इसी का नाम दोस्ती....
हिन्दू धर्म हैं जितना प्यारा उतना ही इस्लाम हैं।
जितनी पावन रामायण हैं उतनी पाक कुरान हैं.
हिंदी-उर्दू भाषा दोनों बहने हैं एक दूजे की.
हिन्दू से न मुस्लिम से दोनों से हिन्दुस्तान हैं.
मित्रांनो , हिंदू मुस्लिम धर्माबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते, पण माझे व माझ्या मित्रांमध्ये आजपर्यंत धर्म भेदभाव आलाच नाही.प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म आवडतोच. पण असे थोडेच आहे कि दुसऱ्या धर्माबद्दल आदरभाव नसतो.मित्रत्वाचे नात्यात तर धर्म आड येत नाहीच.माझे हे दोन्ही मित्र धर्माने मुस्लिम आहेत,शोहरब पठाण व सादिक तांबोळी.पण मी जेव्हा मंदिर पहायचे म्हणतो हे दोघे तयार असतात, ते त्यांच्या धर्माच्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ते करतातच,पण धार्मिक गोष्ट वेगळी व मित्रत्वाचे संबंध वेगळे.मंदिरात गेल्यावर
तेथील अनेक शिल्पांचे फोटो हे दोघेच घेत असतात.
मंदिराची माहिती करुन घेत असतात , मला तर अनेक दुर्मिळ शिल्प हे दाखवितात.मला या दोघांचा नक्कीच अभिमान आहे कि आमच्यात तरी धर्मभेद ,जातीभेद आजपर्यंत आले नाहीत.
एकमेकांच्या धर्माचा आदर राखुन मित्रत्वाचे संबंध जपता येतात....
No comments:
Post a Comment