, ऊपर से ये मूढ़ता का जाहिर प्रदर्शन मुसलमानों को और ही काट के रख देगा समाज की मुख्यधारा से.

अक्सर सोशल मीडिया में ट्रोल्स की महिमा का बखान हुआ करता है. वो लोग जो संगठित होकर किसी पे हमला करते हैं. कहा जाता है कि शुद्ध राजनितिक फायदों के लिए ट्रोल्स को ऑनलाइन सेना की तरह इस्तेमाल किया जाता है. सत्ता-पक्ष की ऐसी ही सेनाओं का ज़िक्र अक्सर सोशल मीडिया के गलियारों में सुनाई पड़ता है.

उन्हें तो चलो कोई पॉलिटिकल बैकिंग होगी लेकिन इन्हें कौन संचालित करता है? ये तो सोच का इश्तेहार है. व्यक्तिगत सोच का. ये उतना ही या शायद उससे ज़्यादा ख़तरनाक है. वो राजनितिक मकसद से किया हुआ संगठित हमला है. ये आपका वो विश्वास है जो ना सिर्फ आधी आबादी के प्रति क्रूर है बल्कि मज़हब के लिए भी शर्म का बायस बन रहा है. इस रैंडम ट्रोलिंग का मतलब तो यही हुआ कि मुसलमानों में एक बड़ा, नहीं, नहीं…  बहुत बड़ा वर्ग अब भी औरत/पहनावा/खान-पान इसी सब में उलझा हुआ है.

ऐसी हरकतों से तमाम मुस्लिम कौम का चेहरा दागदार होता है. गधे-घोड़े एक ही लाठी से हांक लिए जाते हैं. कुछ लोगों की ट्रोलिंग मज़हब की तमाम बुनियादी शिक्षाओं पर सवालिया निशान बनकर रह जाती है. मेरी क्रिसमस बोलने से, दिवाली की शुभकामनाएं देने से, जिस धर्म की नींव दरकती हो तो उसके अनुयायियों को फिर धर्मनिरपेक्षता का आग्रह करने का क्या हक़ बचा? इस देश का सेक्युलर फैब्रिक वैसे ही नाजुक हुआ जा रहा है. उसे बचाए रखने की ज़िम्मेदारी सबकी - आई रिपीट, सबकी - है.

मुबारक अली

मुंहफट मुबारक

thelallantopm@gmail.com दिसंबर 25, 2016 02:38 PM 


Sunday, 25 December 2016

दंगल- पराग

" भारताचे २०१६ चे एकूण बजेट १९ लाख , ७८ हजार , ६० करोड .(१९,७८,०६०)  त्यातील क्रीडा या विभागासाठी १५९२ करोड  म्हणजे एकूण बजेट च्या ०.०८ टक्के . आता या १८९२ करोड पैकी ऑलम्पिक साठी ३० करोड . म्हणजे ऑलम्पिक या खेळासाठी आपला देश ०.००१ टक्के पैसे खर्च करतो .

त्याचवेळी ऑलंपिक साठी , ग्रेटब्रिटन ३०५ करोड , ऑस्ट्रेलिया २२३ करोड , कॅनडा ९२ करोड , एवढा खर्च केला .

त्याचवेळी ,

सरदार पटेल पुतळा एकूण बजेट ३००० करोड . . त्यातील २०० करोड २०१६ च्या बजेट मध्ये जेटली नि गुजराथ साठी ठेवले .

शिवस्मारक ३८०० करोड .

यातून आपले खेळाडू ऑलम्पिक ला जाणार आणि मेडल नाही मिळाले कि शिव्या खाणार .

आणि मग सुरु होते एक 'दंगल' . . .  तुमच्या आमच्या मनामनात . . . ती घुमायला लागते . . आणि मग कोणतरी . . बबिताकुमारी . . दीप . . साक्षी . .  अभिनव . . जन्माला येतो . या सगळ्या व्यवस्थेला फाट्यावर मारून .

या सर्वांचा निर्माता . . या सगळया व्यवस्थेवर राग काढतो . . . त्या साठी तो सकारात्मक मार्ग निवडतो . . आणि तो असतो " दंगल " घडवण्याचा .

