Blog Archive

Friday, 16 June 2017

नेहरू_गांधी_घराणेशाही

होय छाती ठोकून सांगतो, आहे घराणे शाही....
भक्तांनो ...
     दाखवा तुमचा एक तरी अर्ध्वर्यू  अशी घराणे शाही जोपासणारा...आहे हिम्मत?

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही .....

1) मोतीलाल नेहरू यांनी मिठाच्या सत्त्याग्रहात 2 वर्ष तुरुंगवास भोगला! 

2) जवाहरलाल नेहरू यांनी  एकूण 9 वर्षाचा तुरंगवास भोगला

3) एक वेळ तर मोतीलाल आणि जवाहर दोघेही बापलेक कारागृहात होते ,त्यावेळी जवाहरलाल यांच्या मातोश्री स्वरूपराणी नेहरू यांनी कॉग्रेस च्या कामाची धुरा सांभाळली.

मोतीलाल नेहरू दिवंगत झाल्यावर, जवाहरलाल कारागृहात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत स्वरूपराणी नेहरू जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या व पोलिस मारहाणीत त्या मृत झाल्या म्हणून बातमी पसरली होती.  नेहरू कारागृहामधे असल्यामुळे आईला भेटायला जाऊ शकले नाहीत.

4) जवाहरलाल यांच्या पत्नी कमला नेहरूंनी प्रकृती साथ देत नसताना सुद्धा 1  वर्ष कारावास भोगला आणि आजार पण वाढले म्हणूनच त्यांची सुटका झाली ,

5)  मुलगी इंदिरा गांधी यांना  भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगावी लागली. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात, नवदांपत्य तुरूंगात होते.

6) जावई फेरोज गांधी यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान सहभाग घेतल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगली.

7) जवाहरलाल यांची सर्वात धाकटी बहिण कृष्णा हाथीसिंग यांनी 2  वर्षाचा कारावास भोगला. 

8) जवाहरलाल यांच्या पेक्षा धाकटी असणारी विजयालक्ष्मी पंडित यांनी 3  वर्षाचा कारावास भोगला .

9) विजयालक्ष्मी यांचे पती रणजीत सीताराम पंडित यांना 3 वर्षाची सजा झाली, त्यापैकी अडीच वर्ष त्यांनी भोगली कारण 1944 साली  कारागृहात शिक्षा भोगत असतानाच ते  मरण पावले .

10) मोतीलाल यांचा पुतण्या ब्रिजकुमार नेहरू आणि त्यांची पत्नी रामेश्वरी नेहरू यांनी ही 'भारत छोडो' आंदोलनात सहभाग घेतला .

ही देखील घराणेशाहीच आहे ना , या घराणेशाही बद्दल तर कोणीच बोलायला तयार नाही.

© राज कुलकर्णी.

No comments:

Post a Comment