Blog Archive

Friday, 9 June 2017

भारत स्वतंत्र झाला तो केवळ गांधीजींच्या मार्गाने नाही तर सशस्त्र क्रांतीकारकांचही त्यामध्ये योगदान आहे-सुनील तांबे

भारत स्वतंत्र झाला तो केवळ गांधीजींच्या मार्गाने नाही तर सशस्त्र क्रांतीकारकांचही त्यामध्ये योगदान आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादी. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची आझाद हिंद सेना. या क्रांतीकारकांनी शेकडो युवकांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली.
केवळ जुलमी इंग्रज अधिकार्‍यांवर सूड उगवणं हे हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं उद्दिष्ट नव्हतं. क्रांतीकारी जनलढा उभारण्यासाठी त्यांची धडपड होती. म्हणून तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त ह्या दोघांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. जुलमी कामगार कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी. त्यांनी फेकलेला बॉम्ब कमी क्षमतेचा होता आणि रिकाम्या बाकांवर टाकला.
नथूराम गोडसेने गांधीजींचा खून का केला खूप विचार करूनही समजत नाही. गांधीजींना ठार करून हिंदुराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे पडावं ह्यासाठी तो, आपटे, मदनलाल पहवा, करकरे, गोपाळ गोडसे, सावरकर ह्यांनी कोणती व्यूहरचना केलेली होती.....
रा.स्व. संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या नियतकालीकात एक लेख छापून आला होता. त्यामध्ये म्हटलं होतं गांधीच्या ऐवजी  नेहरूंची हत्या करायला हवी होती. त्याचा अर्थ असा की नेहरूंची हत्या झाली असती तर सेक्युलॅरिझम आणि लोकशाही भारतामध्ये रुजली नसती. गांधीजींची हत्या केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना जनमानसातून उतरल्या. हिंदु महासभेची जी काही राजकीय शक्ती होती ती संपुष्टात आली. हिंदुराष्ट्राच्या दिशेने चार पावलं पुढे टाकण्यासाठी संघ परिवाराला २१ व्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली.

No comments:

Post a Comment