या दंगलीत एक .. बाप माणूस उतरतो . . . प्रचलित समाजाचे कचकड्याचे कायदे कानून तुडवतो आणि भारताला पहिल्यांदा महिला गोल्ड मेडल . . आणि मेडल ची साखळी च करून देतो .

जर . . मनात खदखदत असेल तर या "दंगल" चा एक भाग बना .
जर . . मुली असतील आणि मुलगा नसेल तर या " दंगल " भाग बना ,
जर . . मनात , "देशभक्ती " कशी असते ते बघायचे असेल तर या " दंगल" चा भाग बना ,
जर . . परफेक्शनिस्ट . . ची व्याख्या नीट करायची असेल तर या " दंगल " चा भाग बना ,
जर . . आयुष्याचे दिग्दर्शन , कॅमेरा , संवाद , पटकथा याचे प्रश्न असतील तर  या " दंगल " चा भाग बना ,
जर . . बहिष्काराच्या पलीकडे माणूस काय असतो ते बघायचे असेल तर या 'दंगल " चा भाग बना ,
जर . . एका  'स्वप्ना '' चा प्रवास कुठून सुरु होतो ते बघायचे असेल तर या " दंगल " चा भाग बना ,

संपूर्ण "दंगली " ला सलाम . . . .

आमिर . . तू काय चिज आहेस ते . . सतत दोन महिने . . एबीपी माझा वर " पाणी " संकल्पना राबवून दाखवून दिलेस आणि आज आमच्या मनातील , " दंगली  " चा सर्वोच्च हिरो बनलास .

तुला साष्टांग नमस्कार .

- पराग

Friday, 23 December 2016

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या कालावधीत ११९८ वेळा भाषणे दिली पण जाहिरातबाजी नाही केली

तोल मोल के बोल ...

मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी २२ मे २००४ रोजी सुरु होवून दहा वर्षाच्या कारकीर्दीनंतर ते २६ मे २०१४ रोजी समाप्त होतो. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कालखंडातील एकूण दिवस आहेत ३६५४ दिवस!
या कालावधीत भारतीय जनतेची सर्वौच्च  प्रतिनिधीगृह म्हणून ओळखल्या जाणा-या लोकसभा आणि राज्यसभा यांच्या  समोर त्यांनी दिलेली एकूण भाषणे आहेत ११९८! 

डॉ. सिंग यांनी या काळात पंतप्रधान मंत्रालयाकडून  प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांची संख्या १६०० एवढी आहे. संसदेच्या सभाग्रहात कामकाज चालू असताना ते नियमितपणे हजेरी लावत आणि संसदेच्या  कामकाजाच्या एकूण दिवसांपैकी निम्मावेळ ते  कामकाजात सहभागी असत. या शिवाय या कालखंडात पंतप्रधान म्हणून त्यांनी दिलेल्या पत्रकार परिषदांची संख्या खूप मोठी आहे. या शिवाय विविध उद्घाटनाच्या वेळी, मंत्री मंडळासमोर, मुख्यमंत्री परिषदेसमोर आदि ठिकाणी केलेली आणि  दहा वर्षात झालेल्या विविध निवडणुकांदरम्यान केलेल्या भाषणांचा तपशील उपलब्ध होवू शकला नाही.  

या तुलनेत या १० वर्षाच्या कालावधीत त्यांच्या केलेल्या भाषणांना माध्यमांनी दिलेले कवरेज
टीव्ही अर्थात न्यूज चँनेल २.१%
इंग्रजी प्रसार माध्यमे ४.५%
हिंदी प्रसार माध्यमे ५%

दहा वर्षात पंतप्रधान पदाच्या कालखंडात देशातील जनतेच्या सर्वोच्च प्रतिनिधी गृहासमोर ११९८  भाषणे म्हणजे दर तीन दिवसाला एक भाषण  या प्रमाणात  त्यांनी जनतेला उद्देशून आपले विचार व्यक्त केले आहेत. यातील प्रत्येक भाषण मुद्देसूद ,नेमक्या आणि मोजक्या शब्दातील असून अत्यंत अभ्यासपुर्ण असे. या भाषणात कोठेही अक्रस्ताळपणा नाही की मोठ्याने आरडओरडा नाही ! ते बोलघेवडे नव्हते, त्यांचे मोजके शब्द म्हणजे तोल मोल के बोल होते. त्यांनी शांत आणि संयमी वृत्तीने कोणालाही न खिजवता , उथळ वैयक्तिक टीका टिप्पणी न करता केलेली भाषणे म्हणजे म्हणजे भारताच्या संसदीय इतिहासातील वारसा म्हणून त्याची नोंद आहे. मितभाषी असणे किंवा मोजके पण  समर्पक बोलणे म्हणजे मुके असणे असा समज असणा-यांना काय बोलावे! 

डॉ. मनमोहन सिंग संसदीय परंपरेचा सन्मान ठेऊन  जनतेशी सतत संवाद साधत असत . ज्यांच्या डोळ्यांना, कानांना आणि बुद्धीलाही झापडा लावल्या होत्या त्यांना डॉ. सिंग यांची भाषणे ऐकायला मिळाली नसणार हे उघड आहे! अशा झापडबंद लोकांना मनमोहन सिंग दहा वर्षात बोलत नव्हते असं वाटणं स्वाभाविक आहे. 
© राज कुलकर्णी.

Wednesday, 14 December 2016

गांधी–एकविसाव्या शतकासाठी*- रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

*गांधी–एकविसाव्या शतकासाठी*- रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
मोहनदास करमचंद गांधी ह्या मर्त्य माणसाच्या जन्माला २०१९ साली दीडशे वर्षे पूर्ण होतील, ह्यात विशेष काही नाही. विशेष बाब हीच आहे की ६८ वर्षांपूर्वी गोळीने ठार केल्यावरही हा माणूस मेला नाही. त्याच्या तथाकथित अनुयायांनी त्याच्या नावाचा जप करत त्याला प्राणाहून प्रिय असणारी मूल्ये पायदळी तुडवली. त्याला विरोधक नव्हे, तर शत्रू मानणाऱ्यांनी शक्य त्या सर्व उपायांनी त्याचे जीवन, कार्य व वारसा संपविण्यासाठी जंग जंग पछाडले. पण म्हातारा काही केल्या संपत नाही. शस्त्राने छेदल्या न जाणाऱ्या व अग्नीत न जळणाऱ्या त्याच्या (महान) आत्म्याच्या रूपाने तो देशात-परदेशात कोठे न कोठे सतत प्रकट होत राहतो. दलितपीडितांसाठी (त्याच्या शब्दात दरिद्रनारायणासाठी) लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा पुरवत राहतो. कधी तो जगड्व्याळ शक्तींशी एकाकी झुंजणाऱ्या हाताना बळ पुरवतो, तर कधी सभोवतालच्या अंधारात लुकलुकणाऱ्या आशेच्या दिव्यात रचनात्मकतेची तेलवात रुजवतो. तो जिवंत असताना स्वतःला आधुनिक म्हणविणाऱ्यानी ‘हे कालबाह्य, जुनाट मॉडेल आहे’ म्हणून त्याची टर उडवली होती, तर परंपरेचे  तथाकथित पाईक ‘हा आमच्या धर्म-संस्कृतीची उज्ज्वल परंपरा उद्ध्वस्त करायला निघाला आहे’ असे म्हणून त्याच्या विरोधात उभे ठाकले होते. पण त्या वेळी स्वतःला सनातनी हिंदू म्हणविणारा हा ‘ईश्वराला सत्य न मानता सत्याला ईश्वर मानणाऱ्या’ धर्माची मुहूर्तमेढ करीत होता, हे कोणाच्या ध्यानातही आले नाही.  आज जगभरात धर्माच्या नावावर अंधश्रद्धा, द्वेष व कट्टरता थैमान घालत आहेत, तर धर्म नाकारणारा ईहवादी (सेक्युलर) विचार उतरणीला लागला आहे. अशा वेळी धर्मापलीकडच्या मानवतेशी व अध्यात्मिकतेशी नाते सांगणारा त्याचा धर्मविचार सर्वधर्मियांना तसेच नास्तिकांनाही जवळचा वाटू लागला आहे. गेल्या शतकातील सारे जुने विचारव्यूह एकविसाव्या शतकात कालबाह्य ठरत असताना त्याच्या अनेक विचारांची सार्थकता, प्रासंगिकता मात्र काळाच्या छातीवर आपली तप्तमुद्रा कोरताना दिसते आहे. गांधी नावाच्या महात्म्याच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्याच्या विचारांचे पुनर्वाचन करण्यास एव्हढे कारण पुरेसे असायला हरकत नाही.
गम्मत म्हणजे २०१९ हे त्याच्या सहचारिणीच्या जन्माचेही दीडशेवे वर्ष आहे (कस्तुरबा त्यांच्यापेक्षा सहा  महिन्यांनी मोठ्या होत्या). पारंपारिक हिंदू पती-पत्नीच्या नात्यापासून सुरू  झालेल्या ह्या भावबंधाने नंतर कितीतरी रूपे घेतली. कितीतरी संघर्ष, पुरुषी अहंकार, धर्म-जातीचे संस्कार, अपत्यांवरील प्रेम व व्यापक समाजनिष्ठा ह्यांतील टक्कर .. हे सर्व पार करून परस्परांना समृद्ध करणारे सहजीवन त्यांतून आकाराला आले. कस्तुरबांनी मोहनदासशी केलेल्या चिवट संघर्षातून त्याला प्रेममय प्रतिकाराचे व स्त्रीशक्तीच्या आंतरिक शक्तीचे सूत्र सापडले. आज सर्वधर्मीय कट्टरपंथीय स्त्रीला ‘चूल, मूल व कर्मकांड’ ह्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्त्रीमुक्तीची चळवळ दिशाहीन झाली आहे व आधुनिकतेच्या वाटेवर फक्त देहात्मकतेचे चकवे आहेत. अशा वेळी दीडशे वर्षांचे बा-बापू आपल्याला स्त्री-पुरुषांमधील सुंदर निरामय  नाते उलगडून दाखवत आहेत.

