Blog Archive

Sunday, 31 July 2016

संघ स्वातंत्र्य लढ्यात का सहभागी झाला नाही...

*😡संघ स्वातंत्र्य लढ्यात का सहभागी झाला नाही..😡*

देशभक्तीचा अर्थ त्या संघवाल्यांनी सांगावा की ज्यांची स्थापना 1925 ला झाली...
पण ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात घण्टा सहभाग घेतला नाही...!
गांधीच्या नेतृत्वाखाली 1942 च अहिंसक आंदोलन असो वा इतर कोणतेही हिंसक-अहिंसक आंदोलन असो...संघाने कोणत्याही लढ्यात सहभाग घेतला नाही...!

*गांधींचा अहिंसक लढा संघाला मान्य नव्हता अस कारण जरी मान्य केलं...*
*तरी हिंसक मार्गाने तरी कुठे आंदोलन केले काय..?*
असेल तर पुरावा द्या..!

शालेय इतिहासाच्या पुस्तकात हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन...आझाद हिंद सेना...गदर पार्टी...राष्ट्र सेवा दल...या आणि अशा अनेक नुकत्याच जन्मलेल्या आणि हिंसक-अहिंसक दोन्ही मार्गांनी लढलेल्या संघटनांची नावे येतात पण 1947 च्या आधी 22 वर्ष स्थापन झालेल्या राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे नाव अजिबात येत नाही...!
*स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या एखाद्या आंदोलनात अटक झालेल्या स्वयंसेवकांची नावे सांगा...!*
*एक शहीद संघाचा दाखवा जो या लढ्यात फासावर गेला..!*
*एक संघवाला दाखवा ज्याने लढताना इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या...जो तिरंगा घेऊन धारातीर्थी पडला...!*
*एक स्वयंसेवक दाखवा की ज्याने इंग्रज अधिकार्यावर गोळ्या झाडल्या...?*
हां मला एक संघवाला आठवतोय की ज्याने गोळ्या झाडल्या...! पण इंग्रजावर नाही तर महात्मा गांधींवर...! गांधींचा मार्ग चूक की बरोबर हां पोस्टचा विषय नाहिये तर विषय आहे संघ का स्वतः का स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला नाही...?
आणि गांधीवर गोळ्या चालवू शकणाऱ्या नथुरामने एखाद्या इंग्रज अधिकार्यावर गोळी तर सोडा साधा दगडही का भीरकावला नाही,हां मोठा सवालच आहे...! मग नथुराम देशभक्त कसा...? आणि आजही नथुरामला देशभक्त मानणारे आणि त्याचं समर्थन करणारे संघवाले देशभक्त कसे काय असू शकतात...?

संघ त्यावेळी नविन संघटना होती...हे अगदी मान्य...पण तरीही 1942 च आंदोलन ऐन भरात असताना संघ 17 वर्षांचा होता...
1947 ला 22 वय असणाऱ्या संघाला 1925 पासून एकही आंदोलन करावेसे वाटले नाही काय...? भलेही ते हिंसक असो...!
आज सत्तेत असणाऱ्या संघाची शक्ती आजच्या इतकी त्याकाळी नक्कीच नसणार...ती कमी असणार...हे ही मान्य..!
पण भगतसिंग यांची हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन...सुभाष चंद्र बोस यांची आझाद हिंद सेना...करतार सिंग सराभा गदर पार्टी...नाना पाटिल यांचं पत्री सरकार...राष्ट्र सेवा दल...या आणि अशा अनेक नुकत्याच जन्मलेल्या संघटना शक्ती काहीच नसतानाही देशासाठी लढल्या की...मग 1947 च्या आधी 22 वर्ष स्थापन झालेला राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ का नाही लढला...?
*मुळात शक्ती कमी असणे हां गुन्हा नाही तर असलेली शक्ती न वापरणे हां गुन्हा आहे...!*

अहो...बारकी शेंबडी पोरं...घरातील बायका तिरंगा घेऊन बाहेर पडल्या...राष्ट्र सेवादल सैनिक शिरिषकुमार सारख्या लहान मुलांनी आंदोलन करताना इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या राव...!
*मग...आज देशभक्तीची भाषा बोलणारे संघवाले त्यावेळी कुठे होते...?*

दसर्याला गावागावात संचलन करणार्या स्वयंसेवकांनी *आजवर कधी स्वातंत्र्य दिन वा प्रजासत्ताक दिनाला संचलन का केले नाही...?*
*आणि संघाच्या शाखा आजवर हे दिन का साजरे करत नाहीत..?*
मग हे कसले देशभक्त...?
*का नाही घेतला संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग..?*

या सर्व प्रश्नांची पुराव्यानीशी कुणी उत्तरे देऊ शकेल काय...?

*स्वतः स्वयंसेवक आणि प्रचारक असलेले _नरेंद्र मोदी_ "मन की बात" मधून या प्रश्नांची उत्तरे नक्की देतील अशी आम्हा भारतीयांची आशा आहे...!*

(काही लोक हेडगेवार आणि अटल बिहारी वाजपेयी यांना स्वातंत्र्य सैनिक समजतात...
मुळात हेडगेवार आधी
कॉंग्रेस मधे होते...नंतर ते बाहेर पडले...त्याकाळी स्वातंत्र्य मिळवणे हाच कॉंगेसचा एजेंडा होता...कॉंगेसमधे असतानाही आणि बाहेर पडल्यानंतर आणि संघ स्थापनेनंतर त्यांनी काहीही केले नाही...!
संघ स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हता आणि अटल बिहारी वाजपेयी 1942 च्या लढ्यात फक्त आंदोलनाच्या गर्दीचा भाग होते...असं ते स्वतःच एका मुलाखतीत कबूल करताहेत...पुरव्यानिषी माहिती देणाऱ्या रिपोर्टची लिंक...
http://www.frontline.in/static/html/fl1503/15031150.htm )

*विचार तर कराल...?*

_🇮🇳जय हिंद_🇮🇳
_🇮🇳जय भारत🇮🇳_

- विनायक होगाडे
vinayak.hogade8@gmail.com

No comments:

Post a Comment