Blog Archive

Friday, 23 December 2016

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाच्या कालावधीत ११९८ वेळा भाषणे दिली पण जाहिरातबाजी नाही केली

तोल मोल के बोल ...

मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी २२ मे २००४ रोजी सुरु होवून दहा वर्षाच्या कारकीर्दीनंतर ते २६ मे २०१४ रोजी समाप्त होतो. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कालखंडातील एकूण दिवस आहेत ३६५४ दिवस!
या कालावधीत भारतीय जनतेची सर्वौच्च  प्रतिनिधीगृह म्हणून ओळखल्या जाणा-या लोकसभा आणि राज्यसभा यांच्या  समोर त्यांनी दिलेली एकूण भाषणे आहेत ११९८! 

डॉ. सिंग यांनी या काळात पंतप्रधान मंत्रालयाकडून  प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांची संख्या १६०० एवढी आहे. संसदेच्या सभाग्रहात कामकाज चालू असताना ते नियमितपणे हजेरी लावत आणि संसदेच्या  कामकाजाच्या एकूण दिवसांपैकी निम्मावेळ ते  कामकाजात सहभागी असत. या शिवाय या कालखंडात पंतप्रधान म्हणून त्यांनी दिलेल्या पत्रकार परिषदांची संख्या खूप मोठी आहे. या शिवाय विविध उद्घाटनाच्या वेळी, मंत्री मंडळासमोर, मुख्यमंत्री परिषदेसमोर आदि ठिकाणी केलेली आणि  दहा वर्षात झालेल्या विविध निवडणुकांदरम्यान केलेल्या भाषणांचा तपशील उपलब्ध होवू शकला नाही.  

या तुलनेत या १० वर्षाच्या कालावधीत त्यांच्या केलेल्या भाषणांना माध्यमांनी दिलेले कवरेज
टीव्ही अर्थात न्यूज चँनेल २.१%
इंग्रजी प्रसार माध्यमे ४.५%
हिंदी प्रसार माध्यमे ५%

दहा वर्षात पंतप्रधान पदाच्या कालखंडात देशातील जनतेच्या सर्वोच्च प्रतिनिधी गृहासमोर ११९८  भाषणे म्हणजे दर तीन दिवसाला एक भाषण  या प्रमाणात  त्यांनी जनतेला उद्देशून आपले विचार व्यक्त केले आहेत. यातील प्रत्येक भाषण मुद्देसूद ,नेमक्या आणि मोजक्या शब्दातील असून अत्यंत अभ्यासपुर्ण असे. या भाषणात कोठेही अक्रस्ताळपणा नाही की मोठ्याने आरडओरडा नाही ! ते बोलघेवडे नव्हते, त्यांचे मोजके शब्द म्हणजे तोल मोल के बोल होते. त्यांनी शांत आणि संयमी वृत्तीने कोणालाही न खिजवता , उथळ वैयक्तिक टीका टिप्पणी न करता केलेली भाषणे म्हणजे म्हणजे भारताच्या संसदीय इतिहासातील वारसा म्हणून त्याची नोंद आहे. मितभाषी असणे किंवा मोजके पण  समर्पक बोलणे म्हणजे मुके असणे असा समज असणा-यांना काय बोलावे! 

डॉ. मनमोहन सिंग संसदीय परंपरेचा सन्मान ठेऊन  जनतेशी सतत संवाद साधत असत . ज्यांच्या डोळ्यांना, कानांना आणि बुद्धीलाही झापडा लावल्या होत्या त्यांना डॉ. सिंग यांची भाषणे ऐकायला मिळाली नसणार हे उघड आहे! अशा झापडबंद लोकांना मनमोहन सिंग दहा वर्षात बोलत नव्हते असं वाटणं स्वाभाविक आहे. 
© राज कुलकर्णी.

No comments:

Post a Comment