#प्रश्न_१- चमत्कार करणारे बहुसंख्य बुवा हे भोंदू असतात हे खरे. पण काही दैवी पुरुषांना तरी चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त असते, हे खरे नाही काय?
उत्तर- चमत्कार करणारे बुवा, बाबा आणि तथाकथित दैवी पुरुष यांपैकी कोणालाही चमत्कार करण्याचे सामर्थ्य नसते. जे अशा चमत्काराचा दावा करतात ते केवळ हातचलाखी अगर विज्ञान यांच्या आधारेच चमत्कार करतात. दैवी शक्तीने नव्हे.
जगप्रसिद्ध बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक डॉ. अब्राहम कोवूर यांनी चमत्काराचा दावा करणाऱ्या जगभरच्या ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, मांत्रिक, देवऋषी, दैवी शक्ती प्राप्त असलेले तथाकथित स्त्री-पुरुष या सर्वांना १९६३ साली चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला जगभरच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्धी दिली होती. उभयपक्षी मान्य अशा व्यासपीठावर डॉ. कोवूर व त्यांचे सहकारी यांच्यासमोर चमत्कार सिद्ध करावा व हातचलाखी आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार डॉ. कोवूरांना असावा अशी त्यांची अट होती. या अटी मान्य करून जो चमत्कार सिद्ध करेल, त्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे कोवूरांनी जाहीर केले होते.
कोवूरांच्या मृत्यूपर्यंत हे आव्हान स्वीकारण्यास कोणीही पुढे आला नाही. यास अपवाद बंगलोरमधील एका डॉक्टरचा. डॉ. जी. व्यंकटराव याने प्रथम आव्हान स्वीकारण्याचे नाटक केले. पण चाचणीच्या अटी ऐकताच त्याने माघार घेतली व १००० रु. अनामत रक्कम गमावली.
आपण सिद्ध पुरुष आहोत असा दावा करणारे विलासबाबा, तरडगाव (जि.सातारा) व गोडबाबा (बारामती) हे हातचलाखीच करत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशी कितीतरी प्रकरणे संपूर्ण महाराष्ट्रात उघडकीस आणली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, आजही दैवी सामर्थ्याने चमत्कार करणाऱ्या स्त्री-पुरुषांची चाचणी घेण्यास एकवीस लाख रुपयांच्या आव्हान रकमेसह तयार आहे. अनुभवांती अं.नि.स.ची खात्री झाली आहे, की तथाकथित दैवी पुरुष हे हातचलाखी अगर विज्ञान वापरूनच चमत्कार करतात. चमत्कार हा बनवाबनवीचाच मामला असतो.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Blog Archive
-
▼
2017
(121)
-
▼
June
(17)
- संघात जाणारा आणि मोहन भागवतांसोबत बसून जेवण करणारा...
- बोला गुरुजी काकडा कुठे लावायचा?-ज्ञानेश महाराव
- आपण जर त्यांना हे पटऊ शकलो असतो की महाराज रयतेचे र...
- बोला गुरुजी काकडा कुठे लावायचा?-ज्ञानेश महाराव
- #प्रश्न_१६- संमोहित व्यक्ती काही दिवसानंतर देसंमोह...
- अस्सल ट्रोल होण्यासाठी काय लागतं?
- राहुल गांधी कि पप्पू-नामदेव अंजना ............
- आम्ही आणि आमच्या श्रद्धा! किती चूक, आणि किती बरोबर!
- गांधी नावाच्या बनियाचा गहिवर
- नेहरू_गांधी_घराणेशाही
- तुम्ही फक्त हिन्दू धर्मावरच टिका करता, हिम्मत असेल...
- #प्रश्न_२- ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वद...
- प्रश्न_१- चमत्कार करणारे बहुसंख्य बुवा हे भोंदू अस...
- सावरकरांचे माफीनामे-सुनील तांबे
- भारत स्वतंत्र झाला तो केवळ गांधीजींच्या मार्गाने न...
- सावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार ...
- डॉक्टर सावित्री'ची वटपौर्णिमा-वटपौर्णिमेमागील खरे...
-
▼
June
(17)
Friday, 9 June 2017
प्रश्न_१- चमत्कार करणारे बहुसंख्य बुवा हे भोंदू असतात हे खरे. पण काही दैवी पुरुषांना तरी चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त असते, हे खरे नाही काय?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment