जातीय आणि धार्मिक वादावर सापडलेली एक उत्कृष्ट प्रतिक्रिया!!
-
मुस्लिमांनी आपण दाखवलेला इतिहास स्विकारालाय
आपण #महाराज_हिंदुत्ववादीच दाखवले आणि #अफजलखान_मुस्लीमवादी मग त्यांच्यासाठी तो चांगला माणुसच होनार की...
आपण जर त्यांना हे पटऊ शकलो असतो की महाराज रयतेचे राजे होते, सर्वांचे होते, त्यांनी कधी भेदभाव केला नाही.. मुस्लिमांचाच काय कोणाचाही छळ केला नाही, ते मुस्लीम द्वेष्टे न्हवते...
तर चित्र वेगळं दिसेल..
कसं आहे, विनाकारण जर एखाद्या समाजावर टीका किंवा द्वेष केला तर समाजामध्ये भीती निर्माण होऊन समाज एकत्र येतो आणि कट्टर बनतो..
तुझंच ऊदाहरण घे तुला विनाकारण ब्राम्हणांना टार्गेट केलं जातं असं वाटतं म्हणून तु असा वागतोस, ही तुझीच पोस्ट होती...
मी सांगलीचा, हिंदु मराठा आहे.. सांगलीच्या दंगलीचं कारण फक्त एक पोस्टर न्हवतं संभाजी पवार आणि भिडे गुरुजीनी पण तेल ओतलेलं...
पोस्टर लावल्यानंतर मोटर सायकल रॅली मधला उन्माद, घोषणा, हिणवने हे पण बघायला पाहीजे होतं...
आपण #आपल्या_चुकांवर पडदा न टाकतां सत्य मान्य करुन, पुन्हा नव्याने मुस्लिम बांधवांना, महाराज मुस्लिम देष्टे न्हवते हे समजवावं लागेल...
बहुसंख्य मुस्लिमांना समजले आहे, पण त्यांना आपल्यातले बरेच हिंदूत्ववादी हिणवताना दिसतात...
कसं आहे शेवटी हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्रंच जगायचंय..
१५-१६ करोड लोक स्थलांतरीत होऊ शकत नसतात.
सोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही...
मग ऊगाच वाद करुन का रहायचं...?
थोड्याश्या राजकीय फायद्यासाठी किती हिन पातळी गाठायची...?
#गावाकडचा_मुस्लिम_समाज_आजही_कट्टर_नाही...
देवाचा गुलाल कपाळावर लावायला मागे पुढे पाहत नाहीत..
त्यांच्या बायका बुरख्या ऐवजी साडीतच दिसतील, गळ्यात मंगळसुत्र ही दिसेल...
#कट्टरपणा_हा_द्वेषातुन_निर्माण_होतो
कट्टरपणा कोणत्याही धर्माचा असो वाईटच, मग हिंदू असो वा मुस्लीम...
सेम जातीयवादाचं....
21 व्या शतकात जगाने एवढी प्रगती केलीय, आपला अण्वस्त्रधारी, संगणक प्रणालीत नंबर 1 वर आणि मंगळावर गेलेला देश पुन्हा शेणात आणि गोमुत्रात बुडवू नका..
खुप कष्टांनी, हजारो बलिदानाने स्वतंत्र झालेला, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, फुले, राजा राममोहन राय, गांधी ते आंबेडकर यांच्या विचारांनी सजलेला..
नेहरूंच्या विज्ञानवादी सर्वसमावेशक, शास्त्रींच्या समाजवादी, इंदिरेच्या खंबीर आणि राजीव ते मनमोहन सिंग यांच्या प्रगतिशील कर्तृत्वाने समृद्ध झालेल्या देशाला इराक, सिरीया, पाकिस्तान बनवू नका..
देशासाठी हे घातकच आहे... #ताळ्यावर_या
--
Courtesy: Avinash Pataskar
Edited by: अजय मक्तेदार
#शेयर_करा
No comments:
Post a Comment