महात्मा गांधी आणि डॉ आंबेडकर यांच्यात *थोडे मतभेद असले तरी त्यांचे विचार एकमेकांना पूरक होते आणि ते काही एकमेकांचे शत्रू नव्हते*
गांधींचा द्वेष करणारे किंवा न मानणारे अनेक गट होते जसे कि communist, संघ, आंबेडकरवादी व इतर अनेक पण सर्वाना हळू हळू उशिरा का होईना गांधी समजले आणि त्यांनी ते स्वीकारले वा त्यांचे योगदान मान्य केले even आंबेडकरांच्या अनुयायांमध्येही अनेक जणांनी गांधीजींचे महत्व मान्य केले ते बाळासाहेब आंबेडकर(प्रकाश) असो वा रावसाहेब कसबे आणि इतर अनेक जण
पण आंबेडकरांच्या अंधभक्तांमध्ये(अंधभक्त अनुयायी नसतात) गांधीद्वेषाचे प्रमाण प्रचंड दिसून येते. *गांधी म्हणजे भारतीय गरिबीचे जनक , गांधी म्हणजे मनुवाद आणि ब्राह्मणवादाचे कट्टर समर्थक , गांधी म्हणजे रंगिला गांधी (एका तथ्यहीन अश्लील पुस्तकावरून काढलेला संदर्भ), गांधी म्हणजे राक्षस ....इ अनेक विशेषणे गांधींना लावत असतात*. *आंबेडकर म्हणजे जगातील सर्वात मोठे विद्वान जे कधीच चुकले नाहीत आणि गांधी म्हणजे सर्वात वाईट माणूस ज्याने आयुष्यभर फक्त चुकाच केल्या* असे यांचे मत असते संघाचा व हिंदुत्ववाद्यांचा विरोध करणारे हे गांधीद्वेषासाठी हिंदुत्ववाद्यांसोबत एकत्रही येतात
अनेक वेळा तर हे गांधीहत्येचे समर्थनही करतात व नथुरामचे 55कोटी व इतर तथ्यहीन साहित्यही त्यासाठी दाखवतात. माझा एक मित्र म्हणाला कि *'जर नथुराम ब्राह्मण नसता तर सनातन्याच्या आधी यांनीच नथुराम चे स्मारक बांधले असते एवढा गांधीद्वेष यांच्या मनात आहे'* सोबत गांधीजींच्या अनुयायांनाही ते गांधीजींचे विरोधक असून आंबेडकरांचे समर्थक असल्याचा दावा करत तसले साहित्य हे लोक पसरवत असतात
उदा- गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील , कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीला हे लोक क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे गांधींची अहिंसा नाकारणारे, गाडगेबाबा म्हणजे आंबेडकरांच्या जवळचे, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे आंबेडकरांचे अनुयायी असे साहित्य अंधभक्त फॉरवर्ड करतात पण वरील तिघांचे साहित्य नीट वाचले तर तिघेही गांधींना मानणारे होते हे लक्षात येईल.
अंधभक्त हे विसरतात कि *गांधींवर 1934 पासून जे हल्ले झाले त्याचे मुख्य कारण अस्पृश्यता निवारण चळवळीचा वाढता प्रभाव हेच होते*
गोडसेने गांधीजींचा खून फक्त तो गांधीजींच्या विचारांशी असहमत होता म्हणून नाही केला तर पूर्ण देश गांधीजींचे ऐकत होता त्यामुळे केला
*गांधी नसते तर तर आंबेडकरांना सवर्णांकडुन तीव्र प्रतिक्रिया व विरोध मिळाला असता आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती*. *गांधीजींनी आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेत घेण्यासाठी प्रयत्न केले हे वास्तविक सत्यही सध्या हे लोक साफ नाकारतात*
कोणी कितीही हुशार असले तरी त्याला ते पद द्यायचे कि न द्यायचे हा निर्णय सरकरचा असतो आत्ताची पदेच बघून घ्या शिक्षमंत्री - स्मृती इराणी, FTII मधील गजेंद्र चौहान व इतर अनेक पदे यांच्याकडे त्या पदाची कुठलीही पात्रता नसताना त्यांना हे पद दिले आहे तर *रघुराम राजन* सारख्या अनेक विद्वानांना पात्रता व क्षमता असतांना त्यांचे पद काढून घेतले आहे
अंधभक्त स्वजातीच्या महापुरुषाचे उदात्तीकरण करणारी एक विनोदी गोष्ट पसरवतात ती अशी *नेहरू अनेक देश फिरून आले पण कुणीच त्यांना राज्यघटनेसाठी मदत करत नव्हते तेव्हा तेव्हा इंग्लंड च्या राणीने त्यांना सांगितले कि अरे जगातला सर्वात मोठा विद्वान आंबेडकर तुमच्या देशात आणि तुम्ही बाहेर फिरता आणि मग नेहरू पुन्हा भारतात आले आणि त्यांनी आंबेडकरांना घटना लिहिण्यास सांगितले"* असल्या प्रकारचे खोटे व तथ्यहीन साहित्य पसरवतात.
१९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचं अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं या प्रवेशामुळे गांधीजींची बहीण व अनेक जण त्यांच्याविरुद्ध गेले व आश्रम सोडूनही गेले आश्रमाचे fundingही थांबले पण तरीही गांधीजी मागे हटले नाहीत.
वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्यांचा मानसपुत्र नारायनभाई देसाई याच्या विवाहासही ते गेले नाहीत
अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत "हरिजन", हिंदीत "हरिजन सेवक", व गुजरातीत "हरिजन बंधु" ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. पण सध्या गांधीजींनी हरिजन म्हटले म्हणजे आम्हाला शिवी दिली असा काही प्रचार केला जातोय गांधीजींनी हरिजन हा शब्द देवाची माणसे म्हणून स्वीकारला होता पण हरिजन हि कर्नाटक मध्ये कोना एका गावात शिवी म्हणून वापरली जाते हे त्यांना माहीतही नव्हते. भारतात थोड्या थोड्या अंतरावर भाषा बदलते हे हि हे विसरून जातात. एकादशव्रतातही गांधीजींनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता.
*माझ्या मनात गांधी आणि आंबेडकर दोघांबद्दलही समान आदर आहे* दोघांचेही कार्य महानच आहे असो आपल्याकडे यासंदर्भात काही साहित्य असल्यास share करावे हि विनंती करून लेख संपवतो *कारण आज दोघांच्या विचारांच्या अनुयायांनी सोबतच लोकशाही व धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या सर्व लोकांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे नाहीतर येणारा काळ कठीण असेल*
संकेत मुनोत