रिपोस्ट
ओशोच्या एका मित्राने त्याला सांगितलं, माझी आई अतिशय धार्मिक आहे.
ओशो म्हणाले, अरे वा, ही फारच चांगली गोष्ट आहे. धार्मिक माणूस
अतिशय दुर्मीळ असतो. अशी व्यक्ती पाहायला मलाही आवडेल.
त्या मित्राघरच्या मुक्कामात आईने ओशोंना विचारलं, तू काय वाचतोयस?
ओशो एका परधर्माच्या धर्मग्रंथाचं वाचन करत होते. ते नाव ऐकताच आईचा
चेहरा क्रुद्ध झाला आणि ती म्हणाली, तुला आपल्या धर्मातली पुस्तकं नाही
मिळाली का वाचायला?
ओशोंनी त्याच्या मित्राला सांगितलं, मित्रा, तुझी आई अतीव सांप्रदायिक
आहे, ती धार्मिक नाही आणि हेच विचार राहिले, तर ती कधी धार्मिक बनू
शकेल, असं मला वाटत नाही.
No comments:
Post a Comment