" भारताचे २०१६ चे एकूण बजेट १९ लाख , ७८ हजार , ६० करोड .(१९,७८,०६०) त्यातील क्रीडा या विभागासाठी १५९२ करोड म्हणजे एकूण बजेट च्या ०.०८ टक्के . आता या १८९२ करोड पैकी ऑलम्पिक साठी ३० करोड . म्हणजे ऑलम्पिक या खेळासाठी आपला देश ०.००१ टक्के पैसे खर्च करतो .
त्याचवेळी ऑलंपिक साठी , ग्रेटब्रिटन ३०५ करोड , ऑस्ट्रेलिया २२३ करोड , कॅनडा ९२ करोड , एवढा खर्च केला .
त्याचवेळी ,
सरदार पटेल पुतळा एकूण बजेट ३००० करोड . . त्यातील २०० करोड २०१६ च्या बजेट मध्ये जेटली नि गुजराथ साठी ठेवले .
शिवस्मारक ३८०० करोड .
यातून आपले खेळाडू ऑलम्पिक ला जाणार आणि मेडल नाही मिळाले कि शिव्या खाणार .
आणि मग सुरु होते एक 'दंगल' . . . तुमच्या आमच्या मनामनात . . . ती घुमायला लागते . . आणि मग कोणतरी . . बबिताकुमारी . . दीप . . साक्षी . . अभिनव . . जन्माला येतो . या सगळ्या व्यवस्थेला फाट्यावर मारून .
या सर्वांचा निर्माता . . या सगळया व्यवस्थेवर राग काढतो . . . त्या साठी तो सकारात्मक मार्ग निवडतो . . आणि तो असतो " दंगल " घडवण्याचा .
या दंगलीत एक .. बाप माणूस उतरतो . . . प्रचलित समाजाचे कचकड्याचे कायदे कानून तुडवतो आणि भारताला पहिल्यांदा महिला गोल्ड मेडल . . आणि मेडल ची साखळी च करून देतो .
जर . . मनात खदखदत असेल तर या "दंगल" चा एक भाग बना .
जर . . मुली असतील आणि मुलगा नसेल तर या " दंगल " भाग बना ,
जर . . मनात , "देशभक्ती " कशी असते ते बघायचे असेल तर या " दंगल" चा भाग बना ,
जर . . परफेक्शनिस्ट . . ची व्याख्या नीट करायची असेल तर या " दंगल " चा भाग बना ,
जर . . आयुष्याचे दिग्दर्शन , कॅमेरा , संवाद , पटकथा याचे प्रश्न असतील तर या " दंगल " चा भाग बना ,
जर . . बहिष्काराच्या पलीकडे माणूस काय असतो ते बघायचे असेल तर या 'दंगल " चा भाग बना ,
जर . . एका 'स्वप्ना '' चा प्रवास कुठून सुरु होतो ते बघायचे असेल तर या " दंगल " चा भाग बना ,
संपूर्ण "दंगली " ला सलाम . . . .
आमिर . . तू काय चिज आहेस ते . . सतत दोन महिने . . एबीपी माझा वर " पाणी " संकल्पना राबवून दाखवून दिलेस आणि आज आमच्या मनातील , " दंगली " चा सर्वोच्च हिरो बनलास .
तुला साष्टांग नमस्कार .
- पराग
No comments:
Post a Comment