Blog Archive

Wednesday, 13 July 2016

भेकडांची हिंसा

आज आपण जी हिंसा पाहत आहो ती भेकडांची हिंसा आहे. शूरांची हिंसा म्हणूनसुद्धा एक प्रकार आहे. चार अथवा माच माणसांचे भांडण झाले आणि ते तलवारीने मेले तर त्यात हिंसा आहे परंतु ती शूरांची हिसा आहे. परंतु जेव्हा १०,००० सशस्त्र लोक निशस्त्र लोकांच्या गावावर हल्ला करतात आणि त्यांच्या बायकामुलांसह त्यांची कत्तल करतात तेव्हा ती भेकडांची हिंसा असते. अमेरिकेने जपानवर आपला अॅटम बॉम्ब टाकला. ती हिसा भेकडांची हिंसा होती. शूरांची अहिंसा ही पाहण्यासारखी गोष्ट असते. मरण्यापूर्वी मला ती अहिंसा पाहायची आहे. याकरिता आपल्यामध्ये आंतरिक शक्ती असली पाहिजे. हे वेगळेच शस्त्र आहे. लोकांच्या लक्षात जर त्याचे सौंदर्य लक्षात आले असते तर आज जी जिवित आणि वित्तहानी झाली आहे ती झाली नसती. - महात्मा गांधी, ४ जुलै १९४७च्या प्रार्थना प्रवचनमधून

No comments:

Post a Comment