म्हणूनच गांधी-विचारांशी नाते सांगणारे अनेकजण – व्यक्ती, संस्था, संघटना - गांधी-१५० अभियान सुरु करण्यासाठी धडपडत आहेत. हे अभियान म्हणजे २ ऑक्टोबर २०१९ रोजी महासांगता होणारी  मेगा- इव्हेंट नाही. हा सोहळा नाही कुणा व्यक्तीच्या गौरवाचा किंवा ‘आमचाच नेता थोर’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा. गांधींना अशा सोहळ्याची किंवा समर्थनाची गरज नाही. मात्र त्यांचा वारसा बनू पाहणाऱ्यांच्या दृष्टीने ही संधी आहे एकविसाव्या शतकाच्या आरशात स्वतःला व गांधी-विचारांना पारखून पाहण्याची. ह्या निमित्ताने गांधी-विचारांवर फसलेली काजळी पुसली जाईल, त्याचबरोबर सत्य-अहिंसा, अपरिग्रह अशा त्यांच्या तत्त्वांची पुनर्मांडणी केली जाईल. जागतिकीकरणाच्या रूपाने विकासाचे एकसाची प्रतिमान अमेरिकेपासून चीनपर्यंत लोकांना भुरळ घालत असताना त्यामुळे आपण आपली मुले-नातवंडे ह्यांच्यासाठी फक्त वैराण वाळवंटाचा वारसा शिल्लक ठेवणार आहोत हे भान जागविले जाईल. समतेचे मूल्य मानणाऱ्या सर्व विचारधारांशी संवाद करून एका व्यापक लढ्याची चाचपणी केली जाईल. ग्लोबल खेड्याचा भाग बनायच्या खटाटोपात शेजार व साथ  हरवलेल्या एकाकी माणसांना खरेखुरे नातेसंबंध जोडण्यास प्रवृत्त केले जाईल. मुख्य म्हणजे उद्याच्या जगाचे शिल्पकार असणाऱ्या तरुणांची गांधीच्या विचारांशी रुजवात करून दिल्या जाईल.

शनिवार १७ डिसेंबरला पुण्यात सुप्रसिद्ध विचारक व तिबेट सरकारच्या परागंदा सरकारचे माजी प्रधानमंत्री प्रा. रिम्पोचे  ह्यांच्या शुभ हस्ते गांधी-१५०च्या महाराष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ होत आहे. देशात, जगभरात, असंख्य माणसांच्या मनात ते पसरत जाईल आणि द्वेष-हिंसा, स्वार्थाने काळवंडलेल्या एकविसाव्या शतकात प्रेम, शांती व मानवतेचा प्रकाश उजळत जाईल, अशी आशा आपण ह्या प्रसंगी करावी काय?

ईमेल: ravindrarp@gmail.com