सार्वजनिक जीवनात स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गांधीजींचे हे प्रार्थना प्रव अजूनही आपण आचरू शकलेलो नाही. सामाजिक शिस्त ज्याला म्हणतात तिचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. वाद्यांचा गोंगाट, रस्त्यावर फटाके फोडणे, जेवणावळीचे खरकटे वाटेल तिथे फेकणे या गोष्टी करताना आपण काही वावगे करतो याचेही बान आपल्याला नसते.
------------------------
६९. प्रार्थना प्रवचन
नवी दिल्ली,
ऑक्टोबर १३, १९४७
काल मी निर्वासित शिबिरांबद्दल काही उद्गार काढले होते ते इंग्रजीत संक्षेप करताना सुटले होते. मी त्यांना फार महत्त्व देत असल्यामुळे मी त्याबद्दल थोडे विस्ताराने सांगेन. आपल्याकडे जरी आपल्या धार्मिक वा इतर यात्रा भरत असल्या आणि कॉंग्रेसचे अधिवेशन व परिषदा होत असल्या तरीही एक राष्ट्र म्हणून आपल्याला छावणीतील जीवन जगण्याची सवय नाही. कॉंग्रेसची अधिवेशने, परिषदा आणि इतर मेळाव्यांमध्ये मी हजर राहिलो आहे. १९१५ सालच्या हरिद्वार येथील कुंभमेळ्यातही मी गेलो होतो. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या माझ्या सहकाऱ्यांसह मला तिथे भारत सेवक समाजाच्या छावण्यांमध्ये सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते. तिथे माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची अतिशय प्रेमाने काळजी घेण्यात आली याशिवाय त्याबद्दल अधिक काहीही माझ्याजवळ सांगण्यासारखे नाही. आमच्या लोकांच्या शिबिरात राहण्याची पद्धती पाहून कोणताही आनंद होऊ शकत नाही. आपल्यामध्ये सामाजिक आरोग्याची भावना नाही. परिणामी छावण्यांमध्ये घाण आणि कचरा गोळा होतो. त्यामुळे संसर्गजन्य व साथीचे रोग पसरण्याची भीती असते. आपले संडास वर्णन करण्याच्या लायकीचे नसतात. लोकांना वाटते की आपण कुठेही लघ्वी-परसाकड करू शकतो. इथपर्यंत की ते पवित्र नद्यांच्या काठांचीही पर्वा करत नाहीत. शेजाऱ्यापाजाऱ्यांची किंचितही फिकीर न करता कुठेही थुकण्याचा आपला हक्क जवळपास मान्य करण्यात आला आहे. आपली स्वयंपाकाची व्यवस्थासुद्धा याहून फारशी चांगली नाही. कुठेही गेलो तरी माशा आपले स्वागत करण्याकरिता सज्ज असतात. क्षणापूर्वी त्या कोणत्याही प्रकारच्या घाणीवर बसलेल्या असू शकतात व यामुळे त्या सांसर्गिक रोगजंतूंच्या चांगल्या वाहक असतात ही गोष्ट आपण विसरतो. राहण्याच्या व्यवस्थेची नीट योजना आखण्यात आलेली नसते. हे अतिशयोक्त चित्र नाही. आणि या छावण्यांमध्ये जो गोंगाट सहन करावा लागतो तोही दुर्लक्षिण्यासारखा नसतो.
व्यवस्था, योजना आणि संपूर्ण स्वच्छता याबाबतीत मी सैनिकी छावण्यांना आदर्श मानतो. मला सैन्याची आवश्यकता कधीही वाटली नाही. परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की त्यातून काहीही चांगले बाहेर पडत नाही. त्यातून आपल्याला अनुशासन, सामूहिक जीवन, साफसफाई आणि प्र्त्येक उपयोगी कामाला स्थान असेल अशा प्रकारे वेळेचे नियोजन करण्यात आलेले असते. अशा छावण्यांमध्ये मुळीच आवाज नसतो. ताडपत्र्यांखाली ते शहर वसवलेले असते व काही तासात ते उभारण्यात आलेले असते. आपल्या निर्वासित छावण्या त्या आदर्शापर्यंत पोहोचाव्या असे मला वाटते. मग पाऊस येवो अथवा न येवो तिथे गैरसोय होणार नाही.
जर या छावण्यांमध्ये तंबू लावण्यापासून सर्व काम सर्व लोकांनी स्वतः केली, त्यांनी जर स्वतः संडास साफ केले, झाडझूड केली, रस्ते तयार केले, नाल्या खोदल्या, स्वयंपाक केला, कपडे धुतले तर छावण्यांचा खर्च अगदी कमी होऊन जाईल. तिथे राहणारांनी कोणतेही काम कमी प्रतीचे समजू नये. छावणीशी संबंधित कोणतेही काम सारख्याच प्रतिष्ठेचे असते. हे काम कंटाळवाणेपणाने नाही तर जबाबदारीचे भान ठेवून सुज्ञ मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली त्वरित कृती करून केले जाते.
कांबळी आणि दुलया येणे सुरू आहे. येत्या हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्याकरिता आमच्याजवळ पुरेसे साहित्य आहे असे थोड्याच दिवसात म्हणता येईल अशी माला आशा आहे.
हरिजन, ऑक्टोबर २६, १९४७
-----------------------
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Blog Archive
-
▼
2016
(111)
-
▼
July
(22)
- महात्मा गांधी आणि डॉ आंबेडकर यांच्यात *थोडे मतभेद ...
- आता कुठे राहिलिय जातीव्यवस्था,?
- साम्प्रदायिकता और संस्कृति -मुंशी प्रेमचन्द
- संघ स्वातंत्र्य लढ्यात का सहभागी झाला नाही...
- RSS व शिवसेनेच्या शाखेत जात असे आणि मीही गांधीजींच...
- न्यायालयातील मराठी भाषा-राज कुलकर्णी
- सुपारी--राज कुलकर्णी
- उपोषणसुद्धा दानवी असू शकते
- कस्तुरबांबद्दलचा गांधींना वाटणारा हा आदरभाव किती ह...
- गांधींजीकडे फाळणीला विरोध करण्याकरिता आलेल्या लोका...
- भेकडांची हिंसा
- स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील गांधीजींची मन...
- देशात सर्वत्र खून, लूट आणि जाळपोळीचे वातावरण त्याल...
- द्रौपदी टाहो फोडते. भिष्मातार्य, द्रोणाचार्य वगैरे...
- वृत्तपत्रसृष्टीसंबंधी गांधीजींनी व्यक्त केलेले विचार
- स्वतंत्र भारतात सैन्य आणि पोलीस यांची काय भूमिका अ...
- गांधीजी स्वावलंबनाचा मार्ग
- सार्वजनिक संस्थेचा लोकांना एक तर उपयोग असतो वा नसत...
- भगतसिंगांसारख्या शहिदांचे मोठेपण आणि शौर्य आपल्याल...
- ईश्वराबद्दलची गांधीजींची कल्पना
- ताओमधील एक कविता - ७७. ईश्वरीमार्ग ईश्वरी मार्ग हा...
- सार्वजनिक जीवनात स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गांधी...
-
▼
July
(22)
Wednesday, 13 July 2016
सार्वजनिक जीवनात स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गांधीजींचे हे प्रार्थना प्रवच
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment