भारतात ७०००० पेपर आहेत.
४०००० चालू आहेत किंवा जाहिराती देण्याच्या लायकीचे आहेत अस समजा.
पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात द्यायला कुणाचे दर लाख रुपये तर कुणाचे ६० लाख रुपये.
सरासरी दहा लाख धरले आणि दहा दिवस जाहिरात दिली तर किती झाले ?
एक कोटी रुपये , ४०००० पेपरचे चाळीस हजार कोटी.
टीव्ही च्या भारतात सगळ्या मिळून ८८० वाहिन्या आहेत.
१० सेकंद जाहिरात द्यायला सरासरी खर्च एक लाख रुपये.रोज १५ मिनिट एकूण जाहिरात दाखवली तर रोजचा खर्च ९० लाख रुपये आणि अशी महिनाभर जाहिरात केली तर एक महिन्याचा खर्च २७ कोटी रुपये.
अश्या फक्त ७०० वाहिन्या धरल्या तर होतात १८९०० कोटी रुपये.
एका एफएम रेडियोवर जाहिरात करायला सगळ्या दिवसाचे मिळून पन्नास हजार धरले आणि महिनाभर जाहिराती केल्या तर झाले १५ लाख रुपये. अश्या १००० रेडियो वाहिन्या धरल्या तर १५० कोटी रुपये.
एक हेलिकॉप्टर भाड्याने घेतल तर तासाला भाड आहे दीड लाख रुपये.
२५ हेलिकॉप्टर महिनाभर रोज फक्त दहा तास वापरली तर भाड झाल किती ? ११२ कोटी रुपये.
खाजगी जेट विमानच भाड आणि रोजचा खर्च विचारूच नका.
इमेज बिल्डींग कंपनी , कॉम्पुटर प्रोग्राम्स , थ्रीडी सभा , वेगवेगळ्या मिरवणुका खर्च अजून हिशोबात घेतलेले नाहीतच.
बाकी फेसबुक पेजेस चा खर्च आणि फुटकळ खर्च वेगळा.
ढोबळ खर्च किती आहे ?
६०००० कोटी रुपये. साठ हजार कोटी रुपये फक्त.
“ अब कि बार मोदी सरकार “ , माननीय प्रधानमंत्री मोदिजींच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चाचा आकडा मी तसा दबकत मांडलाय.
आता पुढला हिशोब.
करपात्र देणग्या घेत असल्यामुळे वार्षिक विवरणपत्र दाखल करतात सगळे राजकीय पक्ष.
भाजपच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ ह्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा काय आहे , उलाढाल काय आहे ते तपासून पहा.
अतिशय चारित्र्यवान आणि देशभक्त लोकांचा पक्ष सगळा हिशोब चोख आणि पारदर्शक ठेवत असेलच.
हा मोटामोटी ६०००० कोटींचा खर्च जर ताळेबंदमध्ये आला असेल तर आपली काहीच हरकत नाहीये.
जर आला नसेल तर मग मात्र ,,,
अच्छे दिन कुणाचे आलेत ? कुणी गुंतवणूक केली होती आणि कोण व्याजासहित वसूल करतय सगळ समजून जाईल.
आता इथून पुढ ,
मोदी-भाजप-संघ सरकार सध्या भ्रष्ट्राचार करत नाही ह्या सगळ्या मोदी-संघ-भाजप समर्थकांच्या मताशी मीही सहमत होईन म्हणतो.
कारण जेव्हा मोदिजी विमानाने पृथ्वीप्रदक्षिणा होईल एवढे किलोमीटर फिरून रोज संध्याकाळी अहमदाबाद मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा घ्यायला यायचे तेव्हा त्यांचे विमानात बसताना फोटो बरच काही सांगून जातात.
खाजगी जेट विमान कुणाची होती आणि कोण विमान वापरायला देत होत हे उघड गुपित आहे.
आता त्या कंपनीने आपल्या मालकीच जेट विमान 5 रुपये किलोमीटर अस भाड्याने देऊ देत नाहीतर ५००० ने देऊ देत नाहीतर ५०००० ने , तो त्यांचा प्रश्न झाला.
मात्र नंतरच्या काळात जो परतावा त्या विशिष्ट उद्योगांना मिळायला लागला.
थेट मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत प्रधानसेवक झळकायला लागले तेव्हा कोड उलगडायला लागल.
आता पुढली बातमी वाचा,
एका परदेशी वृत्तसंस्थेचे पत्रकार अदानी ग्रुपसंबंधी चौकशी करायला आलेले असताना पोलिसांनी त्यांना अटकाव केला ,त्यांच्या कॅमेर्यामधील फोटो , फुटेज डिलीट केल आणि पत्रकारांची चौकशी केली.
अदानी समूहाला ऑस्ट्रेलियामध्ये कोळसा खाणीसाठी मिळालेली परवानगी वादात सापडलेली आहे.
वास्तविक पाहता तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या परदेशी उद्योगाला ऑस्ट्रेलियन नागरिकांनी विरोध करण्याच तस कारण नव्हत पण पर्यावरणाच्या मुद्द्यावर प्रकल्प अडचणीत आलेला आहे.
जर अदानी समूहाचे सगळे व्यवहार काम चोख असेल , कायद्याला धरून असेल तर आणि आलेल्या पत्रकारांची संस्था भारतात सगळ्या परवानग्या घेऊन आलेली असेल तर पोलिसांना अडचण कुठेय ?
आपल्याला बातम्या वेगवेगळ्या समोर आल्या तर त्याचे अर्थ समजत नाहीत.मात्र त्यांची संगतवार मांडणी केली तर मग अर्थ लागतात.
२०१४ साली ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना आता व्याज ,नफा ,मुद्दल सगळ वसूल करायचं आहे.
त्यासाठी एकवेळ परदेश दौऱ्यावर परराष्ट्रमंत्री नसल्या तरी चालतात मात्र विशिष्ट उद्योगसमुहाचे मालक चालक मात्र सोबत असतात आणि दौरे संपले कि ह्या विशिष्ट कंपन्यांचे व्यापारी करार मदार त्या त्या देशातल्या कंपन्या अथवा सरकारांशी होतात.
हे गौडबंगाल ज्यांनी भक्तीची झापड आणि ढापण लावलीत त्यांना समजत नसतीलही मात्र सर्वसामान्य लोकांना आपले आले नसले तरी अच्छे दिन नक्की कुणाचे आलेत हे नक्कीच समजतय.
बातमीच्या लिंक कॉमेंट मध्ये आहेत, त्याचबरोबर बातमी सोबत परदेशी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियाहि महत्वाच्या आहेत.
#अच्छे_दिन